Official Blogger Account of District Information Office, Amravati DGIPR, Government of Maharashtra
Wednesday, January 10, 2024
मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यास सुरूवात
मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना;
विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यास सुरूवात
अमरावती, दि. 10 (जिमाका): सामाजिक
न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांसाठी
भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. केंद्र शासनाकडून
60 टक्के रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही
सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या खात्यात अशी रक्कम जमा झाली आहे अथवा काही दिवसांत
जमा होणार आहे अशा विद्यार्थ्यांनी त्या रकमेमधून निर्वाह भत्याची 60 टक्के रक्कम वजा
करून उर्वरित रक्कम महाविद्यालयास सात दिवसाच्या आत जमा करावी, असे आवाहन समाजकल्याण
सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.
केंद्र शासनाकडून मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेत
सन 2021-22 व 2022-23 वर्षातील 60 टक्के रक्कम महाडीबीटी प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांच्या
आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांनी त्यांना अनुज्ञेय असलेल्या निर्वाह भत्त्याची रक्कम वजा करून उर्वरित
शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क, इतर ना परतावा शुल्काची रक्कम संबंधित महाविद्यालयास
जमा करावयाची आहे.
00000
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना; पात्र शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन
प्रधानमंत्री
किसान सन्मान निधी योजना; पात्र शेतकऱ्यांनी
नोंदणी
करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 09 (जिमाका) : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळावे यासाठी केंद्र
शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या
बँक खात्यात निधी थेट हस्तांतरण केला जातो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी
जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर संपर्क साधून नाव नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हा
अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपूते यांनी केले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत पात्र वहीतीधारक क्षेत्र असलेल्या पात्र शेतकरी कुटुंबास (पती-पत्नी व 18वर्षाखालील अपत्य) प्रति वर्ष रक्कम 6 हजार रुपये (दर चार महिन्यांनी 2 हजार रुपये समान तीन हप्त्यात ) केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार पात्र लाभार्थीच्या बँक खात्यात थेट हस्तांतरणाव्दारे जमा केला जातो. योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या पोर्टलवर स्वयं नोंदणी, तालुका कृषि अधिकाऱ्यामार्फत किंवा सामुहिक सुविधा केंद्रामार्फत पोर्टलवर नोंदणी करावी. ई-केवायसी, बँक खाते आधार संलग्न करणे आवश्यक राहिल.
नोंदणीकरीता आवश्यक कागदपत्रे : सातबारा,
8-अ, फेरफार, आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा पोस्ट ऑफिस खाते
क्रमांक, रेशन कार्ड, स्वयंघोषणापत्र आवश्यक राहिल. योजनेबाबत सविस्तर माहितीसाठी गावातील
कृषी सहाय्यक व तालुका कृषी अधिकारी यांचाशी संपर्क साधावा.
00000
Monday, January 8, 2024
उमेद तर्फे तीन दिवसांचे ‘मिनी सरस’ प्रदर्शनी; 50 स्वयं सहाय्यता समूहाचा सहभाग नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन- मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा
उमेद तर्फे तीन दिवसांचे ‘मिनी सरस’ प्रदर्शनी; 50 स्वयं सहाय्यता समूहाचा सहभाग
नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन- मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा
अमरावती, दि. 08 (जिमाका): महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद) मार्फत स्वयं सहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या साहित्याची 'मिनी सरस' विक्री प्रदर्शनी दि. 12 ते 14 जानेवारी दरम्यान सायन्स स्कोर मैदान, अमरावती येथे आयोजित करण्यात आली आहे. या प्रदर्शनीत स्वयं सहाय्यता समूहाव्दारे उत्पादित विविध खाद्य पदार्थ व वस्तूचे 50 स्टाँल लावण्यात येणार आहे. तीन दिवशीय प्रदर्शनीचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
ग्रामीण भागातील स्वयं सहाय्यता समूहातील महिलांचे जीवनमान उंचावणे, त्यांचे सबलीकरण व उपजीविका आधारित उपक्रम उमेदमार्फत राबविण्यात येतो. याचाच एक भाग म्हणून स्वयं सहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी विक्री प्रदर्शनीचे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनीमध्ये जिल्ह्यातील 30 स्वयं सहाय्यता समूह तसेच अमरावती व नागपूर विभागातील प्रती जिल्हा दोन स्वयं सहाय्यता समूह असे एकूण 50 समूहाचे स्टाँल लावण्यात येत आहे. या प्रदर्शनीमध्ये ग्रामीण भागातील स्वयं सहाय्यता समूहाद्वारे उत्पादित विविध खाद्य पदार्थ, तसेच इतर आकर्षक वस्तू नागरिकांना खरेदी करिता ठेवण्यात येणार आहे. या मिनी सरस प्रदर्शनीमध्ये 5 स्टाँल शाकाहारी ज्यामध्ये रोडगे, पिठल, भाकरी, बासुंदी, मांडे, पुरणपोळी यांचा समावेश आहे. तर 5 स्टाँलवर मासाहारी खाद्यपदार्थांचा समावेश आहे.
प्रदर्शनीमध्ये नागरिकांना कळधान्य, सर्व प्रकारचे मसाले, डिंक लाडू, पंचरत्न लाडू, मोह लाडू, डिंक लाडू, ज्वारी, बाजरी, सोया प्रोडक्ट, सोया इडली, ढोकळा, हेल्दी आरोग्याकरिता मोरिंगा पावडर, हळद पावडर, सर्व प्रकारचे लोणचे, खारोडी, जवस चटणी, खडू चक्का तेल, शुद्ध देशी गाईचे तूप, गाईचे शेणाच्या धूप बत्ती, मुंग वडी, मकरसंक्रांत निमित्त हलव्याचे दागिने व तिलगुडिया व बांबू पासून विविध आकर्षक वस्तू विक्री करिता या प्रदर्शनीमध्ये मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रीती देशमुख यांनी दिली आहे.
000000
नागपूर-अमरावती विभागाच्या जिल्हा वार्षिक योजनांचा (सर्वसाधारण) उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी घेतला ऑनलाईन आढावा
मेळघाट येथे इको टुरिझम निर्माण करा
- उपमुख्यमंत्री अजित पवार
नागपूर-अमरावती विभागाच्या जिल्हा वार्षिक योजनांचा (सर्वसाधारण)
उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी घेतला ऑनलाईन आढावा
* अमरावती जिल्ह्यासाठी 371 कोटीच्या प्रारुप आराखड्याला मंजूरी; दोनशे कोटींची अतिरिक्त मागणी
* धारणी, चिखलदरा या आकांक्षित तालुक्यांना अधिकचा निधी
अमरावती, दि. 8 (जिमाका): महाराष्ट्राच्या आर्थिक विकासदरामध्ये अमरावती जिल्ह्याची टक्केवारी अधिक वाढावी यादृष्टीने येथील विकास कामांना गतीने चालना द्यावी. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मेळघाट येथे इको टुरिझम निर्माण करा. यातून जिल्ह्याच्या आर्थिक उत्पन्नात भर पडेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री (नियोजन) अजित पवार यांनी आज केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेची (सर्वसाधारण) राज्यस्तरीय बैठक मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी विदर्भातील नागपूर व अमरावती विभागातील अकरा जिल्ह्यांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. या बैठकीला ऑनलाईन पध्दतीने राज्याचे उच्च तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय उपस्थित होते. तसेच अमरावती जिल्हा नियोजन भवन येथून खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके, आमदार देवेंद्र भुयार, विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडेय, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत म्हस्के आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्हा वार्षिक योजनेतून मिळालेला निधीच्या खर्चाची जबाबदारी प्रशासकीय विभागांकडे असून येणाऱ्या निवडणूका व आचारसंहिता लक्षात घेता तातडीने निधी विकास कामांवर खर्च करावा. निधी वेळच्यावेळी खर्च करतानाच विकास कामे दर्जेदारपणे पूर्ण करावीत. नागपूरच्या धर्तीवर नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत मेळघाट, चिखलदरा या भागामध्ये इको टुरिझम संकल्पना विकसित करा. यासाठी त्वरित कृती आराखडा तयार करा. चिखलदरा येथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी स्काय वॉकची निर्मिती करण्यात येत आहे. या प्रकल्पाला समांतर विकास प्रकल्प येथे निर्माण करा. येथील पर्यटकांसाठी विविध सोयी-सुविधा विकसित करा. येथील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या विकास कामांवर भर द्या. तसेच येथे ॲडव्हेंचर टुरिझम निर्माण व्हावे, या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी. यासाठी लोकप्रतिनीधींनी पाठपुरावा करावा. धारणी, चिखलदरा या आकांक्षित तालुक्याच्या निर्देशांकात वाढ करण्यासाठी अधिकचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री (नियोजन) अजित पवार यांनी यावेळी दिली. अमरावती विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडेय तसेच जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी नागपूर येथील इको टुरिझम संकल्पनेची प्रत्यक्ष पाहणी करुन आराखडा सादर करावा, असेही ते यावेळी म्हणाले.
जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीने 371 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्याला मंजूरी दिली आहे. जिल्ह्यात विविध योजना राबविण्यासाठी दोनशे कोटींची अतिरिक्त मागणी यावेळी करण्यात आली. सन 2024-25 या आर्थिक वर्षात हा निधी खर्च करण्यात येणार आहे. यंदा अधिक निधी वाढवून मिळावा, अशी मागणी लोकप्रतिनीधींकडून करण्यात आली. जिल्ह्यांची लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्रावर आधारीत तयार करण्यात आलेल्या सूत्रानुसार निधीचे वितरण करण्यात येईल. तथापि गतवर्षी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून देण्यात आलेल्या निधीपेक्षा यंदा अधिकचा निधी देण्यात येईल. जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांच्या गुणवत्तेत कोणत्याही प्रकारची तडजोड करु नये, प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण झाले पाहिजे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील म्हणाले, अमरावती जिल्हा भौगोलिकदृष्या मोठा आहे. येथील उर्जा विभागामार्फत येत्या काळात 22 गावांना लाभ देण्यात येणार आहे. मेळघाट क्षेत्रातील धारणी, चिखलदरा तालुक्यातील स्वयंसहाय्यता महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी अमरावती शहरात ‘मेळघाट हाट’ विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे. यामुळे बचत गटातील महिलांना स्वयंरोजगार प्राप्त झाला आहे. तसेच मेळघाटातील कुपोषणावर मात करण्यासाठी विविध शासकीय योजना राबविण्यात येत असून महिला व बाल विकास विभागामार्फत उपक्रमही राबविण्यात येत आहेत. मेळघाटातील इको टुरिझम विकसित करुन येथील व्याघ्र प्रकल्पाला चालना देण्यात येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
चिखलदरा व धारणी क्षेत्रात इको टुरिझम विकसित करावे. येथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जंगल सफारी सुरु करावी. जिल्ह्यातील मुलभूत विकास कामांना आवश्यक निधी उपलब्ध करुन द्यावा. अमरावती शहरातील स्त्री रुग्णालयाचे काम पूर्ण झाले असून ते लवकरात लवकर नागरिकांसाठी खुले करण्यात यावे, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी यावेळी केली.
आमदार सुलभा खोडके यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेत वाढीव निधीची मागणी केली. महानगरपालिकेच्या शाळेच्या इमारती शिकस्त झाल्या आहेत. त्यांच्या पुर्नबांधणीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावा. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय यांना वाढीव निधी उपलब्ध करुन द्यावा. विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या (व्हीएमव्ही) शिकस्त इमारतीच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करुन देण्यात यावी. तसेच नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत रुग्णालयात दाखल रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी शासकीय रुग्णालयाच्या परिसरात त्यांच्या निवास व्यवस्थेसाठी धर्मशाळेची स्थापना करण्यात यावी, विभागीय क्रीडा संकुलाच्या व्यवस्थापनासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
आमदार देवेंद्र भुयार यांनी जिल्ह्यातील महेंद्री जंगल सफारी येथे पर्यटकांना सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी निधीची मागणी केली. तसेच महानुभावांची काशी रिध्दपूर येथे श्रध्देने दरवर्षी जगभरातून पर्यटक येतात. येथील पर्यटकांना आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मान्यता देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
0000
योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी मिशनमोडवर काम करा - सौरभ कटियार
‘विकसित
भारत संकल्प यात्रे’चा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा;
योजनांची
माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी मिशनमोडवर काम करा
- सौरभ कटियार
अमरावती, दि. 08 (जिमाका):
शासनाच्या फ्लॅगशीप योजनांचे लाभ लक्षीत लाभार्थ्यांपर्यंत पोहचावे, यासाठी
केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने ‘विकसित भारत संकल्पना यात्रा’ ही मोहिम राबविण्यात
येत आहे. या यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत
मिशन मोडवर पोहोचविण्याचे काम संबंधित यंत्रणांनी करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी
सौरभ कटियार यांनी दिले.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विकसित
भारत संकल्प यात्रा मोहिमेची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. नवी दिल्ली
भारत सरकार वित्त मंत्रालयाचे उपसचिव आदित्य भोजगढिया यांची यावेळी प्रमुख उपस्थिती
होती. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक पंकज
कुमार, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस,
मनपाचे उपआयुक्त डॉ. मेघना वासनकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते तसेच
विविध विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.
