Monday, December 17, 2018

अनुकंपा तत्वावरील पदे 31 डिसेंबरपूर्वी भरा - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांचे निर्देश



अमरावती, दि. 17 : कार्यालयांतील अनुकंपा तत्वावरील पदे तत्काळ भरुन तसा अहवाल 31 डिसेंबरपूर्वी सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी प्रशासनाला दिले.
            विविध विभागांत अनुकंपा तत्वावरील रिक्त असलेल्या  पदांचा आढावा पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
            पालकमंत्री श्री. पोटे पाटील म्हणाले की, अनेक कार्यालयांतील अनुकंपा पदांवरील पदे रिक्त असल्याचे दिसून येते. ही कार्यवाही वेळेत होणे आवश्यक होते. त्यामुळे पात्र असणा-या व्यक्ती वंचित राहिल्या आहेत. त्यामुळे तत्काळ ही पदे भरण्याची कार्यवाही करावी. तसा अहवाल 31 डिसेंबरपूर्वी सादर करावा. या कामात कोणतीही दिरंगाई होता कामा नये.

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार