Tuesday, October 11, 2022

जिल्हा उद्योग केंद्रामार्फत जिल्हा पुरस्कार योजनेसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज आमंत्रित

 जिल्हा उद्योग केंद्रामार्फत

जिल्हा पुरस्कार योजनेसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज आमंत्रित

 

अमरावती, दि. 11 (जिमाका) : उद्योग संचालनालयामार्फत लघु उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा पुरस्कार योजना 2022 साठी पात्र उद्योजकांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी पात्र उद्योजकांनी 31 ऑक्टोबरपूर्वी जिल्हा उद्योग केंद्रात अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापकांनी केले आहे.

लघु उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. अर्जाचा विहित नमुना महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, अमरावती यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत विनामुल्य उपलब्ध आहे.

जिल्हा पुरस्कार योजनेत सहभागी होण्यासाठी लघु उद्योजकांनी काही अटींची पुर्तता करणे आवश्यक आहे. यानुसार लघु उद्योग घटक हा जिल्हा उद्योग केंद्रात 1 जानेवारी 2019 पुर्वी स्थायी नोंदणी / उद्योग आधार नोंदणी झालेला असावा. मागील तीन वर्षात सलग उत्पादन करणारे लघु उद्योग घटक या योजनेसाठी पात्र ठरतील. उद्योग घटक कुठल्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच महिला उद्योजकास यास विशेष गुण दिले जातील. यासाठी जास्तीत जास्त लघु उद्योजकांनी जिल्हा पुरस्कार योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याबाबत जिल्हा उद्योग केंद्रामार्फत कळविण्यात आले आहे.  

00000

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीत एकदिवसीय बदल

 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त

राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीत एकदिवसीय बदल

 

अमरावती दि. 11 (जिमाका) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 54 वा पुण्यतिथी महोत्सव शुक्रवार दि. 14 ऑक्टोबर 2022 रोजी मोझरी येथील गुरुदेव नगर येथे साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त दरवर्षीप्रमाणे मौन श्रध्दांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी सुमारे एक ते दीड लाख भक्तगण समाधीस्थळी जमतात. या कार्यक्रमादरम्यान होणारी गर्दी पाहता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील वाहतुक व्यवस्थेत एकदिवसीय बदल करण्यात आला आहे. यानुसार अमरावतीकडून तिवसा तालुक्यातील मोझरी - गुरुदेव नगर मार्गे नागपूरकडे जाणारी वाहतूक (एसटी बसेस, रुग्णवाहिका व अग्निशमन वाहन वगळून) नांदगाव पेठ पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून मोर्शीमार्गे नागपूरकडे वळविण्यात येत आहे.

            नागपूरकडून अमरावतीकडे येणारी वाहतूक (एसटी बसेस, रुग्णवाहिका व अग्निशमन वाहन वगळून) तिवसा शहरातील पंचवटी चौकातून कुऱ्हा मार्गे अमरावतीकडे वळविण्यात येत आहे. ही वाहतूक व्यवस्था दि. 14 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत वरील मार्गाने वळविण्यात येत आहे. या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या विरुध्द मोटार वाहन कायदा व मुंबई पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाअधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

00000

तात्पुरते फटाका दुकानांना परवाना देण्यासाठी नियमावली जाहिर

 तात्पुरते फटाका दुकानांना

परवाना देण्यासाठी नियमावली जाहिर

 

अमरावती, दि. 11 (जिमाका) : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फटाके दुकानांसाठी तात्पुरता परवाना देण्याचे अधिकार उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. विस्फोटक अधिनियम व नियमांचे पालन करुनच परवाने वितरित करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत.

त्यानुसार तात्पुरते फटाके दुकाने यांचेकडील दुकानांमध्ये फटाके ठेवण्यासाठी लाकडी साहित्य तसेच कापडी पडद्यांचा वापर करण्यात येऊ नये. फटाके दुकानांमध्ये सुरक्षित अंतरावर ठेवावी. जेणेकरुन आग लागण्याच्या दुर्घटनांवर वेळीच प्रतिबंध करता येईल. फटाके सुरक्षित आणि ज्ज्वलनशील नसलेल्या सामग्रीच्या शेडमध्ये ठेवण्यात यावे. फटाके विक्रीसाठी असलेली तात्पुरती दुकाने ही एकमेकांपासून तीन मीटर अंतरावर आणि संरक्षित ठिकाणांपासून 50 मीटर अंतरावर राहतील, याची दक्षता घ्यावी. फटाके विक्रीसाठी असलेली तात्पुरती दुकाने समोरासमोर लावण्यात येऊ नये.

