Wednesday, February 28, 2024

पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 56 उमेदवारांची विविध पदांवर प्राथमिक निवड

 

पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा;

प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 56 उमेदवारांची विविध पदांवर प्राथमिक निवड

 

अमरावती, दि.28 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने बुधवार दि. 21 फेब्रुवारी रोजी  शासकिय तांत्रीक विद्यालय परिसर, अमरावती येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा प्लेसमेंट ड्राईव्ह संपन्न झाला. या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 56 उमेदवारांची विविध पदांवर प्राथमिक निवड करण्यात आली असून या रोजगार मेळाव्यामध्ये नोकरी इच्छुक उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

ऑनलाइन, ऑफलाईन प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 155 उमेदवारांनी सहभाग घेतला. त्यापैकी 134 उमेदवारांनी प्रत्यक्ष येऊन मुलाखती देऊन 56 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, कौशल्य विकास अधिकारी श्री. ठाकरे आदी उपस्थित होते.

 

या मेळाव्यामध्ये रतन असोसिएट प्रा.लि.अमरावती, पी.पी.एस.एनर्जी, अमरावती, स्टारलाईट फायनांसीयल प्रा.लि. अमरावती, बायज्युस ट्युशन क्लासेस अमरावती, नवभारत फर्टीलायझर अमरावती, एम.आर.टेक्नोसर्व अमरावती इत्यादी खाजगी आस्थापनेचे प्रतिनिधींनी उपस्थित राहून उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या

 

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी यंग प्रोफेशनल क्रपा अरगुलेवार, यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन पंकज कचरे यांनी तर आभार प्रदर्शन अश्विनी जयसिंगपुरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

0000

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना; नविन व नुतनीकरण अर्ज ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन

 

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना;

 नविन व नुतनीकरण अर्ज ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 28 (जिमाका): जिल्हातील विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती व इतर योजनाचे नविन व नुतनीकरण अर्ज ऑनलाईन प्रणालीवर भरण्याची प्रक्रिया कार्यन्वीत झाली आहे. विद्यार्थी व महाविद्यालयांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी रिचर्ड यानथन यांनी केले आहे.

 

आदिवासी विकास विभागाकडून राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती योजनेचा लाभ दिला जातो. ही योजना प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी अंतर्गत येत असलेल्या सर्व शासकिय निमशासकिय अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित महाविद्यालयात राबविली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शैक्षणिक सत्र 2023-24 साठी https://mahadbtmahait.gov.in ही प्रणाली नोहेंबर 2023 पासुन कार्यान्वीत झाली असुन अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरणेसाठी निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी नविन तथा नुतनीकरण अर्ज विहीत मुदतीत अर्ज भरुन महाविद्यालय स्तरावर सादर करावे. यासाठी महाविद्यालयांनी सुचना फलकावर सुचना लावून वर्गामध्ये नोटीस फिरवून जनजागृती करावी. अनुसूचित जमातीचा विद्यार्थी भारत सरकार शिष्यवृत्ती व इतर योजनेपासून वंचित राहील्यास याची संपूर्ण जबाबदारी ही संबंधीत महाविद्यालयाची राहील, याची नोंद घ्यावी.

00000

 

बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तु संचाचे वितरण सुरु; वाटपाच्या ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन

 

बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तु संचाचे वितरण सुरु;

 वाटपाच्या ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 28 (जिमाका): नोंदणीकृती सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तु संच वितरीत करण्यात येत आहे. तसेच गृहपयोगी वस्तु संच वितरीत करण्यासाठी तालुकास्तरावर नियोजन करण्यात आले असून प्रत्येक बांधकाम कामगारांना संच मिळणार आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांनी वाटपाच्या ठिकाणी गर्दी करु नये, असे आवाहन जिल्हा कार्यकारी अधिकारी तथा सहाय्यक कामगार आयुक्त यांनी केले आहे.

 

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत जिल्ह्यात दि. 21 फेब्रुवारी 2024 पासून नोंदीत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तु संच बांधकाम कामगारांचे बायोमॅट्रीक व फोटो घेऊन वाटप करण्यात येत आहे. हा वाटप सुनिल इंटरप्राईजेस, प्लॉट, नं. 23, जुना बायपास, एम. आय. डी. सी. बडनेरा रोड, अमरावती येथे सुरु आहे. गृहपयोगी वस्तु संच कुटुंबात एकाच व्यक्तीला देण्यात येतो. तसेच गृहपयोगी वस्तू संच वाटपाचे तालुका स्तरावरील कार्यालयामार्फत नियोजन सुरू असून कोणताही बांधकाम कामगार वंचित राहणार नाही. तरी वाटपाच्या ठिकाणी गर्दी करू नये, असे पत्राव्दारे कळविण्यात आले आहे.

000000

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ; विविध प्रशिक्षणासाठी अर्ज मागविले

 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ; विविध प्रशिक्षणासाठी अर्ज मागविले

            अमरावती, दि. 28 (जिमाका): साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय अमरावतीमार्फत मांतग समाज व तत्सम बारा पोट जातीतील उमेदवारांकडून विविध प्रशिक्षणासाठी अर्ज मागविले आहे. इच्छुक पात्र प्रशिक्षणार्थ्यांनी अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक ज.म. गाभणे यांनी केले आहे.

