Friday, May 27, 2022

संत गाडगेबाबांचा वसा जपण्याची आपली सर्वांची जबाबदारी - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 






दर्यापूर येथील श्री संत गाडगे महाराज बालसुधारगृहाच्या इमारतीला नूतन रूप

संत गाडगेबाबांचा वसा जपण्याची आपली सर्वांची जबाबदारी

-          पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

                         

अमरावती, दि. 27 : लोकसेवेच्या उदात्त हेतूने संत गाडगेबाबांनी मिशनची स्थापना केली. मिशनचे हे कार्य अविरत चालू ठेवून संत गाडगेबाबांनी दिलेला लोकसेवेचा वसा जपण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा श्री गाडगे महाराज मिशनच्या अध्यक्ष ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दर्यापूर येथे केले.  

श्री गाडगे महाराज मिशन मुंबई संचालित दर्यापूर येथील श्री संत गाडगे महाराज बालसुधारगृहाच्या इमारतीचा जीर्णोद्धार पालकमंत्र्यांनी स्वखर्चातून केला. सुधारणेनंतर नवे रूप प्राप्त झालेल्या इमारतीचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार बळवंतराव वानखडे, मिशनचे उपाध्यक्ष बापूसाहेब देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, हरीभाऊ मोहोड, बालसुधारगृहाचे व्यवस्थापक गजाननराव देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.  

श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, संत गाडगेबाबांनी दुर्बल, अनाथ, अपंगांसाठी आयुष्य वाहून घेतले. त्यांच्या दशसूत्री संदेशानुसार तळागाळातील लोकांच्या उन्नतीसाठी कार्य अविरत होत राहणे आवश्यक आहे. मिशनचे हे कार्य एकजुटीने पुढे नेऊया. संत गाडगेबाबांची शिकवण जपून त्यानुसार वाटचाल करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे आवाहन त्यांनी केले.

बालसुधारगृहाला 75 वर्षे पूर्ण झाली. ही इमारत मोडकळीला आली होती. पालकमंत्र्यांनी स्वखर्चातून जीर्णोद्धार केला. हे काम लवकर पूर्णत्वास जाण्यासाठी त्यांनी लक्ष घालून पाठपुरावाही केला. त्यामुळे इमारतीला नूतन रूप लाभले आहे, असे आमदार श्री. वानखडे यांनी सांगितले.

इमारतीच्या नूतनीकरणासाठी योगदान देणा-या मूर्तिकार गोपाळ पवार, सलीमभाई, सुभाष पनपालिया, देवानंद फुके, सुरेश गारोळे, भैय्या पाटील भारसाकळे आदींना यावेळी गौरविण्यात आले.

000

 

 

मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 

मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहणार नाही

याची दक्षता घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 

अमरावती, दि.27: जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या अध्यक्षतेखाली महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र, प्रवर्गाचे अर्ज, शिष्यवृत्ती अर्ज निकाली काढण्यासंदर्भांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे नुकतीच आढावा बैठक संपन्न झाली. येत्या 15 दिवसात प्रत्येक महाविद्यालयात समान संधी केंद्र स्थापन करुन त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश श्रीमती कौर यांनी संबंधितांना दिले.

            जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी महाविद्यालय व विद्यार्थीस्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जांचा महाविद्यालयनिहाय आढावा घेतला. त्यानुसार पात्र नोंदणीकृत अर्जापैकी प्रलंबित अर्जांवर सर्व महाविद्यालयांनी तातडीने कार्यवाही करावी. तसेच कोणताही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश दिले. तसेच येत्या 15 दिवसात प्रत्येक महाविद्यालयात समान संधी केंद्र स्थापन करुन त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी  दिले.

लॉगिनवर कोणतीही कार्यवाही न करता अर्ज प्रलंबित राहून पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू न देण्याची जबाबदारी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची राहील. यासाठी महाविद्यालयांनी वेळीच शिष्यवृत्तीच्या अर्जावर कार्यवाही करण्याची सूचना श्रीमती कौर यांनी यावेळी केली.

जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र, प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे नोंदणीकृत अर्ज प्राधान्याने भरून घेण्यात यावे. तसेच महाविद्यालयातील मागासवर्गीय मुला-मुलींना शिष्यवृत्ती फ्रीशिप व इतर शासनाच्या योजना, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासोबतच उद्योजकता व्यवसाय व रोजगारनिर्मितीसाठी मार्गदर्शन करणे तसेच ‘संवाद अभियान युवा संवाद, यासारखे कार्यक्रम सुरू करणे, महाविद्यालयांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ‘समान संधी केंद्र स्थापन करण्यासंबंधी महाविद्यालयांना सूचित करण्यात आले आहे.

समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, सहाय्यक आयुक्त राजेंद्र भेलाऊ तसेच कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य, शिष्यवृत्ती विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.  

00000

कोविडकाळात अनाथ झालेल्या बालकांना पीएम केअर फॉर चिल्ड्रेनद्वारे मदत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी मदत निधीचे वितरण

 

कोविडकाळात अनाथ झालेल्या बालकांना पीएम केअर फॉर चिल्ड्रेनद्वारे मदत

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी मदत निधीचे वितरण

 

            अमरावती, दि. 27 : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘पीएम केअर फॉर चिल्ड्रेन’ योजनेद्वारे कोविडकाळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मदत निधी वितरण कार्यक्रम सोमवारी (30 मे) रोजी सकाळी 9.45 वाजता होणार आहे. या योजनेत अमरावती जिल्ह्यातील 15 बालकांना लाभाचे वितरण होणार असून, ते जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होतील.   

            या योजनेद्वारे कोविडकाळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना 10 लक्ष रू., आरोग्य विमा आदी लाभ देण्यात येणार आहे. या लाभाचे वितरण जिल्ह्यातील 15 बालकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे होईल. विविध मान्यवर यावेळी उपस्थित राहतील, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. उमेश टेकाळे यांनी दिली.

000  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत अनेक कामांना चालना - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 







सुमारे साडेआठ कोटी निधीतून विविध रस्त्यांचे भूमिपूजन

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत अनेक कामांना चालना

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 27 : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत अनेक कामांना चालना मिळाली असून, ग्रामीण भागात मजबूत रस्त्यांचे जाळे निर्माण होणार आहे. यापुढेही अधिकाधिक कामे हाती घेण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज दिले.

          मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत सुमारे साडेआठ कोटी रू. निधीतून विविध रस्त्यांचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, माजी जि. . अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, माजी जि. . सभापती बाळासाहेब हिंगणीकर, हरिभाऊ मोहो यांच्यासह बांधकाम अभियंता, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यावेळी रावळगाव मुकुंदपूर येथे दोन कोटी 27 लक्ष रु. निधीतून डांबरी रस्त्याचे, तसेच 35 लक्ष रु. निधीतून येसुर्णा बस स्थानक ते गावापर्यंत आणि सुमारे अडीच कोटी रुपये निधीतून येसुरणा ते सावळी खुर्द डांबरी रस्त्याचे, एकूण 95 लक्ष रु. निधीतून कोल्हा ते नरसिंगपूर, तर 30 लक्ष रु.निधीतून इसापुर ते वडनेर भुजंग रस्त्याचे भूमिपूजन यावेळी झाले.

 

त्याचप्रमाणे,  50 लक्ष रु. निधीतून  बोराळा  येथे  राज्य  मार्ग 24 पासून पथ्रोट, जवळापूर,  बोराळा, धनेगाव रामा-308 पर्यंत नाली व काँक्रिट रस्त्याचे आणि 1 कोटी 38 लक्ष रुपये निधीतून पांढरी खानमपूर येथे पांढरी ते वाघनेर या रस्ता कामाचे भूमिपूजन झाले.

जिल्ह्यात रस्त्यांची अनेक कामे पूर्णत्वास जात आहे. अनेक नव्या कामांना चालना मिळाली आहे. ही सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत. ती गुणवत्तापूर्ण असावीत. चांगले रस्तेनिर्मितीमुळे विकासाची प्रक्रिया अधिक गतिमान होणार आहे. इतरही आवश्यक रस्ते सुधारणेच्या कामांबाबत तत्काळ प्रस्ताव द्यावेत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

 

00000

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Wednesday, May 25, 2022

पूर्वतयारी व कार्यवाहीसाठी विविध नोडल अधिकारी नियुक्त - विभागीय आयुक्त पवनीत कौर यांच्याकडून आदेश जारी

 


मागास प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत समर्पित आयोग 28 मे रोजी अमरावतीत

पूर्वतयारी व कार्यवाहीसाठी विविध नोडल अधिकारी नियुक्त

-         विभागीय आयुक्त पवनीत कौर यांच्याकडून आदेश जारी

         अमरावती, दि. 19 : स्थानिक स्वराज्य संस्थांतील मागास प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत समर्पित आयोग शनिवार, दि. 28 मे रोजी अमरावती येथे विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी 9.30 ते 11.30 या वेळेत उपस्थित असेल. आयोगाकडून व्यक्ती व संस्थांकडून निवेदने स्वीकारण्यात येतील. कार्यक्रमाची पूर्वतयारी व कार्यवाही याबाबतच्या जबाबदा-या पार पाडण्यासाठी विविध नोडल अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसा आदेश विभागीय आयुक्त पवनीत कौर यांनी जारी केला आहे.  

महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती आणि शहरातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर पंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास (इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती) आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे शासनाने समर्पित आयोग गठित केला आहे.   याबाबत नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी समर्पित आयोगाचे सदस्य अमरावती येथे शनिवार, दि. 28 मे रोजी उपस्थित असतील. 

 याबाबत पूर्वतयारी व कार्यवाहीसाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांचे संपर्क अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, विवेक घोडके व मनीष गायकवाड यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. नोडल तथा समन्वय अधिकारी म्हणून अमरावतीचे निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल, यवतमाळचे निवासी उपजिल्हाधिकारी ललित व-हाडे, वाशिमचे आरडीसी शैलेश हिंगे, अकोल्याचे आरडीसी संजय खडसे, तसेच बुलडाणा येथील उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय लोखंडे यांना नियुक्त करण्यात आले आहे. आयोगास आवश्यक व्यवस्थेबाबत उपविभागीय अधिकारी रणजीत भोसले यांनाही जबाबदारी देण्यात आली आहे.

          बैठकीच्या कार्यवाहीत आयोगाच्या मदतीसाठी सहायक आयुक्त विवेकानंद काळकर, नायब तहसीलदार प्रशांत देशमुख, संजय मूरतकर, लघुलेखक किर्ती पोकळे, अतुल लवणकर यांची टीम नियुक्त करण्यात आली आहे.

आयोगास निवेदन सादर करण्यासाठी इच्छूकांच्या नोंदणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाबरोबरच पाचही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मदत कक्ष उघडण्यात आला आहे.  दि. 27 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत नोंदणी करता येईल. अशी माहिती पुरवठा उपायुक्त अजय लहाने यांनी दिली. इच्छूकांनी कार्यालयीन वेळेत या कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

 

 

 

 

 

 

 

 

शासकीय तंत्रनिकेतनचा 20 वा पदविका प्रदान समारंभ उपक्रम अधिकाधिक विद्यार्थीभिमुख करण्यावर भर - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

 









शासकीय तंत्रनिकेतनचा 20 वा पदविका प्रदान समारंभ

उपक्रम अधिकाधिक विद्यार्थीभिमुख करण्यावर भर

-         उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

 

अमरावती, दि. २५ : आपली बांधीलकी विद्यार्थ्यांशी आहे हे लक्षात घेऊन विद्यार्थीभिमुख उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येत आहे. कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांनी अनेक अडचणींचा सामना करीत अभ्यास केला. त्या काळात ऑनलाईन परीक्षा ही गरज होती. परंतु आता ऑफलाईन परीक्षा पद्धती स्वीकार करणे गरजेचे आहे. यासाठी विद्यार्थ्यांची मानसिकता तयार होण्यासाठी प्राचार्य व प्राध्यापकांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.

 

            शासकीय तंत्रनिकेतन येथील २० वा पदविका प्रदान समारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते अभियंता भवन येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते. तंत्रनिकेतनच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय जाधव अध्यक्षस्थानी होते.

 

            उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. सामंत म्हणाले की, प्रत्येक संकटावर धैर्य व चिकाटीने मात करण्याचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे. कोविडकाळात ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्या. तथापि, कोविडकाळानंतर ऑफलाईन परीक्षा घेण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन परीक्षेच्या कालावधीत वाढ, प्रश्नसंच उपलब्धता असेही निर्णय राबविण्यात आले. याबाबत विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करण्यासाठी प्राचार्य, प्राध्यापक यांनी पुढाकार घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांना आपले हक्क, कर्तव्य, लोकशाही मूल्ये यांची ओळख व्हावी यासाठी संविधानाचा समावेश अभ्यासक्रमात केला आहे.

 

            पदविका वितरण समारंभाचे स्वरूप हे विद्यार्थी केंद्रित होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, पदविका प्रदान समारंभ हा विद्यार्थ्यांसाठी असतो. त्यामुळे असा कार्यक्रम विद्यार्थी केंद्रितच असावा. विद्यार्थ्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी या सोहळ्यातच मार्गदर्शन मिळावे.  त्यादृष्टीने नियोजन करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी सोहळ्यात परिधान करावयाच्या वस्त्र किंवा उपरण्याचेही स्वरूप अधिक चांगले करण्यात येईल. अनेक ठिकाणी पदवी वितरण समारंभाचे स्वरुप इंग्रजांच्या काळापासून आजही तसेच कायम आहे. ते स्वरुप बदलवून समारंभ विद्यार्थी केंद्रित करण्यावर भर देण्यात येईल. 

 

यावेळी संस्थेच्या प्राचार्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

00000

 

 

 

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...