तात्पुरते फटाके दुकानांमध्ये प्रकाशासाठी कोणत्याही प्रकारचे तेल दिवे, गॅस दिवे अथवा उघडे असलेले विद्युत दिवे लावण्यात येऊ नये. जर कोणत्याही विद्युत वाहिनीचा उपयोग करण्यात आला असेल तर तो भिंतीव्दारे किंवा छतावर लावण्यात यावे. उघड्यावर विजेच्या तारा लोंबकळत असू नये. अशा विजेच्या दिव्यांसाठी लागणारे स्विच हे भिंतीवर लावण्यात यावे तसेच अशी विद्युत वाहिनी जर एकाच रांगेतील दुकानासाठी असेल तर त्यासाठी मास्टर स्विच लावण्यात यावे. फटाके दुकानांच्या 50 मीटर परिसरामध्ये फटाके फोडण्यास सक्त मनाई आहे. कोणत्याही ठिकाणी एका जागेवर एकाच ठिकाणी पन्नासपेक्षा अधिक फटाके विक्री दुकाने यांना परवाना देण्यात येऊ नये. तसा आदेश अपर जिल्हादंडाधिकारी विवेक घोडके यांनी निर्गमित केला आहे.

00000

Monday, October 10, 2022

सर्व आस्थापनांनी ई-आर 1 विवरण सादर करावे

 सर्व आस्थापनांनी ई-आर 1 विवरण सादर करावे

          अमरावती, दि. 10 : कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांच्या कडून पुरविण्यात येणाऱ्या रोजगार विषयक सर्व सेवा आता ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत. या सुविधा ऑनलाईन मिळणार असून त्यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. तसेच उद्योजक / आस्थापना यांनी सेवायोजना कार्यालय (रिक्त पदे अधिसूचित करण्याची सक्ती करणार) कायदा 1959 व नियमावली 1960 कलम 5 (2) अन्वये त्रैमासिक ई- आर 1 ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे.  सप्टेंबर 2022 अखेर संपणाऱ्या त्रैमासिक करिता ई- आर 1 या प्रपत्राची माहिती वरील संकेतस्थळावर सर्व शासकीय,निमशासकीय,खाजगी उद्योजक,आस्थापना यांनी त्यांचे युजर आयडी व पासवर्डच्या माध्यमातून लॉगिन करून ऑनलाइन सादर करावयाची आहे. व त्याबाबतचे प्रमाणपत्र संकेतस्थळावरून प्राप्त करून घ्यावयाचे आहे. ऑनलाइन ई- आर 1 सादर करताना काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा दूरध्वनी क्र. 0721- 2566066 या क्रमांकावर संपर्क साधावा. ई आर 1 सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर  आहे. ई-आर 1 ऑनलाइन सादर न करणाऱ्या कसुरदार आस्थापनावर विहीत नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे याची कृपया नोंद घेण्यात यावी, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रफुल एस. शेळके यांनी केले आहे.

0000

बेरोजगार युवक युवतींना नामांकित कंपनीमध्ये नोकरीची सुवर्ण संधी

 


बेरोजगार युवक युवतींना नामांकित

कंपनीमध्ये नोकरीची सुवर्ण संधी

अमरावती, दि. 10 (जिमाका) : सुशिक्षित उमेवारांना शासकीय नोकरीच्या पुरेशा संधी उपलब्ध नसल्यामुळे खाजगी क्षेत्रात असलेल्या रोजगाराच्या संधीचा शोध घेऊन बेरोजगारांना त्या उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती व शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, गाडगे नगर, व्ही.एम.व्ही. रोड, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींसाठी महाराष्ट्र स्टार्ट अप, रोजगार व उद्योजकता सप्ताह निमित्त पंडीत दिनदयाल उपाध्याय ऑफलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन शनिवार दि. 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, गाडगे नगर, व्ही.एम.व्ही. रोड, अमरावती येथे करण्यात आले आहे.

