Wednesday, October 9, 2019

तीन मतदारसंघात 11, 15 व 19 ला निवडणूक खर्चाची लेखा तपासणी

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019
                                                                     


अमरावती, दि. 9 :  भारत निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार 36-धामणगाव रेल्वे व 37- बडनेरा व 38- अमरावती विधानसभा मतदारसंघातून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक लढविणा-या सर्व उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची तपासणी  11, 15 व 19 ऑक्टोबरला होणार आहे.
निवडणूक खर्च निरीक्षक रामकृष्ण बंडी हे यावेळी विविध ठिकाणी भेट देऊन तपासणी करणार आहेत. या दिवशी धामणगाव रेल्वे मतदारसंघाची लेखा तपासणी चांदूर रेल्वे येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरातील निवडणूक कार्यालयात सकाळी 11 वाजता, बडनेरा निवडणूक कार्यालयात (भातकुली तहसील) दुपारी 3 वाजता व अमरावती निवडणूक कार्यालयात (अमरावती तहसील) दुपारी 12 वाजता होणार आहे, अशी माहिती संपर्क अधिकारी नरेंद्र वानखडे यांनी कळवली आहे.
                                    लेखे तपासणीसाठी वेळेत देणे आवश्यक

  सर्व उमेदवारांनी आपापल्या खर्चाचे लेखे तपासणीसाठी वेळेत सादर करणे आवश्यक आहे. लेखे सादर न करणा-या उमेदवारांविरुद्ध लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 मधील बाब क्रमांक 77 मधील तरतूदीनुसार दंडात्मक कार्यवाहीची तरतूद आहे. 

प्रत्येक काम अचूक व सुस्पष्ट असावे - निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह राजपूत

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019
                             निवडणूक अधिकारी- कर्मचारी प्रशिक्षणाला वेग
                           


अमरावती, दि.  9 : निवडणूक हे राष्ट्रीय कार्य असून, त्यासाठी नियुक्त प्रत्येक अधिकारी व कर्मचा-याने आपली जबाबदारी जाणून घेऊन गांभीर्याने काम करावे. आपले प्रत्येक काम अचूक व सुस्पष्ट असले पाहिजे, असे निर्देश अमरावती विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह राजपूत यांनी आज येथे दिले.
          मतदारसंघात निवडणूकीसाठी नियुक्त पथकातील मतदान केंद्राध्यक्ष व सहायक अधिकारी अशा एकूण 340 अधिकारी- कर्मचा-यांचे प्रशिक्षण आज श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात झाले, त्यावेळी ते बोलत होते.  निवडणूक निर्णय अधिकारी श्री. राजपूत व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रज्ञा महांडुळे यांनी या प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन केले.
          ईव्हीएम यंत्रणेसह प्रत्यक्ष कार्यवाहीबाबत यावेळी बारीकसारीक बाबींसह माहिती देण्यात आली. सर्व शंकांचे निराकरण करून घ्यावे. या प्रक्रियेत एकही चूक होता कामा नये. निवडणूक आयोगाच्या प्रत्येक निर्देशाचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश श्री. राजपूत यांनी दिली. दरम्यान, सामान्य निवडणूक निरीक्षक आशिष भगोटिया यांनी या प्रशिक्षणातील पहिल्या सत्रात भेट देऊन प्रशिक्षण वर्गाची पाहणी केली.
          औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ईव्हीएम यंत्रणेबाबत ‘हँडस ऑन ट्रेनिंग’ही मतदान अधिका-यांना आज देण्यात आले. जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांनी यावेळी भेट देऊन पाहणी केली.
निवडणूकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचा-यांच्या प्रशिक्षण प्रक्रियेने वेग घेतला असून, प्रशिक्षण उद्या चांदूर रेल्वे येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तिवसा येथील वाय. डी. व्ही. डी. कला व वाणिज्य महाविद्यालयात होणार आहे.  
                                         000

