Thursday, November 3, 2022

विभागीय ग्रंथालयात दिवाळी अंकांचे प्रदर्शन सुरू













 विभागीय ग्रंथालयात दिवाळी अंकांचे प्रदर्शन सुरू

विचारसमृद्धीसाठी तरूणांनी वाचनाकडे वळावे

-  उपायुक्त संजय पवार

 

अमरावती, दि. 3 : वाचनातून आकलनशक्ती वृद्धिंगत होऊन विचारांना स्थैर्य मिळते. त्यामुळे केवळ स्मार्ट फोनवर वेळ न घालवता पुस्तकांचे वाचनही तरूण पिढीने नियमितपणे करावे, असे प्रतिपादन विभागीय उपायुक्त संजय पवार यांनी आज येथे केले.

 

विभागीय ग्रंथालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित दिवाळी अंकांच्या प्रदर्शनाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. सहायक आयुक्त श्यामकांत म्हस्के कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तहसीलदार संतोष काकडे, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, विभागीय ग्रंथपाल अरविंद ढोणे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सूरज मडावी आदी उपस्थित होते. हे प्रदर्शन उद्या दि. 4 ऑक्टोबरपर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे.

 

ग्रंथालयाला भेट देणे हे आपल्यासाठी कायम आनंददायी असल्याचे सांगून उपायुक्त श्री. पवार म्हणाले की, वाचनाचा ठेवा माणसाला लहानपणापासून शेवटपर्यंत साथ देतो. पुस्तकांचा परिणाम सकारात्मक असतो. स्मार्ट फोनच्या युगातही वाचनाची परंपरा टिकून राहणे आवश्यक आहे. विचारांची बैठक घडविण्यासाठी वाचन आवश्यक असते. 

 

 सहायक आयुक्त श्री. म्हस्के म्हणाले की, स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांनी मूलभूत संकल्पना समजावून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी पाठ्यपुस्तकांसारखी अभ्यास साधने उपयुक्त असतात. विविध क्षेत्रांतील मोठ्या व्यक्तींची चरित्रे, आत्मचरित्रे वाचल्याने त्यांच्या जीवनसंघर्षाचे, कार्याचे आकलन होते व प्रेरणा मिळते. संवेदनशील मन घडविण्याची ताकद पुस्तकांत असते.

 

प्रदर्शनात राज्यातील महत्वाच्या 200 दिवाळी अंकांचा समावेश असल्याचे श्री. मडावी यांनी सांगितले. प्रदर्शनाला अमरावतीकर रसिकांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन श्री. ढोणे यांनी केले.

 

०००

 

शनिवार व रविवार सुध्दा सुरू राहणार पदवीधर मतदार नोंदणी

 



शनिवार व रविवार सुध्दा सुरू राहणार पदवीधर मतदार नोंदणी

 

            अमरावती, दि. 3 : आगामी पदवीधर मतदार संघ निवडणूक-2023 करीता दि. 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर पुर्णत: नविन मतदार यादी तयार करण्याची मोहिम दि. 1 ऑक्टोबर 2022 पासून सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत दि. 1 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2022 या कालावधीत पदवीधर मतदार नोंदणीसाठी नमुना 18 (फार्म 18) स्विकारण्यात येत आहे.

            जिल्ह्यातील अधिकाधिक पदवीधरांना मतदार म्हणुन नोंदणी करता यावी या करीता जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी केंद्रावर पदवीधर मतदार नोंदणी शनिवार दि. 5 व रविवार दि. 6 नोव्हेंबर 2022 या  सार्वजनिक सुट्टीचे दिवशी कार्यालयीन वेळेत मतदार नोंदणी फार्म स्विकारण्यात येणार आहे. याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा. व जास्तीत जास्त पदवीधरांनी मतदार नोंदणी करावी. तसेच जिल्ह्यातील मतदार नोंदणी केंद्रावर कुठल्याही मतदाराने फार्म क्रमांक 18 भरून दिल्यास तो स्विकारण्यात येईल. याची सुध्दा सर्व मतदारांनी नोंद घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती पवनीत कौर यांनी केले आहे.

