Thursday, October 20, 2022

हृदयविकाराबाबत पूर्वकल्पना देणारा स्टेथॅस्कोप; अमरावतीच्या युवकाचे संशोधन महाराष्ट्र स्टार्टअप कार्यक्रमात कुशकुमार ठाकरे राज्यात सर्वप्रथम

 



हृदयविकाराबाबत पूर्वकल्पना देणारा स्टेथॅस्कोप; अमरावतीच्या युवकाचे संशोधन

महाराष्ट्र स्टार्टअप कार्यक्रमात कुशकुमार ठाकरे राज्यात सर्वप्रथम

 

अमरावती, दि. 20 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाद्वारे महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता कार्यक्रमात अमरावतीचा कुशकुमार मनोहर ठाकरे हा युवक आरोग्य क्षेत्रातील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. हृदयविकाराबाबत कल्पना देणारे ‘पर क्ल्यू’ हे स्टेथॅस्कोपसारखे साधन कुशकुमार याने तयार केले असून, या शोधाबद्दल त्याला राज्यस्तरावरील एक लक्ष रूपयांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनात समारंभपूर्वक पुरस्कार कुशकुमार यांना प्रदान करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रधान सचिव मनिषा वर्मा,  ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर व आयुक्त डॉ. रामास्वामी आदी उपस्थित होते. राज्यस्तरावर 21 उमेदवारांची निवड करण्यात आली. त्यात कुशकुमार यांना आरोग्यहेल्थकेअर सेक्टरमध्ये प्रथम पुरस्कार देवून राज्यपाल यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.  

कुशकुमार हा अमरावतीच्या शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याने ‘पर-क्ल्यू’ हे स्टेथॅस्कोपचे काम करणारे साधन निर्माण केले आहे. या संशोधनाला मनीष कुथरन यांचे सहकार्य व डॉ. शारदा देवरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. ज्याप्रमाणे घरच्या घरी शर्करापातळी मोजण्यासाठी ग्लुकोमीटरचा वापर होतो, त्याचप्रमाणे ‘पर-क्ल्यू’ (परफेक्ट क्ल्यू) हे साधन वापरून हृदयाचे ठोके मोजण्याबरोबरच हृदयविकाराची पूर्वकल्पनाही मिळणार आहे. त्यामुळे रुग्णाला तातडीने उपचार घेता येतील. या साधनात रक्तदाबाची दैनंदिन नोंद होऊन त्याचा महिनाभराचा डेटाही सेव्ह व्हावा, यादृष्टीने आम्ही ते अधिक अद्ययावत करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे कुशकुमार यांनी सांगितले. त्यामुळे डॉक्टरांकडे तपासणीसाठी जाताना या माहितीचा उपयोग होऊ शकेल.    

अमरावती येथे विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचा शुभारंभ झाला. यात्रेत दि. 29 ऑगस्टपर्यंत प्रत्येक तालुका स्तरावर भेटी देऊन नाविन्यपूर्ण संकल्पना, त्याचे इतर पैलू याबाबतची माहिती, मार्गदर्शन व नोंदणी करण्यात आली. त्यानंतर दि. 14 ऑक्टोबरला गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे जिल्हास्तरीय सादरीकरण स्पर्धा झाली. त्यात प्रथम क्रमांक मिळालेल्या कुशकुमारने राज्यस्तरीय सादरीकरण स्पर्धेतही हेल्थ केअर सेक्टरमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे.  

या यशाबद्दल जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी कुशकुमार यांचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कौशल्य विकास सहाय्यक आयुक्त प्रफुल्ल शेळके,  इन्क्युबेशन सेंटरच्या संचालक स्वाती शेरेकर, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य व्ही. आर. मानकर, कौशल्य विकास अधिकारी वैशाली पवार आदी उपस्थित होते.

00000

 

 

 

Monday, October 17, 2022

ओबीसी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घ्यावा

 ओबीसी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्ज व्याज

परतावा योजनेचा लाभ घ्यावा

 

अमरावतीदि. 17: तर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घ्यावाअसे आवाहन इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक चंद्रशेखर श्रीखंडे यांनी केले.

राज्यदेशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बँकेमार्फत मंजूर केलेल्या रूपये 20 लक्षपर्यंत कर्ज रमेवरील व्याज परतावा महामंडळाकडून वितरीत केला जाईल. विद्यार्थ्यांना शैक्षणिकआर्थिक  दृष्ट्या सक्षम करणे व त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे हा योजनेचा उद्देश आहे.

लाभार्थींच्या पात्रतेच्या अटी व शर्ती

        अर्जदाराचे वय 17 ते 30 वर्षे असावे व तो इमाव प्रवर्गातीलमहाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदाराची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागाकरिता रूपये लक्ष पर्यंत असावी. अर्जदार इयत्ता 12 वी 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा तसेच पदवीच्या व्दितीय वर्षे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी 60 टक्के गुणांसह पदविका उत्तीर्ण असावेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी किमान 60 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण असावा. केवळ पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रमाकरिता शासन मान्यता प्राप्त संस्थेमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थीं. बँकेने मंजूर केलेली संपूर्ण रक्कम अर्जदारास वितरीत केल्यानंतर अर्जदार व्याज परतावा योजनेसाठी पात्र राहील. राज्य व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक शुल्कपुस्तकेसाहित्य खरेदी व अर्जदाराच्या राहण्याचा व भोजनाचा खर्च समावेश राहिल. परदेशी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता फक्त शैक्षणिक शुल्कपुस्तकेसाहित्य खरेदीचा समावेश राहिल. अर्जदाराचा सिबील क्रेडिट स्कोअर 0,-1 (म्हणेजच यापूर्वी त्याने कर्ज घेतलेले नसावे) किंवा 500 पेक्षा जास्त असावा.

व्याजाचा परतावा

        महामंडळ केवळ बँकेकडून वितरीत केलेल्या रक्कमेवरील जास्तीत जास्त 12 टक्के पर्यंत रक्कमेचा व्याज परतावा नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थींना करेल.

कर्ज प्रस्तावासोबत अपलोड करावयाची कागदपत्रे

        अर्जदाराचा इतर मागास प्रवर्गातील जातीचा दाखलाउत्पन्नाचा दाखलामहाराष्ट्राचा रहिवासी दाखलाअर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे आधार कार्डज्या अभ्यासक्रमाकरिता शैक्षणिक कर्ज आवश्यक आहे. त्या अभ्यासक्रमासाठीची पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिकाअर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे पासपोर्ट आकारातील छायाचित्रअर्जदाराचा जन्माचावयाचा दाखलाशैक्षणिक शुल्क संबंधित पत्रशिष्यवृत्तीशैक्षणिक शुल्क माफी पात्रतेबाबतचे प्रमाणपत्रमान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतल्याचा पुरावाआधार संलग्न बँक खाते पुरावा. (संपर्क दूरध्वनी 0721-2550339)

00000


मानसिक आरोग्य पंधरवड्यानिमित्त रॅलीद्वारे जनजागृती

 मानसिक आरोग्य पंधरवड्यानिमित्त रॅलीद्वारे जनजागृती 

       अमरावती, दि. 17 : जागतिक मानसिक आरोग्य पंधरवड्यानिमित्त आरोग्य विभागातर्फे शहरात रॅली काढून जनजागृती करण्यात आली.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांनी हिरवी झेंडी दाखवून जिल्हा रूग्णालयातून रॅलीची सुरूवात केली. नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी त्यात सहभाग घेतला.

