Wednesday, July 27, 2022

अमरावती विभागात सर्वदूर पाऊस विभागात सरासरी 8.8 मि.मि पाऊस

 

अमरावती विभागात सर्वदूर पाऊस विभागात सरासरी 8.8 मि.मि पाऊस

अमरावती दि 27: अमरावती विभागात आज 56 तालुक्यात पाऊस झाला. विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाने उपलब्ध करुन दिलेल्या ‘महावेध’च्या नोंदीनुसार आज दुपारी बारा वाजेपर्यंत विभागात सरासरी 8.8 मि.मि पाऊस झाला. दि. 1 जून ते आजपर्यंत 492.1 मि. मि पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील 24 तासांत विभागात यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक सरासरी 15.4 मिली मिटर पाऊस झाला.

विभागात नोंदला गेलेला आजचा तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदा 1 जूनपासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिली मिटर परिमाणात आहेत. ही माहिती  ‘महावेध’च्या नोंदीनुसार दुपारी 12 वाजेपर्यंतची असून बदलत्या पर्जन्यमानानुसार त्यात बदल होऊ शकतात.

अमरावती जिल्हा : धारणी 8.1 (481.7), चिखलदरा 2.6 (773.0), अमरावती 10.0 (416.0), भातकूली 7.5 (336.6), नांदगावखडेश्वर 0.2 (513.6), चांदूररेल्वे 0.5 (437.7), तिवसा 4.7 (587.6), मोर्शी 11.0 (516.1), वरुड 0.0 (546.8), दर्यापूर  0.6 (323.8), अंजनगाव 6.7 (380.3), अचलपूर 17.3 (365.6), चांदूरबाजार 10.7 (553.0), धामणगावरेल्वे 3.1 (619.0) अमरावती जिल्ह्यात चोवीस तासात सरासरी 6.0 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 479.8 मि.मि. पाऊस झाला.

अकोला जिल्हा :- अकोट 2.0 (252.3), तेल्हारा 2.0 (367.6) बाळापूर 2.4 (472.2), पातूर 7.7 (401.2),  अकोला 8.2 (445.6), बार्शीटाकळी 4.4 (342.3), मुर्तीजापूर 1.3 (350.5), जिल्ह्यात 24 तासात सरासरी 4.2 मि.मितर आजवर 379.5 मि.मि पाऊस झालाआहे.

यवतमाळ जिल्हा : यवतमाळ 6.0 (592.6), बाभूळगाव 0.6 (611.8),कळंब 0.8 (617.5), दारव्हा 24.4 (470.0), दिग्रस 20.4 (587.1), आर्णी 64.0 (754.3), नेर 3.7 (541.3), पुसद 8.3 (462.8), उमरखेड 12.9 (591.3), महागाव 9.9 (682.4), वणी 20.8 (825.9), मारेगाव 25.4 (782.8), झरीजामणी 7.5 (719.0), केळापूर 18.9 (730.1), घाटंजी 10.0 (606.6), राळेगाव 18.8 (790.7), जिल्ह्यात 24 तासात सरासरी 15.4 तर यंदाच्या हंगामात आजवर सरासरी 643.3 मि.मि पाऊस झालाआहे.

बुलडाणा जिल्हा :- जळगाव जामोद 2.4 (297.5), संग्रामपूर 8.1 (368.2), चिखली 9.5 (424.7), बुलडाणा 25.2 (544.4), देऊळगाव राजा 4.1 (398.1), मेहकर 6.7 (450.6), सिंदखेडराजा 2.8 (447.7), लोणार 3.8 (369.4), खामगाव 5.3 (326.9), शेगाव 3.6 (404.7), मलकापूर 0.1 (291.3), मोताळा 0.6 (322.3), नांदूरा 2.9 (316.8), जिल्ह्यात दिवसभरात 6.2 तर यंदाच्या हंगामात आजवर 387.7 मि.मि. पाऊस झाला.

वाशिम जिल्हा : - वाशिम 8.8 (475.8), रिसोड 14.8 (499.6), मालेगाव 11.9 (517.1), मंगरुळपिर 3.9 (516.4), मानोरा 13.1 (560.7), कारंजा 3.1 (374.2), जिल्ह्यात 24 तासात 9.2 तर 1 जूनपासून आजवर 486.7 मि.मि. पाऊस झाला.

00000

Tuesday, July 26, 2022

प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी पवनीत कौर

 



प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

-         जिल्हाधिकारी पवनीत कौर

 

फिरत्या वाहनाच्या माध्यमातुन योजनेची प्रसिद्धी

 

अमरावती दि. 26 (विमाका) : प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना घेता यावा यासाठी योजनेची माहिती दर्शविणाऱ्या चार फिरत्या वाहनांना आज जिल्हाधिकारी कार्यालयातील परिसरात जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी हिरवी झेंडी दाखविली. फिरत्या वाहनांच्या माध्यमातुन जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेची माहिती, वैशिष्ठ्ये सांगण्यात येणार आहे. ही केंद्र शासनाची योजना असुन फिरत्या वाहनाच्या माध्यमातुन या योजनेची जिल्हाभर प्रसिद्धी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील अमरावती, चांदुर रेल्वे, धामणगाव व भातकुली या तालुक्यात ‍ही फिरती वाहने रवाना करण्यात आली.     

