Official Blogger Account of District Information Office, Amravati DGIPR, Government of Maharashtra
Tuesday, November 24, 2020
शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२०आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
कोरोना प्रतिबंधक उपाययोजना
नियमभंग करणा-यांवर भरारी पथकांची करडी नजर
'हॉटेल महफिल इन'ला साडेतीन लाखांचा दंड
अमरावती, दि. 27 : कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात संचारबंदी आदेशाद्वारे लग्नाव्यतिरिक्त इतर सभा-समारंभांना प्रतिबंध केलेला असतानाही येथील एका हॉटेलमध्ये गर्दीत सभा झाल्याचे आचारसंहिता भरारी पथकाला निदर्शनास आल्यावरून या हॉटेलला साडेतीन लाख रूपये दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे.
आचारसंहिता भरारी पथकाच्या अहवालावरून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ही नोटीस जारी केली. संचारबंदी आदेशानुसार लग्नसमारंभाव्यतिरिक्त इतर कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही. तथापि, हॉटेल महफिल इन येथे 700 व्यक्तींच्या उपस्थितीत सभा झाल्याचे आचारसंहिता भरारी पथकाला निदर्शनास आले.
प्रतिबंध असतानाही अशी सभा किंवा समारंभ आयोजित केल्याचे प्रथम आढळल्यास प्रतिव्यक्ती पाचशे रूपये दंडाची तरतूद आहे. या सभेला 700 व्यक्ती उपस्थित असल्याचे निदर्शनास आल्याने साडेतीन लाख रूपये दंडाची नोटीस हॉटेल संचालकाला बजावण्यात आली आहे.
आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५ चे कलम ५१ ते ६०, भारतीय साथरोग अधिनियम १८९७, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४, भारतीय दंडसंहिता १८६० चे कलम १८८ व इतर संबंधित कायदे व नियमअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. ही दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी महापालिका आयुक्तांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
या दंडाच्या रकमेचा भरणा सात दिवसाच्या आत करून घेऊन तसा अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, यापुढे असे झाल्याचे आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा हॉटेलचालकाला देण्यात आला आहे.
०००
धार्मिक स्थळे खुली मात्र, यात्रा महोत्सव, समारंभ, मिरवणूकांना प्रतिबंध कायम - जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडून आदेश जारी
कोरोना प्रतिबंधक उपाययोजना
धार्मिक स्थळे खुली मात्र, यात्रा महोत्सव, समारंभ, मिरवणूकांना प्रतिबंध कायम
- जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडून आदेश जारी
अमरावती, दि. २४ : कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेत जिल्ह्यात ३० नोव्हेंबरपर्यंत संचारबंदी यापूर्वीच लागू करण्यात आली आहे. दरम्यान, प्रतिबंधित क्षेत्रे वगळता इतर ठिकाणची धार्मिक स्थळे, पूजास्थाने खुली करण्यात आली असली तरी गर्दी टाळण्यासाठी यात्रा, महोत्सव यांना प्रतिबंध कायम असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी स्पष्ट केले आहे. तसा आदेशही जिल्हाधिका-यांनी जारी केला.
गर्दीतून संक्रमण होऊन कोरोनाबाधितांची संख्या वाढू नये यासाठी यात्रा, महोत्सव, मिरवणूका व समारंभांना प्रतिबंध करणारा आदेश जारी करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात धार्मिक स्वरूपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, स्नेहसंमेलने, महोत्सव आयोजित करता येणार नाहीत. संचारबंदी आदेशानुसार पाच किंवा अधिक लोकांनी एकत्र जमू नये, असा आदेश कायम आहे व तसे आढळल्यास किमान पोलीस उपनिरीक्षक दर्जाहून कमी नसलेल्या अधिका-यास कारवाईसाठी प्राधिकृत करण्यात आले आहे.
यात्रा, उत्सव, महोत्सव, स्नेहसंमेलने, सामूहिक कार्यक्रम यामुळे मोठी गर्दी होऊन विषाणूचे संक्रमण होऊ शकते. त्यामुळे हा आदेश जारी करण्यात आला आहे. गर्दी टाळण्यासाठी दक्षता नियमांचे पालन न करणा-यांवर कठोर कारवाईचे निर्देश जिल्हाधिकारी श्री.नवाल यांनी दिले आहेत.
