Monday, March 4, 2024

जागतिक महिला दिनानिमित्त बचतगटांच्या उत्पादनांचे प्रदर्शनी; 7 ते 9 मार्च दरम्यान आयोजन; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

 

जागतिक महिला दिनानिमित्त बचतगटांच्या उत्पादनांचे प्रदर्शनी;

7 ते 9 मार्च दरम्यान आयोजन; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 04 (जिमाका):  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवानोंन्नती अभियान(उमेद) व महिला आर्थिक विकास महामंडळ(माविम) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त बचतगटांच्या उत्पादनांचे जिल्हा प्रदर्शनीचे आयोजन दि.7 ते 9 फेब्रुवारी 2024 दरम्यान सायन्स स्कोर मैदान, मुख्य बस स्थानक समोर, अमरावती येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनीचा नागरिक, महिला तसेच सर्व वयोगटाच्या व्यक्तिंनी लाभ घ्यावा व महिला आर्थिक सक्षमीकरणाच्या चळवळीला पाठबळ द्यावे, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक प्रिती देशमुख यांनी केले आहे.

 

            स्वयंसहाय्यता समूहातील महिलांचे जीवनमान उंचावणे, त्यांचे सबलीकरण करणे व उपजीविका आधारित उपक्रम राबविणे याकरिता उमेदमाविम यंत्रणाव्दारे काम करत आहेत. याअंतर्गत स्वयं सहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वयं सहाय्यता समूहांच्या वस्तू विक्री व प्रदर्शनीचे तीन दिवसांचे आयोजन करण्यात येत आहे. याप्रदर्शनीमध्ये महिलांच्या सर्वांगीण विकास, महिलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यकरिता विवध तज्ञाचे मार्गदर्शन, कार्यशाळा तसेच विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन या प्रदर्शनीत करण्यात येणार आहे.

 

जिल्हा प्रदर्शनीमध्ये जिल्ह्यातील उमेद व माविम अंतर्गत 100 पेक्षा अधिक स्वयं सहाय्यता समूहांचा या सहभागी होणार आहे. ग्रामीण भागातील स्वयं सहाय्यता समूहाद्वारे उत्पादित विविध खाद्य पदार्थ व आकर्षक वस्तू नागरिकांना खरेदी करिता ठेवण्यात येणार आहे. या प्रदर्शन मध्ये शाकाहारी ज्यामध्ये रोडगे, पिठल, भाकरी, बासुंदी, मांडे, पुरणपोळी इत्यादी स्थानिक व्यंजनाचा समावेश राहिल.तर मासाहारीमध्ये चिकन, मटन, मांडे, ज्वारी, बाजरी भाकरी या विदर्भातील ग्रामीण भागातील मुख्य आकर्षण असलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे. तसेच स्वयं सहाय्यता समूहांकडून उत्पादित बांबू पासून विविध आकर्षक वस्तू, मिक्स मिलेटस कळधान्य, सर्व प्रकारचे मसाले, डिंक लाडू, पंचरत्न लाडू, मोह लाडू, डिंक लाडू, ज्वारी, बाजरी, सोय प्रोडक्ट सोया इडली, ढोकळा, मोरिंगा पावडर, हळद पावडर, सर्व प्रकारचे लोणचे, खारोडी, जवस चटणी, खडू चक्का तेल, शुद्ध देशी गाईचे तूप, गाईचे शेणाच्या धूप बत्ती, मुंग वडी, इत्यादी विक्री करिता प्रदर्शनीमध्ये मिळणार आहे.

   

प्रदर्शनीमध्ये विविध उपक्रमाचे आयोजन

 

जिल्हा प्रदर्शनीमध्ये रांगोळी स्पर्धा, रेसिपी स्पर्धा(मिलेटस), मर्दानी खेळ( मलखांब, स्वयं सुरक्षा, साहसी खेळ), खेळ पैठणीचा, लोकनृत्य, आदिवासी नृत्य, योग, मेडीटेशन, झुम्बा, संगीत संध्या, चित्रकला स्पर्धा, वयक्तिक व ग्रूप नृत्य स्पर्धा इत्यादीचे आयोजन होणार आहे. तसेच महिलांचे आरोग्य व मानसिक ताण या विषयावर विविध तज्‍ज्ञांव्दारे मार्गदर्शन या प्रदर्शनी दरम्यान होणार आहे.

