Thursday, August 4, 2022

आजादी का अमृत महोत्सव भव्य तिरंगा कावड यात्रा

 


आजादी का अमृत महोत्सव

भव्य तिरंगा कावड यात्रा

अमरावती, दि.4 (विमाका) : ‘तिरंगा माझा’ या सेवा भावी संस्थेच्यावतीने ‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत दि. 7 ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

‘तिरंगा माझा’ गृपच्यावतीने आयोजित कावड यात्रेचे शहरात स्वागत होणार असून या यात्रेत भारत मातेचे पूजन व सर्व थोर पुरुषांच्या स्मारकास जलाभिषेक करण्यात येणार आहे. कावड यात्रेची सुरुवात चांदूरबाजार येथील कुरळपूर्णापासून सकाळी 7 वाजता होणार असून ही यात्रा रिंगरोड, शेगांव नाका, पंचवटी चौक, इर्विन चौक, कॉटन मार्केट, चित्रा चौक, जयंस्तभ मार्गे होणार असून नेहरु मैदानात या यात्रेचा समारोप करण्यात येईल. लोकप्रतिनिधी, अधिकारी व मान्यवर उपस्थित राहतील.

00000

मातोश्री शासकिय मुलांच्या वसतीगृहात प्रवेशासाठी २२ ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावे

 मातोश्री शासकिय मुलांच्या वसतीगृहात प्रवेशासाठी

२२ ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावे

अमरावती, दि.४ (विमाका) :महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण विभागातंर्गत येणाऱ्या मातोश्री शासकीय आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहात सन २०२२-२३ या शैक्षणिक सत्रात एकूण ६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत आहेत.

माध्यमिक विभागातील १२ विद्यार्थी, उच्च माध्यमिक विभागातील १८ विद्यार्थी, महाविद्यालयीन विभागातील १८ विद्यार्थी आणि तंत्रशिक्षण विभागातील १२ विद्यार्थी असे एकूण ६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे आर्थिक उत्पन्न २०२१-२२ मधील रू. एक लाख रूपयांच्या आत असावे. विद्यार्थ्यांना या वसतीगृहामध्ये निवास व भोजनाची सुविधा देण्यात येईल. वसतिगृहामध्ये प्रवेशाकरीता अर्ज कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दि. १० ऑगस्ट  ते २२ ऑगस्ट २०२२ पर्यंत वेळ सकाळी ११.०० ते दुपारी ५.०० वाजेपर्यंत वसतीगृहाच्या कार्यालयात विनामुल्य प्रवेश अर्ज वाटप करण्यात येणार असुन विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज दिनांक १० ऑगस्ट ते  २४ ऑगस्ट २०२२ पर्यंत सादर करावे. गरजू विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी वलगाव मार्गावरील मुलांच्या वसतीगृह कार्यालयाशी संपर्क साधावा, असे गृहप्रमुखांनी कळविले आहे.

००००००

विभागीय लोकशाही दिन 8 रोजी

 


विभागीय लोकशाही दिन 8 रोजी

अमरावती, दि.4 (विमाका) : दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्याअनुषंगाने दि. 8 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी शासकीय विभागाशी निगडित तक्रारी, गाऱ्हाणी इत्यादी संदर्भातील प्रकरणे, निवेदन लेखी स्वरुपात सादर करावे. नागरिकांनी त्यांच्या तक्रारी पोस्टाद्वारे, dcgamravati@gmail.com/dcg_amravati@rediffmail.com या संकेतस्थळावर किंवा व्यक्तीश: विभागीय आयुक्त कार्यालयात हजर राहावे, असे विभागीय उपआयुक्त संजय पवार यांनी कळविले आहे.

00000

Wednesday, August 3, 2022

आमझरी हे ‘मधाचे गाव’ म्हणून विकसित होणार स्थानिकांना कायमस्वरूपी रोजगार मिळेल - खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या सीईओ अंशु सिन्हा

 



आमझरी हे मधाचे गाव’ म्हणून विकसित होणार

स्थानिकांना कायमस्वरूपी रोजगार मिळेल

-         खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या सीईओ अंशु सिन्हा

 

अमरावती, दि. 3 : चिखलदरा तालुक्यातील आमझरी हे मधाचे गाव म्हणून विकसित होण्यासाठी या योजनेची सर्व विभागांनी काटेकोर अंमलबजावणी करावी. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना कायमस्वरूपी रोजगार मिळेल, असा विश्वास राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंशु सिन्हा यांनी आज व्यक्त केला.

राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत आमझरी येथे मधाचे गाव संकल्पना राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने श्रीमती सिन्हा यांनी गावाला भेट देऊन पाहणी केली, तसेच विविध विभागाच्या अधिका-यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. प्रकल्प अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सावन कुमार, राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपीन जगताप ,जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्री. प्रदीप चेचरे यांच्यासह तहसीलदार, गटविकास अधिकारी, सिपना महाविद्यालयातील मधुमक्षिका पालन विभागप्रमुख आदी अनेकजण उपस्थित होते.

श्रीमती सिन्हा म्हणाल्या की,  नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, ग्रामीण भागातील युवक व महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मधाचे योग्य व शास्त्रीय पद्धतीने संकलन व त्यानुषंगाने उत्पादन वाढविणे आवश्यक आहे. मधाचे गाव म्हणून विकसित होण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे.