या मेळाव्यामध्ये उमेदवारांची मुलाखतीव्दारे प्राथमिक निवड होणार असून अंदाजित 1094 पदे उपलबध आहेत. सदर मेळाव्यामध्ये लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, अमरावती या उद्योजक कंपनीसाठी इन्शुरन्स ॲडव्हायझर एकुण 100 पदे स्त्री/पुरुषकरीता उपलब्ध्य असून शैक्षणिक पात्रता एस.एस.सी. व वयोमर्यादा 18 ते 45 आहे.

नवभारत फर्टिलायझर प्रा.लि. नागपूर या उद्योजक कंपनीसाठी सेल्स ट्रेनी एकुण 31 पदे स्त्री/पुरुषकरीता उपलब्ध्य असून शैक्षणिक पात्रता पॉलिटेक्निक डिप्लोमा/पॉलिटेक्निक पदवी/एस.एस.सी./एच.एस.सी./पदवीधर व वयोमर्यादा 18 ते 45 आहे. तसेच सेल्स एच.आर आणि रिक्रुटमेंट ऑफिसर एकुण 2 पदे स्त्री/पुरुषकरीता उपलब्ध्य असून शैक्षणिक पात्रता एम.बी.ए./एम.एस.डब्लू/बी.एस.डब्लू व वयोमर्यादा 22 ते 45 आहे. व मार्केट डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह एकुण 5 पदे स्त्री/पुरुषकरीता उपलब्ध्य असून शैक्षणिक पात्रता ॲग्रीकल्चर डिप्लोमा/ॲग्रीकल्चर पदवी व वयोमर्यादा 21 ते 45 आहे. ज्युनिअर अकाऊंटंट एकुण 5 पदे स्त्री/पुरुषकरीता उपलब्ध्य असून शैक्षणिक पात्रता बी.कॉम. पदवी व वयोमर्यादा 21  ते 45 आहे.

धुत ट्रान्समिशन प्रा.लि. औरंगाबाद या उद्योजक कंपनीसाठी ई.पी.पी. ट्रेनी एकुण 100 पदे स्त्री/पुरुषकरीता उपलब्ध्य असून शैक्षणिक पात्रता एस.एस.सी./एच.एस.सी./पदवीधर/डिप्लोमा व वयोमर्यादा 18 ते 28 आहे.

गोल्डन फायबर लि. अमरावती या उद्योजक कंपनीसाठी वर्कर एकुण 100 पदांपैकी स्त्रीसाठी 100 पदे व पुरुषकरीता 50 पदे उपलब्ध्य असून शैक्षणिक पात्रता दहावी पास/नापास व वयोमर्यादा 25 ते 35 आहे.

रुचा इंजिनियरिंग प्रा.लि. औरंगाबाद या उद्योजक कंपनीसाठी टर्नर, वेल्डर, फिटर एकुण 75 पदे स्त्री/पुरुषकरीता उपलब्ध्य असून शैक्षणिक पात्रता 10 वी, 12 वी, डिप्लोमा, पदवीधर, आय.टी.आय. (टर्नर, वेल्डर, फिटर) व वयोमर्यादा 18 ते 28 आहे.

इंण्डोरन्स टेक्नॉलॉजी, औरंगाबाद या उद्योजक कंपनीसाठी टर्नर, वेल्डर, फिटर एकुण 75 पदे स्त्री/पुरुषकरीता उपलब्ध्य असून शैक्षणिक पात्रता 10 वी, 12 वी, डिप्लोमा, पदवीधर, आय.टी.आय. (टर्नर, वेल्डर, फिटर) व वयोमर्यादा 18 ते 28 आहे.

बडवे इंजिनियरिंग प्रा.लि. औरंगाबाद या उद्योजक कंपनीसाठी टर्नर, वेल्डर, फिटर एकुण 75 पदे स्त्री/पुरुषकरीता उपलब्ध्य असून शैक्षणिक पात्रता 10 वी, 12 वी, डिप्लोमा, पदवीधर, आय.टी.आय. (टर्नर, वेल्डर, फिटर) व वयोमर्यादा 18 ते 28 आहे.

