Thursday, February 8, 2024

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत धामणगाव रेल्वे येथे माविमच्या स्वयंसहाय्य महिला बचत गटांचे भव्य प्रदर्शन

 

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत धामणगाव रेल्वे येथे

माविमच्या स्वयंसहाय्य महिला बचत गटांचे भव्य प्रदर्शन

              

            अमरावती, दि. 8 (जिमाका): स्वयंसहाय्य महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी दि. 9 ते 12 फेब्रुवारी 2024 दरम्यान नवतेजस्विनी तालुकास्तरीय प्रदर्शनीचे आयोजन आरोही रिसोर्ट, शिवाजी चौक, धामणगाव रेल्वे  येथे करण्यात आले आहे. या विक्री प्रदर्शनीला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे यांनी केले.

 

            देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महिलांचे सशक्तीकरणासाठी त्यांना संघटीत करणे, प्रशिक्षित करणे, स्वावलंबी करणे, महिलांशी संबंधित योजना राबविणाऱ्या सर्व शासकीय यंत्रणाचे प्रतिनिधी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ लाभार्थ्यांना देणे व त्या लाभार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करणे या उद्देशाने मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान महिला आर्थिक विकास महामंडळमार्फत राज्यामध्ये राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून स्वयंसहाय्य महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी नवतेजस्विनी तालुका स्तरीय  प्रदर्शनीचे आयोजन आयोजन करण्यात येत आहे.

 

प्रदर्शनीमध्ये धामणगाव रेल्वे येथील 40 स्वयंसहाय्य महिला बचत गट तसेच चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील प्रती तालुका 10 स्वयं सहाय्य बचत गट असे एकूण 60 बचत गटांचे  स्टाँल लावण्यात येत आहे. या प्रदर्शनीमध्ये ग्रामीण भागातील बचत गटांद्वारे  उत्पादित विविध खाद्य पदार्थ, तसेच इतर आकर्षक वस्तू नागरिकांना खरेदी करिता ठेवण्यात येणार आहे. या नवतेजस्विनी भव्य प्रदर्शनी व विक्रीमध्ये 10 स्टाँल शाकाहारी ज्यामध्ये रोडगे, पिठल, ज्वारी,बाजरी भाकरी, बासुंदी, मांडे, पुरणपोळी या विदर्भातील ग्रामीण भागातील मुख्य आकर्षन असलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे.

 

प्रदर्शनी निमित्ताने  विविध विषयांवर आधारित चर्चा व मार्गदर्शन सत्र, संवाद कार्यशाळा चे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये महिलांच्या उद्योग वाढीसाठी मार्गदर्शन सत्र, कौश्यल्य विकास विविध महामंडळे/ शासकीय योजनांची माहिती देणारे कार्यक्रम, बँक कर्जाबाबत माहिती, सकस आहार रेसिपी स्पर्धा, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाबाबत माहिती इत्यादीच उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

             या प्रदर्शनी मध्ये बचत गटांद्वारे उत्पदीत मिक्स मिलेटस कडधान्य, सर्व प्रकारचे मसाले, डिंक लाडू, ज्वारी, बाजरी, ढोकळा, हेल्दी आरोग्या करिता मोरिंगा पावडर, हळद पावडर, मिरची पावडर ,सर्व प्रकारचे लोणचे, खारोडी, जवस चटणी, खडू चक्का तेल, शुद्ध देशी गाईचे तूप, गाईचे शेणाच्या धूप बत्ती, मुंग वडी, व बांबू पासून विविध आकर्षक वस्तू व गृह उपयोगी वस्तू विक्रीकरिता या नवतेजस्विनी भव्य प्रदर्शनी मध्ये मिळणार आहे.

00000

शैक्षणिक वर्ष 2024-25 करीता संस्थाकडून प्रस्ताव मागविले

 

शैक्षणिक वर्ष 2024-25 करीता संस्थाकडून प्रस्ताव मागविले

 

अमरावती, दि. 8 (जिमाका): कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, मुंबईमार्फत राबविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष 2024-25 करीता प्रस्ताव दि. 29 फेब्रुवारीपर्यंत मागविण्यात आले आहे. मंडळाचे अभ्यासक्रम राबविणाऱ्या नवीन संस्थांना व अस्तित्वात असलेल्या संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम तुकडी सुरू करण्यास मान्यता घेण्यासाठी इच्छुक संस्थांनी मंडळाचे संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन गुगल फार्म लिंकवर प्रस्ताव सादर करावा. तसेच संबंधित जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय, अमरावती यांचेकडे तीन प्रतीत प्रस्ताव मुदतीत सादर करावा. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केल्या जाणार नाही याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी मंडळाच्या www.msbsde या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर.ई. शेळके यांनी केले.