०००
Monday, November 23, 2020
कोरोनाला रोखण्यासाठी त्रिसूत्रीचे पालन हाच पर्याय
कोरोनाला
रोखण्यासाठी त्रिसूत्रीचे पालन हाच पर्याय
स्वयंशिस्त
पाळा; अन्यथा दुस-या लाटेचा धोका
- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
नियम न पाळणाऱ्यावर
दंडात्मक कार्यवाही
अमरावती, दि. 23 : कोरोना महामारीची दुसरी लाट येण्याची शक्यता
जागतिक आरोग्य संघटनेकडून वर्तवली जात आहे. हा इशारा गांभीर्याने घेण्याची वेळ
असून, नागरिकांनी स्वयंशिस्त पाळत त्रिसूत्रीचे पालन न केल्यास दुसरी लाट येऊ
शकते. आपण आताही धोक्याच्या वळणावर आहोत. दुसरी लाट ही त्सुनामी ठरेल. त्यामुळे
प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळलीच पाहिजे, असे कळकळीचे आवाहन राज्याच्या महिला व
बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले.
माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिम व सातत्यपूर्ण सर्वेक्षणामुळे, संपर्कामुळे
कोरोनाबाधितांची संख्या बरीचशी
कमी झाली. मात्र,
दुसऱ्या लाटेचा धोका अजूनही आहे. त्यामुळे निर्धास्त होऊन चालणार नाही. दुसरी लाट
आली तर तो अनर्थ ठरेल. मार्चपासून वैद्यकीय यंत्रणा सतत जोखीम स्वीकारून कार्यरत
आहे. त्यांच्यावर आणखी ताण वाढू नये. त्या पुढे म्हणाल्या की, जिल्ह्यात कोरोनाची
रुग्णसंख्या रोडावली असली तरी आपण सगळे धोक्याच्या वळणावर असून आताही धोका कायम
आहे. यावर उपाय एकच की, सर्वांनी स्वयंशिस्त पाळून मास्क लावणे, हात धुणे, आणि
सुरक्षित अंतर ठेवणे ही त्रिसूत्री पाळणे खूप गरजेचे आहे. जिल्ह्यात नववी ते
बारावीच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रतिबंधात्मक
उपाययोजना करण्यासाठी कार्यपद्धती ठरवून देण्यात आली आहे.
दंडात्मक कारवाईचे निर्देश
जिल्ह्यामध्ये काही
नागरिक सार्वजनिक ठिकाणी शिस्तिचे पालन करीत नसल्याचे दिसत आहे. सर्वांना
स्वंयशिस्तीची सवय लागावी म्हणून जिल्ह्यात आता सार्वजनिक स्थळी थुंकणे, मास्क न
वापरणे, सामाजिक अंतर न पाळणाऱ्यांना दंडाची रक्कम वाढविण्यात आली असून अशा
व्यक्तींना पाचशे रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. स्वच्छता व सार्वजनिक शिस्तिचे
पालन न करण्याचे आढळून आल्यास संबंधित व्यक्तींवर प्रथम वेळेस पाचशे रुपये दंड तर
दुसऱ्यांना आढळून आल्यास फौजदारी कार्यवाही करण्यात येणार आहे. दुकानदार,
फळभाजीपाला विक्रेते तसेच सर्व जीवनावश्यक वस्तू विक्रेते व ग्राहकांनी सोशल
डिस्टन्सिंग न पाळल्यास (दोन ग्राहकांमध्ये तीन फूटचे अंतर न राखणे व
विक्रेत्यांनी मार्किंग न करणे), ग्राहकाला तीनशे रुपये तर संबंधित दुकानदार,
विक्रेताला तीन हजार रुपये दंड प्रथम वेळेस तर दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी
कार्यवाही करण्यात येईल. तसेच किराणा विक्रेत्यांनी वस्तुंचे दरपत्रक दर्शनी भागात
न लावल्यास तीन हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. उपरोक्त प्रतिबंधात्मक
आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी तसेच दंडात्मक कार्यवाही करण्यासाठी
संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व शासकीय विभागांना जिल्हा प्रशासनाकडून
निर्देशित करण्यात आले आहे, असेही श्रीमती ठाकूर यांनी यांनी सांगितले.