मधमाश्यांचे पर्यावरणातील महत्व मोठे आहे. त्याचा पिकाच्या उत्पादनात वाढ होण्यासाठीही लाभ होतो. हे लक्षात घेता मधमाश्यांच्या संवर्धनाबाबत उपक्रम आखण्यात आला आहे. यामुळे स्थानिकांना रोजगार मिळेल व मधुपर्यटनाच्या माध्यमातून गावाचा विकास होईल. मध केंद्र योजनेत मधमाशीपालनासाठी प्रशिक्षण, साहित्यवाटप, अनुदान आदी सुविधा मिळतात. त्याचा लाभ अधिकाधिक नागरिकांना करून द्यावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

श्रीमती सिन्हा यांनी यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना उपक्रमाची माहिती दिली. यावेळी स्थानिकांना आग्या मधमाश्यांचे कीटवाटप करण्यात आले. खादी व ग्रामोद्योग आयोग व वन विभागामार्फत आमझरी येथील महिलांना नुकतेच अगरबत्ती मशीनचे प्रशिक्षण देण्यात आले. या महिलांना यावेळी प्रशिक्षण प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

000 

 

 

 

 

जिल्हाधिकाऱ्यांनी केली तपोवनची पाहणी

 






जिल्हाधिकाऱ्यांनी केली तपोवनची पाहणी

 

अमरावती, दि.3 :  कुष्ठरोग्यांसाठी दीर्घकाळापासून अविरत कार्यरत असलेल्या तपोवन या सामाजिक संस्थेला आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, असे जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे सांगितले.

जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी तपोवन या संस्थेला यांनी आज भेट देऊन पाहणी केली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. अतुल आळशी, सदस्य विवेक मराठे, प्रभारी सचिव सहदेव गोळे यासह कुष्ठरोग आरोग्य सेवा सहायक संचालक डॉ. अजय डवले, वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाठ, वैद्यकीय परिवेक्षक दीपक गडलिंग आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

श्रीमती कौर यांनी तपोवन येथे कुष्ठरोग्यांमार्फत चालविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली. तसेच तपोवनातील आश्रित उद्योगधंद्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. येथील मुद्रणालयाला त्यांनी भेट देऊन कामकाजाचे स्वरुप जाणून घेतले. येथील पेपर कटींग, बाईंडिंग आदी काम करणाऱ्या कुष्ठरोग्यांशी त्यांनी संवाद साधला. त्यांच्या कामाचे स्वरुप जाणून त्यांना आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत आश्वासन दिले.

येथे सुतार काम उद्योगामध्ये लाकडाचे फर्निचर मोठ्या प्रमाणात तयार करण्यात येते. तसेच शिवणकला उद्योगामध्ये शाळेचे गणवेश शिवणे, ऑपरेशन थिएटरमध्ये लागणारे ॲप्रॉन शिवणे तसेच आवश्यकतेनुसार शिवण काम करण्यात येते. याचीही माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतली. तपोवनमध्येच लोखंडी कपाटे, रॅक्स तयार करण्यात येतात. याला बाहेर मोठी मागणी असते. याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली. कुष्ठरुग्णांसाठी असलेली निवास तसेच भोजनगृहाची पाहणी केली. येथील रुग्णांनी फुलविलेल्या शिव उद्यानाचीही त्यांनी पाहणी केली. त्यानंतर तपोवन परिसरात श्रीमती कौर यांच्या हस्ते सुपारीचे झाड लावून वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. तपोवनमार्फत चालविण्यात येत असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना श्रीमती कौर यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

00000

 

 

 

 

 

 

 

 

 

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘झेंडा विक्री केंद्रा’चा शुभारंभ

 









जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झेंडा विक्री केंद्राचा शुभारंभ

अमरावती, दि. 3 : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवांतर्गत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम दि. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान  राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत (माविम) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झेंडा विक्री केंद्रा’चा शुभारंभ जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते आज झाला.

निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल, महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व महिला बचत गटाच्या महिलाभगिनी यावेळी उपस्थित होत्या.

‘माविम’च्या माध्यमातून झेंडा विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. बचत गटातील महिलाभगिनींनी माविमच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू केला. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा फडकावा, यासाठी अनेक ठिकाणी झेंडे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तशी केंद्रेही ठिकठिकाणी सुरु होत आहेत. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी प्रत्येक घरावर तिरंगा लावून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी यावेळी  केले. 

उपक्रमाबाबत गावोगाव जनजागृतीही होत आहे. विविध कार्यालये, संस्था यांचा सहभाग उपक्रमात मिळत आहे. झेंड्याची सर्वत्र उपलब्धता असण्यासाठी तालुकास्तरारही केंद्रे सुरू होत आहेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. बिजवल यांनी सांगितले.

 

00000

Tuesday, August 2, 2022

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

 विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

अमरावती दि.3 (विमाका) : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि. 3 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यमप्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे.

विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (341.37), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (397.61), अरुणावती (329.38), बेंबळा (266.55), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (346.75), वान (405.52), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (290.56), पेनटाकळी (557.00), खडकपूर्णा (519.60).

मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (443.42), चंद्रभागा (502.80), पूर्णा (448.64), सपन (507.95), पंढरी (426.70), गर्गा (344.40), बोर्डीनाला (361.75),यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (304.79), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319.00), नवरगांव (254.10), अकोला जिल्ह्यातील  निर्गुणा (390.75), मोर्णा (366.35), उमा (343.25), घुंगशीबॅरेज (253.80), वाशिम जिल्ह्यातील अडाण (380.12), सोनल (451.90), एकबुर्जी (151.94), बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा (402.50), पलढग (401.85), मस (324.50), कोराडी (545.25), मन (372.90), तोरणा (403.35), उतावळी (370.50) आहे.   

000000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...