 रॅलीला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, डॉ. अमोल गुल्हाने, डॉ. स्वाती सोनोने, प्रमोद भक्ते, भावना पुरोहित, सुनील कळतकर, श्रीमती सारा उमर, सायली डंभे, सचिन टवलारे, श्रध्दा हिरकंचे, विधूत पापळकर, शुभम झळके, निलेश मते, लोकेश पवार, श्रीमती अनुष्का ठाकरे, श्याम खोडवे, रवि गाढवे, स्पूर्ती डाखोडे, वैष्णवी सकरवार, दीक्षा रामटेके, अनुजा पाथरकर, सिमरण पठाण, दिपाली कडू, संदया मालधुरे, स्वाती चिंचोले, प्रीती चव्हाण, मुगल मॅडम, सरस्वती नर्सिंग विद्यालयाच्या विद्यार्थी यांच्या सह रूग्णालयीन कर्मचारी, अधिकारी, रूग्णाचे नातेवाईक, नर्सिंग कॉलेज प्राध्यापक उपस्थित होते.

00000

सर्व विभागांनी समन्वयाने जलशक्ती अभियान यशस्वी करावे

 




‘कॅच द रेन’

सर्व विभागांनी समन्वयाने जलशक्ती अभियान यशस्वी करावे

अमरावती, दि. 17 - जलशक्ती अभियानातून जलपुनर्भरण व जलस्त्रोतांचे संवर्धन करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन अभियानाचे संचालक विश्वजीत कुमार यांनी केले.

अभियानाच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेण्यासाठी संचालक अमरावती दौ-यावर आहेत. त्यानिमित्त त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन विविध विभागप्रमुखांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी पवनीत कौर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा व अनेक अधिकारी उपस्थित होते.

उपक्रमात ग्रामपंचायतींचा सहभाग मिळविणे आवश्यक आहे. पाण्याचे दुर्भिक्ष दूर करण्यासाठी जलपुनर्भरण व जलस्त्रोतांचे संवर्धन गरजेचे असून, सर्व विभागांनी, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी विविध उपक्रमातून अभियान यशस्वी करावे, असे आवाहन विश्वजीत कुमार यांनी केले. जिल्हाधिकारी श्रीमती कौर, श्री. पंडा यांनीही मनोगत व्यक्त केले. संचालक श्री. कुमार हे उद्या कोलकास, वडाळी, चिरोडी आदी ठिकाणी भेट देऊन तेथील कामांची पाहणी करणार आहेत.

०००

Friday, October 14, 2022

मधुरा, पुर्वशा व सांजली ला राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त

 मधुरा, पुर्वशा व सांजली ला राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त

       अमरावती,दि. 13 : गुजरात येथे आयोजित 36 व्या राष्ट्रीय स्पर्धेत एकुण 36 क्रीडा प्रकारात महाराष्ट्र राज्याने सहभागी होवून 140 पदके प्राप्त करून महाराष्ट्र तालीकेमध्ये द्वितीय स्थान मिळविलेले आहे. या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये अमरावती येथील जलतरण खेळाडू सांजली राजेंद्र वानखडे तर धनुर्विद्या खेळाडू पुर्वशा शेंडे व मधुरा धामणगावकर यांनी 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करतांना सुवर्ण पदक प्राप्त केले. सांजली वानखडे या खेळाडूने जलतरण या क्रीडा प्रकारात वॉटरपोलो या बाबीमध्ये सुवर्णा पदक प्राप्त केले आहे. यापुर्वी सुध्दा सांजली वानखडे या खेळाडूने 5 वेळेस राष्ट्रीय स्पर्धेत तर 2 वेळा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 8 वी आशियन एज ग्रुप बॅकॉक येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत सहभागी झालेली होती. तसेच साऊथ ऐशियन जलतरण स्पर्धा श्रीलंका येथे झालेल्या स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केलेले होते. सांजली ही खेळाडू नियमितपणे श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे जलतरण तलावावर नियमितपणे सराव करीत असते. तिला प्रमुख मार्गदर्शक म्हणुन प्रा.डॉ. लक्ष्मीकांत खंडागळे, प्रा. डॉ. योगेश निर्मळ, प्रतिभा भोंडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. सद्यस्थितीत सदर खेळाडू ही श्री. शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय अमरावती येथे शिकत असून प्रा. डॉ. अंजली ठाकरे, यांचे सुध्दा प्रोत्साहन सांजली वानखडे प्राप्त झालेले आहे.

            धनुर्विद्या या क्रीडा प्रकारातील कंपांऊड या बाबीमध्ये पुर्वशा शेंडे या खेळाडुने 36 व्या राष्ट्रीय क्रीडा  स्पर्धेत धनुर्विद्या सांघीक या क्रीडा प्रकारात महाराष्ट्रचे प्रतिनिधीत्व  करून सुवर्ण पदक प्राप्त केले. या पूर्वी 19 वेळा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये सहभागी होऊन प्राविण्य प्राप्त केलेले आहे. तसेच जागतिक स्पर्धा, आशियाई स्पर्धा, साऊथ आशियाई स्पर्धा, एशियन स्पर्धा, युथ वर्ड चॉम्पियनशिप इ. आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये 17 वेळा सहभागी होऊन प्राविण्य प्राप्त केलेले आहे. पुर्वशाच्या यशात तिचे वडील श्री. सुधिर शेंडे  यांच्या मार्गदर्शनात ती सराव करीत आहे.

            धनुर्विद्या या खेळात कंपांऊड या क्रीडा प्रकारात मधुरा धामणगावकर या खेळाडूने सुध्दा 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत धनुर्विद्या सांघीक या खेळात सुवर्ण पदक प्राप्त केले. या पुर्वी मधूराने 9 वेळा राष्ट्रीय स्पर्धा, आखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धामध्ये सहभागी होऊन प्राविण्य प्राप्त केले आहे. तसेच 3 वेळा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आशियाकप, युथवर्ड चॉम्पीयनशिप, वर्ल्ड कप चॉम्पीयनशिप मध्ये सहभागी झालेली आहे.खेळाडूंना भारतीय धनुर्विद्या संघटनेचे प्रमोद चांदुरकर, महाराष्ट्र ऑलम्पीक संघटनेचे प्रशांत देशपांडे,गुरूकुल अकादमीचे तुषार भारतीय, प्रशिक्षण पवन तांबट, गणेश विश्र्वकर्मा, नितेश मागरूळकर, प्रफुल डांगे यांचे सुध्दा मार्गदर्शन लाभत आहे.

            अमरावती जिल्ह्यातील 3 ही खेळाडूांचे  जिल्हाधिकारी श्रीमती पवनीत कौर, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा, विजय संतान, जिल्हा क्रीडा अधिकारी वर्षा साळवी, जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्था,एकविध खेळ संघटना, शारीरिक शिक्षण संघटना यांनी पुढील वाटचालीसाठी तसेच भविष्यात स्पर्धाकरीता शुभेच्छा देण्यात आल्या.

00000

--

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना लाभार्थ्याला 2 लाखाचा धनादेश वितरीत




 प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना

लाभार्थ्याला 2 लाखाचा धनादेश वितरीत

 

अमरावती, दि. 13 : प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही मुदत स्वरुपाची विमा योजना आहे. कुटूंबातील कर्त्या व्यक्तीच्या मृत्यूपश्चात कुटूंबियांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागु नये यासाठी ही योजना राबविण्यात येते. त्यात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातुन नुकतेच पत्निचा आधार गमावलेल्या लाभार्थ्याला या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ मिळवून देण्यात आला. रायपुरच्या पांढरी येथील गजानन दवंगे यांना त्यांच्या पत्नि अलका दवंगे यांच्या मृत्यूपश्चात 2 लाख रुपये विम्याची रक्कम या योजनेअंतर्गत प्रदान करण्यात आली. श्री दवंगे वार्षिक 456 रुपये हफ्ता अदा करत होते. त्यांच्या विम्याची रक्कम दोन लाख रुपये असुन धनादेश स्वरुपात देण्यात आली.

स्टेंट बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक संजोग भागवतकर यांनी श्री दवंगे यांना 2 लाख रुपयांचा धनादेश वितरीत केला. यावेळी सहायक महाप्रबंधक प्रवीणकुमार, मुख्य प्रबंधक लीलाधर नेवारे, प्रबंधक अमोल चावरे, कौस्तूभ राऊत, मीनाक्षी अबरुक आदी उपस्थित होते.

या योजनेअंतर्गत विमा धारकांना दरवर्षी 330 रुपये किंवा त्याहुन अधिक विमा भरावा लागतो. 330 रुपयांच्या प्रिमियमवर 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. विमाधारक व्यक्तिचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास दाव्याची 2 लाख रुपयांची रक्कम कुटूंबियांना दिली जाते. ही योजना एलआयसी मार्फत सुरु करता येत असून बॅकेत देखील याबाबतची माहिती घेता येते. 18 ते 50 वर्ष वयोगटातील लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यासाठी बॅकेत खाते असणे गरजेचे आहे, अशी माहिती श्री नेवारे यांनी दिली.

0000000

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी -जिल्हाधिकारी पवनीत कौर

                 


       

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी

-जिल्हाधिकारी पवनीत कौर

 

अमरावती दि. 13 : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना ही महत्त्वाकांक्षी योजना शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे . या योजनेच्या 16 हजार 193 लाभार्थ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी लाभार्थ्यांनी त्वरित आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे .

            बँकांनी योजनेच्या पोर्टलवर अपलोड केलेल्या माहितीचे ऑनलाइन प्रणालीद्वारे संस्करण करून पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर केली आहे. या याद्या संबंधित ग्रामपंचायत कार्यालय, विविध कार्यकारी संस्था कार्यालय , संबंधित बँक शाखा, तहसीलदार कार्यालय , सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालय या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

            पात्र लाभार्थ्यांच्या यादीमध्ये समाविष्ट असणाऱ्या लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ येथे भेट देऊन आपल्या विशिष्ट क्रमांकाच्या अनुषंगाने कर्ज खात्याचा आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी. आधार प्रमाणीकरण करण्यासाठी जाताना आपले आधारकार्ड, विशिष्ट क्रमांक, बँक पासबुक अशी आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगावी. आधार प्रमाणीकरण करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र संचालकामार्फत लाभार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. आधार प्रमाणीकरण करताना लाभार्थ्यांना अडचणी येत असल्यास, त्याबाबत ऑनलाईन तक्रार प्रणालीद्वारे पोर्टलवर आपली तक्रार दाखल करता येईल.

लाभार्थ्यांना त्यांचा विशिष्ट क्रमांकासमोर नमूद आधार क्रमांक, तसेच लाभाची रक्कम अमान्य असल्यास ऑनलाइन प्रणालीद्वारे जिल्हास्तरीय समितीकडे तक्रार दाखल करता येईल. लाभार्थ्यांना त्यांच्या अंगठ्याचे ठसे येत नसल्यास अथवा आधार प्रमाणीकरण करणे शक्य होत नसल्यास त्यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे तालुकास्तरीय समितीकडे तक्रार दाखल करता येईल.

            जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय समितीकडे दाखल केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने तक्रारदारांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांच्या तक्रारी या ऑनलाइन पद्धतीने निकाली काढण्यात येतील. बँकांनी अपलोड केलेल्या माहितीप्रमाणे योजनेच्या निकषानुसार सर्व पात्र लाभार्थ्यांच्या याद्या नजीकच्या काळात प्रसिद्ध करण्यात येणार असून योजनेच्या निकषानुसार पात्र असणारा कोणताही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही, अशी माहिती सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांनी दिली आहे.

00000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...