Thursday, January 9, 2020

महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर (सोनवणे) यांनी स्वीकारला कार्यभार


अमरावती, दि. 9 : महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर (सोनवणे) यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. मंत्रालय विस्तार इमारतीत पाचव्या मजल्यावरील दालन क्रमांक 540 येथे कार्यालय आहे.
यावेळी माजी मंत्री अनीस अहमद, महिला व बालविकास सचिव आय. ए. कुंदन, आयसीडीएस आयुक्त इंद्रा मालो, सहसचिव लालसिंग गुजर, उपायुक्त गोकूळ देवरे आदी उपस्थित होते. उपस्थितांनी मंत्री श्रीमती ठाकूर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
श्रीमती ठाकूर (सोनवणे) म्हणाल्या, बचतगट चळवळीद्वारे महिला सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने काम करणार आहे. महिला आयोगाचे सेंटर प्रत्येक जिल्ह्यात स्थापन करण्याचा मानस आहे. महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या दृष्टीने काम करणार आहोत. तसेच बालगृह, अनाथ मुले, बालकल्याणसाठी नवीन योजना आणू, असेही त्यांनी सांगितले.
00000

Tuesday, January 7, 2020

पोलिओ निर्मूलन मोहिमेत जिल्ह्यात 19 जानेवारीला लसीकरण



अमरावतीदि. 7 – जिल्ह्यात 19 जानेवारीला पोलिओ निर्मूलन मोहिमेत लसीकरण मोहिम 19 जानेवारीला राबविण्यात येणार असूनत्यापासून एकही बालक वंचित राहू नये यासाठी कार्यक्रमाची परिपूर्ण अंमलबजावणी व्हावीअसा निर्णय जिल्हास्तरीय टास्क फोर्सच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
          जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक गजेंद्र मालठाणेजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकमजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रमणलेसमितीचे सदस्य सचिव तथा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजेकरजि. प. महिला व बालकल्याण प्रशासन अधिकारी संजय अंबुलकरमहावितरणचे उपअभियंता संजय अंबुलकरजिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवारपोलीस निरीक्षक दीपक वानखडे यांच्यासह अनेक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
          अधीक्षक श्री. मालठाणे म्हणाले कीपोलिओ निर्मूलन मोहिमांची सतत अंमलबजावणी केल्यामुळे पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यात देशाला यश मिळाले आहे.  जिल्ह्यात ही मोहिम अधिक व्यापकपणे राबवावी. एकही बालक वंचित राहता कामा नये. एकही वाडी-वस्ती मोहिमतून सुटता कामा नये. गत मोहिमेत नागरी क्षेत्राच्या तुलनेत ग्रामीण  क्षेत्रातील लसीकरणाचे प्रमाण अधिक होते. यावेळी नागरी क्षेत्रातही अधिक नियोजनपूर्वक काम करावे. मोहिमेची सर्वदूर प्रसिद्धी करण्यात यावी.
                             पोलिओ केवळ पाक व अफगाणिस्तानात शिल्लक
          अफगाणिस्तान व पाकिस्तान वगळता पोलिओचे जगातून समूळ उच्चाटन झाले आहे. 2019 या वर्षात पाकिस्तानात 101 व अफगाणिस्तानात 24 पोलिओच्या केसेस आढळून आल्या. भारतात 2011 मध्ये बिहारमध्ये शेवटची केस आढळली होती. महाराष्ट्रात 2010 नंतर पोलिओची केस आढळली नाही. अमरावती जिल्ह्यात 2007 मध्ये शेवटची केस आढळली होती. भारतात पोलिओ निर्मूलन मोहिमेला चांगले यश मिळाले आहे. तथापिदक्षता म्हणून हा कार्यक्रम कायम ठेवण्यात आला आहेअसे फोर्सचे सदस्य सचिव डॉ. करंजेकर यांनी सांगितले.
गत मोहिम 10 मार्च 2019 ला राबविण्यात आली. त्यात ग्रामीण भागात 93 टक्केतर शहरी भागात 72 टक्के असे जिल्ह्यात सरासरी 89 टक्के लसीकरण झाले.
                             मोहिमेत 19 जानेवारीला जिल्ह्यात ग्रामीणमध्ये 1759 व शहरी क्षेत्रात 200 असे एकूण 1959 बुथ असतील. सुमारे पावणदोन लाख बालकांचे लसीकरण केले जाईल. त्याशिवायग्रामीण भागात 3 दिवस व शहरी क्षेत्रात 5 दिवस गृहभेट देऊन लसीकरण केले जाईल. वाड्यावस्त्यांसाठी स्वतंत्र पथकेही नेमण्यात आली आहेतअसे डॉ. करंजीकर म्हणाले.
0000