 

मांतग समाज व तत्सम बारा पोट जातीतील प्रशिक्षणार्थीसाठी सन 2024-25 आर्थिक वर्षाकरिता 267 प्रशिक्षणार्थीचे उदिष्टे प्राप्त झाले आहे. पात्र प्रशिक्षणार्थीनी विहित नमुन्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन पोलीस कमिशनर ऑफिस मागे कॅम्प रोड, अमरावती येथे सादर करावा.

 

प्रशिक्षणासाठी अटीशर्ती याप्रमाणे : प्रशिक्षणार्थी हा मातंग समाजाचा व तत्सम बारा पोट जातीतील असावा. प्रशिक्षणार्थी महराष्ट्रातील रहिवासी असावा. प्रशिक्षणार्थ्यांचे वय 18 ते 50 वयोगटातील असावे. प्रशिक्षणार्थींने यापुर्वी शासनाच्या, महामंडळाच्या कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला नसावा.  प्रशिक्षणार्थींचे वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा जास्त नसावे. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येईल. प्रशिक्षणार्थींने आधार कार्ड जोडलेल्या बँक खात्याच्या तपशिल सादर करावा. दिव्यांग प्रशिक्षणार्थींना 5 टक्के आरक्षणानुसार प्राध्यान देण्यात येईल.

 

आवश्यक कागदपत्रे: जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, राशनकार्ड, आधारकार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्र, आधार लिंक पासबुक प्रत, पासपोर्ट साईज फोटो.

0000

Friday, February 23, 2024

संत गाडगेबाबा यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 


संत गाडगेबाबा यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

            अमरावती, दि. 23 (जिमाका): थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

          याप्रसंगी उपजिल्हाधिकारी विजय जाधव, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, तहसिलदार प्रशांत पडघम, अधीक्षक निलेश खटके तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

00000

महासंस्कृती महोत्सवात नागरिकांनी घेतली मतदानाची प्रतिज्ञा

 


महासंस्कृती महोत्सवात नागरिकांनी घेतली मतदानाची प्रतिज्ञा

          अमरावती, दि. 23 (जिमाका): पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या वतीने सायन्स स्कोर मैदान येथे महासंस्कृती महोत्सवात विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी दि. 22 फेब्रुवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित ‘सविधान’ हे महानाट्य सादर करण्यात आले. या महानाट्याच्या प्रारंभी उपस्थित सर्व नागरिकांना आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासंदर्भात प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व रसिक, नागरिकांनी लोकशाहीवर निष्ठा ठेऊन देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त नि:पक्षपाती व शातंतापुर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू, अशी प्रतिज्ञा घेतली.

 

          प्रतिज्ञेकरिता अप्पर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, उपायुक्त श्यामकांत म्हस्के, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, उपमुख कार्यकारी अधिकारी कैलास घोडके, उपायुक्त महानगरपालिका नरेंद्र वानखडे, तहसिलदार विजय लोखंडे आदी उपस्थित होते.

00000

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी व्यापक जनजागृती करा -मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा

 




मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी व्यापक जनजागृती करा

-मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा

 

अमरावती, दि.23 (जिमाका): आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये तसेच मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा व ग्रामस्तरावर व्यापक जनजागृती करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्विप नोडल अधिकारी संजीता मोहपात्रा यांनी केले.

 

जिल्ह्यातील मतदार सक्षम बनविणे, मतदानाची टक्केवारी वाढविणे, निवडणूकीबाबत नागरीक जागरुक होऊन अधिक सजग व्हावा व देशातील लोकशाही बळकट होऊन तरुण, महिला, दिव्यांग, ग्रामीण व आदीवाशी क्षेत्रातील लोकांचा सहभाग वाढावा याकरिता जिल्ह्यात स्विप प्लॉन तयार करुन त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय स्विप समिती स्थापन करण्यात आलीआहे. या समितीची बैठक आज मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात आज पार पडली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम.एम कुळकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर, नगरपरिषद प्रशासन अधिकारी सुमेध अलोणे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे आदी तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा म्हणाल्या की, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी गावपातळीवर वार्ड सभा घेणे, महाविद्यालयामध्ये निवडणूक आणि मतदानासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन, संकल्प पत्रांचे वाटप व गोळा करणे, कलापथक, लोकनृत्य, जिंगल्स, पोस्टर बॅनर अशा विविध माध्यमाद्वारे जनजागृती करावी. जिल्हास्तरावर मानवी श्रृखंलाचे आयोजन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांद्वारे मतदान जनजागृती रॅली, शासकीय कार्यालय व गर्दीच्या ठिकाणी सेल्फी पाईंट तयार करणे, नैतीक मतदान प्रशिक्षण अशा विविध उपक्रमातून जनजागृती करावी. यासाठी स्विप समितीच्या विविध विभागांनी सुक्ष्म नियोजन करुन समन्वयाने काम करावे. तसेच स्थलांतरित कामगार, अर्बन व आदिवासी क्षेत्रात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष मोहिम राबवावी, अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

0000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...