Official Blogger Account of District Information Office, Amravati DGIPR, Government of Maharashtra
Wednesday, December 1, 2021
वलगाव येथील पाणीपुरवठा सुविधेसाठी 92 लक्ष निधीला प्रशासकीय मान्यता- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
Tuesday, November 30, 2021
बचत गटाच्या माध्यमातून महिलांमध्ये वित्तीय साक्षरता - पालकमंत्री ॲङ यशोमती ठाकूर
बचत गटाच्या माध्यमातून महिलांमध्ये वित्तीय साक्षरता
- पालकमंत्री ॲङ यशोमती ठाकूर
'महाबॅंके'कडून जिल्ह्यातील 582 महिला बचत गटांना 8 कोटी 13 लक्ष रुपयांचे कर्ज वाटप
जिल्ह्यात लवकरच गोट बँक कार्यान्वित होणार
अमरावती, दि. 30: बचत गटांमुळे महिला सक्षम बनत असून त्यांच्यामध्ये वित्तीय साक्षरताही वाढत आहे. महिलांना बचत गटांसाठी सुलभ कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रचा पुढाकार प्रशंसनीय असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री ॲङ यशोमती ठाकूर यांनी आज काढले.
संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे बँक ऑफ महाराष्ट्र व महिला आर्थिक वितरण महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांना उद्योग निर्मितीसाठी कर्ज वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी श्रीमती ठाकूर बोलत होत्या.
महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, प्रकल्प संचालक प्रिती देशमुख, बँक ऑफ महाराष्ट्र अमरावती झोनचे अंचल प्रबंधक राहूल वाघमारे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, जितेंद्रकुमार झा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
महिला बचत गटांना स्वयंपूर्ण बनवून त्यांना सहज भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी बॅंक ऑफ महाराष्ट्रने कर्ज वितरणाची प्रक्रिया सुलभ केली आहे, असे सांगून श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, बचत गटांच्या माध्यमातून आत्मनिर्भर होण्यासाठी महिला पुढाकार घेत आहेत. ही बाब कौतुकास्पद आहे. कोविडच्या काळात महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी घरुनच मास्क बनविणे, सॅनिटायझर तसेच खाद्य पदार्थ आदींची निर्मिती केली. त्यांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे बचत गटातील महिलांचेही मनोबल वाढले. जागतिक बँकेनेही महिला बचत गटांच्या कार्याची नोंद घेतली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमुळे आज 582 महिला बचत गटांना 8 कोटी 13 लक्ष रुपयांचे कर्ज वितरण करण्यात येत आहे. यापासून प्रेरणा घेऊन इतर महिलांनीही बचत गटांमध्ये सहभागी होऊन आर्थिक स्वावलंबी बनण्यासाठी प्रयत्न करावे. प्रशासनामार्फत आपल्याला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
जिल्ह्यात एकूण 1475 महिला बचत गट कार्यरत आहेत. या बचत गटांच्या सक्षमतेसाठी लवकरच गोट बँक प्रस्तावित करण्यात येणार आहे. काही ठिकाणी गोट बँक ही संकल्पना यशस्वी ठरली आहे. त्याच धर्तीवर आपल्या जिल्ह्यातही ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास आपोआपच समाजही सक्षम होतो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या सहकार्याने स्वयंसहाय्यता गट नव्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. बँक ऑफ महाराष्ट्र प्रमाणेचे इतर बँकांनीही महिला बचत गटांना सुलभ कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घ्यावा. व सामाजिक बांधिलकी जोपासत महिलांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करावी, असे आवाहन श्रीमती ठाकूर यांनी यावेळी केले.
महिला बचत गटांना मान्यवरांच्या हस्ते यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात धनादेशाचे वाटप करण्यात आले. माहुली जहागीर येथील विठ्ठल स्वयंसहाय्यता बचत गट, मासोद तपोवन येथील अल्मिरा अल्पसंख्यांक बचत गट, राजकमल चौक येथील अलिना महिला बचत गट, लोणी काकडी येथील रुख्मिणी महिला बचत गट, थूगाव पूर्णानगर येथील प्रेरणा महिला बचत गट आदींना यावेळी धनादेशाचे वाटप करण्यात आले.