00000
Saturday, November 21, 2020
जिल्ह्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यास परवानगी
जिल्ह्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यास परवानगी
Friday, November 20, 2020
नियोजनभवनात मतदान अधिकारी- कर्मचारी प्रशिक्षण प्रत्येक बाबीचे गांभीर्य जाणून कार्यवाही करावी - मास्टर ट्रेनर नरेंद्र फुलझेले
नियोजनभवनात मतदान
अधिकारी- कर्मचारी प्रशिक्षण
प्रत्येक बाबीचे
गांभीर्य जाणून कार्यवाही करावी
- मास्टर ट्रेनर नरेंद्र
फुलझेले
- प्रशिक्षणानंतर झाली
अधिकारी-कर्मचा-यांची आरटीपीसीआर चाचणी
- प्रत्येक मतदान केंद्रावर असेल विलगीकरण कक्ष
अमरावती, दि. 20 : कोरोना प्रादुर्भाव
लक्षात घेऊन शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची मतदान प्रक्रिया अधिक काळजीपूर्वक पार
पाडावयाची असून, निवडणुकीचे पावित्र्यही जपणे आवश्यक आहे. त्यामुळे मतदान
केंद्राध्यक्ष, मतदान अधिका-यांनी प्रत्येक बाबीचे गांभीर्य जाणून घेऊन कार्यवाही
करण्याची सूचना विभागाच्या निवडणूक यंत्रणेचे मास्टर ट्रेनर तथा उपविभागीय अधिकारी
नरेंद्र फुलझेले यांनी आज येथे केली.
अमरावती विभाग शिक्षक
मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी,
मायक्रो ऑब्झर्व्हर अशा एकूण 144 अधिकारी- कर्मचारी यांचे प्रशिक्षण नियोजनभवनात
आज झाले, त्यावेळी ते बोलत होते. उपविभागीय अधिकारी श्यामकांत म्हस्के, उपजिल्हा
निवडणूक अधिकारी वर्षा पवार यांच्यासह मतदान अधिकारी यावेळी उपस्थित होते. कोरोना
प्रतिबंधक उपाययोजना म्हणून यावेळी सर्व अधिकारी व कर्मचा-यांची आरटीपीसीआर चाचणी
करण्यात आली. ही चाचणी करणे मतदान प्रतिनिधींनाही आवश्यक करण्यात आले आहे.
यावेळी मास्टर ट्रेनर
श्री. फुलझेले व श्री. म्हस्के यांनी निवडणूकीच्या अनुषंगाने विविध नियम व बाबींची
माहिती सहभागींना दिली. मतपेटीची हाताळणी, मतपत्रिकेचे स्वरूप, मतदान केंद्रांवरील सुविधा
यासह मतदान प्रक्रियेतील प्रत्येक बाबींचे बारीकसारीक तपशीलासह प्रशिक्षण यावेळी
देण्यात आले.
मतदान प्रक्रिया पार
पाडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांची आहे.
त्यामुळे प्रक्रियेबाबत सबंध तपशील समजून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व तालमींना
हजर राहावे. प्रत्येक शंकेचे निरसन करून घ्यावे. मतपेट्या उघडणे, बंद करणे याचाही
सराव करावा. मतदान साहित्य 30 नोव्हेंबरला रवाना होणार केंद्रावरही पोहोचणार आहे.
केंद्रांवर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, पोलीस कर्मचारी यांनी मुक्कामी
राहावे. कोणीही घरी जाऊ नये. केंद्रावर पुरूष व महिलांसाठी स्वतंत्र रांगा
असाव्यात. सोशल डिस्टन्स राखण्यासाठी पुरेशी जागा असावी. मतदारांना आत येण्यासाठी व
बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग असावेत. केंद्रात पुरेसा उजेड असावा, आदी सूचना
श्री. फुलझेले यांनी केल्या.
मतदान केंद्रावर
स्वतंत्र विलगीकरण कक्ष
मास्क असल्याशिवाय
कुणाला प्रवेश देऊ नये. कोरोनाबाधित किंवा
विलगीकरणात असलेल्या मतदारांना पोस्टल मतपत्रिकेची सुविधा देण्यात येणार आहे.
मात्र, केंद्रावर आलेल्या एखाद्या मतदाराला ताप आदी लक्षणे आढळल्यास त्यांना टोकन
देऊन दुपारी 4 वाजता मतदान केंद्रावर येण्याचे सूचित करावे. दरम्यान, त्याच दिवशी
कुणी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना पीपीई कीट देण्यात यावी.
