Thursday, December 7, 2017

सामाजिक विकृतींना आळा घालण्याची सर्वांची जबाबदारी
-         पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील
अमरावती, दि. 7 :   समाजातील विकृतींना आळा घालण्याची जबाबदारी कायदा व सुव्यवस्था यंत्रणेइतकीच  आपली सर्वांची आहे. सुदृढ व सुरक्षित समाजासाठी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज येथे केले.
पोलीस आयुक्तालयातर्फे  ‘जागर तरुणाईचा, सामाजिक बांधीलकी व उत्तरदायित्व कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यशाळेला शहरातील विविध शाळा- महाविद्यालयांतील दोन हजारहून अधिक विद्यार्थीनींची उपस्थिती होती. यावेळी उपमहापौर संध्या टिकले, सहायक पोलीस आयुक्त चेतना तिडके, राजश्री कौलखेडे, डॉ. मोना चिमोटे, डॉ. वर्षा देशमुख, डॉ. स्मिता देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. पोटे- पाटील म्हणाले की, कुटुंबात मिळालेल्या स्वातंत्र्याचा पाल्यांकडून दुरुपयोग होऊ नये यासाठी पालकांनीही त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची काळजी घेतली पाहिजे. मुलांमध्ये व्यसनाधीनता येता कामा नये. अद्ययावत तंत्रज्ञानाने उपलब्ध करुन दिलेली मोबाईल आदी साधने म्हणजे आधुनिकता नव्हे. ती विचारांत असली पाहिजे. या साधनांमध्ये किती वेळ गुंतून पडायचे, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. मुली व महिलांनी धीट होऊन गैरवर्तणुकीचा वेळीच प्रतिकार केला पाहिजे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस व शासन कटिबद्ध आहे. श्री. मंडलिक यांनी मनोगत व्यक्त केले. 
          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षिप्रा मानकर यांनी केले. आभार पोलीस उपायुक्त चिन्मय पंडीत यांनी मानले. कायद्यांची माहिती असलेल्या घडिपत्रिकेचे वितरण यावेळी करण्यात आले.


पालकमंत्र्यांनी घेतला शहरातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा
गुन्हेगारी प्रवृत्तींवर वचक बसवावा
                                    -पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील
अमरावती, दि. 7 : शहरात वारंवार गुन्हेकारक घटना घडत आहेत. अशा घटना घडू नयेत म्हणून गुन्हेगारी प्रवृत्ती वेळीच ठेचली गेली पाहिजे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अवैध धंद्यांवर लक्ष केंद्रित करुन गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज येथे दिले.
          पालकमंत्री श्री. पोटे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात कायदा व सुव्यवस्थाविषयक बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलीस अधिक्षक अभिनाश कुमार आदी उपस्थित होते.
          पालकमंत्री श्री. पोटे- पाटील म्हणाले की, शहरातील गुन्हेगारी घटनांचे प्रमाण पाहता पोलीस विभागाने अधिक सतर्क राहून काम केले पाहिजे. अवैध धंद्यावर लक्ष केंद्रित करुन गुन्हेगारांवर वचक निर्माण करावा. तरुणांमध्ये शिस्त आणण्यासाठी त्यांना नियमांची जाणीव करुन देण्याची गरज आहे. सुसाटवेगाने दुचाकी चालवणाऱ्या युवकांना समज देऊन त्यांच्या आईवडलांना कल्पना द्या. शहरात शाळा-महाविद्यालय परिसरात साध्या वेशातील पोलीस अधिकारी- कर्मचारी नियुक्त करावेत.  शिस्तीचे पालन न करणा-यांना खाकीची पॉवर कळू द्या.   काही रिक्षाचालक महिलांशी गैरवर्तणुक करत असल्याच्या तक्रारी होत आहेत. अशा ठिकाणी साध्या वेशातील कर्मचारी नेमावेत.  

