Thursday, August 16, 2018

'दिलखुलास' कार्यक्रमात संचालक शेखर गायकवाड आणि डॉ. विजय पाखमोडे



मुंबई, दि. १६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'दिलखुलास' या कार्यक्रमात ‘महाराष्ट्र भूजल नियम २०१८’ या विषयावर संचालक शेखर गायकवाड व उपसंचालक डॉ. विजय पाखमोडे, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून शुक्रवार दि. १७ आणि शनिवार दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक सुरेश ठमके यांनी ही मुलाखत घेतली आहे.
 महाराष्ट्र भूजल नियम २०१८, भूजल नियमनाची आवश्यकता व पार्श्वभूमी, भूजलाची पातळी कमी होण्याचे व वारंवार दुष्काळ होण्याचे कारण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, भूजल नियमाबाबतच्या हरकती व सूचना, नव्या नियमानुसार पाण्याची तरतूद, शेतकऱ्यांच्या विहिरींची नोंदणी तसेच भूजल नियमाचे दूरगामी परिणाम याबाबतची माहिती श्री.गायकवाड आणि श्री.पाखमोडे यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.

No comments:

Post a Comment

विशेष लेख : वाचन प्रेरणा दिन : पुस्तकांच्या पलीकडे विवेकाचा शोध!

  विशेष लेख : वाचन प्रेरणा दिन : पुस्तकांच्या पलीकडे विवेकाचा शोध!   माहितीच्या महासागरात ज्ञानाचा दीप आणि मतांच्या कोलाहलात विवेकाचा ...