Sunday, July 31, 2022

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

 विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

अमरावती दि.1 (विमाका) : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि. 1 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यमप्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे.

विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (341.24), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (397.39), अरुणावती (329.28), बेंबळा (266.55), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (346.71), वान (405.20), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (290.55), पेनटाकळी (556.90), खडकपूर्णा (519.44).

मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (443.10), चंद्रभागा (502.70), पूर्णा (448.22), सपन (507.45), पंढरी (426.70), गर्गा (344.50), बोर्डीनाला (362.00),यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (304.78), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319.00), नवरगांव (254.10), अकोला जिल्ह्यातील  निर्गुणा (390.70), मोर्णा (366.20), उमा (343.25), घुंगशीबॅरेज (254.00), वाशिम जिल्ह्यातील अडाण (379.96), सोनल (451.90), एकबुर्जी (151.94), बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा (402.50), पलढग (401.75), मस (324.50), कोराडी (545.25), मन (372.90), तोरणा (403.35), उतावळी (370.50) आहे.   

000000

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

 

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

अमरावती दि.31 (विमाका) : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि. 31 जुलै 2022 रोजी सकाळी           7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यम प्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे.

विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (341.24), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (397.26), अरुणावती (329.19), बेंबळा (266.55), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (346.89), वान (405.10), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (290.53), पेनटाकळी (556.80), खडकपूर्णा (519.28)

मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (442.92), चंद्रभागा (502.60), पूर्णा (448.14), सपन (507.30), पंढरी (426.70), गर्गा (344.50), बोर्डीनाला (362.00), यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (304.79), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319.00), नवरगांव (254.10), अकोला जिल्ह्यातील  निर्गुणा (390.70), मोर्णा (366.10), उमा (343.15), घुंगशीबॅरेज (254.00), वाशिम जिल्ह्यातील अडाण (379.85), सोनल (451.90), एकबुर्जी (151.94), बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा (402.50), पलढग (401.70), मस (324.45), कोराडी (545.25), मन (372.90), तोरणा (403.35), उतावळी (370.50) आहे.  

00000

 

 

 

 

 

 

 

 

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे आजपासून खादी उत्सव



स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव

खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे आजपासून खादी उत्सव

अमरावती, दि. ३१ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ व कस्तुरबा सोलर खादी महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ ते १५ ऑगस्ट दरम्यान शहरातील तापडिया सिटी सेंटरमधील तिसऱ्या  मजल्यावर खादी उत्सव प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते उद्या, दि. १ ऑगष्ट रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे यांनी आज दिली.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत अमरावती जिल्ह्यात मागील पाच वर्षापासून विकेंद्रित सोलर चरखा समूह कार्यक्रम हा नाविन्यपुर्ण पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील २१ गावांमध्ये अडीचशे महिलांना सौर चरखे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

 कस्तुरबा सोलर खादी महिला समितीमार्फत अमरावती जिल्हयातील शेतकऱ्यापासून कापूस खरेदी करून त्यापासून कच्चा माल तयार करतात. विविध गावातील चरख्यावर सुत कताई करून त्यापासून सौर खादी कापड व विविध सौर खादी उत्पादनाची निर्मिती केली जाते.

 संपूर्णतः महिलांनी महिलांसाठी राबविण्यात आलेला हा देशातील एकमेव प्रकल्प आहे.

 

 

या प्रकल्पामध्ये अमरावती जिल्हातील ३०० पेक्षा जास्त महिलांना कायमस्वरूपी रोजगार प्राप्त झाला असून हा प्रकल्प पूर्णतः सामाजिक भावनेतून ना नफा ना तोटा या तत्वावर राबविण्यात येत आहे. त्यामध्ये अमरावती जिल्हयातील धारणी तालुक्यातील १०० आदिवासी महिलांचा समावेश आहे. तसेच धारणी तालुक्यातील मांडू या गावी विणकाम केंद्र स्थापन केले असून तेथील १५ पेक्षा जास्त युवक- युवतीना उदरनिर्वाहाकरिता कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण व ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्याचा संस्थेचा उद्देश आहे.

या प्रकल्पाअंतर्गत राज्य शासनाच्या उद्योग विभागाच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रमा अंतर्गत (MSICDP) अमरावती एम आय डी सी येथे ग्रीनफॅब सोलर खादी प्रोसेसिंग क्लस्टर या नावाने सामुहिक सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या सामुहिक सुविधा केंद्रामध्ये ८० टक्के शासनाचा सहभाग आहे.