श्री. मंडलिक म्हणाले की,  महिलांच्या सुरक्षेकरिता दामिनी पथक कार्यरत आहे. 195 शाळा-महाविद्यालयांत तक्रार पेटी बसविण्यात आली आहे. शहरातील महिला वसतिगृहांकरिता महिला पोलीस उपनिरीक्षकांकडून नियमित भेट देण्यात येते. तक्रारी असतील तर त्यावर कार्यवाही केली जाते. कायदा व सुव्यवस्थेसाठी  लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टीने पोलीस मित्र, शांतता समिती, मोहल्ला समिती, सामाजिक सुरक्षा समित्यांची निर्मिती करण्यात आली आहे.  
          शहरातील एटीएममधून पैसे चोरी होत असल्याच्या तक्रारींवर सायबर विभागाच्या कामगिरीमुळे सर्व आरोपींना जेरबंद करण्यात यश आले आहे.  
00000

पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची
रक्कम तत्काळ जमा करण्याचे आदेश
एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून
वंचित राहणार नाही: मुख्यमंत्र्यांची ग्वाही
मुंबई, दि. : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागवल्यानंतर आतापर्यंत 41 लाख शेतकरी खात्यांसाठी19,537 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून आता बँकांनी ही रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी तत्काळ कारवाई करावीअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
या ऑनलाईन प्रक्रियेत एकूण 77 लाख खाते राज्य सरकारला प्राप्त झाले. पुन्हा पुन्हा आलेले अर्ज तसेच इतर त्रुटी दूर करून सुमारे 69 लाख खात्यांवर प्रक्रिया करण्यात आली आहे. शासनाने आतापर्यंत सुमारे 41 लाख शेतकऱ्यांच्या खात्यासाठी 19 हजार 537 कोटी रुपयांची रक्कम मंजूर केली आहे. यात वन टाईम सेटलमेंटसाठी 4673 कोटी रुपये आहेत. कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी बँकांना शाखानिहाय देण्यात आली असून बँकांनी ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ जमा करावीत्यासाठी बँकांनी आपली स्थानिक यंत्रणा अधिक सक्षम करावीतसेच या सर्व खातेदारांना रब्बी हंगामासाठी कर्ज देण्याचीही व्यवस्था करावीअसे  आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यांच्या अध्यक्षतेत सह्याद्री अतिथीगृहात आज राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशीवित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दिनेशकुमार जैनमाहिती तंत्रज्ञान सचिव एस.व्ही.आर श्रीनिवास यांच्यासह बँकर्स समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, 41 लाख खातेधारकांशिवाय आता उर्वरित खातेधारकांच्या अर्जांवर प्रक्रिया करण्यासाठी बँकांनी विशेष चमू गठीत कराव्यात आणि या प्रक्रियेत अधिकाधिक शेतकऱ्यांना लवकरात लवकर फायदा मिळण्यासाठी सहकार्य करावे. सरकारच्या वतीने बँकासोबत समन्वयासाठी तीन चमू गठीत करण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेत बँकांनी मोठे सहकार्य केल्याबद्दल त्यांनी आभारही मानले. यापुढे सुद्धा असेच काम करून एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी बँकांनी हे काम पंधरा दिवसात पारदर्शकपद्धतीने पूर्ण करावेत्यांना सहकार विभागाचे तालुका आणि जिल्हास्तरीय अधिकारी मदत करतील. शेवटच्या पात्र शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत कर्जमाफीची प्रक्रिया अशीच सुरु राहीलअसेही ते म्हणाले.
वन टाईम सेटलमेंट योजनेअंतर्गत बँकांनी कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांना हप्ते पाडून द्यावेतजेणेकरून अधिक शेतकरी त्याचा लाभ घेऊ शकतील. त्यासाठी शेतकऱ्यांशी बँकांनी संवाद साधावा व त्यातून नावीन्यपूर्ण अशी योजना आखावी व खातेदाराचे बँक खाते पुर्नजीवित करावे. महाराष्ट्राने आतापर्यंत कर्जमाफीचे काम देशाला पथदर्शी ठरावे इतक्या पारदर्शकपद्धतीने केले आहेपुढेही ते याचपद्धतीने पुर्णत्वाला न्यावेअशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची अंमलबजावणी करतांना बँकांच्या शासनाकडून असलेल्या अपेक्षाही त्यांनी जाणून घेतल्या.
00000
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम
महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धा 2017 चा निकाल जाहीर
मुंबईदि. 7 माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने आयोजित महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धा 2017 चा निकाल जाहीर झाला असून या स्पर्धेत प्रथम क्रमांक वेदांत कुलकर्णी (कोल्हापूर)द्वितीय क्रमांक दीपक कुंभार (कोल्हापूर) तर तृतीय क्रमांक अंशुमन पोयरेकर(मुंबई) यांनी पटकावला आहे.
या स्पर्धेतील पाच उत्तेजनार्थ पारितोषिकांसाठी प्रशांत खरोटे (नाशिक)राजेंद्र धाराशिवकर (उस्मानाबाद)सुनिल बोर्डे (बुलढाणा)उमेश निकम(पुणे)सुशिल कदम(नवी मुंबई) यांची निवड करण्यात आली आहे.  माहिती व जनसंपर्कचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी आज निकाल जाहीर केला. प्रथमद्वितीयतृतीय क्रमांकासाठी निवड झालेल्या छायाचित्रकारांना अनुक्रमे 25 हजार, 20 हजार, 15 हजार तर उत्तेजनार्थ पाच पारितोषिकांसाठी प्रत्येकी तीन हजार रूपये प्रदान केले जाणार आहेत. 
            महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र दर्शन घडावे यासाठी महाराष्ट्राचा प्राचीनऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या विविध महत्वाच्या योजनांवर आधारित महाराष्ट्र माझा छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी 3,210 छायाचित्रे प्राप्त झाली होती. त्यातील दर्जेदार छायाचित्रांचे राज्यभरात प्रदर्शन भरविण्यात येणार असून प्रदर्शनाची सुरूवात नागपूर येथून होणार आहे.
            प्राप्त छायाचित्रातून विजेत्यांची निवड आणि प्रदर्शनासाठी दर्जेदार छायाचित्रांची निवड करण्यासाठी माहिती व जनसंपर्कचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कामकाज पाहिले. या समितीत संचालक (प्रशासन) अजय अंबेकरसंचालक (माध्यम समन्वयक) शिवाजी मानकरज्येष्ठ पत्रकार रवींद्र आंबेकरज्येष्ठ छायाचित्रकार नितीन सोनवणेसंजय पेठेअनिल छड्डा यांचा समावेश होता.
            राज्यभरात लवकरच या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार असून  याचा लाभ सर्वांनी घ्यावाअसे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
००००

Tuesday, December 5, 2017

पर्यटक निवासातून मिळेल मेळघाटातील पर्यटन व रोजगाराला चालना
अमरावती, दि. 5 : निसर्गरम्य मेळघाटमध्ये पर्यटकांच्या सोयीसाठी नानाविध सुविधा उभारण्याचे प्रयत्न राज्य शासनाकडून होत आहेत. याच अंतर्गत डिजीटल व्हिलेज हरिसालमध्ये पर्यटक निवास उभारण्यासाठी स्थानिकांना मदत देण्यात आली असून, त्यातून पर्यटनाला चालना व रोजगार निर्मितीही होणार आहे.
रोजगार निर्मितीसाठी पर्यटक निवास व्यवस्था उभारण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपयांची मदत हरिसालमध्ये पाचजणांना देण्यात आली आहे. त्यानुसार हे काम लवकरच पूर्णत्वास जाणार आहे. पर्यटक याठिकाणी राहून निसर्गपर्यटनाचा आनंद घेऊ शकतील.  पर्यटकांना स्थानिक संस्कृतीचा परिचय व्हावा म्हणून हरिसालमध्ये स्थानिक 15 कलावंतांचे पथकही निर्माण करण्यात आले आहे.  त्यामुळे पर्यटनाच्या आकर्षण केंद्रांत भरच पडली आहे. या योजनेमुळे स्थानिकांनाही रोजगार उपलब्ध होत आहे.
लोकराज्य डिसेंबर अंक प्रकाशित
महापरिनिर्वाण दिन आणि विदर्भ विशेष

