Friday, July 1, 2016

रोपे उपलब्धतेची माहिती
अमरावती दि 1 : वन महोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने सामाजिक वनीकरण विभागाने रोपाची उपलब्धता केली आहे. संबंधीतांनी आपआपल्या परिसरातील संपर्क साधून रोपे उपलब्ध करुन द्यावीत व मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी.
रोपे उपलब्धतेची माहिती
तालुका
रोपवाटीका
उपलब्ध रोपे
संपर्क अधिकारी
भ्रमणध्वनी क्र.
अमरावती
वडाळी
40,000
श्री. मोहतुरे, लिपिक
9420547664
मासोद
25,000
श्री. व्ही. व्ही. व्यवहारे, सा.व.म.
8390679407
वडाळी
10,000
श्री. शेख सलीम, वनपाल
9860220851
तिवसा
शिवणगांव
20,000
कु. एम. आर. मगर्दे, सहा. लागवड अधिकारी
8007109893
मोर्शी
पिंपळखुटा
22,000
श्री. आर. जी. पाचपोर, सा. व. म.
9881931504
पाळा
34,000
श्री. ठाकुर, वनरक्षक
9637655402
चांदुर बाजार
टोंगलापुर
22,000
श्री. बी. पी. गायकवाड, सहा. लागवड अधिकारी
9422914093
वरुड
जामथळ
22,500
श्री. एस. टी. तायडे, सा.व.म.
9623449404
धारणी
उतावली
9,500
श्री. आर. एस. मावसकर, सा.व.म.
9420076417
बोरी
50,000
श्री. एस. एन. गुल्हाने, वनपरिक्षेत्र अधिकारी
9373342180
गोडवाडी
40,000
श्री. एस. एन. गुल्हाने, वनपरिक्षेत्र अधिकारी.
9373342180
हिराबंबई
12,000
श्री. पी. आर. भुजाडे, वनपाल
9403152113
मध्यवती रोपमाळा
10,000
कु. डी. जे. चव्हाण, वनक्षेत्रपाल
9049017363
नांदगाव खं.
माहुलीचोर
27,700
श्री. के. टी. बलोदे, रोपवन कोतवाल
9421788410

भिवापुर
97,755
श्री. व्ही. व्ही. गंभीर, वनमजुर
9763179265
अचलपुर
वडगाव
27,000
कु. पी. आर. यावतकर, सहा. लागवड अधिकारी
8446721488
परतवाडा
9,000
कु. पी. आर. यावतकर
8446721488
वडगाव
9,64
श्री. डी. एच. वांगे, वनरक्षक
9420075018
अंजनगाव
खोडगाव
19,000
श्री. आर. एम. बुंदेले, सहा. लागवड अधिकारी
9767166994
चांदुर रेल्वे
चिरोडी
17,600
श्री. एम. बी. चोरपगार, सा. व. म.
9423621743
धामणगांव
बासलापुर
20,817
श्री. जे. डी. बलोदे, वनरक्षक
9823891672
परसोडी
5,600
श्री. बी. पी. लावरे, सा. व. म.
9403610903
दर्यापुर
दर्यापूर
9,000
श्री. के. बी. ढेंगे, सहा. लागवड अधिकारी
9604901309

एकुण
5,52,436




तालुकास समन्वयक अधिकारी
अ.क्र.
तालुका
समन्वय अधिकारी नांव व पदनाम
भ्रमणध्वनी क्र.
1
अमरावती
श्री. एच. पी. पडगव्हाणकर, वनपरिक्षेत्र अधिकारी
9850134474
2
मोर्शी
श्री. एस. डी. डगळे, वनपरिक्षेत्र अधिकारी
9892684266
3
वरुड
श्री. ए. डी. रिधोरकर, लागवड अधिकारी
9404370370
4
चांदूर रेल्वे
श्री. ए. एन. गावंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी
9423123063
5
धामणगांव रेल्वे
श्री. ए. आर. काळ, लागवड अधिकारी
9422937675
6
नांदगांव खं.
श्री. एम. एच. मोहिते, लागवड अधिकारी
9423879259
7
चांदूर बाजार
श्री. जी. एम. हिंगणीकर, लागवड अधिकारी
9730133043
8
अचलपूर
श्री. एस. की. बारखडे, वनपरिक्षेत्र अधिकारी
9404801506
9
चिखलदरा
श्री. जी. एम हिंगणीकर, लागवड अधिकारी
9730133043
10
धारणी
श्री. ए. डी. महल्ले, लागवड अधिकारी
7350122530
11
अंजनगांव सुर्जी
श्री. ए. डी. जवंजाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी
9860239237
12
दर्यापूर
श्री. के. बी. ढेंगे, सहा. लागवड अधिकारी
9604901309
13
भातकुली
श्री. पी. बी. मरले, लागवड अधिकारी
9270790228
14
तिवसा
श्री.व्ही. बी. निंभोरकर, लागवड अधिकारी
9422543392
00000
काचावार/सवाई/दि.1-07-2016/वेळ 16-00 वाजता











जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण
अमरावती दि 1 : दिवसेंदिवस होत असलेली वृक्षतोड यामुळे वनजमिनींचा नाश होत आहे तसेच त्याचा परिणाम म्हणून दिवसागणिक पावसाचे प्रमाण कमी होत असून राज्याला वारंवार दुष्काळाचा सामना करावा लागत आहे, यावर मात करण्यासाठी अर्थ मंत्री व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 1 जुलै,2016  संपूर्ण राज्यभरात एकाच दिवशी 2कोटी वृक्षलागवडीचा महत्वकांक्षी संकल्पानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयात किरण गित्ते यांच्या हस्ते बचत भवन लगतच्या परिसरात वृक्षरोपणाचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये सर्व अधिकारी, कर्मचारी उत्साहाने शामील झाले होते. तत्पुर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी 200 झाडे लावण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात 200 झाडे लावण्यात आली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर, उपजिल्हाधिकारी रामदास सिध्दभट्टी, जयंत देशपांडे, विनोद शिरभाते व अन्य वरीष्ठ अधिकारी, महसुल विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
00000
वाघ/धकाते/सागर/दि.01-07-2016/वेळ-15-00











वसंतराव नाईक जयंती जिल्हाधिकारी
कार्यालयात साजरी
       अमरावती, दि.1 : वसंतराव नाईक जयंती दि.1 जुलै, 2016 रोजी साजरी करण्यात आली. या निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
          जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस हार्रापण केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी डी.एस.वानखडे, अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
00000000
वाघ/धकाते/सागर/दि.01-07-2016/वेळ-15-00





संत गाडगेबाबा विद्यापिठात वृक्ष लागवड करुन
पालकमंत्र्यांच्या हस्ते वनमहोत्सवाचा शुभारंभ
* दुपारी 1 वाजेपर्यंत जिल्ह्यात 5 लक्ष वृक्ष लागवड
* जलयुक्त शिवारच्या 250 गावात 1 लक्ष 80 हजार झाडे लावली
* वृक्ष संवर्धनासाठी मोर्शीत दिड लाख रुपये जमा
* विद्यापिठात 2016 वृक्ष लागवड करणार