 

 

कर्जदार,बिगर कर्जदार व भाडेपट्टीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी पीक विमा अर्ज नोंदणी प्रक्रिये पुर्ण करण्यासाठी आपले सरकारया केंद्रावर सुविधा निर्माण करण्यात आली असुन ३१ जुलै पर्यंत शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन श्रीमती कौर यांनी केले.

 

 

नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, सुधारीत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे व शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी प्रधानमंत्री पिक योजना राबविण्यात येत आहे. यावर्षी खरीप हंगाम योजना २०२२-२३ मध्ये भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड या योजनेची अंमलबजावणी करीत आहे. तांदुळ, ज्वारी, सोयाबीन, मुग, उडीद, तुर व कापुस पिकांचा खरीप हंगामात समावेश आहे.

 

 

उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनीधी नितीन सावळे आदी यावेळी उपस्थित होते.

 

00000

जिल्हा लोकशाही दिन 1 ऑगस्टला

 

जिल्हा लोकशाही दिन 1 ऑगस्टला

अमरावती, दि.26: जिल्हा लोकशाही दिन महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार ऑगस्ट महिन्यातील जिल्हा लोकशाही दिन, सोमवार, दिनांक 1 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. संबंधितांनी याची नोंद घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी केले आहे.

00000

जि.प., पं. स. निवडणूकीसाठी नियोजनभवनात गुरूवारी आरक्षण सोडत

 

जि.प., पं. स. निवडणूकीसाठी नियोजनभवनात गुरूवारी आरक्षण सोडत

अमरावती, दि. 26 (विमाका) : अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणूक-2022साठी जिल्हा परिषद सदस्यांच्या एकूण 66 पदांच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण या पदांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन गुरूवारी (28 जुलै) आरक्षण सोडत होणार आहे. पं. स. निवडणुकीसाठी जिल्ह्यातील एकूण 11 तहसील स्तरावर याच दिवशी आरक्षण सोडत होईल.

जिल्हाधिकारी श्रीमती पवनीत कौर यांच्या अध्यक्षतेखाली जि. प. निवडणुकीसाठीची सोडत प्रक्रिया सकाळी 11 वाजता होणार आहे.  प्रशासनाकडून सोडतीच्या अनुषंगाने पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. उपजिल्हा निवडणूक कार्यालयाकडून कार्यवाही होत आहे. सोडत सभेच्या अनुषंगाने आवश्यक बाबी, आवश्यक पोलीस बंदोबस्त आदी तजवीज करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील 11 तहसील स्तरावर पं. स. निवडणुकीची आरक्षण सोडत गुरूवारी सकाळी 11 वा. होईल. जिल्ह्यातील तिवसा, धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे या अस्तित्वात असलेल्या पंचायत समित्या वगळता उर्वरित 11 पं. स. निवडणूकीसाठी सोडत होणार आहे. 

वर्गणी, देणगी गोळा करण्याच्या परवानगीसाठी अर्ज ऑनलाईन उपलब्ध

 

वर्गणी, देणगी गोळा करण्याच्या परवानगीसाठी

अर्ज ऑनलाईन उपलब्ध

 

अमरावती, दि.26: विविध कारणांसाठी वर्गणी किंवा देणगी गोळा करण्यासाठी परवानगी मिळण्यासाठी अर्ज व माहिती पुस्तिका ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती धर्मादाय सहआयुक्त संभाजी द. ठाकरे यांनी आज दिली.

महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 41-क अन्वये विविध कारणांसाठी वर्गणी व देणगी गोळा करण्यास परवानगी मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज व मार्गदर्शनपर माहिती पुस्तिका पीडीएफ फाईलमध्ये व ऑफलाईन अर्जाचा नमुना, त्यासह आवश्यक कागदपत्रांची यादी www.charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मुखपृष्ठावर तसेच प्रणाली मार्गदर्शन / applicationguidline या टॅबखाली उपलब्ध् आहे. त्यानुसार संबंधित संस्थांनी कार्यवाही करण्याचे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचा आढावा

 

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचा आढावा

 

अमरावती, दि. 26 (विमाका) : जिल्ह्यातील अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार घडलेला गुन्हा आणि त्यावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आज आढावा घेण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक घेऊन आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक घेण्यात आली.