प्रजासत्ताक दिन सोहळा पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समन्वयाने काम करावे -निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे



अमरावतीदि. 7 – भारतीय प्रजासत्ताकदिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ 26 जानेवारी 2020 रोजी जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे सकाळी 9. 15 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावेअसे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी आज येथे दिले.
        याविषयी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. अधीक्षक गजेंद्र मालठाणेजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकमपोलीस निरीक्षक निलिमा आरज यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. व्यवहारे म्हणाले कीप्रजासत्ताक दिनी सर्व शाळांनी सकाळी साडेसहा वाजता प्रभातफे-या काढून मुख्य समारंभासाठी वेळेपूर्वी पोहोचावे. अधिकाधिक लोकांना या समारंभास उपस्थित राहाता यावेयासाठी यादिवशी सकाळी 8.30 ते सकाळी 10 या वेळेत इतर कार्यालयसंस्थांनी ध्वजारोहण किंवा शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करू नये. असे समारंभ सकाळी 8.30 च्या पूर्वी किंवा सकाळी 10 नंतर आयोजित करावेत.
ते पुढे म्हणाले कीकार्यक्रमासाठी स्वागत व समन्वय समितीध्वजवंदन संचालन व मैदानावरील कार्यक्रम समितीसांस्कृतिक कार्यक्रम समिती आदी समित्या गठित करण्यात आल्या आहेत. ध्वजवंदन संचलनसामूहिक कवायतमैदानावरील कार्यक्रमचित्ररथआवश्यक सराव यादृष्टीने नियोजनपूर्वक कार्यवाही करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून फर्निचरस्वागतद्वार उभारणीसजावटीच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी. अतिथी व उपस्थितांची बैठक व्यवस्थाआवश्यक स्वयंसेवकध्वनीयंत्रणा आदी व्यवस्था काटेकोर असावी. महापालिकेकडून स्वच्छतापेयजल सुविधामुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी मुलांना खाऊवाटप आदी व्यवस्था पुरविण्यात यावी.
                        सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम
प्रजासत्ताक दिनी सायंकाळी 7 वाजता वनिता समाज येथे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. त्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्यात आली असूनशिक्षण उपसंचालक हे आमंत्रक असतील. माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी कार्यक्रम यथोचितरीत्या साजरा होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश डॉ. व्यवहारे यांनी दिले. कार्यक्रमापूर्वी रंगीत तालीम 24 जानेवारीला 4 वाजता जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होईल.
00000

Friday, January 3, 2020

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडून विकासकामांचा आढावा विहित मुदतीत कामे पूर्ण करावीत - राज्यमंत्री बच्चू कडू





*आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश

अमरावतीदि. 3 :  नागरिकांच्या सेवा- सुविधांसाठी विविध सार्वजनिक कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अचलपूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत दिले.
उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार आणि संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. जलयुक्त शिवार, पांदणरस्ते योजना आदी विविध योजना व कामांचा आढावा यावेळी श्री. कडू यांनी घेतला.
श्री. कडू म्हणाले की, पांदणरस्ते योजना व जलयुक्त शिवार योजनेतील कामे गतीने पूर्ण करावी. जलसंधारणाची कामे करत असताना तेथील खनिज आदी साहित्याचा वापर पांदण रस्त्याच्या कामात करुन घेण्यात यावा. याबाबतचा एकत्रित प्रस्ताव गटविकास अधिकारी यांनी तातडीने सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले. उपविभागात 342 पांदण रस्ते प्रस्तावित असून याकरिता स्वातंत्र्य संग्राम सैनिकगणेश मंडळ कार्यकर्ते तसेच संबंधित गावातील नागरिक व निमशासकीय कर्मचारी यांची तालुकास्तरावर समिती गठित करुन त्या समितीने नवीन पांदणरस्त्याच्या खर्चाचे अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
जुन्या व नवीन खचलेल्या विहिरींबाबत एकत्रित पंचनामे पूर्ण करावे, अतिवृष्टीमुळे खचलेल्या विहिरींचे सर्वेक्षण करावेपीकविमा योजना व प्रधानमंत्री किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी तालुका कृषि अधिकारी यांनी ऑनलाईन द्यावी, असे निर्देश त्यांनी केले. पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
ते म्हणाले की, नागरिकांना वेळेत सेवा मिळाली पाहिजे. सातबारा, फेरफार आदी  आवश्यक प्रमाणपत्रे वेळेत उपलब्ध करून द्यावीत.  अचलपूर तहसील कार्यालयाने आदिवासी बांधवांच्या सुमारे दोनशे जात प्रमाणपत्रांबाबत प्रस्ताव तयार केले आहेत. चांदूरबाजार तहसील कार्यालयात 207 प्रकरणे प्रलंबित आहेत. ती तात्काळ निकाली काढावीततसेच शालेय जात प्रमाणपत्र वाटपाबाबत शाळानिहाय कार्यक्रम आखून महा ई-सेवा केंद्राच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना त्वरित जात प्रमाणपत्र वाटप करण्यात यावेअसे निर्देश दिले.
00000

मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडून विकासकामांचा आढावा शेतकरीहिताला प्राधान्य द्यावे - मंत्री यशोमती ठाकूर यांचे निर्देश




अमरावतीदि. 3 – नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी बांधव अडचणीत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यास प्रशासनाने प्राधान्य द्यावेअसे निर्देश कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.
            जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेताना त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी शैलेश नवालजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगेपोलीस आयुक्त संजयकुमार बाविसकरपोलीस अधीक्षक हरी बालाजीमनपा आयुक्त संजय निपाणे यांच्यासह विविध विभागप्रमुखअधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
श्रीमती ठाकूर म्हणाल्या कीमहात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ जिल्ह्यातील एक लाखांहून अधिक शेतकरी बांधवांना होणार आहे. त्याची अंमलबजावणी गतीने करावी. गारपीट व अकाली पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी व पंचनामे करावेत. शेतकरी बांधवांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्या अडचणी सोडविण्यावर भर द्यावा. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनाशेततळेकृषी यांत्रिकीकरण योजनेतील प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करावीत. वीजपुरवठ्यात नियमितता आणावी. पावसाने कोसळलेले खांब उभारणीचे काम गतीने करावे.
त्या पुढे म्हणाल्या कीजिल्ह्यातील पुनर्वसनाच्या कामांना गती मिळावी. त्यासाठीचा निधी मिळण्यासाठी पाठपुरावा करावा. सिंचन प्रकल्पाची अपूर्ण कामे कालावधीचे नियोजन करून पूर्ण करावी. विकासकामांची सद्यस्थिती व नियोजन याबाबत परिपूर्ण माहिती सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
उपजिल्हाधिकारी अजय लहानेडॉ. नितीन व्यवहारेउपमुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमकेजिल्हा उपनिबंधक संदीप जाधवजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकमजिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरेजिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी  विजय चवाळेमहावितरणचे अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे  यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
00000

विद्यार्थिनींच्या मोठ्या प्रतिसादात महिला सुरक्षेचा जागर सायबर सुरक्षिततेचा संदेश प्रत्येक माताभगिनीपर्यंत पोहोचवा - पोलीस आयुक्त संजयकुमार बाविसकर








अमरावतीदि. 3-  सोशल मीडिया हाताळताना प्रत्येकाने लक्ष्मणरेषा आखून घेणे आवश्यक आहेसतत सजगता हाच सुरक्षिततेचा उपाय आहेसायबर सुरक्षिततेचा हा संदेश प्रत्येक माताभगिनीपर्यंत पोहोचवाअसे आवाहन शहराचे पोलीस आयुक्त संजयकुमार बाविसकर यांनी आज येथे केले.
अमरावती शहर पोलीस व सायबर सेलतर्फे जिल्हा माहिती कार्यालय व विविध संस्थांच्या सहकार्याने सायबर सेफ वुमेन या मोहिमेत कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होतेप्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले व  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सायबर सुरक्षेबाबत आवाहनाचा संदेश प्रसारित करण्यात आला. उपमहापौर कुसुम साहू, महिला व बालकल्याण सभापती वंदना हरणे, सुनीता भेले, सुरेखा लुंगारे, श्री शिवाजी महाविद्यालयाच्या प्राचार्य स्मिता देशमुखमाहिती उपसंचालक राधाकृष्ण मुळीदिशा संस्थेच्या ज्योती खांडपासोळेपोलीस उपायुक्त प्रशांत होळकरशशिकांत सातवसहायक पोलीस आयुक्त सुहास भोसले आदी यावेळी उपस्थित होते.
पोलीस आयुक्त श्रीबाविसकर म्हणाले कीसोशल मीडिया किंवा कुठलेही माध्यम हाताळताना प्रत्येकाने आपली वैयक्तिकताखासगी बाबीबद्दलची माहिती गरज नसेल तर शेअर करता कामा नयेआपल्या मर्यादाजबाबदा-या विसरू नयेपाल्यांनी पालकांना अंधारात ठेवून कुठलीही कृती करू नयेसोशल मीडियातून संपर्कात आलेली अपरिचित व्यक्ती आपल्याविषयी स्नेह का बाळगतेहे तपासणे आवश्यक आहेसंकटे ही आपल्या अवतीभवतीपरिसरातही असू शकतातआपल्याला त्याचा चेहरा ओळखता आला पाहिजेत्यामुळे आपले भान व सजगता टिकवून ठेवणे गरजेचे आहे. 
श्रीमुळी म्हणाले कीमोबाईल ही वैयक्तिक वस्तू असूनतिच्यावर आपल्याखेरीज इतरांचे नियंत्रण असता कामा नयेपोस्ट ट्रुथ म्हटल्या जाणा-या आजच्या युगात सत्याचा आभास निर्माण करणा-या वेगवेगळ्या गोष्टी एकाचवेळी समोर येत असतातअशा वेळी सजग राहून सामाजिक व्यवहार पार पाडण्याची जबाबदारी आपली असते.
श्रीमती देशमुख म्हणाल्या कीआजच्या पिढीची एक पालक म्हणून काळजी वाटावी अशा घटना सभोवती घडत असतातत्यासाठी सामाजिक वर्तन मर्यादा सोशल मीडियावरही पाळल्या गेल्या पाहिजेतसंस्कारक्षम समाजनिर्मितीसाठी मूल्यांची जपणूक होणे गरजेचे आहे           
दुस-या सत्रात सायबर सेलचे निरीक्षक प्रवीण काळे व श्रीमती खांडपासोळे यांनी कार्यशाळेत पॉवरपाईंट प्रेझेंटेशनद्वारे सायबर सुरक्षा व सार्वजनिक सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले.
सायबर ग्रुमिंगसायबर बुलिंगमॉर्फिंगसायबर डिफेमेशनस्टॉकिंगऑनलाईन गेमिंगफिशिंगसेक्सॉर्टशन,स्कुटिंग अशा विविध सायबर गुन्हे प्रकारांची माहिती देताना श्रीकाळे म्हणाले कीदुर्लक्ष व चुकीच्या बाबी सहन करत राहण्याची वृत्ती या सार्वजनिक व्यवहारांसह सोशल मीडियावरही अत्यंत घातक ठरतातत्यामुळे कुठलीही आक्षेपार्ह बाब लक्षात येताच तत्काळ पोलीसांना कळविली पाहिजेसमाजमाध्यमे हाताळताना अनोळखी व्यक्तींना फ्रेंड लिस्टमध्ये स्थान देता कामा नयेशेअर केलेल्या माहितीफोटोला अधिक लाईक मिळण्याची भुरळ पडू देऊ नयेकारण अनेकदा लाईक देऊन गैरहेतूने जवळीक साधण्याचाही प्रयत्न गुन्हेगारी व्यक्तींकडून केला जातोब्ल्यू व्हेलपब्जीसारख्या गेमच्या आहारी गेल्याने तरूणांचे मोठे नुकसान होतेअमरावतीतही एक तरूणी बेपत्ता झाल्याचे प्रकरण घडले आहेयात महिला व मुलींप्रमाणे बालकांच्या फोटोचाही वापर होत असल्याच्या घटना घडल्या आहेतत्यामुळे वेबसाईच्या सेंटिंग्जमध्ये जाऊन सिक्युरिटीचे भक्कम पर्याय निवडणेअनावश्यक माहिती शेअर न करणेबॅक अप ठेवणे व पालकांचे नियंत्रण असणे गरजेचे आहे.
श्रीमती खांडपासोळे म्हणाल्या कीदुर्लक्ष व जागरूकतेचा अभाव हे व्यक्ती गुन्ह्यास बळी पडण्यास मुख्यत्वे कारणीभूत असतातत्यामुळे हे कसे टाळायचे याचे कौशल्य आत्मसात करणे अपरिहार्य आहेयात पालकांनी आपली जबाबदारी ओळखून स्वत:सही मर्यादा घालाव्यात व पाल्यांना तसे मार्गदर्शन केले पाहिजेआपल्या दैनंदिन जीवनातील हकीकती प्रसृत करण्यास मर्यादा हवीसोशल मिडीयातून वेट लॉससौंदर्य प्रसाधने यांच्या आकर्षक पण फसव्या जाहिरातींचे प्रमाणही मोठे आहेत्यांना बळी पडू नयेजाणीवजागृती व जबाबदारी या त्रिसूत्रीचा अवलंब करावा.

