Sunday, November 14, 2021

पालकमंत्र्यांची शहरात विविध ठिकाणी भेट विविध परिसरातील नागरिकांशी साधला संवाद

 









पालकमंत्र्यांची शहरात विविध ठिकाणी भेट

विविध परिसरातील नागरिकांशी साधला संवाद

अमरावती, दि. 14 : पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज शहरात विविध ठिकाणी भेट देऊन स्वत: पायी फिरून परिस्थितीची पाहणी केली व तेथील नागरिकांशी संवाद साधून एकोप्याचे आवाहन केले.  

          शहरातील अनुचित घटनांच्या अनुषंगाने शहरात लागू संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी आज सायंकाळी शहरातील विविध भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी विविध नागरिकांशी संवाद साधला. शहरात सर्वत्र शांतता असून, परिस्थिती सुरळीत होत आहे. जनजीवन पूर्वपदावर येत असून, नागरिकांनी असाच एकोपा कायम राखण्याचे आवाहन त्यांनी केले.

          जि. प. अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, माजी राज्यमंत्री सुनील देशमुख, माजी महापौर विलास इंगोले, महापालिकेचे विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, मिलिंद चिमोटे, जयंतराव देशमुख, हरिभाऊ मोहोड आदी यावेळी उपस्थित होते.

          यावेळी पालकमंत्र्यांनी महेंद्र कॉलनी, बजरंग टेकडी, अल हिलाल कॉलनी, पठाण चौक, खोलापुरीगेट, हनुमाननगर, सोमेश्वर चौक, सराफा, साबणपुरा, राजकमल चौक आदी विविध परिसराला भेट दिली. तेथील नागरिकांशी संवाद साधला. शहरात शांतता प्रस्थापित होत असून विविध भागातील नागरिकांचे मोठे सहकार्य मिळत आहे. जनजीवन पूर्वपदावर येत असून, अमरावतीत सलोख्याचे वातावरण निर्माण होत आहे. प्रशासन, पोलीस, विविध क्षेत्रातील मान्यवर सर्वजण एकजुटीने शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी योगदान देत आहेत, असा सांगून पालकमंत्र्यांनी विविध भागातील नागरिकांना दिलासा दिला.

          यावेळी पालकमंत्र्यांनी कायदे व सुव्यवस्थेसाठी विविध ठिकाणी तैनात असलेल्या पोलीस दलांच्या जवानांशीही संवाद साधला.

00000

 

 

 

Friday, November 12, 2021

निम्न पेढी पुनर्वसितांना सानुग्रह अनुदानाचा मार्ग मोकळा जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचा पाठपुरावा

                      



        निम्न पेढी पुनर्वसितांना सानुग्रह अनुदानाचा मार्ग मोकळा

जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचा पाठपुरावा

 


        अमरावती, दि. 12 : निम्न पेढी प्रकल्पांतर्गत पुनर्वसितांचे प्रलंबित अनुदान मिळण्यासाठी जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. पुनर्वसितांसाठीचे निर्धारित अनुदान तत्काळ मिळणार असून, त्यामुळे अनेक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


              विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत निम्न पेढी प्रकल्पात भातकुली तालुक्यातील प्रकल्पबाधित अळणगाव, कुंड खुर्द, कुंड सर्जापूर, गोपगव्हाण व हातुर्णा येथील बेघर प्रकल्पग्रस्तांसाठी भूखंडवाटप करण्यात आले आहे. त्यांचे काळ्या मातीतील पायवा बांधकामाकरिता प्रत्येक कुटूंबासाठीता एक लक्ष रूपये याप्रमाणे रू.४९ लक्ष सानुग्रह अनुदान देण्याचे निर्देश नियामक मंडळाला देण्यात आले आहेत. निम्न पेढी प्रकल्पबाधितांना प्रलंबित अनुदानाची मागणी लक्षात घेऊन जलसंपदा राज्यमंत्री श्री. कडू यांनी पाठपुरावा केला. त्यानुसार अनुदानाचा मार्ग मोकळा झाला. 
त्याचप्रमाणे, अचलपूर तालुक्यातील वासनी मध्यम प्रकल्प या योजनेतंर्गत पुनर्वसनामध्ये प्रस्तावित नविन गावांना ६ ते ७ फुट खोलीपर्यंत काळी माती असल्यामुळे पायवा बांधकामाचा अतिरिक्त खर्च म्हणून प्रति खातेदार रू एक लक्ष या प्रमाणे ७.१४ कोटी रकमेचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णयही झाला आहे. या निर्णयामुळे लवकरच प्रकल्पग्रस्तांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

अकोट (अकोला) येतील शहापूर बृहत लघु प्रकल्पाच्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार अडीचशे कोटी रुपये किंमतीच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.

000

मतदार यादीच्या पुनरीक्षणात शनिवार व रविवारी विशेष शिबिर जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा - जिल्हा निवडणूक अधिकारी पवनीत कौर

 



मतदार यादीच्या पुनरीक्षणात शनिवार व रविवारी विशेष शिबिर

जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा

-         जिल्हा निवडणूक अधिकारी पवनीत कौर

-          

अमरावती, दि. 12 : मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत असून, त्यात विशेष शिबिराचे आयोजन दि. 13 व 14 नोव्हेंबरला (शनिवार व रविवार) करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने दि. 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. आयोगाच्या निर्देशानुसार दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत मतदार नोंदणी संदर्भात विशेष मोहिमांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार प्रथम 13 व 14 नोव्हेंबरला  आणि त्यानंतर 27 व 28 नोव्हेंबरला विशेष शिबिरे होतील.

सर्व केंद्रांवर ‘बीएलओ’ असतील

 मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिराच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.  या मतदान केंद्रावर शिबिरांच्या दिवशी मतदार नोंदणी, नावात बदल, पत्त्यांत बदल, नाव कमी करणे आदी मतदार नोंदींसंबंधी कामांची सुविधा उपलब्ध असतील. छायाचित्रासह मतदार यादी अद्ययावत होण्यासाठी संबंधित सर्वांनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीमती कौर यांनी केले आहे.

00000

 

 

 

 

Wednesday, November 10, 2021

अभिनव संकल्पनांचा वापर करून उपक्रम राबवा - निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल

 






आझादी का अमृत महोत्सव

 अभिनव संकल्पनांचा वापर करून उपक्रम राबवा

-          निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल

अमरावती, दि. 10 : आझादी का अमृत महोत्सव उपक्रमात पुढील काळात विविध कार्यक्रम आयोजित करावयाचे असून, अभिनव संकल्पनांचा वापर करून हा उपक्रम राबवावा, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी येथे दिले.

 

महोत्सवात कार्यक्रमाच्या आखणीबाबत चर्चा आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

श्री. बिजवल म्हणाले की, महोत्सवात निर्धारित लोगोचा वापर सर्वांनी पत्रव्यवहारात करावा. सर्व कार्यालयांनी आपल्या नियोजनाचा प्रस्ताव सादर करावा. स्वातंत्र्यचळवळीच्या अनुषंगाने जिल्ह्याशी संबंधित घटनास्थळे, इतिहास आदींचे दर्शन घडविणारे कार्यक्रम आयोजित करावेत. अशा कार्यक्रमांतून इतिहासाचे स्फूर्तीदायक दर्शन घडविताना त्याचे आयोजन कल्पक पद्धतीने करावे. देशभक्तीपर गीतांच्या सुरावटी सादर करण्यासाठी पोलीस बँड पथकाचा समावेश प्रत्येक कार्यक्रमात करावा.  महोत्सवाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा, तालुका, महानगर, शहर व गाव स्तरावर समित्या गठित कराव्यात. सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

 

000

लसीकरणाची गती वाढवा; ‘मिशनमोड’वर कामे करा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचे निर्देश














 दिवसाला 50 हजार लसीकरणाचे उद्दिष्ट

 लसीकरणाची गती वाढवा; ‘मिशनमोड’वर कामे करा

 जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचे निर्देश

 

अमरावती, दि. 10 : पुढचे 20 दिवस लसीकरण हे सर्वोच्च प्राधान्य मानून मोहिम स्तरावर काम करावेअसे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे दिले.

 

जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी बैठक बचतभवनात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडामहापालिका आयुक्त प्रशांत रोडे, सहायक जिल्हाधिकारी मंदार पत्की, धारणी प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल आदी यावेळी उपस्थित होते.  

 जिल्हाधिकारी श्रीमती कौर म्हणाल्या की, काही देशांत कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. सिंगापूर येथे लॉकडाऊन आहे. त्यामुळे संभाव्य तिसरी लाट टाळण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. जिल्ह्यात दिवसाला 50 हजार व्यक्तींचे लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. काही अडचणी असतील तर जिल्हा प्रशासनाला तत्काळ कळवा. उपविभागीय अधिका-यांनी स्वत: या कामांचे संनियंत्रण करावे. या मोहिमेत गावोगाव प्रभावी जनजागृती करावी. लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, सर्व विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था या सर्वांना सहभागी करून घ्यावे. सर्व विभागांनी आपल्या कर्मचा-यांकडूनही दोन मात्रेचे लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र घ्यावे. हे कंत्राटी कर्मचा-यांनाही लागू आहे. रोजगार हमी कामावरही शिबिरे घ्यावीत, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

                                           पीएचसीनिहाय रिव्ह्यू घ्या                        

ज्यांचे अद्यापही दुसऱ्या मात्रेचे लसीकरण झाले नाहीत्यांचे लसीकरण पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. आवश्यकतेनुसार मोबाईल लसीकरण वाहन सुरू करा. अचलपूरनांदगाव खंडेश्वर येथे लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. चिखलदराधारणीतही प्रमाण कमी आहे. त्यामुळे गावनिहाय प्रभावी जनजागृती करावी लागेल.

लसीकरणाच्या कामांचा प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय आढावा घ्यावा. मोहिमेतील कामांबाबत 15 नोव्हेंबरला पुन्हा आढावा घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 100 टक्के लसीकरण केलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधींचा सत्कार यावेळी करण्यात आला.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमलेडॉ. विनोद करंजीकर यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

                                            000




Monday, November 8, 2021

फ्रेजरपुरा येथे लसिकरण शिबीराचे आयोजन जिल्‍हाधिकारी पवनीत कौर व मनपा आयुक्‍त प्रशांत रोडे यांची लसिकरण शिबीराला भेट











फ्रेजरपुरा येथे लसिकरण शिबीराचे आयोजन

जिल्‍हाधिकारी पवनीत कौर व मनपा आयुक्‍त प्रशांत रोडे यांची लसिकरण शिबीराला भेट

 

फ्रेजरपुरा बडी नगीना मज्‍जीद शादीखाना येथे कोविड १९  लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात १८ वर्षावरील नागरिकांनी लसिकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्‍यात आले होते त्‍याला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी फ्रेजरपुरा येथे मा.जिल्‍हाधिकारी पवनीत कौर व महानगरपालिका आयुक्‍त प्रशांत रोडे यांनी या शिबीराला प्रत्‍यक्ष भेट दिली.

 

मा.जिल्‍हाधिकारी पवनीत कौर व मनपा आयुक्‍त प्रशांत रोडे यांनी यावेळी सर्व उपस्थित नागरीकांना लसिकरणासाठी शुभेच्‍छा दिल्‍या. महानगरपालिकेच्‍या या लसिकरण केंद्रावरील कर्मचारी प्रामाणिकपणे आपले कर्तव्‍य बजावतांना आढळून आल्‍याबद्दल जिल्‍हाधिकारी पवनीत कौर व मनपा आयुक्‍त प्रशांत रोडे यांनी यावेळी त्‍यांचे विशेष कौतुक केले. नागरीकांसोबत संवाद साधतांना त्‍यांनी आपली काळजी घेण्‍याच्‍या सुचना दिल्‍या. या ठिकाणी पहिला डोज असणा-या महिला मोठ्या प्रमाणात होत्‍या. आशा वर्कर व समाजसेवक यांनी नागरिकांना डोज घेण्‍यासाठी प्रोत्‍साहित केल्‍यामुळे या ठिकाणी मोठा प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी कोणतीही भिती न बाळगता लस घ्‍यावी असे आवाहनही यावेळी त्‍यांनी केले.       

 

        लसीकरण मोहीम सुरु करण्‍यात आली असून नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घ्‍यावा असे आवाहन जिल्‍हाधिकारी पवनीत कौर यांनी केले.

 

यावेळी नागरिकांनी लस घेवून या लसिकरण शिबीराला सहकार्य केले आहे. तसेच महानगरपालिकेने अमरावतीकरांचे लसिकरण करण्‍यासाठी पुढाकार घेतल्‍याबद्दल नागरिकांनी त्‍यांचे यावेळी आभार मानले. या शिबीरात १९० नागरिकांचे लसिकरण करण्‍यात आले.

 

यावेळी जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, डॉ.जयदिप देशमुख, प्रफुल चव्‍हाण, संध्‍या चरपे, आशा वर्कर, इस्‍माईल लालुवाले, सचिन डाके व कर्मचारी उपस्थित होते.

 

00000

 

  

पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात 178 तक्रारींचा निपटारा

 




 पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात 178 तक्रारींचा निपटारा

नागरिकांच्या समस्यांच्या तत्काळ निराकरणासाठी शासन कटिबद्ध

-   पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 8 :  नागरिकांच्या विविध समस्यांचे तत्काळ निवारण करण्यासाठी 178 तक्रारींचा आज निपटारा करण्यात आला असून आवश्यक तिथे शासनदरबारी पाठपुरावा करण्यात येईल. नागरिकांच्या हितासाठी आवश्यक ते निर्णय व कार्यवाही करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले. 

            जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध अडचणींचे निराकरण करण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्र्यांनी जनता दरबार घेतला. यावेळी पालकमंत्र्यांनी प्राप्त निवेदन तसेच नागरिकांनी समक्ष भेटून मांडलेल्या निवेदनांवर चर्चा करण्यात आली. यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सर्व संबंधित नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून या संबंधी प्रशासनाला कार्यवाहीचे स्पष्ट निर्देश दिले. जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे  नुकसानग्रस्त कुटुंबांना आवश्यक ते संपूर्ण सहकार्य करू. नागरिकांच्या अडचणींच्या काळात शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी दिली.

 शहरासह ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची कामे वेळेत व्हावीत, त्यांना कुठलाही त्रास होऊ नये, त्यांच्या समस्या, प्रश्न निकाली निघाव्यात व त्यांना न्याय मिळावा यासाठी जनता दरबार हा उपक्रम आहे. यानिमित्ताने त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, प्रश्न जाणून घेतले. 

      यावेळी नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत तत्काळ कार्यवाहीचे निर्देश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले. विविध ठिकाणांहून आलेले तक्रारदार नागरिक, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद विविध विभागाचे अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

00000

 

 

 

 

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...