Thursday, December 13, 2018

पालकमंत्री पांदणरस्ता योजनेतील कामांना गती देण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश



अमरावती, दि. 13 : पालकमंत्री पांदणरस्ते योजनेत अपेक्षित कामांनुसार खर्चाचे नियोजन करून या कामांना गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी आज येथे दिले.
  जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. जि. प. सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता प्रशांत गावंडे, मोर्शी येथील उपविभागीय अभियंता राजेंद्र मालवे, ए. के. चव्हाण, एस. एम. पाराशर, चंद्रकांत मेहेत्रे आदी उपस्थित होते.
योजनेत सध्या दीड कोटी रुपयांचा निधी प्राप्त आहे. त्याचे तालुक्यांना समप्रमाणात वाटप करण्यात यावे, असे सांगून श्री. देशमुख म्हणाले की, कामांनुसार यंत्रसामग्रीचे दर तपासून तत्काळ अंदाजपत्रक सादर करावे. आर्थिक मर्यादा तपासून कामांचे नियोजन करावे. त्यानुसार लवकरच तालुका समितीच्या प्रस्तावांनुसार कामांचे निश्चितीकरण करुन कामांना सुरुवात केली जाईल, असेही ते म्हणाले.
00000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार