Thursday, August 29, 2019

चंदन व औषधी वनस्पती उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा कोट्यावधींच्या प्रलंबीत अनुदानाचा मार्ग मोकळा केला - कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे


केंद्र शासनाकडून चंदन व औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी  मिळणारे कोट्यावधी रूपयांचे अनुदान मागील दोन वर्षांपासून प्रलंबीत राहीले होते. कृषीमंत्रीपदाचा कार्यभार घेतल्यावर या बाबत माहिती मिळताच कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी शेतकऱ्यांना त्वरीत अनुदान वाटपाचे निर्देश दिल्यामुळे हे अनुदान आता लवकरच शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे राज्यातील हजारो औषधी वनस्पती उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मंत्रालयात आज अहमदनगर व अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषीमंत्री डॉ. बोंडे यांना चंदनाची रोपे देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी आमदार प्रभुदास भिलावेकर व वरूडचे सामाजिक कार्यकर्ते बाळू मुरूमकर उपस्थित होते. 

यावेळी कृषीमंत्री डॉ. बोंडे म्हणाले, राज्यात पान पिंपरी, शतावरी यांसारख्या औषधी वनस्पतींची मोठ्या प्रमाणात लागवड होते. तसेच राज्यातील काही भागात चंदनाचे देखील उत्पादन घेतले जाते. यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.  चंदन व औषधी वनस्पतींच्या शेतीसाठी केंद्र शासनाच्या आयुष अभियानांतर्गत प्रति हेक्टरी 58 हजार रूपयांचे अनुदान दिले जाते.  मात्र दोन वर्षांपासून हे अनुदान प्रलंबित राहीले होते. या शेतकऱ्यांना त्वरीत अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून याचा चंदन व औषधी उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना चंदनाची व औषधी वनस्पतींची उत्कृष्ट दर्जाची रोपे देखील उपलब्ध होतील असा विश्वास ही कृषीमंत्री डॉ. बोंडे यांनी यावेळी व्यक्त केला. 
 
अहमदनगर जिल्ह्यतील चंदन व फळझाडे उत्पादक शेतकरी राजेंद्र गाडेकर, पत्रकार विनायक गोळे,  श्री विष्णू दरेकर, अमरावती जिल्हयातील शेतकरी सुभाष थोरात, विजय लांडोळे यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा करून कृषी मंत्री डॉ. बोंडे यांची याबाबत भेट घेतली होती. याबाबत महत्तवपूर्ण निर्णय घेण्यात आल्यामुळे त्यांनी आज कृषीमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

विद्यार्थ्यांमध्ये खिलाडू वृत्ती जागृत करण्यासाठी क्रिडा संकुलाची निर्मिती - पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे

जिल्हा क्रीडा संकुल बांधकामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन


क्रीडा संकुलाच्या निर्मितीसाठी आठ कोटी
राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
अमरावती, दि.29ग्रामीण भागातील मुलांमध्ये विशेषत: आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये कणखरता, निडरता व जिद्द आदी गुण असतात. त्यांच्यातील खेळगुणांना वाव देऊन उत्कृष्ट खेळाडू घडविण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात येत आहे, असे कृषीमंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज सांगितले.
येथील विद्यापीठ परिसरातील जिल्हा क्रीडा संकुल बांधकामाचे भूमीपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते कोनशिलाचे अनावरण करुन करण्यात आले.  त्यावेळी ते बोलत होते. आमदार अरुण अडसळ, आमदार रवि राणा, जि.प.सदस्य संजय गुलाणे, नगरसेविका जाधव, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव,अधिक्षक अभियंता श्रीमती शर्मा यांचेसह क्रीडा विभागाचे अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
 हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा करण्यात येतो, त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन डॉ. बोंडे म्हणाले की, अमरावतीत विभागीय क्रीडा संकुल अस्तिवात आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये खेळवृत्तीला चालना देण्यासाठी जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुलाची निर्मिती होणे आवश्यक आहे. क्रीडा संकुलाच्या निर्मितीतून शहरी व ग्रामीण भागातील खेळाडूंना खेळ साहित्य व आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्यास राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतील. जिल्हा क्रीडा संकुलाच्या निर्मितीसाठी शासनाव्दारे 16 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला असून आठ कोटी रुपयाचा निधी क्रीडा विभागाला देण्यात  आला आहे. त्याचा विनियोग झाल्यावर उर्वरित निधी दिला जाईल.
 ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यातून क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ठ नेतृत्व समोर येण्यासाठी खेलो इंडियाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आर्चरी रेंज निर्माण करण्यासाठी 5 कोटी 61 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आगामी काळात कबड्डी, खो-खो, धर्नुविद्या, लगोरी यासारख्या पारंपारिक खेळांना पुरस्कृत करण्यासोबतच नवीनतम ज्युदो, कराटे, मार्शल आर्ट, सॉफ्टबॉल, व्हॉलीबॉल, फुटबॉल, क्रिकेट सारख्या खेळांना मैदानाची निर्मिती करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
यापुढेही खेलो इंडियाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक खेळाप्रकाराला प्रोत्साहित करण्यात येणार आहे. या अंतर्गत मोर्शीतून कबड्डी, ज्युदोसाठी दर्यापूर, आर्चरीसाठी नांदगावपेठ तर मेळघाटमध्ये ॲथलेटीक्स सारख्या क्रीडाप्रकारचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. येत्या जानेवारी महिन्यात सेमाडोह ते मेळघाट अशी राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचे आयोजनही करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील मुलींना शारीरिक व मानसिकरित्या सक्षम करण्यासाठी स्वयंसिध्दा उपक्रम शाळा-महाविद्यालयातून प्रशिक्षणाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत पाच हजार मुलींनी प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून एक लाख मुलींना कराटे, लाठीकाठी व स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षामध्ये विदर्भातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढविण्यासाठी पाच कोटी रुपये निधी खर्चुन जिल्हा व तालुकास्तरावर अभ्यासिकांचे निर्मिती करण्यात येणार आहे, असेही डॉ. बोंडे यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, प्रत्येकाने  विद्यार्थी दशेत असतांना नियमित अभ्यासासोबतच किमान एक तास मैदानी खेळ खेळणे अत्यंत आवश्यक आहे. मैदानी खेळ खेळल्याने विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, सातत्य व जिद्द यासारखे गुण निर्माण होऊन त्यांचे मानसिक व शारीरिकरीत्या व्यक्तिमत्व विकास होईल. विद्यार्थ्यांनी संगणक, मोबाईलवर ऑनलाईन आभासी खेळ खेळण्यापेक्षा खरोखरचे मैदानी खेळ खेळावे. मुलांनी आभासी दुनियेत न वावरता खरोखरचे जीवनाचे सार जाणून देशावर प्रेम करणारे व्यक्तिमत्व विकास करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यकमात राज्य शासनाव्दारे पुरस्कार प्राप्त क्रीडा मार्गदर्शक डॉ. लक्ष्मीकांत खंडागळे, जलतरणपटू चेतन राऊत, नेटबॉलपटू कु. स्वाती कांडलकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार अरुण अडसळ व आमदार रवि राणा यांचेही समायोचित भाषणे झालीत.
जिल्हा क्रीडा संकुलात नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या विविध क्रीडा सुविधांविषयी  क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख यांनी प्रास्ताविकातून माहिती दिली. यावेळी शाळा- महाविद्यालयातील स्कॉउट गाईडचे व क्रीडा प्रबोधिनीचे विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.
जिल्हा क्रीडा संकुलात निर्माण करण्यात येणाऱ्या सुविधा
संरक्षक भिंत व प्रवेशव्दार, आर्चरी रेंज , जलतरण तलाव, बहुउद्देशीय हॉल, विद्युतीकरण
अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा सुविधा निर्माण करण्यात येणार आहे.



Thursday, August 8, 2019

बनावट खते, कीटकनाशके, बी-बियाणे नियंत्रण कायदा अधिक कडक करणार - कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे




मुंबई, दि 08 : शेतकऱ्यांची फसवणूक थांबविण्यासाठी बनावट खते, कीटकनाशके व बी-बीयाणे नियंत्रण संदर्भातील कायदा अधिक कडक करून त्याचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेते व उत्पादकांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच नमुना तपासणीमध्ये वारंवार बनावट व निकृष्ट दर्जाची खते, कीटकनाशके विक्री करत असल्याचे आढळल्यास गुन्हा दाखल करून परवाने रद्द करण्यात यावेत असे निर्देश देऊन नमुना तपासणी प्रक्रिया अधिक जलद व सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज येथे सांगितले.
मंत्रालयात बनावट खते, कीटकनाशके व बी-बियाणे यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी कायदा अधिक कडक करण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.
नमुना तपासणी प्रक्रिया अधिक जलद व सक्षम
खते व कीटकनाशकांचा पहिला नमुना पंधरा दिवसांमध्ये तपासून अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात येईल. त्याचबरोबर पहील्या नमुना गुणवत्तेनुसार अपात्र ठरल्यास दुसरी नमुना तपासणी व अहवाल प्रक्रिया साठ दिवसांमध्ये पूर्ण करणे बंधनकारक राहील. यांमध्ये दोन्ही नमुना तपासणी प्रक्रियांमध्ये निर्देशित टक्केवारीनुसार गुणवत्तेमध्ये त्रुटी आढळून आल्यास उत्पादन व्यवस्थापक व जबाबदार व्यक्तीवर निरीक्षकाद्वारे (इन्स्पेक्टर) गुन्हा दाखल करण्यात येईल. हा गुन्हा दाखल करण्यासाठी कृषी सहसंचालकांना पंधरा दिवसांच्या आत परवानगी देणे बंधनकारक करण्यात येईल.  नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळांची संख्या वाढविण्यासाठी व तपासणी प्रक्रिया सुलभ व जलद होण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रे तसेच कृषी विद्यापीठांना अधिसूचित करण्याबाबत प्रस्ताव सादर करा, असे निर्देशही कृषीमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.
डॉ.बोंडे म्हणाले, प्रथम गुणवत्ता नमुना तपासणी शुल्क हा कंपनी परवाना नोंदणीवेळी आकारण्यात येणार आहे. खतांच्या व कीटकनाशकांच्या पाकीटावर नमूद केलेल्या व प्रत्यक्षातील वजनामध्ये तफावत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे यावर नियंत्रण मिळविण्यासाठी विक्रेत्यांना इलेक्ट्रॉनिक वजनकाटा ठेवणे सक्तीचे करण्यात येणार आहे. बिगर नोंदणीकृत खते व कीटकनाशकांची विक्री करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात येईल.  शेतकऱ्यांची फसवणूक थांबविण्यासाठी व त्यांना गुणवत्तापूर्ण खते, कीटकनाशके व बी-बियाणे  उपलब्ध करून देण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
या बैठकीस, कृषी आयुक्त सुहास दिवसे, कृषी सहसचिव गणेश पाटील, गुणवत्ता नियंत्रण विभागाचे संचालक श्री घावटे, तसेच कृषी विभागाचे वरिष्ट अधिकारी उपस्थित होते
00000

Saturday, July 27, 2019

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना कार्यशाळा अधिकाधिक शेतकरी उत्पादक कंपन्या व बचत गटांचा समावेश करावा -जिल्हाधिकारी शैलेश नवाल



अमरावती, दि. २७ : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेची अंमलबजावणी अधिक परिणामकारकपणे होणे आवश्यक आहे. योजनेत अधिकाधिक शेतकरी उत्पादक कंपन्या व महिला बचत गटाचा समावेश करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काल येथे दिले. 
जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवनात आयोजित पोकरा कार्यशाळेत ते बोलत होते. जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी अनिल इंगळे यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 
श्री. नवाल म्हणाले की, पोकराची अंमलबजावणी भरीव पणे होण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला बचत गट यांना अधिक प्रोत्साहन द्यावे. अवजारे, शेड, रेफर वाहन, प्राथमिक प्रक्रिया एकत्रिकरण केंद्र, गोदामे, स्वच्छता प्रतवारी गृह आदींसाठी अनुदान  उपलब्ध करून द्यावे. त्यासाठी बचत गट, शेतकरी कंपन्या यांना प्रोत्साहित करावे. महिला आर्थिक विकास महामंडळ, जीवनोन्नती अभियान याद्वारे ग्रामविकासाच्या दृष्टीने कृषी पूरक उद्योग व व्यवसाय वाढविण्याचा प्रयत्न व्हावा. 
यावेळी उपस्थित मार्गदर्शक तज्ज्ञांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
यावेळी जीवनोन्नती अभियान, महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यासह कृषी विभागाचे अनेक अधिकारी  व कर्मचारी उपस्थित होते. 


प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांनी तत्काळ संपर्क साधावा - जिल्हाधिकारी शैलेश नवाल



            अमरावती, दि. २७ : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान योजना) योजनेत पात्र लाभार्थ्यांची यादी जिल्हा सूचना विज्ञान केंद्राच्या (nic) संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून, योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. अद्यापही लाभ  न मिळालेल्या पात्र लाभार्थ्यांनी तत्काळ तलाठी, कृषी सहायक यांच्याशी आवश्यक कागदपत्रांसह संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची व्याप्ती वाढली असून अनेक शेतकरी बांधवांना त्यामुळे लाभ मिळणार  आहे. पात्र लाभार्थ्यांची यादी गावात ही प्रसिध्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी केले आहे. योजनेच्या कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल व कृषी प्रशासनाला दिले आहेत.
          शेतकऱ्यांना थेट मदत व्हावी यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना देशभरात राबविण्यात येत असून योजने अंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये प्रमाणे तीन टप्प्यात जमा करण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळावा यासाठी कृषी विभागाने व महसूल, तसेच ग्रामविकास प्रशासनाने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करुन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न होत आहेत.  योजनेच्या माध्यमातून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ व्हावा यासाठी दोन हेक्टर शेतीची मर्यादा रद्द करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व यंत्रणांनी कार्य करावे. जिल्ह्यात असणाऱ्या एकूण पात्र शेतकऱ्यांपैकी एकही शेतकरी सुटू नये यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 
पात्र शेतकरी बांधवांनी तात्काळ आपल्या गावातील तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधून आधारकार्ड, बँक पासबुक प्रत आदी आवश्यक कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन श्री. नवाल यांनी केले आहे. 