अमरावतीकरांनी या उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन खादी ग्रामोद्योग कार्यालय व कस्तुरबा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

00000

 

 

 

 


अमरावती विभागात जूनपासून आतापर्यंत 501.4 मिमि पावसाची नोंद विभागात सरासरी 3.8 मि.मि. पाऊस

 अमरावती विभागात

जूनपासून आतापर्यंत 501.4 मिमि पावसाची नोंद

विभागात सरासरी 3.8 मि.मि. पाऊस

 

अमरावती दि 31 (विमाका) : अमरावती विभागातील 56 तालुक्यात पाऊस झाला. विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाने उपलब्ध करुन दिलेल्या ‘महावेधच्या नोंदीनुसार आज दुपारी बारा वाजेपर्यंत विभागात सरासरी 3.8 पाऊस झाला. दि. 1 जून ते आजपर्यंत 501.4 मिमि पावसाची नोंद करण्यात आली आहे.

विभागात नोंदला गेलेला आजचा तालुका निहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदा 1 जूनपासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिली मिटर परिमाणात आहेत. ही माहिती ‘महावेधच्या नोंदीनुसार दुपारी बारावाजेपर्यंतची असुन बदलत्या पर्जन्यमानानुसार त्यात बदल होऊ शकतात.

अमरावती जिल्हा : धारणी 0.0 (492.7), चिखलदरा 0.0 (789.9), अमरावती 3.0 (419.8), भातकूली 3.8 (341.2), नांदगाव खडेश्वर 1.8 (520.0), चांदूर रेल्वे 8.8 (448.9), तिवसा 4.2 (597.4), मोर्शी 1.0 (521.2), वरुड 1.3 (548.3), दर्यापूर 1.0 (324.9), अंजनगाव 0.0 (385.3), अचलपूर 0.3 (375.4), चांदूरबाजार 6.9 (560.6), धामणगाव रेल्वे 2.4 (624.6) अमरावती जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 2.4 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 486.5 मि.मि. पाऊस झाला.

अकोला जिल्हा :- अकोट 0.0 (260.3), तेल्हारा 0.0 (370.5), बाळापूर 0.4 (472.6), पातूर 3.9 (405.2),  अकोला 2.2 (448.0), बार्शी टाकळी 27.8 (370.4), मुर्तीजापूर 0.1 (353.8), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 4.2 मि.मि. तर आजवर 385.8 मि.मि पाऊस झाला आहे.

बुलडाणा जिल्हा :- जळगाव जामोद 0.8 (299.8), संग्रामपूर 0.2 (368.6), चिखली 0.4 (438.4), बुलडाणा 1.7 (546.4), देऊळगाव राजा 3.4 (415.8), मेहकर 0.1 (456.8), सिंदखेड राजा 10.0 (463.8), लोणार 13.0 (385.3), खामगाव 0.0 (326.9), शेगाव 0.3 (405.0), मलकापूर 0.0 (291.3), मोताळा 0.0 (322.4), नांदूरा 0.0 (316.8), जिल्ह्यात दिवसभरात 2.1 तर यंदाच्या हंगामात आजवर 393.7 मि.मि. पाऊस झाला.

यवतमाळ जिल्हा : यवतमाळ 4.7 (609.5), बाभूळगाव 2.4 (620.8), कळंब 1.1 (626.9), दारव्हा 15.6 (489.7), दिग्रस 7.1 (598.6), आर्णी 5.0 (761.2), नेर 4.0 (546.3), पुसद 7.4 (478.5), उमरखेड 2.9 (608.0), महागाव 2.9 (686.5), वणी 2.3 (855.1), मारेगाव 12.5 (798.3), झरीजामणी 2.2 (744.7), केळापूर 9.1 (744.7), घाटंजी 9.1 (619.8), राळेगाव 3.9 (801.0), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 5.7 तर यंदाच्या हंगामात आजवर सरासरी 657.7 मि.मि पाऊस झालाआहे.

वाशिम जिल्हा : - वाशिम 0.3 (483.8), रिसोड 9.8 (520.1), मालेगाव 1.0 (527.6), मंगरुळपिर 1.5 (519.6), मानोरा 23.2 (590.3), कारंजा 0.1 (374.4), जिल्ह्यात 24 तासात 5.2 तर 1 जूनपासून आजवर 498.0 मि.मि. पाऊस झाला.

****

'हर घर तिरंगा' उपक्रम दि. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांचे आवाहन

 


'हर घर तिरंगा' उपक्रम दि. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान

नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे

- विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांचे आवाहन

 

अमरावती,दि. ३१ : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर 'हर घर तिरंगा' उपक्रम दि. १३ ते १५ ऑगस्ट या काळात राबविण्यात येणार आहे. प्रत्येक घरावर तिरंगा डौलाने फडकावा, यासाठी सर्व नागरिकांनी उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले आहे.

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनातस्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात राहावी या उद्देशाने या देदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी दि. १३  १५ ऑगस्ट या कालावधीसाठी 'हर घर तिरंगा' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक जिल्हयातील, प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकावा याकरीता या उपक्रमामध्ये सर्व जनतेने उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे व ध्वजसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले आहे.

प्रत्येक जिल्ह्यात हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी भरीव जनजागृती करावी. विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यालये, आस्थापना, नागरिक, संस्था यांना  उपक्रमात सहभागी करून घ्यावे. अधिकाधिक लोकसहभाग मिळवून उपक्रम यशस्वी करावा, असे निर्देश विभागीय आयुक्त श्री. पांढरपट्टे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

अशी आहे ध्वजसंहिता

         ध्वजसंहितेनुसार, आपला राष्ट्रध्वज हा हाताने कातलेला किंवा विणलेला अथवा मशीनद्वारे तयार केलेला असावा. सूत, पॉलिस्टर, सिल्क, खादी किंवा लोकरीपासून तयार केलेला तिरंगा चालेल. प्लास्टिक किंवा कागदी झेंडा फडकवू नये. राष्ट्रध्वजाचा अर्थात तिरंगाचा आकार हा आयताकृती असेल. तसेच त्याची ठेवण 3:2 या प्रमाणात असावी. तिरंगा फडकवताना नेहमी झेंड्यातील केशरी रंग हा वरच्या बाजूने आणि हिरवा रंग हा जमिनीच्या बाजूने राहील, याची काळजी घ्यावी. यात चूक केल्यास तो तिरंग्याचा अवमान समजण्यात येतो.

     राष्ट्रीय ध्वज लावताना स्तंभाच्या वरच्या टोकावर लावावा. त्याला स्तंभाच्या मध्ये अगर खाली किंवा इतरत्र लावू नये.राष्ट्रध्वज लावताना, इतर सजावटी वस्तू लावू नये, केवळ फडकवण्याआधी त्यात फुले किंवा पाकळ्या ठेवण्यास मनाई नाही, तसेच राष्ट्रध्वज उतरवताना पूर्ण सावधानतेने आणि सन्मानाने हळूहळू उतरवावा.

      ध्वजावर कोणते प्रकारचे अक्षर चिन्ह लावू नये. तसेच ध्वज स्तंभाच्या वर अथवा आजूबाजूला काही लावू नये, ध्वज जमिनीपासून उंचावर लावावा. ध्वज जाणून-बुजून जमिनीवर अगर पाण्यामध्ये बुडणार नाही अशा पद्धतीने लावावा. राष्ट्रीय ध्वजाचा वापर व्यवसायाकरिता करता येत नाही. तसेच त्याची अवहेलनाही करणं दंडनीय अपराध आहे. त्यामुळे ध्वजाचा उपयोग गाडीवर झाकणे, इमारतीवर झाकणे, टेबलवर टेबल क्लॉथ प्रमाणे टाकणे, ध्वजाच्या कोणत्याही प्रकारच्या पोशाखाचा अथवा गणवेशाचा भाग म्हणून वापर करणे, ध्वजाचा रुमाल, उशी किंवा शर्ट आदींवर किंवा कोणत्याही पोशाख साहित्यावर भरतकाम किंवा छपाई करणे चुकीचे आहे.

 

     राष्ट्रध्वज कुठल्याही प्रकारे फाटलेला, मळलेला अथवा चुरगळलेला लावण्यात येऊ नये. तसेच तो एकाच वेळी इतर ध्वजासोबत एकाच काठीवर फडकवू नये. ज्या स्तंभावर राष्ट्रध्वज फडकवायचा आहे, त्या काठीवर वा स्तंभावर ध्वजाच्या टोकावर फुले किंवा हार यासारखी कोणतीही वस्तू, बोधचिन्ह ठेवू नये. राष्ट्रध्वजाच्या कोणत्याही प्रकारे तोरण, गुच्छ अथवा पताका म्हणून किंवा अन्य कोणत्याही प्रकारे शोभेसाठी उपयोग करू नये. राष्ट्रीय ध्वज उभारताना तो कोणत्याही पद्धतीने फाटणार नाही, याची काळजी घ्यावी.आपला राष्ट्रध्वज तिरंगा हा आपला अभिमान आहे. आपली अस्मिता आहे. त्याचा कुठल्याही प्रकारे अनादर होईल अशा प्रकारे कृत्य करू नये.