चाईल्डलाईनचे दिनेश कपूर यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिलीपोलीस निरीक्षक निलिमा आरज यांनी प्रास्ताविक केलेपोलीस निरीक्षक अनिल कुरळकर यांनी सूत्रसंचालन केलेजिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यांनी आभार मानले. सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती हेरोळे यांच्यासह विविध पोलीस अधिकारी व कर्मचा-यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला शहरातील महिला कार्यकर्ताविद्यार्थिनीअधिकारी यांची मोठी उपस्थिती होती. श्री शिवाजी शिक्षण संस्थादिशा संस्थाचाईल्डलाईनपब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडिया व विविध शाळामहाविद्यालयांचे कार्यक्रमाला सहकार्य लाभले.
                                    000

Thursday, January 2, 2020

गारपीट नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा - मंत्री यशोमती ठाकूर यांचे जिल्हाधिका-यांना निर्देश

शासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी


       अमरावतीदि. 2 - जिल्ह्यात सुरु असलेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीची पाहणी करुन तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिका-यांना दिले आहेत.

       श्रीमती ठाकूर यांनी आज जिल्हाधिकारी  शैलेश नवाल यांच्याशी चर्चा करुन जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती घेतली.  नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना तात्काळ नुकसानभरपाई देण्यासाठी शासन कटिबद्ध असून शेतकरी बांधवांनी या संकटकालीन परिस्थितीत   विचलित होऊ नये. शासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी आहेअसे आवाहन श्रीमती ठाकूर यांनी केले आहे.

       श्रीमती ठाकूर यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकारी आणि कर्मचा-यांना तात्काळ नुकसानग्रस्त भागात भेट देऊन पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. श्रीमती ठाकूर या उद्या तिवसा तालुक्यातील काही नुकसानग्रस्त भागांनाही भेट देणार आहेत. या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे प्रभावित झालेल्या शेतक-यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्या परिस्थिती जाणून घेणार आहेत. 


अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...