 

            जुन महिन्यात शहरी ग्रामीण भागात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीची 14 प्रकरणे घडली. जानेवारी ते जुन अखेर शहरी हद्दीत 17 तर ग्रामीण हद्दीत 24 अशी 41 प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. अशी माहिती समाज कल्याणच्या सहायक आयुक्त माया केदार यांनी दिली. अर्थसहायचा प्रलंबित निधी प्राप्त करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. जानेवारी 2022 ते 30 जुनअखेरपर्यंतची एकूण 29 प्रकरणांचा पोलिस तपास करीत आहेत. याबाबतची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी दिले.

 

 

या बैठकीला समाज कल्याण निरिक्षक सुरेश ‍कोंडे, ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाचे तपन कोल्हे, पोलिस उपअधीक्षक कार्यालयाचे प्रशांत राजे, अशासकीय सदस्य राजेंद्र महल्ले, दिलीप काळबांडे आदी उपस्थित होते.

अमरावती विभागात सर्वदूर पाऊस जूनपासून आतापर्यंत 483.3 मिमि पावसाची नोंद

 

अमरावती विभागात सर्वदूर पाऊस

जूनपासून आतापर्यंत 483.3 मिमि पावसाची नोंद

 

 

अमरावती दि 26: अमरावती विभागात आज 56 तालुक्यात पाऊस झाला. प्राप्त अहवाला नुसार, दुपारी बारा वाजेपर्यंत झालेल्या पावसाच्या घेण्यात आलेल्या नोंदी नुसार विभागात 1 जून ते आजपर्यंत 483.3 मि मि पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील 24 तासांत विभागात 13.7 मिली मिटर पाऊस झाला.

विभागात नोंदला गेलेला आजचा तालुका निहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदा 1 जूनपासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिली मिटर परिमाणात आहेत.

अमरावती जिल्हा : धारणी 19.8 (473.6), चिखलदरा 24.8 (770.4), अमरावती 20.6 (406.0), भातकूली 9.3 (329.1), नांदगावखडेश्वर 29.8 (513.4), चांदूररेल्वे 17.4 (437.2), तिवसा 14.9 (582.9), मोर्शी 1.5 (505.1), वरुड 7.8 (546.8), दर्यापूर 1.8 (323.3), अंजनगाव 3.3 (373.6), अचलपूर 4.7  (348.3), चांदूरबाजार 6.6 (542.3.4), धामणगावरेल्वे 30.2 (615.9) अमरावती जिल्ह्यात चोवीस तासात सरासरी 13.6 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 473.8 मि.मि. पाऊसझाला.

अकोला जिल्हा :- अकोट 0.4 (250.3), तेल्हारा 0.1 (365.6), बाळापूर 6.2 (469.8), पातूर 12.7 (390.3),  अकोला 1.0 (437.4), बार्शीटाकळी 6.5 (337.9), मुर्तीजापूर 2.5 (349.2), जिल्ह्यात 24 तासात सरासरी 13.7 मि.मि आजवर 483.3 मि.मि पाऊस झाला आहे.

यवतमाळ जिल्हा : यवतमाळ 26.0 (586.6), बाभूळगाव 41.3 (611.2), कळंब 14.7 (616.7), दारव्हा 9.2 (445.6), दिग्रस 50.9 (566.7), आर्णी 42.3 (690.3), नेर 26.5 (537.6), पुसद 15.2 (454.5), उमरखेड 14.5 (578.4), महागाव 29.1 (672.5), वणी 9.7 (805.1), मारेगाव 7.9 (757.4), झरीजामणी 13.4 (711.5), केळापूर 24.1 (711.2), घाटंजी 12.6 (596.6), राळेगाव 18.0 (771.9), जिल्ह्यात 24 तासात सरासरी 21.2 तर यंदाच्या हंगामात आजवर सरासरी 627.9 मि.मि पाऊस झालाआहे.

बुलडाणा जिल्हा :- जळगाव जामोद 3.2 (295.1), संग्रामपूर 1.9 (360.1), चिखली 9.9 (415.2), बुलडाणा 8.1 (519.2), देऊळगाव राजा 0.6 (394.0), मेहकर 3.2 (443.9), सिंदखेडराजा 1.1 (444.9), लोणार 1.1 (365.6), खामगाव 4.7 (321.6), शेगाव 2.9 (401.1), मलकापूर 4.9 (291.2), मोताळा 2.3 (321.7), नांदूरा 6.8 (313.9), जिल्ह्यात दिवसभरात 4.3 तर यंदाच्या हंगामात आजवर 381.5 मि.मि. पाऊस झाला.

वाशिम जिल्हा : - वाशिम 20.9 (467.0), रिसोड 17.2 (484.8), मालेगाव 35.8 (505.2), मंगरुळपिर 40.0 (512.5), मानोरा 42.6 (547.5), कारंजा 3.1 (371.1), जिल्ह्यात 24 तासात 13.7 तर 1 जूनपासून आजवर 483.3 मि.मि. पाऊस झाला.

00000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...