लक्षणे आढळलेल्या व
बाधित असलेल्या मतदारांसाठी केंद्रावर स्वतंत्रपणे बसण्यासाठी विलगीकरण कक्षाची
सुविधा असावी.
मतदाराची ओळख पटावी
यासाठी त्याला मास्क थोडावेळ हटवता येईल. मात्र, हा कालावधी अत्यंत कमी म्हणजेच
पाच सेकंदाइतका असावा. संपूर्ण खबरदारी घेऊन ही प्रक्रिया पार पाडावी. प्रत्येक मतदान
केंद्रावर थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर आदी सुविधा ठेवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.
मतपत्रिकेचा रंग
गुलाबी, जांभळ्या पेनाने नोंद
मतपत्रिकेचा रंग गुलाबी
असेल, तसेच ती इंग्रजी व मराठी भाषेत असेल. केंद्रासाठी मतदार यादी तीन प्रतीत
असेल. त्यातील एक चिन्हांकित असेल. जांभळ्या शाईचा विशेष पेन पुरवला जाईल. त्यानेच
नोंदी होणे आवश्यक आहे. चुकूनही कुणीही इतर पेन वापरू नये. तसे झाल्यास
फेरमतदानाची व कर्मचा-यावर निलंबनाची वेळ येऊ शकते. अशी एक घटना यापूर्वी घडल्याची
माहिती मास्टर ट्रेनर म्हस्के यांनी दिली.
डमीवर कॅन्सलचा शिक्का
मारू नका
डमी मतपत्रिकेवर डमी
असल्याचा स्पष्ट उल्लेख असतो. त्यामुळे या पत्रिकेवर कॅन्सलचा शिक्का मारण्याची
गरज नाही. त्यामुळे आक्षेप येऊ शकतात. याबाबत खबरदारी घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी
केली.
मतदान पथकातील सर्व
अधिकारी कर्मचा-यांनी केंद्रापर्यंत जाण्या-येण्याचा रस्ता, पथकातील सदस्यांचे
मोबाईल नंबर, आपल्या मतदान केंद्राचे विभेदक चिन्ह आदींबाबत सुस्पष्ट जाणून घेणे
आवश्यक आहे. लाख कांडी, कापडी पिशवी, लोखंडी पट्टी, फॉर्म 19 चा गठ्ठा,
उमेदवार व त्यांचे मतदान प्रतिनिधी यांची नमुना स्वाक्षरी, जांभळ्या शाईचा विशेष
पेन आदी साहित्य काळजीपूर्वक केंद्रावर नेणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
00000
Thursday, November 19, 2020
दिव्यांग, कोविडबाधितांसाठी टपाली मतपत्रिकेची सुविधा
दिव्यांग, कोविडबाधितांसाठी टपाली मतपत्रिकेची सुविधा
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक
जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क करावा
महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दिव्यांग व्यक्ती आणि कोविडबाधित मतदारांसाठी टपाली मतपत्रिकेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, यासाठी दि. 22 नोव्हेंबर पूर्वी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार यांनी दिली.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी दि. 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. यातील दिव्यांग व्यक्ती आणि कोविडबाधित मतदार आपले मत टपाली मतदानाने नोंदवू शकतील. टपाली मतपत्रिका मिळण्यासाठीचा नमूना 12 डी दि. 22 नोव्हेंबर पर्यंत कार्यालयीन वेळेत संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात देणे आवश्यक आहे. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यामधील संबंधित मतदारांस मत नोंदविता यावे, यासाठी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांना नमूना 12 डी मिळण्याची सुविधा करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक
अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...
-
पालकमंत्र्यांनी घेतला जिल्हा नियोजन समितीचा आढावा; 679 कोटी मंजूर निधीच्या कामांचे प्रस्ताव तात्काळ सादर करा - पालकमंत्री चंद...
-
महसूल दिनी एक लाख वृक्षारोपण होणार *आजपासून महसूल सप्ताहाचे आयोजन; विविध कार्यक्रमांची रेलचेल अमरावती, दि. ३१ : महसूल दिनाच्या निमित्ताने १ ...
-
खरीप पीक कर्जवितरणाला गती देण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश कर्जवितरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करा - पालकमंत...