00000

 

 

अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

 


अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

             अमरावती, दि. 04 (जिमाका): पोलिस ठाणे सिटी कोतवाली अमरावती (शहर) अंतर्गत एका अनोळखी इसमाचा मृतदेह इर्विन दवाखान्याच्या परिसरात सापडला आहे. मृतकाचे अंदाजे वय 40 वर्षे असून मृतकाचा बांधा सडपातळ, रंग निमगोरा, उंची 5 फुट 7 इंच, केस काळे, मिशी काळी, दाढी पांढरी, चेहरा लाबंट, दोन्ही डोळे, तोंड अर्धवट उघडे व उजव्या हातावर अस्पष्ट नाव गोंदलेले दिसत आहे तसेच अंगात पांढऱ्या रंगाची सॅंडो बनियान, हिरव्या रंगाची निकर व काळ्या रंगाचे स्पोर्ट्सचे लोअर घातलेले आहे.

 

 मृतकाच्या नातेवाईकाचा शोध लागावा व अनोळखी इसमाची ओळख पटविण्यास पोलीस नियंत्रण कक्ष, अमरावती शहर दुरध्वनी क्रमांक- 0721-2672001 किंवा मनोहर कोतनाके भम्रणध्वनरी क्र. 8390151927 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन सिटी कोतवाली, अमरावती यांनी केले आहे.

00000

Friday, March 1, 2024

जिल्हा लोकशाही दिन येत्या सोमवारी

 

जिल्हा लोकशाही दिन येत्या सोमवारी

            अमरावती, दि. 1 (जिमाका): जिल्हा लोकशाही दिन महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार जानेवारी महिन्यातील जिल्हा लोकशाही दिन सोमवार, दि. 4 मार्च 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी अहवालासह व्यक्तिश: उपस्थित राहण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी केले आहे.

00000

राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत योजना; आधार व दुरध्वनी क्रमांक बँक खात्याशी 7 मार्चपूर्वी संलग्न करण्याचे आवाहन

 

राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत योजना; आधार व दुरध्वनी क्रमांक बँक खात्याशी 7 मार्चपूर्वी संलग्न करण्याचे आवाहन

       अमरावती, दि. 01 (जिमाका): राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत योजनेंतर्गत मानधन डीबीटी प्रणालीव्दारे अदा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने वृध्द कलावंत व साहित्यीकांनी स्वत:चे आधार क्रमांक, बँक खात्याशी संलग्न असलेल्या दुरध्वनी क्रमांक आपल्या संबंधित पंचायत समितीमध्ये गुरुवार दि. 7 मार्चपर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

          वृध्द कलावंतांनी आपली माहिती विहित मुदतीत पंचायत समितीकडे सादर न केल्यास माहे एप्रिलपासून डीबीटीव्दारे वितरित होणाऱ्या मानधानापासून वंचित राहतील, याची गंर्भीयाने नोंद घ्यावी. आपला आधार क्रमांक अद्यावत करून बँक खाता व दुरध्वनी क्रमांक बँक खात्याशी संलग्न असल्याची खातरजमा करावी. तरी मंजुर वृद्ध साहित्यिक व कलावंत लाभार्थ्यांनी त्वरीत पंचायत समितीकडे संपर्क करून माहिती सादर करावी, असे पत्राव्दारे कळविण्यात आले आहे.

00000

 

 

 

 

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी 14 मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

 महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी

14 मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 1 (जिमाका) : वीरशैव लिंगायत समाजासाठी समाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, समाज संघटनात्मक, आध्यात्मिक प्रबोधन व आर्थिकदृष्ट्या कल्याणासाठी काम करणाऱ्यांना महात्मा बसवेश्वर सामाजिक समाता-शिवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यासाठी नामवंत कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्य क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्ती अथवा संस्थांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यामध्ये व्यक्तीसाठी एक व सामाजिक संस्थेसाठी एक अशा दोन पुरस्कारासाठी  गुरुवार दि. 14 मार्चपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे, अशी माहिती समाज कल्याण सहायक आयुक्त माया केदार यांनी कळविले आहे.

 

महात्मा बसवेश्वर सामाजिक समात-शिवा पुरस्कारासाठी पात्रता व नियमावली दि. 8 मार्च 2019 रोजीच्या शासन निर्णयासह महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर असून त्याचा सांकेतांक क्रमांक 201903082039003522 असा आहे.

 

व्यक्ती पुरस्कारासाठी पात्रता : या पुरस्कारासाठी पुरुषाचे वय 50 वर्ष अथवा त्यापेक्षा जास्त तसेच  स्त्रियांचे वय 40 वर्ष अथवा त्यापेक्षा जास्त असावे. या क्षेत्रात कमीत कमी 10 वर्ष वैयक्तिक किंवा संघटनात्मक कार्य करणाऱ्या व्यक्ती या पुरस्कारास पात्र ठरतील.