000000

अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेश देणे सुरु; 15 मार्चपर्यंत अर्ज आंमत्रित

 

अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेश देणे सुरु;

15 मार्चपर्यंत अर्ज आंमत्रित

 

अमरावती, दि. 8 (जिमाका) :  अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत सन 2024-25 मध्ये इयत्ता पहिली व दुसरीमध्ये प्रवेश देणे सुरु झाले आहे. इच्छुक पालकाकडुन निवासी शाळेत प्रवेशासाठी दि. 15 मार्च 2024 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रिचर्ड यानथन यांनी केले आहे.

                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                    

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी कार्यक्षेत्रातील अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज धारणी कार्यालयातंर्गत असलेल्या सर्व शासकीय आश्रमशाळांवर विनामुल्य उपलब्ध आहेत. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राच्या अटी व शर्ती पुर्ण करुन परीपुर्ण अर्ज सादर करावा. तसेच वरीष्ठ कार्यालयाकडुन मंजुरी दिलेल्या शाळांना व मंजुर संख्येनुसारच विद्यार्थ्याना प्रवेश देण्यात येईल.

 

प्रवेशासाठी अटीशर्ती : योजनेचा लाभ घेवु इच्छिणारा विद्यार्थी अनुसुचित जमातीच्या असावा,  विद्यार्थ्यांच्या पालकाचे किंवा विद्यार्थ्यांचे नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या अनुसुचित जमातीच्या सांक्षाकिंत दाखल्याची प्रत जोडणे आवश्यक आहे. प्रवेश अर्जासोबत विद्यार्थ्यांचे जन्मतारखेचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक.  जर विद्यार्थी दारिद्ररेषेखालील असेल तर यादीतील अनुक्रमांकासह मुळप्रमाणपत्राचे प्रत सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा दारिद्र रेषेसाठी विचार केला जाणार नाही. या योजनेचा लाभ घेवु इच्छिणाऱ्या  विद्यार्थ्यांच्या पालकांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लक्ष इतके असावे. तहसिलदार यांचे चालु वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र सोबत जोडावे.

 

            इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेवु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याचे वय 6 वर्ष पुर्ण असावे. पालकाचे संमतीपत्र व विद्यार्थ्याचे दोन पासपोर्ट फोटो व जन्मतारखेचा दाखला अंगणवाडी, ग्रामसेवक यांच्या शिक्का व स्वाक्षरीसह जोडावा. विद्यार्थ्यांचे वैद्यकिय पात्रता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक. आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांची तसेच वीरपत्नी, घटस्फोट, निराधार, परितक्त्या व दारिद्ररेषेखालील अनुसूचित जमातीच्या पालकाच्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश दिले जाईल. घटस्फोटीत यांनी कार्यालयीन निवाड्याची प्रत सोबत जोडावी. विद्यार्थ्याचे पालक शासकिय व निमशासकिय नोकरदार नसावेत. नोकरदार नसल्याचे पालकांनी लेखी लिहुन दयावी लागेल.

 

            इयत्ता दुसरीमध्ये प्रवेशासाठी शिक्षण घेत असलेल्या शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र या योजनेचा लाभ घेवु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड जोडणे आवश्यक. अर्ज सादर करावयाचा दि. 20 फेब्रुवारी 2024 ते अर्ज स्विकारण्याचा शेवट दि. 15 मार्च 2024 पर्यतच राहिल. त्यानंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. या अर्जामध्ये खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांस एकदा एका शाळेत प्रवेश निश्चित झाल्यानंर कोणत्याही परिस्थित पालकाच्या व पाल्याच्या विनंतीनुसार शाळा बदलता येणार नाही. याबाबत पालकाचे हमीपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे.

 

आवश्यक कागदपत्रे : अर्जदार विद्यार्थ्यांचे नजिकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो, पालकाचे रहिवासी प्रमाणपत्र, पालकाचे जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, अंगणवाडीचा दाखला पहिली इयत्तेसाठी ग्रामसेवकाचा दाखला. विद्यार्थ्यांचा आधारकार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र,  दारिद्ररेषेखालील असल्यासबाबतचा दाखला किंवा ग्रामसेवक दाखला.  महिला पालक विधवा, वीरपत्नी, घटस्फोटीत, निराधार, परितक्त्या असल्यास ग्रामपंचायतीचा दाखला. ज्या शाळेमध्ये विद्यार्थ्याला प्रवेश मिळाले आहे त्याच शाळेमध्ये इयत्ता पहिली ते बारावी पर्यत शिक्षण घेत असल्याबाबत हमीपत्र.

00000

Wednesday, February 7, 2024

पाच दिवसांचा ‘महासंस्कृती महोत्सव’;महोत्सवाच्या यशस्वितेसाठी सुक्ष्म नियोजन करा- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 

पाच दिवसांचा ‘महासंस्कृती महोत्सव;महोत्सवाच्या यशस्वितेसाठी सुक्ष्म नियोजन करा- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 





अमरावती, दि. 7 (जिमाका) :  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध प्रांतातील संस्कृतीचे आदानप्रदान, संवर्धन, स्वातंत्र्य लढ्यातील लढवय्यांची माहिती जनसामान्यांपर्यत पोहचविण्याच्या उद्देशाने अमरावती येथे पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. महोत्सवाच्या यशस्वितेसाठी परिपूर्ण आराखडा व सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे दिले.

 

            जिल्हास्तरावर घेण्यात येणाऱ्या महासंस्कृती महोत्सवाच्या आयोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, महापालिकाचे उपायुक्त नरेंद्र वानखडे, सहायक आयुक्त भुषण पुसदकर, सहायक माहिती अधिकारी सतिश बगमारे तसेच अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले की, महासंस्कृती महोत्सवात महाराष्ट्रातील विविध प्रदेशांतील संस्कृती दर्शविणारे कार्यक्रम तसेच जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन मिळावा यासाठी त्यांच्या कलागुणानुसार विविध कार्यक्रम आयोजन करण्यात येईल. सोबतच शिवचरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, भारूड, गोंधळ, पोवाडा, खडी गंमत, कोळीगीत, लोककलेतील विविध प्रकार, स्थानिक कला प्रकार, नाटक, कवी संमेलन, व्याखानमाला अशा कार्यक्रमांची रेलचेल असेल. या महोत्सवामध्ये शासनाच्या विविध विभागाचे व महिला बचत गटांचे स्टॉलही येथे उपलब्ध असतील.

 

महासंस्कृती महोत्सव दि. 17 ते 21 फेब्रुवारी दरम्यान घेण्याचे नियोजन आहे. महोत्सवाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांबाबत स्वतंत्रपणे उपसमित्या तयार कराव्यात. त्याद्वारे प्रत्येक कार्यक्रमाबाबत सविस्तर चर्चा करून परिपूर्ण आराखडा निश्चित करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले.

00000

मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती महाडीबीटी प्रणालीवर कार्यान्वित; ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती महाडीबीटी प्रणालीवर कार्यान्वित; ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 7 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनूसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक वर्ष 2023-24 पासुन ऑनलाईन महाडीबीटी प्रणालीवर कार्यन्वीत करण्यात आलेली आहे. तरी पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

 

 इयत्ता नववी व दहावी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती, साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती, इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावी मधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थीनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क या योजना राबविण्यात येतात.

 

योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी प्रणालीच्या http://prematric.mahait.org/Login/ या वेब लिंकवर ऑनलाईन अर्ज नोंदणी करावे. महाडीबीटी प्रणालीमध्ये पात्र सर्व अनूसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे 100 टक्के अर्जांची नोंदणी जिल्ह्यातील शासनमान्य शाळेच्या मुख्याध्यापक करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

000000

शहरात कलम 37 (1) व (3) लागू

 

शहरात  कलम 37 (1)  व (3) लागू

 

            अमरावती, दि. 07 (जिमाका):  शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस आयुक्त (अमरावती शहर) यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

 

              प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता अमरावती पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात  लागू  करण्यात आला असून तो  दि. 20 फेब्रुवारी 2024 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त (अमरावती शहर)  नविनचंद्र रेड्डी  यांनी कळविले आहे.

0000

Tuesday, February 6, 2024

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

 जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 6 (जिमाका) : व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र नोंदणी अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमासाठी प्रवेशीत विद्यार्थ्यांनी आपला परिपूर्ण अर्ज तात्काळ सादर करावा, असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती श्रीमती जया राऊत यांनी केले आहे.

 

            ज्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र, वास्तुशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट व केटरिंग टेक्नोलॉजी, व्यवस्थापन शास्त्र, एमसीए, कला शिक्षण, वैद्यकीय, कृषी, शिक्षणशास्त्र, बीए, बीएससी-बीएड,एमएड, विधी, फिशरी, शारिरीक शिक्षण, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, फिजिओथेरेपी इत्यादी व्यावसायिक अभ्याक्रमात प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांनी प्रवेश अर्ज करतेवेळी जात पडताळणी प्रमाणपत्र प्रवेश प्रक्रिया नोंदणी अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपला जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज http:barti.maharashtra.gov.in या वेबसाईटवर भरावे. ऑनलाईन अर्जाची प्रिंट, त्यासोबत अर्जदाराचे जात प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, वडील व आजोबांचे शालेय किंवा महसूली पुरावे, आवश्यक शपथपत्रासह संबंधित महाविद्यालयामार्फत किंवा प्राचार्याच्या सही शिक्याने स्व:त यथाशिघ्र संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र समितीकडे सादर करावा. परिपूर्ण अर्ज दाखल करतांना अर्जदाराने मुळ दस्ताऐवज सोबत आणून दाखवणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज भरण्याचे वेळेअगोदर वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्याचे अनुषंगाने विद्यार्थ्यांनी परिपूर्ण अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीव्दारे करण्यात आल आहे.

0000000


टास्क फोर्स् सदस्य जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे विद्यार्थी,उमेदवार व संबंधित घटकांशी थेट संवाद साधणार

  भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येणार आह...