Thursday, December 1, 2022

अटल भूजल योजनेअंतर्गत कार्यशाळेत 66 प्रशिक्षणार्थ्यांचा सहभाग

 



अटल भूजल योजनेअंतर्गत कार्यशाळेत 66 प्रशिक्षणार्थ्यांचा सहभाग

अमरावती,दि. 1 : केंद्र शासन व जागतिक बँकेतर्फेराबविण्यात येणा-या  अटल भूजल योजनेंतर्गत ‘जलसुरक्षा आराखड्याची अंमलबजावणी’ या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रम डॉ. पंजाबरावदेशमुख विदर्भ प्रशासकीय विकास प्रशिक्षण प्रबोधिनीत झाला. त्यात 66प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला.   

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्याहस्ते कार्यशाळेचा शुभारंभ झाला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी,एसडीओ  नितीन हिंगोले, योजनेचे पालकअधिकारी डॉ.चंद्रकांत भोयर, कृषी उपसंचालक किसनराव मुळे, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षाभाकरे, उपमुख्य कार्य अधिकारी मधुकर वासनिक, भूजल सर्वेक्षणचे वरिष्ठ भूवैज्ञानिक संजय कराड उपस्थित होते.  

भूजलाच्या अनियंत्रीत उपशामुळे भूजलपातळीत होणारीघसरण थांबविण्यासाठी अटल भूजल योजना राबवली जाते. गावांमध्ये पाणी बचतीच्याउपाययोजना, जलसंधारण पुनर्भरण उपाययोजना व त्याला जोडून मनरेगा,प्रधानमंत्रीकृषी सिंचन योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापनकार्यक्रम, जलसंधारण, रोहयो  आदी योजनांचे अभिसरण याद्वारे होत आहे. भूजल गुणवत्तासुधारणे किंवा अबाधित राखणे हाही योजनेचा उद्देश असल्याचे संजय कराड यांनी सांगितले.

भूजल पुनर्भरण, रोजगारहमी योजना, विहिर पुनर्भरण,शोषखड्डेयांची कामे प्राधान्याने राबविणे, भूजलाच्या शाश्वत विकासासाठी जिल्हा व ग्रामपातळीवर सक्षम संस्थात्मक व्यवस्था निर्माण करणे, सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अधिकाधिकअवलंब करुन उपलब्ध पाण्याचा वापर मर्यादित करणे, सिंचन व्यवस्थापनामध्ये सुधारणाआणणे व सर्व बागायती क्षेत्रात 100 टक्के ठिबक व तुषार सिंचनाखाली आणणे आदीबाबत डॉ. भोयर यांनी सादरीकरण केले. श्री. मुळे,श्री. वासनिक, विषय तज्ज्ञ प्रकाश बहादे यांनीही मार्गदर्शन केले.

डॉ. केतकी जाधव यांनी सूत्रसंचालन केले. हरिषकठारे यांनी आभार मानले. भूवैज्ञानिक हिमा जोशी, प्रतीकचिंचमलातपुरे, दिनेश खडसे, सचिन चव्हाण, प्रफुल्लराठोड, गणेश वडगावकर, जी. एस. कदम यांनी कार्यशाळेच्यायशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

 

०००

महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाचे उपकेंद्र लवकरच अमरावतीत - कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर

 

महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाचे उपकेंद्र लवकरच अमरावतीत

-      कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर

अमरावती, दि.1 : महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाचे उपकेंद्र औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात लवकरच सुरू करण्यात येईल, असे विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी आज सांगितले.

उपकेंद्राच्या अनुषंगाने डॉ. पालकर यांनी परिसराची पाहणी केली, यावेळी त्यांनी स्थानिक उद्योजकांशीही चर्चा केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की, उद्योगांच्या मागणीनुसार रोजगारक्षम शिक्षण देऊन आवश्यक मनुष्यबळनिर्मितीसाठी कौशल्य  विद्यापीठाने कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग सायबर सिक्युरिटी, बिझनेस इंटेलिजन्स, इनोवेशन रोबोटिक्स अभ्यासक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे. अभ्यासक्रमात 40 टक्के अभ्यासवर्ग आणि 60 टक्के ‘ऑन द जॉब ट्रेनिंग’ देण्यात येणार असल्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर उत्तम प्रशिक्षित व अनुभवसिद्ध मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.            

