Friday, April 18, 2025

DIO NEWS AMRAVATI 18-04-2025

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा

     अमरावती, दि. १८ : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शनिवार, दि.१९ एप्रिल रोजी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.
     दौऱ्यानुसार, सकाळी ११ वाजता समाज कल्याण कार्यालय सभागृहात आदिवासी विकास विभागाची आढावा बैठक घेतील. दुपारी १२.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, वैद्यकीय महाविद्यालय परिसर, मोर्शी रोड येथील शिक्षक मेळाव्यास उपस्थित राहतील. दुपारी २ वाजता समाज कल्याण कार्यालय सभागृहात सामाजिक न्याय विभागाची आढावा बैठक घेतील. दुपारी ३.३० वाजता एमआयडीसीचे अध्यक्ष किरण पातुरकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देतील. त्यानंतर दुपारी चार वाजता सोयीने नागपूरकडे प्रयाण करतील.
00000

ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा दौरा

     अमरावती, दि. १८ : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील हे दि. १९ आणि २० एप्रिल रोजी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.
     दौऱ्यानुसार, शनिवार, दि. 19 एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता चिखलदरा येथील शासकीय विश्राम गृह येथे आगमन होईल. रविवार, दि. 20 एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजता वन तलावास भेट देणार आहेत. तसेच, सकाळी 11 वाजता संभाव्य चारा लागवडीबाबत तहसिलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. सोयीने पाणीटंचाई असलेल्या गावांना भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी देखील करतील.
०००००

कुष्ठरोग प्रतिबंध, निर्मूलनावर दोन दिवसीय प्रशिक्षण

     अमरावती, दि. १८ : कोठारा लेप्रसी मिशन हॉस्पिटल आणि सहायक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग कार्यालयातर्फे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत अधिकारी आणि कर्मचारी यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण कोठारा येथे पार पडले. 'कुष्ठरोगासंबंधी अपंगत्व प्रतिबंध' यावर दि. १६ आणि १७ एप्रिल रोजी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
प्रशिक्षणामध्ये कोठारा लेप्रसी मिशन हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मिलिंद चव्हाण, आयएलईपी एनएलईपी कन्सल्टंट सुरेश धोंडगे आणि अलर्ट इंडियाचे श्री. अन्सारी यांनी कुष्ठरोगाचे विविध पैलू आणि प्रतिबंधात्मक उपायांवर मार्गदर्शन केले.
     प्रशिक्षणात प्रत्यक्ष रुग्णांची तपासणी, रोगनिदान यासारख्या बाबींचे प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हास्तरीय अवैद्यकीय पर्यवेक्षक दीपक गडलिंग यांनी प्रशिक्षणाचे महत्त्व सांगितले. अलर्ट इंडियाचे फिजिओथेरपिस्ट श्री. अन्सारी यांनी समाजामध्ये वावरताना 'लेप्रसी माइंडसेट' ठेवून लोकांकडे पाहण्याची गरज व्यक्त केली. लवकर निदान आणि उपचार झाल्यास कोणत्याही व्यक्तीला कुष्ठरोगामुळे होणारे संभाव्य अपंगत्व टाळता येऊ शकते, असे त्यांनी सांगितले. 
सहाय्यक संचालक डॉ. पूनम मोहोकार यांनी कोठारा लेप्रसी मिशन हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मिलिंद चव्हाण, पंचानन गोरैन, मिलिंद चांदेकर आणि त्यांच्या चमूचे आभार मानले.
00000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार