Friday, June 30, 2023

परिवहन कार्यालयातर्फे एका जप्त वाहनाचा 17 जुलैला लिलाव

 परिवहन कार्यालयातर्फे एका जप्त वाहनाचा 17 जुलैला लिलाव

 प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जप्त केलेल्या एका वाहनाचा लिलाव दि. 17 जुलै रोजी सकाळी 11 वाजता होईल. पाहणीसाठी वाहन कार्यालयाच्या आवारात उपलब्ध आहे. 

 

           वायुवेग पथकाने थकित कर, तसेच विविध गुन्ह्यांखाली अडकवून ठेवलेल्या वाहनाच्या मालकाला त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पंजीबध्द डाकेने नोटीस पाठविण्यात आली आहे. लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर व पर्यावरण कर भरण्याची संधी वाहनमालकाला राहील.

 

वाहनाचा क्रमांक एमएच 27सी0724 असून प्रकार एचजीव्ही टिप्पर, चासिस क्र.  403121सीव्हीझेड711992, इंजिन क्रमांक 497डी44 सीव्हीझेड871875 व रंग रूबी रेड आहे.  वाहनाची नोंदणी 17 एप्रिल, 2004 रोजीची व बनावट – टाटा मोटर्स लि. यांची आहे.

 

 ई-लिलावात सहभागी होण्यासाठी दि. 3 ते 10 जुलैदरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत www.eauction.gov.in या संकेतस्थळावर, तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय, अमरावती येथे 17 हजार रू. रकमेचा आरटीओ, अमरावती या नावाने अनामत धनाकर्षासह (डिमांड ड्राफ्ट) नाव नोंदणी करुन प्रत्यक्ष येऊन पूर्तता करावी. अर्जदार जीएसटीधारक असावा.

 

कोणतेही कारण न देता सदर जाहिर ई-लिलाव रद्द करण्याचे अथवा तहकूब ठेवण्यावे अधिकार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कर वसुली अधिकारी, अमरावती यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहेत.

 

 

 

00000

No comments:

Post a Comment

#अमरावती_विभाग_शिक्षक_मतदारसंघ_निवडणूक_2026 दिनांक 23 ऑक्टोबर, 2026 रोजी सकाळी 08.00 वा. ते दुपारी 16.00 वाजे पर्यंत झालेल्या अंतीम मतदानाची आकडेवारी

  # अमरावती _ विभाग _ शिक्षक _ मतदारसंघ _ निवडणूक _2026 दिनांक 23 ऑक्टोबर, 2026 रोजी सकाळी 08.00 वा. ते दुपारी 16.00 वाजे पर्यंत झालेल्या...