Friday, June 16, 2023

कुंड सर्जापूर रस्त्याच्या बांधकामामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद पर्यायी रस्ता वापरण्याचे आवाहन

 

कुंड सर्जापूर रस्त्याच्या बांधकामामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद

पर्यायी रस्ता वापरण्याचे आवाहन

अमरावती दि 16: अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील अमरावती कुंड सर्जापूर रस्त्याच्या तवक्कल किराणापासून लालखडी चौकापर्यंत रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे कुंड सर्जापूर रस्त्याच्या तवक्कल किराणापासून लालखडी चौकापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण व पुलाच्या बांधकामासाठी हा रस्ता दिनांक 5 जुलै 2023 पर्यंत वाहतुकीस बंद करण्यात येत आहे. यासाठी नागरिकांनी वाहतुकीसाठी पर्यायी खुल्या मार्गाचा वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 17-10-2025

                                                        जिल्हा महिला लोकशाही दिन येत्या सोमवारी अमरावती, दि. 17 (जिमाका) : जिल्हा महिला लोकश...