Monday, October 7, 2019

महामतदार जागृतीरथाचा शुभारंभ

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019
                                        





·         मतदार जागृतीसाठी जिल्हाभर रथ फिरेल
अमरावती, दि. 7 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी क्षेत्रीय प्रचार कार्यालयातर्फे महामतदार जागृती मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत मतदार जागृतीरथाचा शुभारंभ आज सामान्य निरीक्षक राजस्थानातील आयएएस अधिकारी महावीरप्रसाद वर्मा  यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात झाला.
जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी रथाला हिरवी झेंडी दाखवून व फलक दर्शवून मतदार जागृतीचे आवाहन केले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील, क्षेत्रीय प्रचार अधिकारी इंद्रवदनसिंह झाला, सहायक अधिकारी अंबादास यादव आदी यावेळी उपस्थित होते. मोहिमेत हा रथ जिल्ह्यात ठिकठिकाणी फिरणार असून, त्यावर कला पथकांद्वारे कार्यक्रमही सादर केले जाणार आहेत.  या रथाद्वारे अमरावती व बडनेरा शहरात आज व उद्या व नंतर मोर्शीसह विविध ठिकाणी जनजागृती करण्यात येणार आहे. 
यावेळी माध्यमिक कन्या शाळेच्या विद्यार्थिनींचा सहभाग असलेली जागृती रॅलीही काढण्यात आली. रथावर कलापथकाद्वारे मतदार जागृतीचे आवाहन करणारी नाटिका व संगीत सादर करण्यात आले.
                                                000

Saturday, October 5, 2019

छाननीअंती 151 उमेदवार कायम

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019
                                     
अमरावती, दि. 4 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रांची छाननी आज विविध मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिका-यांकडून करण्यात आली. त्यानुसार   धामणगाव रेल्वे 23, बडनेरा 28, अमरावती 25, तिवसा 16, दर्यापूर 20, मेळघाट 10, अचलपूर 15, मोर्शी 14 असे एकूण 151 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरल आहेत.

            धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघात विरेंद्र वाल्मिकराव जगताप (इंडियन नॅशनल काँग्रेस), प्रताप अरुणराव अडसड (भारतीय जनता पार्टी), सविता भिमराव कटकतलवारे (बहूजन समाज पार्टी), उत्तम जंगलू गवई (रिपब्लिकन पक्ष (खोरीपा)), हर्षवर्धन बळीरामजी खोब्रागडे (बहूजन विकास आघाडी), वासूदेव काशीनाथराव चौधरी (जनधिकार पार्टी), निलेश ताराचंद विश्वकर्मा (वंचित बहूजन आघाडी), विशाल उत्तमराव घाडगे (अखिल भारतीय हिंदू महासभा) सुनिता विजय रायबोले (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक)), अभिजीत प्रवीण ढेपे (अपक्ष), अवधूत विश्वनाथ सोनवने (अपक्ष), गौरव सुधाकर सव्वालाखे (अपक्ष), चंद्रदिप शंकरराव डोंगरे (अपक्ष), निलम देविदास रंगारकर (अपक्ष), प्रवीण दिनकरराव घुईखेडकर (अपक्ष), प्राविण्य प्रमोदराव देशमुख (अपक्ष), फिरोज खान गफार खान पठान (अपक्ष), मारोती नामदेव सहारे (अपक्ष), रमेश नामदेवराव गजबे (अपक्ष), रामभाऊ गणपत गाडेकर (अपक्ष), शैलेश दिवाकर रोहणकर (अपक्ष), संदिप बाबूलाल मेश्राम (अपक्ष), संदिप विनायकराव धवणे (अपक्ष) अशा 23 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले.  
            बडनेरा विधानसभा मतदार संघात प्रिती संजय बंड (शिवसेना), विलास देविदास गावंडे (बहूजन समाज पक्ष), संजय हिरामन आठवले (बहूजन विकास आघाडी), प्रवीण रामेश्वराव गाढवे (किसान समाज पार्टी), जीवन चव्हाण (गोंडवाणा गणतंत्र पार्टी), प्रमोद यशवंतराव इंगळे (वंचित बहूजन आघाडी), प्रवीण महादेवराव सरोदे (विकास इंडिया पार्टी), रत्नाकर सुदामराव बनसोड (बहूजन मुक्ती पार्टी), राहूल माणिकराव देशमुख (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक)), राहूलभाऊ लक्ष्मणराव मोहोड (बहूजन महापार्टी), संजय देवरावजी महाजन (आर.पी.आय. (खोब्रागडे)), श्रीधर विठोबा गडलिंग (अपक्ष), निलेश पुरुषोत्तम येते (अपक्ष), पुरुषोत्तम उत्तमराव भटकर (अपक्ष), प्रशांत पंजाबराव जाधव (अपक्ष), महेश सुभाषराव देशमुख (अपक्ष), मृदूला किशोर सोनवने (अपक्ष), रवी गंगाधर राणा (अपक्ष), राजू बक्षी जामनेकर (अपक्ष), राणी सुखदेवराव पाटील (अपक्ष), शिला संतोष मेश्राम (अपक्ष), शेख शफी अब्दूल हफिज (अपक्ष), शैलेश अभिमान गवई (अपक्ष), सिद्धार्थ गोंडाणे (अपक्ष), सुरज घरडे (अपक्ष), सुरेश मेश्राम (अपक्ष), सैय्यद इरफान सैय्यद अमीर (अपक्ष), संजय भोंडे (अपक्ष), असे 28 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले
            अमरावती विधानसभा मतदार संघात देशमुख मोईन मुफिज (बहूजन समाज पार्टी), डॉ. सुनील पंजाबराव देशमुख (भारतीय जनता पार्टी), सुलभा संजय खोडके (इंडियन नॅशनल काँग्रेस), मो.अलीम पटेल (वंचित बहूजन आघाडी), आठवले संजय हिरामनजी (बहूजन विकास आघाडी), वासुदेव काशिनाथराव चौधरी (जनअधिकार पाटी), धनंजय त्र्यंबकराव देशमुख (संभाजी ब्रिगेड पार्टी), प्रमोद दामोदरराव वाकोडे (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटीक), राजू मधुकरराव कलाने (किसान समाज पार्टी), रावसाहेब पुंडलिक गोंडाणे (राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी), राहुल लक्ष्मण मोहोड (बहुजन महा पार्टी), रोशन प्रभाकरराव अर्डक (आम आदमी पाटी), अभिजीत राजेंद्र दळवी (अपक्ष), अशोक पुर्णाजी टेंभरे (अपक्ष), किशोरानंद अजाबराव देशमुख (अपक्ष), गणेश मनोहर पाटील (अपक्ष), नलिनी सचिन तायडे (अपक्ष), पुरुषोत्तम किसन बागडी (अपक्ष), प्रवीण महादेव ऊर्फ मारोती सरोदे (अपक्ष), माधव जळबाजी कारेगावकर (अपक्ष), मेहराज खान पठान (अपक्ष), मोहम्मद एजाज मोहम्मद युनस (अपक्ष), रामक्रिष्ण अडकुजी महाजन (अपक्ष), राहूल माणिकराव देशमुख (अपक्ष), सिंधू विलास इंगळे (अपक्ष) असे 25 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र पात्र ठरले.  