महिंन्द्रा ॲन्ड महिंन्द्रा प्रा. लि. औरंगाबाद या उद्योजक कंपनीसाठी टर्नर, वेल्डर, फिटर एकुण 75 पदे स्त्री/पुरुषकरीता उपलब्ध्य असून शैक्षणिक पात्रता 10 वी, 12 वी, डिप्लोमा, पदवीधर, आय.टी.आय. (टर्नर, वेल्डर, फिटर) व वयोमर्यादा 18 ते 28 आहे.

रेडियंट सुपरस्पेशालिटी  हॉस्पिटल सावन्स हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड, अमरावती या उद्योजक कंपनीसाठी नर्सिंग एकुण 6 पदे स्त्रीयांसाठी उपलब्ध्य असून शैक्षणिक पात्रता बी.एस.सी./जी.एन.एम. व वयोमर्यादा 18 ते 40 असून अटेंडन्स एकुण 5 पदे पुरुषांसाठी उपलब्ध असून शैक्षणिक पात्रता बी.एस.सी./जी.एन.एम. वयोमर्यादा 18 ते 30 आहे.

पी.जी. इलेक्ट्रॉनिक्स, पुणे या उद्योजक कंपनीसाठी असेम्बली ऑपरेटर एकुण 50 पदे स्त्री/पुरुषकरीता उपलब्ध्य असून शैक्षणिक पात्रता 10 वी, 12 वी, आय.टी.आय. व वयोमर्यादा 18 ते 35 आहे.

फ्रटलाईन ग्रृप ऑफ कंपनीज, पुणे या उद्योजक कंपनीसाठी ड्रायवर एकुण 50 पदे स्त्री/पुरुषकरीता उपलब्ध्य असून शैक्षणिक पात्रता 8 वी पास व वयोमर्यादा 18 ते 40 आहे.

थिंजी एच.प्रा. आर. अमरावती लि. या उद्योजक कंपनीसाठी सेविंग मशीन ऑपरेटर एकुण 100 पदे स्त्रीयांसाठी उपलब्ध्य असून शैक्षणिक पात्रता 10 वी, 12 वी, आय.टी.आय. व वयोमर्यादा 18 ते 30 आहे.

टेक्नोक्राफ्ट प्रा.लि. अमरावती या उद्योजक कंपनीसाठी वेल्डर, इलेक्ट्रीशन एकुण 100 पदे स्त्रीयांसाठी उपलब्ध्य असून शैक्षणिक पात्रता 10 वी, 12 वी, आय.टी.आय. (वेल्डर इलेक्ट्रीशन) व वयोमर्यादा 18 ते 26 आहे.

निल मेटल प्रा.लि. (जे.बी.एस.ग्रृप, चाकण) या उद्योजक कंपनीसाठी ट्रेनी एकुण 90 पदे पुरुषांसाठी उपलब्ध्य असून शैक्षणिक पात्रता 10 वी, 12 वी, आय.टी.आय. (वेल्डर, फिटर) व वयोमर्यादा 18 ते 40 आहे.

दहावी, बारावी पदविधर, आय.टी.आय. (दोन वर्षाचे), पॉलिटेक्निक डिप्लोमा/पॉलिटेक्निक पदवी व इतर शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांनी www.rojgar.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ज्या कंपनीकडे मुलाखत द्यावयाची आहे त्या कंपनीची निवड करुन ऑनलाईन अप्लाय करावा. जिल्ह्यातील सुशिक्षीत बेराजगार उमेदवारांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त, प्रफुल्ल शेळके, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यांनी केले आहे.

00000

संत्रा फळबागधारकांना सहभागासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत

 संत्रा फळबागधारकांना सहभागासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत 

आंबिया बहारासाठी फळपीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

अमरावती, दि. 10 - विभागातील पाचही जिल्ह्यांत आंबिया बहारासाठी पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी बांधवांसाठी ही योजना ऐच्छिक आहे. नुकसानीच्या परिस्थितीत आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी अधिकाधिक शेतकरी बांधवांनी योजनेत सहभाग घेण्याचे आवाहन कृषी सहसंचालक किसनराव मुळे यांनी केले आहे.