सामाजिक संस्थांसाठी पात्रता : या पुरस्कारासाठी संबंधित संस्था पब्लिक चॅरिटेबल व ट्रस्ट व सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट 1960 खाली नोंदणीकृत असावी. स्वयंसेवी संस्थेचे समाजकल्याण क्षेत्रातील सेवा व कार्य दहा वर्षापासून अधिक असावे. तसेच ती संस्था राजकारणापासून अलिप्त असावी. वीरशैव- लिगांयत समाजसेवा आणि समाजाचा विकास या क्षेत्रातील कामाचा विचार करूनच हा पुरस्कार स्वयंसेवी संस्थाना दिला जाईल.

 

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार अर्जाचा नमुना समाज कल्याण सहायक आयुक्त, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलीस आयुक्तालयाच्या मागे, चांदुर रेल्वे रोड, अमरावती येथे विनामुल्य उपलब्ध आहेत. अर्जामध्ये अलीकडच्या काळातील पासपोर्ट साईज छायाचित्र (तीन प्रती), वयाचा दाखला, शैक्षणिक पुरावा, सामाजिक कार्याची माहिती व त्यासंबंधीचे पुरावे, पोलीस विभागाचा चारित्र्य पडताळणी दाखला सर्व तीन प्रतीत असणे आवश्यक आहे. पात्र अर्जदारांनी समाज कल्याण कार्यालयात वेळेत अर्ज सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.

00000

 

धारणी तालुक्यातील विविध विकास कामाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

 









धारणी तालुक्यातील विविध विकास कामाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

          अमरावती, दि. 1 (जिमाका): धारणी तालुक्यातील विविध विकास कामाची पाहणी करण्याकरीता गुरुवार दि. 28 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी तालुका दौऱ्यावर आले होते. यावेळी तालुक्यात सुरु असलेल्या विविध कामाचा आढावा घेऊन अपूर्ण प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी संबंधिताना दिले.

दौऱ्यादरम्यान श्री. कटियार यांनी मौजा बिजूधावडी येथे रोजगार हमी योजनेच्या सीसीटी तसेच डीप सीसीटी कामांना भेट दिली. तसेच कामावर उपस्थित असलेल्या सर्व मजुरांशी चर्चा करुन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. मौजा तितंबा येथे महाराजस्व अभियानांतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत सातबाराचे वाटप करण्यात आले. त्यानंतर त्याच गावात रोजगार हमी योजनेमार्फत सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांची पाहणी करण्यात आली. मौजा धोदरा येथे मत्स्यव्यवसाय विभागामार्फत संचालित मत्स्यपालन केंद्राची पाहणी (धोदरा धरणातील) करण्यात आली. गावांमधील रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या माती धुराबांध कामाला भेट देऊन तेथील मजुरांशी चर्चा केली. त्यानंतर मौजा मानसूधावडी येथील गडगाधरण मध्यम प्रकल्प व 41 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या एमजीपी योजनेला भेट देऊन कामाचा आढावा घेतला.  जिल्हा परिषद शाळा मानसुधावडी येथे भेट देऊन वर्गखोल्यांची पाहणी केली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

धारण तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी दिल्यानंतर श्री. कटियार यांनी अचलपूर तालुक्यातील उपातखेडा येथील जैवविविधता उद्यान व पायविहीर येथील इंटरप्रिटेशन सेंटरला भेट दिली. भेटी दरम्यान येथे  उपस्थित असलेल्या आदिवासी समुदायाच्या समस्या जाणून घेतल्या.

00000

 

 

मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती महाडीबीटी प्रणालीवर कार्यान्वित; ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती महाडीबीटी प्रणालीवर कार्यान्वित; ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 अमरावती, दि. 1 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनूसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक वर्ष 2023-24 पासुन ऑनलाईन महाडीबीटी प्रणालीवर कार्यन्वीत करण्यात आलेली आहे. तरी पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

             इयत्ता नववी व दहावी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती, साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती, इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावी मधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थीनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क या योजना राबविण्यात येतात.

            योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी प्रणालीच्या http://prematric.mahait.org/Login/ या वेब लिंकवर ऑनलाईन अर्ज नोंदणी करावे. महाडीबीटी प्रणालीमध्ये पात्र सर्व अनूसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे 100 टक्के अर्जांची नोंदणी जिल्ह्यातील शासनमान्य शाळेच्या मुख्याध्यापक करावी. महाडीबीटी डॅशबोर्ड नुसार जिल्ह्यातील शासन मान्य 121 शाळांनी नोंदणी केलेली नाही अशा सर्व शाळांनी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करून नमुद योजनांचे अर्ज तात्काळ भरण्यात यावे.

00000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...