जिल्ह्यातील एकही नागरिक कोरोना लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी प्रशासनामार्फत प्रभावीपणे लसीकरण मोहिम सर्वत्र राबविल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणून आज कार्यक्रमस्थळीही कोविड लसीकरण मोबाईल व्हॅन उपलब्ध करण्यात आली होती. ज्यांचे अद्याप लसीकरण व्हायचे होते, त्यांनी या सेवेचा लाभ घेतला.
श्रीमती ठाकूर यांनी महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाची पाहणी करुन खरेदीही केली. उत्पादित केलेल्या मालाची गुणवत्ता उत्तम असल्याचे सांगून त्यांनी बचत गटातील महिलांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहूल वाघमारे यांनी केले. तर संचालन निशा राऊत व आभार सुनील सोसे यांनी मानले.
***
Wednesday, November 24, 2021
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्यासमाधीस्थळाला राज्यपालांचे अभिवादन
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या
समाधीस्थळाला राज्यपालांचे अभिवादन
गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे
समाधीस्थळ व प्रार्थना मंदिराला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट
अमरावती, दि. 24 :राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मोझरी येथील राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे शांतीस्थान महासमाधीला आज भेट दिली. यावेळी महासमाधीवर त्यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच येथील प्रार्थना मंदिरालाही भेट दिली.
समाधीस्थळावरील शांतता व पावित्र्य मनाला संमोहित करणारे आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांनी ही भूमी पावन झालेली आहे. राष्ट्रसंतांच्या विचारांची ज्योत प्रत्येकाने आपल्या मनात तेवत ठेवावी. हीच खरी त्यांना मानवंदना ठरेल, असे श्री कोश्यारी यावेळी म्हणाले.
महापौर चेतन गावंडे, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सचिव जनार्दन बोधे, श्रीमती निवेदिता चौधरी, अध्यात्म विभाग प्रमुख डॉ राजाराम बोधे तसेच जिल्हाधिकारी पवनीत कौर, उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे, तहसिलदार वैभव फरताडे, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ आदी यावेळी उपस्थित होते.
अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळामार्फत राज्यपाल श्री कोश्यारी यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विरचित गद्य-पद्य ग्रंथ संपदा, ग्रामगीता तसेच शाल, श्रीफळ देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले.
Monday, November 22, 2021
महिला सक्षमीकरणासाठी समाजात नव उद्योजिका निर्माण होणे गरजेचे - जिल्हाधिकारी पवनीत कौर
-
महिला सक्षमीकरणासाठी समाजात
नव उद्योजिका निर्माण होणे गरजेचे
- जिल्हाधिकारी पवनीत कौर
* दुर्गापूर कृषी विज्ञान
केंद्रात महिला वसतिगृहाचे उद्घाटन तसेच महिला उद्योजक कार्यशाळा संपन्न
अमरावती, दि. 22 : आज सर्वच क्षेत्रात महिलांनी स्वत:चे
स्थान निर्माण केले आहे. महिला उद्योजक म्हणूनही जिल्ह्यातील अनेक महिलांना राष्ट्रीय
पातळीवर सन्मानित करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर जिल्ह्यातील अन्य महिलांनाही प्रोत्साहन
देऊन नव उद्योजिका निर्माण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी पवनीत कौर
यांनी आज येथे केले. दुर्गापूर कृषी विज्ञान केंद्रातील महिला वसतिगृहाचे उद्घाटन जिल्हाधिकारी
यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महिला उद्योजक कार्यशाळाही
घेण्यात आली.
दुर्गापूर कृषी विज्ञान केंद्राचे वरीष्ठ शास्त्रज्ञ व
प्रमुख डॉ. के.ए. धापके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, जिजामाता कृषी भूषण
पुरस्काराने सन्मानित प्रगतीशील शेतकरी पुर्निमा सवाई, महिला आर्थिक विकास महामंडळाचे
जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे जिल्हा अभियान व्यवस्थापक
सचिन देशमुख, आत्माच्या अर्चना निस्ताने आदी यावेळी उपस्थित होते.
