Thursday, June 8, 2023

चांदुररेल्वे येथील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहासाठी प्रवेश सुरु

 

चांदुररेल्वे येथील मागासवर्गीय मुलांच्या

शासकीय वसतिगृहासाठी प्रवेश सुरु

 

अमरावती, दि. 8 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह चांदुर रेल्वे येथे शैक्षणिक सत्र 2023-24 मधील रिक्त जागेसाठी प्रवेश अर्जांचे नि:शुल्क वाटप करण्यात येत आहे.

प्रवेशीत विद्यार्थ्यांना शासनामर्फत निवास, भोजन तसेच अंथरुण, पांघरुण, शैक्षणिक पुस्तके, स्टेशनरी, छत्री, रेनकोट पुरविल्या जाते. तसेच दरमाह निर्वाह भत्ता प्रदान केला जातो. वसतिगृहात ग्रंथालय, संगणक कक्ष, मनोरंजन कक्ष, व्यायामशाळा व क्रीडा साहित्य उपलब्ध आहे.

यासाठी इच्छुक गरजू विद्यार्थ्यांनी वसतिगृहाचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल री.क. यादव यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार