Thursday, April 5, 2018

'जय महाराष्ट्र'मध्ये राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील
मुंबईदि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात 'प्रदूषण मुक्त महाराष्ट्रया विषयावर पर्यावरण राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत शुक्रवार दि. 6 एप्रिल रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून संध्याकाळी 7.30 ते 8 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.
प्रदूषण नियंत्रणासाठी पर्यावरण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहितीअमरावती जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी सुरु असलेले कार्य,अमरावती जिल्ह्यात विकास व पर्यावरणाचा समतोल साधत औद्योगिक व कृषी विकासासाठी शासन करत असलेले प्रयत्न याबाबतची माहिती श्री.पोटे-पाटील यांनी'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून दिली आहे. 

No comments:

Post a Comment

टास्क फोर्स् सदस्य जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे विद्यार्थी,उमेदवार व संबंधित घटकांशी थेट संवाद साधणार

  भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येणार आह...