00000

नागरी सेवा परीक्षेच्या विनामूल्य प्रशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया 4 नोव्हेंबरपासून

 नागरी सेवा परीक्षेच्या विनामूल्य प्रशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया 4 नोव्हेंबरपासून

 

अमरावती, दि. 3 (जिमाका) : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या, नागरी सेवा परीक्षा-2023 (आयएएस,आयपीएस,आयएफएस) विनामुल्य पूर्व प्रशिक्षण  देण्यासाठी ‘भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रा’तील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा राज्यस्तरावरून ऑफलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी जाहिरातीत नमूद केलेल्या अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून ऑॅनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

            ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज दि. 4 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत भरता येतील. अर्ज भरण्याची तसेच परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत दि. 25 नोव्हेंबरपर्यंत आहे. प्रवेश परीक्षा दि. 4 डिसेंबर 2022 (ऑफलाईन पध्दतीने) घेण्यात येईल. परीक्षेची वेळ सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत राहिल.

           परीक्षेची जाहिरात, अभ्यासक्रम, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत माहिती व परीक्षेसंबंधी इतर सर्व सूचना www.siac.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तरी इच्छुकांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका डॉ. संगिता पकडे यांनी केले आहे.

00000

राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी 6 नोव्हेंबरपर्यंत अर्ज आमंत्रित

 


राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी 6 नोव्हेंबरपर्यंत अर्ज आमंत्रित

 

अमरावती, दि.3 (जिमाका): राष्ट्रीय विकास व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवक-युवती, पंजीबध्द संस्था यांनी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी दि. 6 नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी वर्षा साळवी यांनी केले आहे.

आरोग्य, संशोधन आणि नाविण्य, सांस्कृतिक, मानवाधिकार, प्रोत्साहन, कला व साहित्य, पर्यटन, परंपरागत औषधी, जागरुक नागरिक, समुदाय सेवा, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात विकासात्मक कार्य आणि स्मार्ट शिक्षण या क्षेत्रात काम करणारे या पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करु शकतात. यामध्ये 15 ते 29 वयोगटातील युवक-युवती व पंजीबध्द संस्थांनी विहित मर्यादेत प्रस्ताव सादर करावेत. https://awards.gov.in या केंद्रशासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज वैयक्तिक अथवा संस्थेमार्फत ऑनलाईन सादर करावे. या पोर्टल व्यतिरिक्त अन्य माध्यमातून प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

प्राप्त प्रस्ताव आवश्यक सर्व कागदपत्रे तसेच शिफारशींसह शासनास निर्धारित कालावधीत सादर करावयाचे असल्याने दि. 6 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन पध्दतीने भरुन प्रस्तावाच्या दोन प्रती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करण्यासंबंधी कळविण्यात आले आहे.

00000

शासकीय वसतिगृहाच्या प्रवेशासाठी 9 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

 शासकीय वसतिगृहाच्या प्रवेशासाठी 9 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

 

अमरावती, दि.3 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाव्दारे चालविल्या जाणाऱ्या शासकीय वसतिगृहांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची मुदत दि. 9 नोव्हेंबर 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तरी गुणवत्तेनुसार इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेचा अर्ज 9 नोव्हेंबरपर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत निंभोरा विभागीय वसतिगृह, अमरावती येथे  सादर करण्याचे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त माया केदार तसेच गृहपाल आशिष हाडके यांनी केले आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये वसतिगृह प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचे निर्देश समाजकल्याण आयुक्तालयाने दिले आहे.  मागासवर्गीय मुलांचे विभागीय स्तरावरील शासकीय वसतिगृह निंभोरा, अमरावती येथे आहे. या वसतिगृहात हजार विद्यार्थी राहण्याची क्षमता आहे. महाविद्यालयीन प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय मुलांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाव्दारे वसतिगृहामध्ये निवास तसेच अन्य सोयी-सुविधा पुरविल्या जातात. यासाठी जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्याबाबत समाजकल्याण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

00000

जिल्ह्यातील पं.स.आरक्षण सोडत जाहीर

 


जिल्ह्यातील पं.स.आरक्षण सोडत जाहीर

अमरावती, दि.3 (जिमाका): अमरावती जिल्ह्यातील 14 पंचायत समितीच्या सभापती पदाची सोडत जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन येथे आज जाहीर करण्यात आली.

चक्रानुक्रमे आरक्षण निश्चित करण्यात आल्यामुळे चिठ्ठीव्दारे सोडत करण्याची गरज भासली नाही. सन 1996 ते 2019 पर्यंतचे मागील आरक्षण विचारात घेता चक्रानुक्रमे आरक्षण जाहीर करण्यात आले.

पंचायत समिती अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सभापती पदासाठी अनु.जाती, नांदगाव खंडेश्वर अनु.जाती, अमरावती अनु. जाती (स्त्री), वरुड अनु. जमाती, चांदुर बाजार ना.मा.प्र., तिवसा ना.मा.प्र. (स्त्री), चांदुर रेल्वे सर्वसाधारण, दर्यापूर सर्वसाधारण, अचलपूर सर्वसाधारण, भातकुली सर्वसाधारण (स्त्री), मोर्शी सर्वसाधारण (स्त्री), धामणगाव रेल्वे सर्वसाधारण (स्त्री), धारणी अनु. जमाती तसेच चिखलदरा येथे अनु. जमाती (स्त्री) यांना आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी आरक्षण सोडतीची कार्यवाही केली. राजकीय व्यक्ती, पत्रकार यावेळी उपस्थित होते. निवडणूक विभागाचे प्रमोद देशमुख, किशोर झोंबाडे, अनुप उईके, वैभव मोरे, सीमा अढाऊ तसेच राधा तायडे यांनी आरक्षण सोडतीच्या कामकाजाचे व्यवस्थापन केले.

00000

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नियुक्ती आदेश वाटप कार्यक्रम सर्वसामान्यांच्या हितासाठी कार्य करावे -अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

 



















स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नियुक्ती आदेश वाटप कार्यक्रम

 

सर्वसामान्यांच्या हितासाठी कार्य करावे

-अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

 

     अमरावती, दि. 3 : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 75 हजार युवकांना रोजगार देण्याचा राज्य शासनाने संकल्प केला आहे. शासकीय नोकरीचे स्वप्न बाळगणाऱ्या व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांचे या उपक्रमाच्या माध्यमातून स्वप्न साकार होत आहे. या माध्यमातून सर्वसामान्यांच्या सेवेची संधी उमेदवारांना प्राप्त होत आहे. सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी संघटितपणे कार्य करुया, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी आज येथे केले.

 

       स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नियुक्ती आदेशाचा वाटप कार्यक्रम नियोजनभवनात झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंत्री श्री. राठोड यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात अमरावती विभागातील तीसजणांना, तसेच एकूण 109 उमेदवारांना नियुक्ती आदेशांचे वितरण करण्यात आले. राज्यात सर्व विभागीय ठिकाणी हा कार्यक्रम झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतील मुंबई येथील कार्यक्रमाचे थेट प्रसारणही करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छापर संदेशाची चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली.

 

      विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, प्रादेशिक वनसंरक्षक जी. के. अनारसे, महावितरणच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण, पारेषण मुख्य अभियंता जयंत विखे, महावितरण अकोला परिक्षेत्राचे मुख्य अभियंता पवनकुमार कचोट, सहायक महाव्यवस्थापक सुर्यकांत फलटणकर, मनीष भोपळे, परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक निलेश बेलसरे, उपायुक्त संजय पवार,  निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके आदी उपस्थित होते.

 

     श्री. राठोड म्हणाले की, कोरोनाकाळात उद्योग, व्यवसाय बंद असल्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. हे लक्षात घेऊन राज्य शासनाने भरती प्रक्रिया सुरु करुन युवकांसाठी सुवर्ण संधी निर्माण केली आहे. राज्याच्या हिताचे 700 निर्णय शासनाने घेतले. रिक्त पदांमुळे यंत्रणेवर ताण येतो. क्षेत्रीय स्तरावर काम करणारे कर्मचारी नसतील तर एकालाच अनेक प्रभार सांभाळावे लागतात. त्यामुळे कामे प्रलंबित राहतात. त्यामुळे सर्व विभागांत भरती प्रक्रियेला गती देण्यात आली आहे.

 

विभागीय आयुक्त डॉ. पांढरपट्टे म्हणाले की, या उपक्रमाव्दारे तरुणांना मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. शुभारंभाच्या दिवशी राज्यात 2 हजार युवकांना एकाचवेळी नियुक्तीपत्रे दिली जात आहे.

 

          यावेळी महावितरणमध्ये नियुक्त 95, महापारेषणमध्ये एक व परिवहन महामंडळात नियुक्त 13 अशा एकूण 109 उमेदवारांना नियुक्ती आदेशांचे मान्यवरांच्या हस्ते  वाटप  करण्यात आले. कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित होते.

 

0000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...