यंदा आंबिया बहारासाठी संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष, प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी व पपई या नऊ फळपीकांसाठी विमा योजना लागू आहे. फळपीकासाठी २० हेक्टरहून अधिक उत्पादनक्षम क्षेत्र असलेल्या महसूल मंडळांना अधिसूचित करून ही योजना राबवली जाते. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षण लागू होते. त्यानुसार फळपिकाचे उत्पादनक्षम वय संत्रा व मोसंबी पीकाचे ३ वर्ष, डाळिंब व द्राक्ष पिकाचे २ वर्ष व आंबा पिकाचे ५ वर्ष असणे आवश्यक आहे. 

अमरावती, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, अकोला जिल्ह्यासाठी एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कं. व बुलडाणा जिल्ह्यासाठी भारतीय कृषि विमा कंपनी  नियुक्त करण्यात आली आहे.

                       संत्रा फळबागधारकांना सहभागासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत

संत्रा फळपीकासाठी विभागातील पाचही जिल्ह्यांचा समावेश आहे. संत्र्यासाठी प्रतिहेक्टर विमा संरक्षित रक्कम नियमित हवामान धोक्यासाठी 80 हजार रू., तर गारपीटीसाठी 26 हजार 667 रू. असून, हवामान धोक्याबाबत शेतक-याने भरावयाचा विमा प्रति हेक्टर 6 ते 14 हजार आणि गारपीटीसाठी 1 हजार 333 रू. हप्ता भरावयाचा आहे. संत्रा फळबागधारकांसाठी योजनेत सहभागाची अंतिम मुदत 30  नोव्हेंबर आहे.

मोसंबीसाठी बुलडाणा, अमरावती व अकोला या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. मोसंबीसाठी प्र. हे. विमा संरक्षित रक्कम हवामान धोक्यासाठी 80 हजार रू. व गारपीटीसाठी  26 हजार 667 रू. आहे. हवामान धोक्याबाबत शेतक-याने भरावयाचा विमा प्रति हेक्टर 4 हजार आणि गारपीटीसाठी 1 हजार 333 रू. हप्ता भरावयाचा आहे. मोसंबी फळबागधारकांसाठी योजनेत सहभागाची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर आहे.

डाळिंबासाठी बुलडाणा, वाशिम व अकोला या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. डाळिंबासाठी प्र. हे. विमा संरक्षित रक्कम हवामान धोक्यासाठी 1 लाख 30 हजार रू. व गारपीटीसाठी  43 हजार 333 रू. आहे. हवामान धोक्याबाबत शेतक-याने भरावयाचा विमा प्रति हेक्टर साडेसहा हजार ते 28 हजार 600 रू., आणि गारपीटीसाठी 2 हजार 167 रू. हप्ता भरावयाचा आहे. डाळिंब फळबागधारकांसाठी योजनेत सहभागाची अंतिम मुदत 14 जानेवारी आहे.

केळीसाठी बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. केळीसाठी प्र. हे. विमा संरक्षित रक्कम हवामान धोक्यासाठी 1 लाख 40 हजार रू. व गारपीटीसाठी  46 हजार 667 रू. आहे. हवामान धोक्याबाबत शेतक-याने भरावयाचा विमा प्रति हेक्टर 7 हजार ते 9 हजार 100 रू., आणि गारपीटीसाठी 2 हजार 333 रू. हप्ता भरावयाचा आहे. केळी फळबागधारकांसाठी योजनेत सहभागाची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर आहे.

 

आंब्यासाठी बुलडाणा व वाशिम या 2 जिल्ह्यांचा समावेश आहे. आंब्यासाठी प्र. हे. विमा संरक्षित रक्कम हवामान धोक्यासाठी 1 लाख 40 हजार रू. व गारपीटीसाठी  46 हजार 667 रू. आहे. हवामान धोक्याबाबत शेतक-याने भरावयाचा विमा प्रति हेक्टर 15 हजार 400 ते 16 हजार 100 रू., आणि गारपीटीसाठी 2 हजार 333 रू. हप्ता भरावयाचा आहे. आंबा फळबागधारकांसाठी योजनेत सहभागाची अंतिम मुदत 31 डिसेंबर आहे.

द्राक्षासाठी केवळ  बुलडाणा जिल्ह्याचा समावेश आहे. द्राक्षासाठी प्र. हे. विमा संरक्षित रक्कम हवामान धोक्यासाठी 3 लाख 20 हजार रू. व गारपीटीसाठी  1 लाख 6 हजार 667 रू. आहे. हवामान धोक्याबाबत शेतक-याने भरावयाचा विमा प्रति हेक्टर 16 हजार रू., आणि गारपीटीसाठी 5 हजार 333 रू. हप्ता भरावयाचा आहे. द्राक्ष फळबागधारकांसाठी योजनेत सहभागाची अंतिम मुदत 15 ऑक्टोबर आहे.

 

पपईसाठी अमरावती व वाशिम या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. पपईसाठी प्र. हे. विमा संरक्षित रक्कम हवामान धोक्यासाठी 35 हजार रू. व गारपीटीसाठी  11 हजार 667 रू. आहे. हवामान धोक्याबाबत शेतक-याने भरावयाचा विमा प्रति हेक्टर 1 हजार 750 रू., आणि गारपीटीसाठी 583 रू. हप्ता भरावयाचा आहे. पपई फळबागधारकांसाठी योजनेत सहभागाची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर आहे.

 

 

 

 

या योजनेत अधिसूचित क्षेत्रातील कुळाने, भाडेपट्टीने शेती करणारा शेतक-यांसह सर्व शेतकरी भाग घेऊ शकतात.  एकापेक्षा अधिक फळपीकांसाठी सहभाग घेता येतो. एका वर्षात एका फळपिकासाठी एका क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामासाठी अर्ज करता येईल. एक शेतकरी चार हेक्टर मर्यादेत विमा संरक्षण घेऊ शकतो. आंबिया बहारातील फळपिकांची विमा नोंदणी करिता विमा पोर्टल(https://pmfby.gov.in)या संकेतस्थळास भेट द्यावी. सीएससी सेंटरमार्फत अर्ज करता येईल. रिलायन्स विमा कंपनीचा संपर्क क्र. (022) 68623005 व ग्राहक सेवा क्र. 1800 1024 0888 असा आहे. एचडीएफसी ॲग्रो विमा कंपनीचा संपर्क क्रमांक (022)  62346234 व टोल फ्री क्रमांक 1800 266 0700 असा आहे. भारतीय कृषी विमा कंपनीचा संपर्क क्र. (022) 61710912 व टोल फ्री क्र. 1800 116 5515 असा आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन श्री. मुळे यांनी केले.

000

अनुदान तत्वावर मिनी ट्रॅक्टर मिळण्यासाठी गटांनी अर्ज करण्याचे आवाहन अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांसाठी योजना

अनुदान तत्वावर मिनी ट्रॅक्टर मिळण्यासाठी गटांनी अर्ज करण्याचे आवाहन

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांसाठी योजना


अमरावती, दि. 10 - अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या बचत गटांना अनुदान तत्वावर  साडेतीन लाख रू. मर्यादेत किमान 9 ते 18 अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व रोटाव्हेटर, ट्रेलर मिळण्यासाठी समाजकल्याण कार्यालयाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

योजनेत 90 टक्के शासकीय अनुदान व 10 टक्के स्वयंसहायता बचत गटाचा हिस्सा अशी तरतूद आहे. बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य, तसेच अध्यक्ष, सचिव अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील असावेत,  गटातील सदस्य महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत.  मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांची खरेदी मर्यादा साडेतीन लाख रू. असेल. या मर्यादेच्या रकमेच्या 10 टक्के (35 हजार रू.)  स्वहिस्सा गटाने भरल्यावरच उर्वरित 90 टक्के हिस्सा अर्थात कमाल 3.15 लाख रू. शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील. प्राप्त अर्जांचा आढावा घेऊन लॉटरी पद्धतीने सोडत होईल.  यापूर्वी पॉवर टिलरचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

 इच्छूक गटांनी दि. 20 ऑक्टोबरपूर्वी सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चांदूर रेल्वे मार्ग, अमरावती येथे संपर्क साधून विहित अर्ज  कार्यालयीन वेळेत सादर करण्याचे आवाहन सहायक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

०००

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...