महिला उद्योजकांना प्रोत्साहन देत श्रीमती कौर म्हणाल्या
की, कृषी विज्ञान केंद्रातून प्रशिक्षण घेऊन उद्योग चालविणाऱ्या महिलांचे उत्पादन अतिशय
सुंदर आहे. या उत्पादनाला विक्री व्यवस्थापनाची जोड देणे आवश्यक आहे. यासाठी महिलांच्या
उत्पादनाला योग्य बाजारपेठ उपलब्ध होणे गरजेचे आहे. यादृष्टीने लवकरच कार्यवाही करण्यात
येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
डॉ. के.ए. धापके म्हणाले की, दुर्गापूर कृषी विज्ञान केंद्रामार्फत
विविध प्रशिक्षण देण्यात येते. येथे सुरु करण्यात आलेल्या महिला वसतिगृहामुळे या प्रशिक्षणाला
अधिक चालना मिळून अधिकाधिक महिलांना त्याचा लाभ मिळेल. आपल्या जिल्ह्यात संत्री मोठ्या
प्रमाणावर उत्पादित होतात. परंतू संत्री रस साठवून ठेवण्यासाठी अनेक अडचणी आहेत. त्यासाठी
महिला उद्योजकांनी छोट्या स्टॉलवरुन संत्रा रसाची त्वरित विक्री करता येईल अशी व्यवस्था
निर्माण केल्यास बाजारपेठेत या पेयाला चांगली मागणी निर्माण होऊ शकते.
अनेक क्षेत्राप्रमाणे शेती व्यवसायातही महिलांचा सहभाग
मोठ्या प्रमाणात आहे. कृषीवर आधारित उद्योग वाढविण्यासाठी शासनाच्या अनेक कल्याणकारी
योजना आहेत. त्याचा लाभ महिला उद्योजकांनी घ्यावा. या योजनांचा लाभ वैयक्तिक किंवा
गटाच्या माध्यमातूनही घेता येतो. अनेक योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर सबसीडीही उपलब्ध
आहे, असे सांगून अनिल खर्चान यांनी उपस्थित महिला उद्योजकांना विविध योजनांची माहिती
दिली. महिलांनी वस्तूंच्या विक्रीचे कौशल्य आत्मसात करुन उद्योगाची उभारणी केल्यास
उद्योग निश्चितच यशस्वी होईल, असे श्री सोसे यावेळी म्हणाले.
जिल्ह्यात
बचत गट महिला उत्पादन कंपनीसाठी व्यापारी केंद्र उभारण्याचे शासनस्तरावर प्रस्तावित
आहे. त्यातून विक्री व्यवस्था निर्माण झाल्यास उद्योगांना निश्चितच चालना मिळेल, असे
श्री देशमुख यावेळी म्हणाले. महिला उद्योजक आरती शेंडे, शोभा डवरे, रुपाली कापसकर,
किरण लोहकरे, मनिषा टवलार यांनी आपल्या व्यवसायाची माहिती देऊन या क्षेत्रातील आव्हाने
आणि अडचणींबाबत जिल्हाधिकारी यांना माहिती दिली.
कृषी
विज्ञान केंद्रातील साधना रेडिओ, बीज प्रक्रिया, बीज परीक्षण, माती-पाणी परीक्षण, सेंद्रिय
खते निर्मिती केंद्र आदींची जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन पाहाणी केली.
कार्यक्रमाचे
संचालन आणि आभार प्रदर्शन गृह विज्ञान विषय विशेषज्ञ डॉ. अर्चना काकडे यांनी मानले.
00000
आरोग्य पथकांद्वारे मेळघाटात पाड्यापाड्यांवर पोहोचून लसीकरण
आरोग्य पथकांद्वारे मेळघाटात पाड्यापाड्यांवर पोहोचून लसीकरण
अमरावती, दि. 22 : जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाने
वेग घेतला आहे. आरोग्य पथके जिल्ह्यात सर्वदूर, तसेच मेळघाटातील पाड्यापाड्यांवर पोहोचून
पात्र व्यक्तींचे लसीकरण करत आहेत. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडून ठिकठिकाणी पोहोचून
शिबिरांची पाहणी करण्यात येत आहे. जिल्हाधिका-यांनी आज नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील
रांजणा येथे लसीकरण शिबिराला भेट देऊन मार्गदर्शन केले.