00000

जिल्हा नियोजनच्या नाविण्यपूर्णमधून महिलांचा विकास करणार - पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे







अमरावती, दि. 27 : महिलांचा विकास झाल्यास देशाचा विकास होतो. त्यामुळे महिलांच्या विकासासाठी जिल्हा नियोजन व विकास निधीमधील नाविन्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करुन देऊ. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिलांचा विकास करणारे उपक्रम राबविण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली. 
वरूड येथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने आज वार्षिक सर्वसाधारण सभा आणि महिला मेळावा घेण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य अंजली तूमराम, सरपंच स्वाती आंडे,उपविभागीय कृषी अधिकारी राहूल सातपूते, तालुका कृषी अधिकारी अजय यादवकर, जिल्हा समन्वयक खुशाल राठोड, डॉ. वसूधा बोंडे आदी उपस्थित होते.
डॉ. बोंडे म्हणाले, माविमच्या माध्यमातून महिलांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे काम करण्यात येत आहे. महिलांची आर्थिक प्रगती होण्यासाठी त्यांना माफक दरात कर्ज पूरवठा करण्यात येत आहे. महिलांवर दाखविलेला विश्वास महिलांनी कर्ज पूर्ण परतफेड करुन खरा करून दाखविला आहे. महिलांच्या या प्रतिसादामुळे वरूड येथे कापडी पिशवी बनविण्याचा कारखाना सुरू करण्यात येत आहे. या ठिकाणी दोनशे महिलांना रोजगार मिळणार आहे.
बचत गटांनी केवळ उत्पादनावर लक्ष केंद्रीत न करता विक्रीवरही लक्ष केंद्रीत करावे. आज बाजारपेठेत माल विकणे ही एक कला असल्याने काही गटांनी यासाठी पुढाकार घ्यावा. आज विविध क्षेत्र बचत गटांसाठी उपलब्ध झाले आहे. गटांनी निंबोळी अर्क, जैविक खत आदी क्षेत्रातही कार्य करावे. यासाठी संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असेही डॉ. बोंडे म्हणाले. 
सुरवातीला मॉ जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बचत गटांचा सत्कार करण्यात आला. खुशाल राठोड यांनी सवित्तर मार्गदर्शन केले.
00000

जिल्हा नियोजनच्या नाविण्यपूर्णमधून महिलांचा विकास करणार - पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे












अमरावती, दि. 27 : महिलांचा विकास झाल्यास देशाचा विकास होतो. त्यामुळे महिलांच्या विकासासाठी जिल्हा नियोजन व विकास निधीमधील नाविन्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करुन देऊ. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिलांचा विकास करणारे उपक्रम राबविण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली. 
वरूड येथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने आज वार्षिक सर्वसाधारण सभा आणि महिला मेळावा घेण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य अंजली तूमराम, सरपंच स्वाती आंडे,उपविभागीय कृषी अधिकारी राहूल सातपूते, तालुका कृषी अधिकारी अजय यादवकर, जिल्हा समन्वयक खुशाल राठोड, डॉ. वसूधा बोंडे आदी उपस्थित होते.
डॉ. बोंडे म्हणाले, माविमच्या माध्यमातून महिलांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे काम करण्यात येत आहे. महिलांची आर्थिक प्रगती होण्यासाठी त्यांना माफक दरात कर्ज पूरवठा करण्यात येत आहे. महिलांवर दाखविलेला विश्वास महिलांनी कर्ज पूर्ण परतफेड करुन खरा करून दाखविला आहे. महिलांच्या या प्रतिसादामुळे वरूड येथे कापडी पिशवी बनविण्याचा कारखाना सुरू करण्यात येत आहे. या ठिकाणी दोनशे महिलांना रोजगार मिळणार आहे.
बचत गटांनी केवळ उत्पादनावर लक्ष केंद्रीत न करता विक्रीवरही लक्ष केंद्रीत करावे. आज बाजारपेठेत माल विकणे ही एक कला असल्याने काही गटांनी यासाठी पुढाकार घ्यावा. आज विविध क्षेत्र बचत गटांसाठी उपलब्ध झाले आहे. गटांनी निंबोळी अर्क, जैविक खत आदी क्षेत्रातही कार्य करावे. यासाठी संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असेही डॉ. बोंडे म्हणाले. 
सुरवातीला मॉ जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बचत गटांचा सत्कार करण्यात आला. खुशाल राठोड यांनी सवित्तर मार्गदर्शन केले.
00000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...