Thursday, April 26, 2018

“दिलखुलास” मध्ये परिवहन मंत्री दिवाकर रावते
मुंबई, दि. 25 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित “दिलखुलास” कार्यक्रमात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत गुरुवार दि. २६ ते शनिवार दि. २८ एप्रिल रोजी आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका पल्लवी मुजुमदार यांनी ही मुलाखत घेतली आहे.
बिरसा मुंडा पुनर्वसन प्रकल्प, तरुण महिलांना वाहन चालकाचे प्रशिक्षण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना, एसटी आगारांमध्ये लघु चित्रपटगृहे, परवाने मुक्त रिक्षा, खासगी टॅक्सी कंपनींना सिटी टॅक्सी नियम,महाविद्यालयीन तरुणांना वाहन चालकाचा शिकाऊ परवाना, अत्याधुनिक बसपोर्ट, बाळासाहेब ठाकरे अपघात सहायता निधी तसेच महिला चालक असलेली अबोली रंगाची रिक्षा याबाबत माहिती श्री. रावते यांनी “दिलखुलास”कार्यक्रमातून दिली आहे.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 26.10.2026

  दुष्काळात शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केल्यास फायनान्स कंपन्यांवर फौजदारी कारवाई होणार- निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे       अमरावती, दि...