विविध योजना, उपक्रमांची सांगड लसीकरणाशी
घालून मोहिम व्यापक करण्यात आली आहे. या आठवड्यात लसीकरण मोठ्या प्रमाणावर पार पडण्याची
चिन्हे आहेत. अंजनगाव बारी, रांजणा, खिराळा, कु-हा, गणोरी, खडिमल, वलगाव, शिराळा, चंद्रपूर,
येवदा, रामतीर्थ, आमला, रेहट्याखेडा अशा अनेक ठिकाणी शिबिरांना मोठा प्रतिसाद मिळत
आहे. निरनिराळी कार्यालये, संस्था आदींनाही मोहिमेत सहभागी करून घेतले जात आहे. अंजनगाव
सुर्जी बाजार समितीतील सभेला व्यापारी, अडते, हमाल आदींनी हजेरी लावली.
मेळघाटातील चिखलदरा
व धारणी तालुक्यात आरोग्य पथके पाड्यापाड्यांवर पोहोचून लसीकरण कार्यक्रम राबवत आहेत.
लोकांचे प्रबोधन करणे, लसीकरणाचे महत्व पटवून देणे व लसीकरण आदी कार्यक्रम नियोजनबद्ध
पद्धतीने पार पडत आहे. दुर्गम भागापर्यंत पायी पोहोचून पथकांकडून मोहिमेची अंमलबजावणी
होत आहे.
00000
Saturday, November 20, 2021
लसीकरणाचा वेग वाढला; उद्दिष्ट गाठण्यासाठी आणखी प्रयत्नांची गरज - जिल्हाधिकारी पवनीत कौर
प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय परिपूर्ण नियोजनाच्या
सूचना
लसीकरणाचा वेग वाढला; उद्दिष्ट
गाठण्यासाठी आणखी प्रयत्नांची गरज
- जिल्हाधिकारी पवनीत कौर
अमरावती, दि. २० : जिल्ह्यात
आरोग्य व विविध विभाग, अनेक पथकांच्या समन्वयाने लसीकरणाचा
वेग वाढला आहे. तथापि, उद्दिष्टपूर्तीसाठी आणखी थोड्या
प्रयत्नांची गरज आहे. सर्वांनी एकजुटीने व पुढील आठवड्याचे परिपूर्ण नियोजन करून
लसीकरण वाढवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी
केले.
लसीकरण वाढविण्यासाठी मोहिम हाती घेण्यात आली असून, त्यासाठी सर्व विभागांसह विविध क्षेत्रातील संस्था, संघटना,
मान्यवर यांचेही योगदान मिळत आहे. सर्वांचे प्रयत्न व योगदान
कौतुकास्पद असून, यापुढे अधिक व्यापक व नियोजनबद्ध प्रयत्न
करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी केले.
दरम्यान, सर्व तालुका आरोग्य
अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी यांना लसीकरणाबाबत
सुस्पष्ट सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तालुक्याचे आताच्या उद्दिष्टापेक्षा 25 टक्क्यांनी जास्त उद्दिष्ट ठेवण्यात
यावे व त्यानुसार टीम चे नियोजन करण्यात यावे. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे
उद्दिष्टापेक्षा काम कमी होत आहे त्यांना जास्त प्रमाणात फोकस करून नियोजन करण्यात
यावे. मागील सात दिवसाचे कामकाज तपासावे.
उद्दिष्टपूर्तीकरिता जास्त लोकसंख्येचे गाव निवडून त्या गावांमध्ये एकाच दिवशी
वेगवेगळ्या ठिकाणी सत्र नियोजित करून शंभर टक्के उद्दिष्ट प्राप्त होईल याची
नियोजन करावे, अशी सूचना करण्यात आली आहे.
तालुका आरोग्य अधिकारी यांनी पुढील सात दिवसाचे लसीकरण
सत्रांचे परफेक्ट नियोजन करावे. प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय लसीकरणाच्या शिल्लक
असलेल्या एन्ट्री तातडीने पूर्ण कराव्यात. मोबाईल लसीकरणाचे वाहनाला एक दिवसाचे
कमीत कमी चारशे ते पाचशे उद्दिष्ट द्यावे, असेही निर्देश
देण्यात आले आहेत.
ज्या भागात
जास्त प्रमाणात प्रतिसाद कमी आहे त्या भागात मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेऊन
त्यांचे सहकार्याने सत्र आयोजित करावे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला किमान
हजार इतके उद्दिष्ट द्यावे ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्दिष्ट पूर्ण होईल
त्या टीम इतर प्राथमिक आरोग्य केंद्राला त्यांच्या सेवा अधिग्रहित कराव्या, अशाही सूचना तालुका आरोग्य अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी सांगितले.
00000
लसीकरण वाहन थेट आपल्या दारी नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद
लसीकरण वाहन थेट आपल्या
दारी
नागरिकांचा उस्फूर्त
प्रतिसाद
अमरावती, दि.२० : कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या
मार्गदर्शनाखाली कोरोना लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे .लसीकरण
मोहिमेंतर्गत आता लसीकरण वाहन थेट नागरिकांच्या दारी जात असून मोठ्या प्रमाणावर
लसीकरण करण्यात येत आहे .या उपक्रमाला नागरिकांचाही उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे .
जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या आदेशान्वये
तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती
जिल्हा आरोग्य कार्यालयातून वलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास लसीकरण वाहन मिळाले. जिल्हा
परिषद सदस्य गजानन राठोड यांच्या हस्ते या लसीकरण वाहनाचे काल (दिनांक १९
नोव्हेंबर )उद्घाटन करण्यात आले .
लसीकरण वाहनाच्या सहाय्याने वलगाव येथील
वसुपुरा ,
निर्मळ हॉस्पिटल लढ्ढा गल्ली तसेच सौदागरपुरा येथील ५५० नागरिकांचे
लसीकरण करण्यात आले आहे .लसीकरण चमूमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश पाटील, समुदाय अधिकारी डॉ. प्रिती चव्हाण, आरोग्य सेविका
राधिका पखाले, आरोग्य सहायक श्री. नवाथे उपस्थित होते. आजही या भागामध्ये लसीकरण
वाहनाद्वारे लसीकरणाचे कार्य सुरू आहे.
लसीकरण वाहनामुळे ग्रामीण भागातील
नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती निर्माण होण्यास मदत होत आहे .थेट आपल्या दारी
लसीकरण वाहन आल्यामुळे नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. लसीकरण वाहनामुळे
जास्त लोकसंख्या असलेल्या भागांमध्ये जाऊन लसीकरण करणे सहज शक्य होत असल्याची
माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ .दिलीप रणमले यांनी दिली आहे.
कोरोना लसीकरणापासून एकही नागरिक वंचित राहू
नये यासाठी आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन विविध उपक्रम राबवित आहे . कोरोनाचा कहर कमी झाला असला तरी दुर्लक्ष करून चालणार
नाही .तरी ज्या नागरिकांचा पहिला व दुसरा डोस अदयाप प्रलंबित आहे त्यांनी नजिकच्या
लसीकरण केंद्रावर जावून तातडीने लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती
कौर यांनी केले आहे.
0000
अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक
अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...
-
पालकमंत्र्यांनी घेतला जिल्हा नियोजन समितीचा आढावा; 679 कोटी मंजूर निधीच्या कामांचे प्रस्ताव तात्काळ सादर करा - पालकमंत्री चंद...
-
महसूल दिनी एक लाख वृक्षारोपण होणार *आजपासून महसूल सप्ताहाचे आयोजन; विविध कार्यक्रमांची रेलचेल अमरावती, दि. ३१ : महसूल दिनाच्या निमित्ताने १ ...
-
खरीप पीक कर्जवितरणाला गती देण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश कर्जवितरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करा - पालकमंत...


