            तिवसा विधानसभा मतदार संघात अब्दुल नईम अब्दुल जलील (बहुजन समाज पार्टी), ॲड यशोमती चंद्रकांत ठाकुर (इंडियन नॅशनल काँग्रेस), राजेश श्रीराम वानखडे (शिवसेना), दिपक देवराव सरदार (वंचित बहुजन आघाडी), पवन विजय वसू (प्रहार जनशक्ती पार्टी), प्रदीप गंगाधर महाजन (बहुजन मुक्ती पार्टी), भिमराव काशीराव कोरडकर (राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी), सिंधू विलास इंगळे (बहुजन महा पार्टी), संजय गोपाळराव बोडखे (पी.पी.आय.बी. (डी)), दिलीप बाजीराव धनाडे (अपक्ष), नरेंद्र बाबुलालजी कठाणे (अपक्ष), भारत शरद तसरे (अपक्ष), मो. राजीक शे. हसन (अपक्ष), सुरेश मारोती उंदरे (अपक्ष), संजय पंजाब कापडे (अपक्ष), संजय शिवलींग कोल्हे (अपक्ष) असे 16 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले.
            दर्यापूर विधानसभा मतदार संघात गौतम रामदास इंगळे (बहुजन समाज पाटी), बळवंत बसवंत वानखडे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), रमेश गणपतराव बुंदिले (भारतीय जनता पार्टी), ॲड चंद्रकांत बोदडे (महाराष्ट्र परिवर्तन सेना), मिनाक्षी सोमेश्वर करवाडे (बहुजन महा पार्टी), रेखा साहेबराव वाकपांजर (वंचित बहुजन आघाडी), विनोद गुलाबराव मेश्राम (आंबेडकरवादी रि.पार्टी), संतोष गोंडूजी कोल्हे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया), आशाबानो रशीद खान (अपक्ष), गजानन मोतीराम लवटे (अपक्ष), गोपाळ यशवंतराव तंतरपाळे (अपक्ष), गोपाल रामकृष्ण चंदन (अपक्ष), दिलीप साहेबराव गवई (अपक्ष), निलेश गजानन राक्षसकर (अपक्ष), ॲड भुषण अनिल खंडारे (अपक्ष), विजय यशवंत विल्हेकर (अपक्ष), सागर ज्ञानेश्वर कलाने (अपक्ष), सिमा रविंद्र सावळे (अपक्ष), सुधाकर दत्तूजी तलवारे (अपक्ष), संजय तुळशीराम पिंजरकर (अपक्ष), असे 20 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र पात्र ठरले.
            मेळघाट विधानसभा मतदार संघात केवलराम तुळशीराम काळे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी), रमेश सुरेशराव मावस्कर (भारतीय जनता पार्टी), लक्ष्मण शिकारी धांडे (बहूजन समाज पार्टी), उमेश शंकरराव जांभे (पिपल्स  पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक)), राजकुमार दयाराम पटेल (प्रहार जनशक्ती पार्टी), अशोक मारोती केदार (अपक्ष), गंगाराम कुंजीलाल जांबेकर (अपक्ष), मन्नालाल खुबीलाल दारसिंबे (अपक्ष), रवी रामू पटेल (अपक्ष), शैलेंद्र विजयराव गावंडे (अपक्ष) असे 10 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र पात्र ठरले.
            अचलपूर विधानसभा मतदार संघात अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ सुभानराव देशमुख (इंडियन नॅशनल काँग्रेस), सुनिता नरेंद्रराव फिसके (शिवसेना), सैय्यद अशपाक सैय्यद अली (बहूजन समाज पार्टी), अब्दूल नाजिम अब्दूल रहूब (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहदूल मुस्लिमीन), नंदेश शेषराव अंबाडकर (वंचित बहूजन आघाडी), बच्चू ऊर्फ ओमप्रकाश बाबाराव कडू (प्रहार जनशक्ती पक्ष), डॉ. राजेंद्र रामकृष्ण गवई (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया), रोहिदास ऊर्फ प्रेमहरिचंद गजभिये (बहूजन मुक्ती पार्टी), अनुष्का विजय बेलोरकर (अपक्ष), अमोल ऊर्फ अंकूश दयारामजी गोहाड (अपक्ष), अक्षरा रुपेश लहाने (अपक्ष), गिरीधर नथ्थूजी रौराळे (अपक्ष), पुंडलिकराव गजानन खाडे (अपक्ष), रवि गुणवंतराव वानखडे (अपक्ष), राहूल दिनकरराव कडू (अपक्ष) असे 15 उमेदवारांचे नामर्निदेशन पत्र पात्र ठरले.
            मोर्शी विधानसभा मतदार संघात डॉ. अनिल सुखदेवराव बोंडे (भारतीय जनता पार्टी), राजेंद्र शेषराव भाजीखाये (बहूजन समाज पक्ष), चंद्रकांत वसंतराव कुमरे (गोंडवाणा गणतंत्र पार्टी), देवेंद्र महोदवराव भुयार (स्वाभिमानी पक्ष), महेंद्र उत्तमराव भातकुले (बहूजन मुक्ती पार्टी), विलास संतोष राऊत (पिछडा समाज पार्टी युनायटेड), संजय दिगांबर खासबागे (अपक्ष), गिरीष रंगराव कराळे (अपक्ष), गुणवंत तुकाराम दवंडे (अपक्ष), गोपाल यशवंतराव तंतरपाळे (अपक्ष), नंदकिशोर बापूरावजी कुयटे (अपक्ष), नंदकुमार हरिराम हिंगवे (अपक्ष), महोदव बस्तीरामजी युवनाथे (अपक्ष), विनायक खजिनराव वाघमारे (अपक्ष), असे 14 उमेदवारांचे नामर्निदेशन पत्र पात्र ठरले.

                22 अर्ज बाद
             छाननीअंती 22 अर्ज बाद झाले असले तरी त्यातील 2 उमेदवारांनी एकाहून अधिक अर्ज दाखल केल्याने त्यांची उमेदवारी कायम आहे.  20 उमेदवार बाद ठरले आहेत.
अमरावती विधानसभा मतदारसंघात 28 उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रांच्या छाननीनंतर तीन अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार जुम्मन चावरे, अविनाश वानखडे, राजेश चांडक यांचे अर्ज बाद झाले. 25 जणांची उमेदवारी कायम आहे.
बडनेरा मतदारसंघात 28 उमेदवारांच्या 38 नामनिर्देशन पत्रांपैकी 2 नामनिर्देशन पत्र बाद झाले असले तरीही उमेदवारांनी एकाहून अधिक अर्ज टाकल्यामुळे 28 उमेदवारांची उमेदवारी कायम आहे.
अचलपूर मतदारसंघात 15 उमेदवारांच्या 24 नामनिर्देशनपत्रांपैकी सर्व अर्ज पात्र ठरून 15 ही उमेदवारांचे अर्ज कायम आहेत.
मोर्शी मतदारसंघात 17 उमेदवारांच्या 22 नामनिर्देशनपत्रांपैकी 3 अर्ज बाद झाले. श्रीमती वसुधा अनिल बोंडे, सय्यद फारूख सय्यद अहमद, परवेज खाँ रऊफ खाँ पठाण यांचे अर्ज बाद झाले. 14 जणांची उमेदवारी कायम आहे.
दर्यापूर मतदारसंघातील 25 उमेदवारांच्या 26 नामनिर्देशन पत्रांपैकी 5 अर्ज रद्द होऊन 20 जणांची उमेदवारी कायम आहे. सूरज पारडे, डॉ. विद्यासागर वानखडे, समित्रा गायकवाड, राहूल बाबणेकर, मनोज मेळे आदींचे अर्ज बाद झाले आहेत.
तिवसा मतदारसंघात 21 उमेदवारांचे 27 नामनिर्देशन पत्रांपैकी 5 अर्ज बाद झाले. मंगेश वहाणे, राजू गोरडे, राहूल उके, प्रशांत गोंडाणे, ज्ञानेश्वर मानकर यांचे अर्ज बाद झाले. 16 जणांची उमेदवारी कायम आहे.
धामणगाव मतदारसंघात 24 उमेदवारांचे 32 अर्जांपैकी  पंकज पवार यांचा एक अर्ज बाद होऊन 23 जणांची उमेदवारी कायम आहे.
मेळघाट मतदारसंघात 13 उमेदवारांच्या 15 अर्जांपैकी 4 अर्ज बाद झाले. राजाराम भिलावेकर, राजेश दहिकर, रामकिसन जांभू, अशोक केदार यांचे अर्ज बाद केले. श्री. केदार यांचा एकाहून अधिक अर्ज असल्याने त्यांची उमेदवारी कायम आहे.  10 जणांची उमेदवारी कायम आहे.
                                    000

Wednesday, October 2, 2019

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन



सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत राबविले जागरूकता अभियान
अमरावती, दि. 02 :  राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी  प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या 150 व्या जयंती निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी संजय पवार यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, उपजिल्हाधिकारी अजय लहाने, स्नेहल कनिचे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा यांचेसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी  प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण आदरांजली वाहिली.
स्वच्छता अभियान राबवून दिला सिंगल प्लास्टिक यूज ला गुडबाय करण्याचा संदेश

            तत्पूर्वी, महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात स्वच्छता अभियान राबवून सिंगल प्लास्टिक यूज ला गुडबाय करण्याचा संदेश देण्यात आला. या अभियानात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी हिरेरीने आपला सहभाग नोंदविला.
00000

Tuesday, October 1, 2019

स्वीप मोहिमेच्या सदिच्छा दूत म्हणून बबिता ताडे यांची निवड - जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री

     







राज्यकर्ते निवडण्याचा अधिकार मतदारांनी वापरावा      
                                  बबिता ताडे, सदिच्छादूत, स्वीप
लोकशाहीने आपल्याला आपले राज्यकर्ते निवडण्याचा अधिकार दिला आहे. हा अत्यंत महत्वाचा अधिकार आहे. त्यामुळे मतदान करून त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. आपल्या देशाचा व राज्याचा कारभार करणारी यंत्रणा निवडण्याचा आपला हक्क मतदानाच्या माध्यमातून वापरला गेला पाहिजे. आपल्या राष्ट्रीय कर्तव्याला जागले पाहिजे, असे श्रीमती ताडे यांनी यावेळी सांगितले. या काळात ठिकठिकाणी जाऊन मतदार जागृती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अमरावती, दि. 1 : मतदान जनजागृतीसाठी स्वीप मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी  सदिच्छा दूत म्हणून कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमातील विजेता बबिता ताडे यांची निवड करण्यात आली आहे. श्रीमती ताडे या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचून मतदानाचे महत्व पटवून देतील, असे स्वीप कार्यक्रमाच्या नोडल अधिकारी तथा जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी आज पत्रकारांना सांगितले.
या उपक्रमाची माहिती देण्यासाठी जिल्हा परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके आदी यावेळी उपस्थित होते.
श्रीमती खत्री म्हणाल्या की, नवमतदार, ज्येष्ठ मतदार, दिव्यांग मतदार व महिला मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम आखण्यात आले आहेत. जिथे गतवेळी मतदानाचे प्रमाण कमी होते, तिथे लक्ष केंद्रित करून परिपूर्ण  कार्यक्रम आखण्यात आले आहेत.
                उद्या गावोगाव चुनावी पाठशाळा
        गांधीजयंतीच्या मुहुर्तावर उद्या जिल्ह्यातील 839 गावांमध्ये चुनावी पाठशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. नवमतदारांपर्यंत (First Voters) पोहोचण्यासाठी हा लोकशाही शिक्षणाचा उपक्रम आहे. त्यात निवडणूक, मतदान प्रक्रिया याबाबत संपूर्ण माहिती दिली जाईल.
                        गावोगाव मतदान सहायक
                दिव्यांग मतदार, ज्येष्ठ मतदार यासह इतरही मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचणे व इतर मदत करण्यासाठी गावोगाव मतदान सहायकांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यांची यादी तयार करण्यात आली असून, ती ग्रामसभेत जाहीर केले जाईल.
                        ईव्हीएम व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिकांवर भर
                ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत यापूर्वी प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. आताही ठिकठिकाणी ही प्रात्यक्षिके आयोजित करून मतदान प्रक्रियेची मतदारांना संपूर्ण माहिती दिली जाईल.
                         नवरात्रौत्सवात चुनावी पाठशाळा
        नवरात्रौत्सवात विविध ठिकाणी आयोजित गरबा कार्यक्रमांतून चुनावी पाठशाळा व इतर उपक्रम घेतले जातील. नवरात्रौत्सवाच्या शेवटच्या दोन दिवसांत यावर अधिक भर दिला जाईल, असे श्रीमती खत्री यांनी सांगितले.

