Thursday, April 13, 2023

आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांचा अमरावती जिल्हा दौरा

 


आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत

यांचा अमरावती जिल्हा दौरा

 

            अमरावती, दि.१३:  राज्याचे आदिवासी  विकास मंत्री डॉ. विजय कुमार गावीत यांचा सोमवार, (दिनांक 17 एप्रिल  2023) रोजीचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे:

            सकाळी 7.47 वाजता बडनेरा रेल्वेटेशन येथे आगमन व शासकीय वाहनाने अमरावतीकडे प्रयाण. सकाळी 8.10 वाजता अमरावती येथे आगमन व राखीव. सकाळी 9.45 वाजता अमरावती येथून शासकीय वाहनाने बडनेराकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता बडनेरा येथे आगमन व शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा मुलींचे वसतिगृह भुमीपुजन कार्यक्रमास उपस्थिती.

      सकाळी 10.30 वाजता बडनेरा येथून शासकीय वाहनाने मंगरूळ, नांदगाव खंडेश्वरकडे प्रयाण. सकाळी 11.10 वाजता मंगरूळ चव्हाळा, ता. नांदगाव खांडेश्वर येथे आगमन व आदिवासी पारधी समाजाचा जनजागृती मेळावा व पारधी समाजातील लाभार्थ्यांना शासकीय साहित्याचे वाटप कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11.45 वाजता नांदगाव खंडेश्वर येथून शासकीय वाहनाने श्री ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, अमरावतीकडे प्रयाण. सकाळी 12.30 वाजता श्री ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आगमन व आदिवासी पारधी समाज जनजागृती मेळाव्यास उपस्थिती.

       दुपारी 2 वाजता श्री ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथून शासकीय वाहनाने नवसारीकडे प्रयाण. दुपारी 2.15 वाजता नवसारी येथे आगमन व आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह भुमिपुजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2.30 वाजता नवसारी येथून शासकीय वाहनाने परतवाडाकडे प्रयाण. दुपारी 3.15 वाजता परतवाडा येथे आगमन व राखीव. दुपारी 4 वाजता शासकीय विश्रामगृह परतवाडा येथून शासकीय वाहनाने आदिवासी मुलामुलींचे शासकीय वसतिगृह, परतवाडाकडे प्रयाण.

         दुपारी 4.10 वाजता शासकीय वसतिगृह, परतवाडा येथे आगमन व आदिवासी मुलामुलींचे शासकीय वसतिगृह इमारतीचा लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सायंकाळी 5.15 वाजता शासकीय वसतिगृह परतवाडा येथून शासकीय वाहनाने अमरावतीकडे प्रयाण. सायंकाळी 6.15 वाजता अमरावती येथे आगमन व राखीव. सायंकाळी 7 वाजता शासकीय विश्रामगृह, अमरावती येथून बडनेराकडे प्रयाण. रात्री 7.55 वाजता बडनेरा येथुन मुंबईकडे प्रयाण.

00000

No comments:

Post a Comment

#अमरावती_विभाग_शिक्षक_मतदारसंघ_निवडणूक_2026 दिनांक 23 ऑक्टोबर, 2026 रोजी सकाळी 08.00 वा. ते दुपारी 16.00 वाजे पर्यंत झालेल्या अंतीम मतदानाची आकडेवारी

  # अमरावती _ विभाग _ शिक्षक _ मतदारसंघ _ निवडणूक _2026 दिनांक 23 ऑक्टोबर, 2026 रोजी सकाळी 08.00 वा. ते दुपारी 16.00 वाजे पर्यंत झालेल्या...