Thursday, October 4, 2018

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पुनर्वसन प्रश्नांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा



 मुंबई, दि. 4 :  संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तसेच आरे येथील पात्र अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासंदर्भातील  विविध प्रश्नांचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर आढावा घेतला.
बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्यासह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे अधिकारी उपस्थित होते.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पुनर्वसनास पात्र झोपडपट्टीधारक तसेच आदिवासी पाड्यांमधील कुटुंबाची यादी अद्ययावत करावी व ती परिपूर्ण यादी म्हाडाकडे हस्तांतरित करावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

No comments:

Post a Comment

• पहिल्या पसंती क्रमाच्या मतगणनेची तिसरी व अंतिम फेरी पूर्ण झाली असून तिन्ही फेरी मिळून ३३ हजार ३४ मत मोजण्यात आले. विजयासाठी मतांचा कोटा : १६,१३४ ठरला आहे. • बाद फेरीला सुरुवात

#अमरावती_विभाग_शिक्षक_मतदारसंघ_निवडणूक मतमोजणी UPDATE (रात्री १०.३० वा.) • पहिल्या पसंती क्रमाच्या मतगणनेची तिसरी व अंतिम फेरी पूर्ण झाल...