मुंबई5 :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकणाराविदर्भातील विकासकामांचा आढावा घेणारा लोकराज्य डिसेंबरचा अंक प्रकाशित झाला आहे.
या अंकात प्रा. दत्ता भगतडॉ. कमल गवईनागसेन कांबळेकृष्णा इंगळेमिलिंद मानकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लिहिलेल्या लेखांची विशेष पुरवणी समाविष्ट केली आहे.
गेल्या तीन वर्षात विदर्भामध्ये झालेल्या विकासकामांची विस्तृत माहिती या अंकात देण्यात आली आहे. यात नागपूर मेट्रोमाहिती तंत्रज्ञानगोसीखुर्द प्रकल्पजलयुक्त शिवारकृषी पंपांना वीज पुरवठास्मार्ट नागपूरऔद्योगिक गुंतवणूक,  शैक्षणिक प्रगतीआरोग्य सुविधामत्स विकासखनिज संपत्ती आणि विविध जिल्ह्यातील नव्या उपक्रमांचा आढावा आहे. विदर्भातील बहुविध पर्यटन स्थळांचा रंजक वेध घेणाऱ्या लेखाचाही या अंकात समावेश करण्यात आला आहे. या अंकाची किंमत 10 रुपये आहे. हा अंक स्टॉलवर सर्वत्र उपलब्ध आहे.
००००
जिल्हा वार्षिक योजनेतील विविध विकासकामांचा
लघु गट समितीकडून आढावा
अमरावती, दि. 5 : जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक योजनेत विविध कार्यालयांना प्राप्त गत वर्षातील निधी व खर्च, तसेच पुढील वर्षाचे नियोजन यांचा आढावा लघु गट समितीतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजनभवनात घेण्यात आला. 
आमदार अनिल बोंडे व जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य प्रवीण तायडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांच्यासह विविध अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यात मदर डेअरीतर्फे दूध संकलन सुरु असले तरी ते सर्वत्र नाही. शासकीय दुग्धशाळेची मोर्शी, परतवाडा आदी शीतकरण केंद्रे बंद आहेत. ती सुरु करण्यासाठी कार्यालयांनी प्रयत्न केला पाहिजे, असे डॉ. बोंडे यांनी सांगितले. त्यानुसार प्रत्येक तालुक्यात गावांचे क्लस्टर निर्माण करुन मदर डेअरीतर्फे संकलन केंद्र सुरु करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. पशुसंवर्धन विभागाच्या नादुरुस्त दवाखान्यांबाबत माहिती सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले.
मत्स्यसंवर्धनाच्या अनुषंगाने संबंधित कार्यालयाच्या मत्स्यबीजवाटप आदी कामांबाबत तक्रारी येत आहेत. यासंबंधी याच आठवड्यात योग्य ती कार्यवाही करुन अहवाल द्यावा, असे निर्देश डॉ. बोंडे यांनी दिले.
जलयुक्त शिवार योजना राज्याची कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी महत्वाची ठरत आहे. या योजनेतील कामांना गती मिळण्यासाठी वनविभागाने सहकार्य करावे, असे निर्देश देण्यात आले. उपलब्ध पाणीसाठ्याच्या सुयोग्य वापरासाठी प्रत्येक ठिकाणी पाणीवापर संस्था निर्माण कराव्यात, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले.
बोंडअळीबाबत शेतक-यांकडून 6500 हजार तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानुसार पाहणी करण्यात येत असल्याचे जिल्हा कृषी अधिक्षक अधिका-यांनी सांगितले. या कामाला प्राधान्य देऊन दैनंदिन कार्यवाहीची माहिती घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
रोही, रानडुक्कर, हरीण आदी वन्य प्राण्यांमुळे शेतीसह वनविभागाच्या रोपवाटिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यासाठी जंगलात कृत्रीम पाणवठे तयार करावे, वनांजवळील गावात दक्षता घ्यावी, अशी सूचना आमदार डॉ. बोंडे यांनी केली.
ठिबक व तुषार सिंचन अनुदानासाठी 4448 आवेदने प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी यांनी दिली.
औद्योगीक प्रशिक्षण संस्थांच्या वसतिगृहात आवश्यक सोयी- सुविधा नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा मुद्दा डॉ. बोंडे यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांकडे प्रशासनाने संवेदनशीलतेने पाहिले पाहिजे, असेही ते म्हणाले. याप्रकरणी 7 दिवसात कार्यवाही करुन तसा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
 00000



अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...