श्री. कटियार म्हणाले की, विकसित भारत संकल्प यात्रा ही मोहीम जिल्ह्यात
दि. 23 नोव्हेंबरपासून सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत 575 गावांमध्ये ही यात्रा पोहोचली
असून शासनाच्या विविध योजनाचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला आहे. उर्वरित 266 गावामध्ये
यात्रेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळेल, यासाठी सुक्ष्म नियोजन
करावे. गावपातळीवर लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांचे सहकार्य घेण्यात यावे. ज्या लाभार्थ्यांना
लाभ दिला आहे, त्यांची माहिती केंद्र शासनाच्या वेब पोर्टलवर नियमित अपलोड करावी. आगामी निवडणुक आचारसंहिता लक्षात घेऊन मिशन मोडवर
यंत्रणांनी केंद्र सरकारच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवा, असेही
ते यावेळी म्हणाले.
उपसचिव श्री. भोजगढीया म्हणाले की, विकसित भारत संकल्प यात्रा ज्या
गावामध्ये जाणार आहे, त्या गावातील लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या विविध योजनांची
माहिती व्हावी, यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्यात यावा. जेथे लाभार्थ्यांनी अद्यापही
केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेतला नाही, त्यांच्यापर्यंत योजनांची माहिती
प्रभावीपणे पोहोचवावी. यासाठी युवा वर्ग, महिला बचत गट व विद्यार्थ्यांना सहभागी करून
घ्यावे. जिल्ह्यातील ग्रामीण तसेच दुर्गम भागात केंद्र सरकारच्या योजनांची माहिती प्रभावीपणे
पोहोचविण्यात यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
000000
Friday, January 5, 2024
जिल्हा माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
जिल्हा माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
अमरावती, दि. 06 (जिमाका): ‘दर्पणकार’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना पत्रकार दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात सहायक माहिती अधिकारी सतिश बगमारे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी वृत्तछायाचित्रकार सागर राणे, लिपिक कोमल भगत, संदेश सहायक प्रतिक वानखडे, राजश्री चोरपगार, गजानन पवार यांनीही बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
00000
शहरात कलम 37 (1) व (3) लागू
शहरात कलम 37 (1) व (3) लागू
अमरावती, दि. 06 (जिमाका): शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस आयुक्त (अमरावती शहर) यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता अमरावती पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला असून तो दि. 7 जानेवारीचे मध्यरात्रीपासून ते 21 जानेवारी 2024 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त (अमरावती शहर) नविनचंद्र रेड्डी यांनी कळविले आहे.
0000
अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक
अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...
-
पालकमंत्र्यांनी घेतला जिल्हा नियोजन समितीचा आढावा; 679 कोटी मंजूर निधीच्या कामांचे प्रस्ताव तात्काळ सादर करा - पालकमंत्री चंद...
-
महसूल दिनी एक लाख वृक्षारोपण होणार *आजपासून महसूल सप्ताहाचे आयोजन; विविध कार्यक्रमांची रेलचेल अमरावती, दि. ३१ : महसूल दिनाच्या निमित्ताने १ ...
-
खरीप पीक कर्जवितरणाला गती देण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश कर्जवितरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करा - पालकमंत...