     स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात घरोघरी ध्वज फडकावा व ध्वज संहिता पाळण्यात यावी,असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

00000

 

 

 

 

 

 

 

 

Friday, July 29, 2022

महिलांमध्ये आर्थिक सक्षमीकरणाबाबत सकारात्मकता निर्माण करावी - प्रधान सचिव मनीषा वर्मा

 











महिलांमध्ये आर्थिक सक्षमीकरणाबाबत

सकारात्मकता निर्माण करावी

-         प्रधान सचिव मनीषा वर्मा

‘आकांक्षा कौशल्यातुन जीवनोन्नतीकडे..’ सामंजस्य करार

          अमरावती दि. 29 (विमाका): रोजगाराविषयी प्रशिक्षणाचा कालावधी पुर्ण करुन रोजगार प्राप्त होईपर्यंत सहभागी महिला प्रशिक्षणार्थींचे सातत्याने समुपदेश करावे. प्रेरणादायी सत्र, उद्योजक कंपन्यांचे भरती मेळावे व विषय तज्ज्ञांच्या व्याख्यानांचे नियमीत आयोजन करावे. प्रशिक्षणानंतर रोजगार प्राप्त होऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याबाबत सकारात्मकता या महिलांमध्ये निर्माण करावी, अशा सुचना कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनीषा वर्मा यांनी दिल्या.

आकांक्षा कौशल्यातुन जीवनोन्नतीकडे कार्यक्रमातंर्गत अमरावती व नागपुर विभागातील युवती व महिलांना कौशल्य प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणाऱ्या प्रशिक्षण प्रकल्पाबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय विकास प्रशिक्षण प्रबोधिनी व नवगुरुकुल फाऊंडेशन फॉर सोशल वेलफेअर, दिल्ली यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

         आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवती व महिलांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन त्यांना अर्थार्जनाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी ‘आकांक्षा कौशल्यातुन जीवनोन्नतीकडे’ हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सामंजस्य करारावर यावेळी स्वाक्षरी करण्यात आली.

जिल्हाधिकारी पवनीत कौर, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे उपायुक्त दत्तात्रय ठाकरे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक प्रदीप घुले, सहायक संचालक नरेंद्र येते, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी के विसाळे, प्रविण आत्राम, प्रबोधिनीचे संचालक गजेंद्र बावणे, नवगुरुकुल फाउंडेशच्या संचालिका निधी अनारकत आदी यावेळी उपस्थित होते.

या प्रकल्पातंर्गत प्रशिक्षणासाठी विज्ञान शाखेत पदवी प्राप्त युवती व महिलांना संधी देण्यात येणार असुन त्यांची प्रवेशासाठी निवड करीत असतांना पालकांना प्रशिक्षणाबाबतचे नियम, निवासाबाबत असलेली सुरक्षितता, भोजन व आदी बाबींची माहिती देण्यात यावी. दुर्बल घटकातील महिलांना या प्रशिक्षणाच्या माध्यमातुन आर्थिक व सामाजिकदृष्ट्या स्थिरता प्रदान होईल असा विश्वास श्रीमती वर्मा यांनी व्यक्त केला .

अमरावती नागपुर विभागातील प्रशिक्षणासाठी इच्छुक 5 हजार 465 महिलांनी नोंदणी केली असुन 2 हजार 224 महिलांनी ऑन लाईन चाळणी परीक्षा दिली. त्यापैंकी 1 हजार 307 महिलांनी ही चाचणी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. प्रवेशासाठी चार टप्प्यांमध्ये चाळणी परीक्षा घेण्यात येणार असुन प्रवेशाबाबत प्रक्रिया सुरु असल्याची माहीती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केद्रांचे सहायक आयुक्त प्रफुल शेळके यांनी दिली.

                                               000000

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

 


विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

अमरावती दि.29 (विमाका) : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि. 29 जुलै 2022 रोजी सकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यम प्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे.

विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (341.18), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (396.84), अरुणावती (328.95), बेंबळा (266.45), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (346.56), वान (404.90), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (290.50), पेनटाकळी (556.75), खडकपूर्णा (519.0).

मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (442.44), चंद्रभागा (502.40), पूर्णा (448.53), सपन (507.65), पंढरी (426.70), गर्गा (344.70), बोर्डीनाला (362.25),यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (304.76), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319.00), नवरगांव (254.10), अकोला जिल्ह्यातील  निर्गुणा (390.50), मोर्णा (365.80), उमा (343.15), घुंगशीबॅरेज (254.00), वाशिम जिल्ह्यातील अडाण (379.85), सोनल (451.90), एकबुर्जी (150.90), बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा (402.40), पलढग (401.60), मस (324.40), कोराडी (545.25), मन (372.90), तोरणा (403.35), उतावळी (370.50) आहे.   

000000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...