Friday, June 16, 2023

कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 20 जून रोजी

 

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 20 जून रोजी

71 रिक्तपदांवर होणार भरती

 

            अमरावती, दि. 16 : अमरावती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दर महिन्याच्या, तिसऱ्या मंगळवारी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमे’चे आयोजन करण्यात येत आहे. त्या अंतर्गत ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 20 जून 2023 रोजी होणार आहे. स्थानिक तसेच अन्य जिल्ह्यातील नामवंत खाजगी कंपन्या, कारखाने आणि उद्योग समूहामध्ये काम करण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

          जिल्हयातील युवक-युवतींना नोकरीच्या संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार मेळाव्यामधून नोकरी देण्याचा प्रयत्न जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे करण्यात येतो. त्याचाच पुढील टप्पा म्हणून आता प्रत्येक महिन्याच्या तिस-या मंगळवारी "जागेवरच निवड" (On Spot Selection) मोहीम आयोजित करण्यात येत आहे. त्यात विविध उद्योजकांना आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या पात्रतेच्या पदांसाठी कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील. मुलाखतीनंतर पात्र ठरणा-या उमेदवारांना लगेच नोकरीची संधी मिळेल.

71 रिक्तपदांसाठी राबविणर भरती प्रक्रिया

        या मेळाव्यामध्ये 71 रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यामध्ये अमरावती श्याम इंडोफॅब प्रा.लि. या उद्योगामध्ये 11 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. यामध्ये असोसिएट 5 पदे, ट्रेनी असोसिएट 4 पदे तर फायनांन्स ॲण्ड कमर्शियल असे 2 पदे उपलब्ध आहे. तसेच अमरावती जाधव स्टील अलॉयज येथे आय.टी.आय. ॲप्रेन्टीशिप पदांच्या 10 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्याचप्रमाणे अमरावती क्रेडीट ॲक्सेस ग्रामीण लि. येथे ट्रेनी केंद्र मॅनेजर या पदांच्या एकूण 50 जागांसाठी भरती  भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. अशा एकूण 71 पदांची ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

            या मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी https://shourl.at/aderl या लिंकवर  जाऊन निःशुल्क ऑनलाईन नोंदणी करावी. अथवा विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून निःशुल्क ऑनलाईन नोंदणी करावी.

           यापूर्वी नोंदणी केली असल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जावून Employment वर क्लिक करावे. Job Seeker (Find a Job ) या ऑप्शनवर क्लिक करावे. JOB SEEKER LOGIN हा पर्याय निवडून आपला नोंदणी क्रमांक,आधार क्रमांक आणि पासवर्ड क्रमांकाचा वापर करुन LOGIN व्हावे. त्यांनतर Pandit Dindayal Upadhyay Job Fair हा पर्याय निवडावा. Amravati जिल्हा निवडून Filter द्यावे. त्यानंतर आपल्याला अमरावती जिल्हयातील रोजगार मेळाव्यांची यादी दिसून येते. त्यातील ऑफलाईन प्लेसमेंट ड्राईव्ह, पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा -3, दिनांक- 20/ 6/2023 मेळाव्याची निवड करावी. त्यानंतर Vaccancy List या टॅबवर क्लिक करावे.                    ‘I Agree’ हा पर्याय निवडून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध पदे दिसून येतील. त्यानंतर Apply बटणावर क्लिक करावे. शेवटी Successfully Applied for the Job असा Message दिसेल.

         याबाबत काही अडचण असल्यास अमरावती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुरध्वनी क्रमांक 0721-2566066 किंवा amravatirojgar@gmail.com या इमेलवर संपर्क साधावा. तसेच 20 जून रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, उस्मानिया मस्जिदजवळ, बस स्टँड रोड, अमरावती येथे स्वखर्चाने बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो व आवश्यक कागदपत्रासंह कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित रहावे, असे आवाहन अमरावती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रफुल्ल एस. शेळके यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

#अमरावती_विभाग_शिक्षक_मतदारसंघ_निवडणूक_2026 दिनांक 23 ऑक्टोबर, 2026 रोजी सकाळी 08.00 वा. ते दुपारी 16.00 वाजे पर्यंत झालेल्या अंतीम मतदानाची आकडेवारी

  # अमरावती _ विभाग _ शिक्षक _ मतदारसंघ _ निवडणूक _2026 दिनांक 23 ऑक्टोबर, 2026 रोजी सकाळी 08.00 वा. ते दुपारी 16.00 वाजे पर्यंत झालेल्या...