त्या पुढे म्हणाल्या की, केवळ यांत्रिकच नव्हे, तर संगणकीय व इतर कौशल्यांचे मिश्रण असलेल्या मेकॅट्रॉनिक्स शाखेतील कुशल मनुष्यबळाची गरज अमरावतीसारख्या शहरांतही आहे. कौशल्य विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांतून असे मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. कौशल्य पुन:प्रशिक्षणाच्या संधी देणारे अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार आहेत. इनोवेशन हबद्वारे संशोधनाला चालना देण्यात येणार आहे.

उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन नव्या कौशल्यांचा शोध घेणे, जागतिक पातळीवरील आधुनिक तंत्रज्ञानाचा वेध व त्यानुसार कौशल्य प्रशिक्षणाची व्यवस्था करणे हे आव्हान विद्यापीठापुढे आहे. त्यानुसार राज्यात सहा महसुली विभागात उपकेंद्रे सुरू करणे, उद्योगांशी चर्चा व त्यानुसार नव्या अभ्यासक्रमांची रचना, विद्यापीठासाठी आवश्यक मनुष्यबळाची भरती आदी प्रक्रिया वेगाने होत असल्याचे त्यांनी सांगितले.

०००

एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅलीला मोठा प्रतिसाद

 



एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅलीला मोठा प्रतिसाद

 

अमरावती, दि. 1- जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षातर्फे जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित जनजागृती रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यात युवकांचा सहभाग लक्षणीय होता.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे व पीडीएमसीचे डॉ. ए. टी. देशमुख यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. यावेळी सर्वांना आरोग्य सुरक्षेची शपथ देण्यात आली. सामान्य रुग्णालय येथून रेल्वेस्थानक चौक ते राजकमल चौक ते कॉटन मार्केट ते सामान्य रुग्णालय असा रॅलीचा मार्ग होता. रॅलीत अनेक बाईकस्वार सहभागी झाले.  प्रा. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुंदर पथनाट्य सादर केले.  “एचआयव्हीसह जगणाऱ्यांकरिता आपली एकता,आपली समानता” या घोषवाक्यास अनुसरून फलक प्रदर्शित करण्यात आले, तसेच घोषणा देण्यात आल्या.

अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप नरवणे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे, डॉ.पद्माकर सोमवंशी, प्रकाश शेगोकार, डॉ. सुशील राजपूत, डॉ. तृप्ती जवादे, डॉ. संदीप दानखडे, राजेश पिदडी, डॉ.सुयोगा देशपांडे,  रमेश बनसोड, अजय वरठे, प्रमोद मिसाळ, दामोदर गायकवाड, नरेश मंथापुरवार, लोकेश पवार, संदीप पाटील, अमित बेलसरे, प्रवीण मिसाळ, अमोल मोरे, सचिन वानखडे, प्रदीप चव्हाण आदी उपस्थित होते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आरोग्य व शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉ. रघुनाथ वाडेकर, संत सत्ययदेव बाबा महिला मंडळ, भाग्योदय बहुउदेशीय संस्थेचे बी. एस. रामटेके, राजेंद्र साबळे, ब्रिजेश दळवी, श्री शिवाजी शिक्षण संस्था, भाग्योदय बहुउदेशीय संस्था, परमेश्वर मेश्राम,  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, विहान, आधार संस्था, समर्पण ट्रस्ट संस्था, साथी प्रकल्प, आय. एम. ए., स्त्रीरोग तज्ज्ञ संघटना, जॉनटस क्लब, परीचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, प्रा. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय औषध निर्माण महाविद्यालय विद्याभारती महाविद्यालय, बियाणी कॉलेज, भारतीय महाविद्यालय, इंदिरा मेघे महाविद्यालय अमरावती, दंत महाविद्यालय, रेड रिबन क्लब शिवाजी महाविद्यालय, शिवाजी कृषि महाविद्यालय, फार्मसी महाविद्यालय, डॉ. राजेंद्र गोळे फार्मसी महाविद्यालय यांचे सहकार्य लाभले.

 

०००

स्वच्छ सर्वेक्षणामधे सर्व ग्रामपंचायतींनी सहभागी व्हावे - अविश्यांत पंडा स्वच्छतेसाठी होणार गावांचे स्वयंमुल्यांकन

 


स्वच्छ सर्वेक्षणामधे सर्व ग्रामपंचायतींनी सहभागी व्हावे - अविश्यांत पंडा

स्वच्छतेसाठी  होणार गावांचे स्वयंमुल्यांकन

 अमरावती, दि. 1 : शाश्वत स्वच्छतेसाठी अमरावती जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हास्तरावर स्वच्छ सर्वेक्षण 2023 राबविण्यात येत असून मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांचे हस्ते प्रबोधिनी अमरावती येथे या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

         गावागावात निर्माण होणाऱ्या स्वच्छतेच्या नव्या सुविधा, नागरिकांचे स्वच्छते बाबतीत होणारे मत परिवर्तन व स्वच्छतेच्या चळवळीत ग्रामीण भागातील सर्व ग्रामस्थांचा सहभाग यामधुनच शाश्वत स्वच्छतेची चळवळ गतिमान होत असल्याचे ते म्हणाले. यावेळी अतीरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी , प्रकल्प संचालक प्रीती देशमुख ,पाणी स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख, गटविकास अधिकारी उपस्थित होते

        शासनाच्या ईग्रामस्वराज या पोर्टलवर  स्वयंमुल्यांकन पध्दतीचा अवलंब करत 15 डिसेंबर पर्यंत ग्रामपंचायतीला आपला प्रथम सहभाग नोंदवायचा असुन त्याकरीता पाचशे मार्क असणार आहेत. कुटुंब स्तर, सार्वजनिक स्तर आणी स्वच्छता सुविधा या तिन स्तरावर माहिती भरायची असुन याकरीता वैयक्तिक शौचालय, कुटुंब स्तर सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, गाव परीसर स्वच्छता, गावस्तरावरील सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय, घंटागाडी, प्लास्टिक विलगीकरण सुविधा, जनजागृती संदेश, निगराणी समीती, गुड मॉर्निंग पथक, नियमित सभा या उपक्रमाचा समावेश आहे.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून स्वच्छ सर्वेक्षण 2023 बाबत विस्तृत माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी यांनी दिली यावेळी जिल्हा पाणी व स्वच्छता मीशन कक्षातील अधीक्षक सुनील इंगोले ,प्रदिप बद्रे, निलेश नागपूरकर, धनंजय तिरमारे , बाळु बोर्डे, निलीमा इंगळे, दिनेश गाडगे,संजय राजुरकर उपस्थित होते

00000

जिल्हा लोकशाही दिन 5 डिसेंबरला

 

जिल्हा  लोकशाही  दिन  5 डिसेंबरला

अमरावती, दि. 1 : जिल्हा लोकशाही दिन महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार डिसेंबर महिन्यातील जिल्हा लोकशाही दिन, सोमवार, दिनांक 5 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी अहवालासह व्यक्तिश: उपस्थित राहण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी केले आहे.

00000

Tuesday, November 29, 2022

समाजकल्याण विभागातर्फे पत्रकार बांधवांसाठी कार्यशाळा सामाजिक न्याय साकारण्यासाठी सर्व घटकांनी योगदान द्यावे - विविध मान्यवरांचे आवाहन

 










समाजकल्याण विभागातर्फे पत्रकार बांधवांसाठी कार्यशाळा

सामाजिक न्याय साकारण्यासाठी सर्व घटकांनी योगदान द्यावे

- विविध मान्यवरांचे आवाहन

अमरावती, दि. 29 : राज्यघटनेतील मुलभूत तत्त्वांचे संरक्षण करत असतानाच सामाजिक न्याय साकारण्यासाठी शासन, प्रशासन, माध्यमे, संस्था, नागरिक या सर्व घटकांनी योगदान द्यावे, असे आवाहन विविध वक्त्यांनी पत्रकार कार्यशाळेत आज केले.

सामाजिक न्याय विभागातर्फे संविधान दिन ते महापरिनिर्वाण दिनादरम्यान ‘समता पर्व’ आयोजित करण्यात आले असून त्याअंतर्गत पत्रकार बांधवांसाठी ‘सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा’ या विषयावरील कार्यशाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात झाली. समाजकल्याण उपायुक्त  सुनील वारे अध्यक्षस्थानी होते. अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपाल हरणे, प्र. माहिती उपसंचालक हर्षवर्धन पवार, जात पडताळणी समितीच्या उपायुक्त जया राऊत, सहायक आयुक्त माया केदार, जिल्हा समाजकल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर,                    डॉ. राजकुमार दासरवाड आदी उपस्थित होते.

सामाजिक न्याय विभागातर्फे वंचित घटकातील 37 लाख नागरिकांना दरवर्षी शिष्यवृत्ती, वसतीगृहे, विविध लाभाच्या योजनांचा लाभ देण्यात येतो. योजनांच्या अंमलबजावणीसाठी महाडीबीटीसारख्या प्रणाली विकसित करण्यात आल्या असून अनेक त्रुटी व तक्रारी दूर झाल्या आहेत. योजना, उपक्रमांची अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठी माध्यमांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. वारे यांनी केले.

श्री. अग्रवाल म्हणाले की, सामाजिक न्याय संपूर्णत: अस्तित्त्वात येण्यासाठी अंतर्मुख होऊन मंथन होणे आवश्यक आहे. सामाजिक न्याय व महिला सबलीकरणाच्या संकल्पनेनुसार सर्वोच्च न्यायालयाने मुलीचा वडीलांच्या संपत्तीत अधिकार याबरोबरच मिळकत कराच्या 10 टक्के रकमेतून मजूरांसाठी कल्याणकारी योजना राबविण्याबाबत निर्णय दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेने हा निधी मजूरांसाठी खर्च केला पाहिजे. अशा विविध अंगांनी विचार व कृती करुन सामाजिक न्यायाची संकल्पना अस्तित्त्वात आणण्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक आहे. सोशल मिडियाच्या आजच्या युगात नवनवी माध्यमे उदयास येत असताना मुद्रित माध्यमांनी विश्वासार्हता टिकवून ठेवली आहे, असेही ते म्हणाले.

श्री. हरणे म्हणाले की, सामाजिक न्याय प्रत्येक स्तरात निर्माण होऊन तळागाळातील घटकांचा विकास साधण्यासाठी सामाजिक न्याय विभागाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. न्याय मिळण्याची भूमिका सर्वांची असली पाहिजे. पत्रकार बांधवांनी आपल्या लेखणीचा वापर सामुहिक हितासाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले.

लोकशिक्षण घडविण्यात माध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण असून त्यासाठी योगदान देण्याचे आवाहन श्री. पवार यांनी केले. श्री. दासरवाड यांनी नवमाध्यमांबाबत माहिती दिली. श्रीमती राऊत यांनी जात पडताळणी प्रक्रियेची माहिती दिली. श्री. जाधवर यांनी विभागाच्या योजनांची माहिती दिली.

श्रीमती केदार यांनी प्रास्ताविकातून विविध योजना, उपक्रमांची माहिती दिली. विभागाच्या जनसंपर्क अधिकारी मंगला देशमुख यांनी सुत्रसंचालन केले. राजेंद्र बिलव यांनी आभार मानले. कार्यशाळेला पत्रकार बांधव, पत्रकारिता अभ्यासक्रमाचे विद्यार्थी व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.  

00000

 

Monday, November 28, 2022

डाक अदालत 13 डिसेंबरला तक्रारींचा तपशील 29 नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन

 डाक अदालत 13 डिसेंबरला

तक्रारींचा तपशील 29 नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 28 (जिमाका) : भारतीय डाक विभागामार्फत डाक अदालतीचे आयोजन 13 डिसेंबर रोजी प्रवर अधीक्षक, डाक घर अमरावती विभाग यांच्या कार्यालयामध्ये दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आली आहे. 

विभागातील पोस्टाच्या कामासंबंधी विशेषत: स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, डाक वस्तू रजिस्टर पार्सल, बचत बँक व मनी ऑर्डर अशा तस्सम तक्रारींचे निराकरण सहा आठवड्याच्या आत झाले नसेल व त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारी विचारात घेऊन डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. 

सर्व संबंधितांनी आपले अर्ज प्रवर अधीक्षक डाक घर अमरावती विभाग, अमरावती 444602 यांच्याकडे सादर करावा. त्यामध्ये तक्रारीचा सर्व तपशील, तक्रार केल्याची तारीख, ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव व हुद्दा इत्यादीसह उल्लेख करुन उद्या मंगळवार  दि. 29 नोव्हेंबरपर्यंत पाठवावे, असे प्रवर अधीक्षक डाकघर यांनी कळविले आहे.

00000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...