अमरावती दि 1 : राज्यात दि.1 ते 7 जुलै, 16 पर्यंत वनमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त पालकमंत्री प्रविण पोटे यांच्याहस्ते संत गाडगेबाबा विद्यापिठाच्या परिसरात वृक्ष लागवड करुन शुभारंभ करण्यात आला.
 यावेळी खा.आनंदराव अडसुळ, आ.बच्चु कडू, जिल्हाधिकारी किरण गित्ते, नगरसेविका वैशाली झटाले, कुलगुरु डॉ.मुरलीधर चांदेकर, कुलसचिव डॉ. अजय देशमुख, माजी कुलगुरु व्हि.एस.सपकाळ, प्र.कुलगुरु जयकिरण तिडके, मुख्य वनसंरक्षक संजिव गौड, उपमुख्य वनसंरक्षक निनु सोमराज, उपसंचालक सामाजिक वनीकरण प्रदिप मसराम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अरुण राऊत आदी उपस्थित होते.
पोटे म्हणाले, विद्यापिठाचा भव्य परिसर आहे त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणावर प्राणवायू घेण्यासाठी येतात. शासनाकडून अन्न, वस्त्र, निवारा या प्रमुख गरजा पुर्ण करण्यासाठी दिशा मिळत आहे. गाडगेबाबांनी साक्षरता व वनीकरणाचा संदेश दिला. राज्यात वृक्ष लागवडीची चळवळ सुरु आहे. सर्वांनी या चळवळीत भाग घेण्याचे आवाहन केले.
खा.आनंदराव अडसुळ म्हणाले, वृक्षाचे अजन्म नाते आहे. 11 कोटी राज्याची लोकसंख्या आहे. प्रत्येक कुटुबांनी एक झाड लावल्यास उद्दिष्ट पुर्ण होईल.
कुलगुरु डॉ.मुरलीधर चांदेकर म्हणाले, वृक्षारोपण ही जागतिक गरज आहे. विद्यापिठाची 450 एकर जमीन व तरुण मनुष्यबळ व 25 हजार राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) विद्यार्थी विद्यापिठाकडे आहेत. या मनुष्यबळाचा वापर महसुल विभागाच्या सहकार्याने अमरावती विभागातील 70 टक्के रिकाम्या जागेवर वृक्ष लागवडीची सामुहिक चळवळ राबवू असे सांगून विद्यापिठ परिसर संपुर्ण हरित करण्यासाठी 2016 वृक्ष लागवड करणार असल्याचे सांगितले.
दुपारी 1 वाजेपर्यंत 5 लक्ष वृक्ष लागवड - जिल्हाधिकारी
 जिल्हाधिकारी किरण गित्ते म्हणाले, दोन कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात अमरावती जिल्ह्यात 4 लक्ष 80 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असतांना दुपारी 1 वाजेपर्यंत जिल्ह्यात 5 लक्ष वृक्ष लागवड करुन उद्दिष्टपुर्ती केली आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत 3 लक्ष 63 हजार झाडे लावण्यात आली होती. या सर्व झाडाचे संवर्धन करण्यासाठी 200 झाडामागे 1 मजुर तसेच तार कुंपण करुन वृक्षाचे जतन करण्यात येईल.
जलयुक्तच्या 250 गावात 1 लाख 80 हजार झाडे
 गित्ते म्हणाले, जिल्ह्यात 250 गावात मागील वर्षी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामे घेण्यात आली होती. या सर्व गावातील नाला सरळीकरण, नदी-नाले खोलिकरणाच्या जागेवर अशा 250 गावात 1 लक्ष 80 हजार वृक्ष लावगड करण्यात आली. या शिवाय शहरातही मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड घेण्यात येत आहे. वृक्ष संवर्धनासाठी लोकसहभाग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मोर्शी येथे वृक्ष संवर्धन समिती स्थापन करण्यात आली असुन दिड लक्ष रुपये लोकसहभागातून जमा झाले आहे. यातून किमान 75 टक्के तरी वृक्षाचे जतन होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. राज्यात 50 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आगामी काळात घेण्यासाठी लोकचळवळीची आवश्यकता आहे. राज्य शासन जलयुक्त शिवारानंतर वनयुक्त शिवार अभियान राबविणार असुन पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक झालेले जलयुक्त व वनयुक्त अभियान यशस्वीपणे राबवू असा विश्वास व्यक्त केला. आगामी काळात विद्यापिठ 25 हजार एनएसएस च्या विद्यार्थ्यामार्फत अमरावती विभागातील 70 टक्के रिकाम्या जागांवर वृक्ष लागवडीचा मानस व्यक्त केला त्याबद्दल धन्यवाद दिले. राज्यात 1950 पासून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम सुरु आहे. वृक्ष संवर्धनाची काळजी न घेतल्यामुळे तसेच वृक्ष तोडीवर टिका न झाल्यामुळे आपली ही अवस्था झाली आहे.
 प्र.कुलगुरु अजय देशमुख म्हणाले, हे 2016 चे वर्ष आहे या निमित्त विद्यापिठ परिसरात 2016 वृक्ष लागवडीचा कुलगुरुंनी केलेला संकल्प पुर्ण करु.   
मुख्य वनसंरक्षक संजिव गौड म्हणाले, पालकमंत्री पोटे यांचे मार्गदर्शन व जिल्हाधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे वृक्ष लागवड चळवळीस मोठा सहभाग मिळत आहे. बार असोसिएशनसह एनएसएस आदी संस्था पुढे येत आहे. सर्वांनी श्रमदानाऐवजी श्रमअर्पण करण्याचे आवाहन केले.
विद्यापिठ परिसरात 151 झाडे
 यावेळी विद्यापिठ परिसरात पालकमंत्री पोटे यांच्यासह खा.आनंदराव अडसुळ, कुलगुरु डॉ.मुरलीधर चांदेकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्यासह विद्यापिठातील सर्व विभाग प्रमुख व विद्यार्थ्यांनी परिसरात 151 झाडे लावलीत. तत्पुर्वी विद्यापिठ परिसरात वृक्षदिंडी काढण्यात आली. प्रारंभी उपस्थित पाहुण्यांनी वृक्ष पुजन करुन वनमहोत्सवाचा शुभारंभ केला. वृक्ष देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले. उपसंचालक सामाजिक वनीकरण प्रदिप मसराम यांनी आभार प्रदर्शन केले. सुत्रसंचालन विलास नांदुरकर यांनी केले.
00000

काचावार/गावंडे/सागर/दि.01-07-2016/15-15 वाजता

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...