                                        000
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रँडमायझेशनची प्रक्रिया
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीनचे सरमिसळीकरण पूर्ण  
*अद्ययावत प्रणालीत माहिती सुरक्षित
* संपूर्ण पारदर्शक ऑनलाईन प्रक्रिया
अमरावती, दि. 1 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅटच्या सरमिसळीकरणाची (रँडमायझेशन) प्रक्रिया जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राष्ट्रीय सूचना केंद्रात झालेल्या या प्रक्रियेला उमेदवार किंवा त्यांच्या वतीने प्रतिनिधीही उपस्थित होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील, इटीपीबीएस व मतपत्रिका नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अजय लहाने, संगणीकीकरण प्रशिक्षण नोडल अधिकारी तथा जिल्हा सूचना अधिकारी अरुण रणवीर, अतिरिक्त सूचना अधिकारी मनीष फुलझेले यावेळी उपस्थित होते.
  जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील 2 हजार 628 मतदान केंद्रासाठी 3 हजार 156 बॅलेट युनिट, 3 हजार 174 कंट्रोल युनिट व 3 हजार 622 व्हीव्हीपॅट मशीनचे स्कॅनिंग व सरमिसळीकरण झाले. तसेच आठही विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्राकरीता लागणाऱ्या मनुष्यबळाची सुध्दा सरमिसळीकरणाची प्रक्रिया आज झाली. जिल्हास्तरावरील सरमिसळीकरणाची संगणकीकृत प्रक्रिया ऑनलाईन व प्रतिनिधींच्या उपस्थितीत अमरावती विधानसभा मतदारसंघासाठी पूर्ण झाली आहे. सरमिसळीकरणानंतर प्रक्रिया झालेली माहिती आता  ‘लॉक’ व सुरक्षित झाली आहे. त्यात कोणालाही हस्तक्षेप करता येणार नाही. यानंतर दुसऱ्या स्तरावरील इव्हीएमचे सरमिसळीकरण त्या त्या विधानसभा मतदासंघात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या पातळीवर होणार आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र सादर करण्याची अंतिम दि. 4 ऑक्टोबर आहे. नामनिर्देशनपत्राची छाननी दि. 5 ऑक्टोबरला होईल. उमेदवारी मागे घेण्याची तारीख दि. 7 ऑक्टोबर आहे व त्यानंतर चिन्ह वाटपाची प्रक्रिया होणार आहे. मतदानाचा दिनांक 21 ऑक्टोबर तर मतमोजणीचा दिनांक 24 ऑक्टोबर आहे. दि. 27 ऑक्टोबरला निवडणूक प्रक्रिया पुर्ण होईल.
ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या तपासणीच्या व प्रत्यक्ष वापराच्या प्रत्येक टप्प्यात मॉकपोलव्दारे उमेदवारांना व मतदारांना प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. ही संपूर्ण पारदर्शक ऑनलाईन प्रक्रिया असून, अद्ययावत प्रणालीत माहिती सुरक्षित असेल, असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल यांनी यावेळी सांगितले.
दि. 31 ऑगस्टच्या अंतिम मतदार यादीनुसार 24 लाख 45 हजार 766 मतदार असून त्यात पुरुष 12 लाख 58 हजार 99 व स्त्री मतदार 11 लाख 87 हजार 625 आहेत. इतर मतदार 42 आहेत. मतदान केंद्रे 2 हजार 628 असून त्यातील मुख्य 2 हजार 607 व 21 सहाय्यकारी मतदान केंद्रे आहेत.    

00000


अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...