Saturday, December 29, 2018

महसूल क्रीडा स्पर्धेत अमरावती जिल्हा उपविजेता

  


अमरावती, दि. 29 :  विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत अमरावती जिल्ह्याने सर्वसाधारण उपविजेता पद पटकावले आहे.
ही तीनदिवसीय स्पर्धा नुकतीच अकोला येथे झाली. विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांच्या हस्ते गुणवंतांना गौरविण्यात आले. जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, यवतमाळचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, वाशिमचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, अकोल्याचे पोलीस अधिक्षक राकेश कलासागर, वाशिमच्या पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, महसूल उपायुक्त गजेंद्र बावणे आदी उपस्थित होते.
स्पर्धेत सांस्कृतिक कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, निकेता जावरकर, अक्षय मंडवे व चमूने उत्कृष्ट कामगिरी बजावली. अमरावतीच्या महिला संघाने खो-खो व थ्रो बॉलमध्ये पहिला क्रमांक पटकावला. ज्योती गणोरकर, पल्लवी गोरले, रक्षा डोल्लवार, मंगला सोळंके, पूजा वाहणे, स्वाती चिंचे, लता पुंड आदी खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.  कबड्डी, फुटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉलमध्ये अमरावतीला दुसरा क्रमांक मिळाला.
स्पर्धेच्या यशस्वितेसाठी जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, उपजिल्हाधिकारी अजय लहाने, संदीप महाजन, शरद पाटील, व्यंकट राठोड, विनोद शिरभाते आदींनी मार्गदर्शन केले.

No comments:

Post a Comment

• पहिल्या पसंती क्रमाच्या मतगणनेची तिसरी व अंतिम फेरी पूर्ण झाली असून तिन्ही फेरी मिळून ३३ हजार ३४ मत मोजण्यात आले. विजयासाठी मतांचा कोटा : १६,१३४ ठरला आहे. • बाद फेरीला सुरुवात

#अमरावती_विभाग_शिक्षक_मतदारसंघ_निवडणूक मतमोजणी UPDATE (रात्री १०.३० वा.) • पहिल्या पसंती क्रमाच्या मतगणनेची तिसरी व अंतिम फेरी पूर्ण झाल...