Wednesday, January 3, 2024

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

 



 

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

 

            अमरावती, दि. ०३ : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

अधिक्षक निलेश खटके यांचेसह अन्य अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनीही स्व. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून आदरांजली वाहिली.

 

00000

Tuesday, January 2, 2024

शिष्यवृत्ती योजनेकरीता 4 जानेवारीपर्यंत अर्ज मागविले

 शिष्यवृत्ती योजनेकरीता 4 जानेवारीपर्यंत अर्ज मागविले

 

       अमरावती, दि. 02 (जिमाका) :  देशातील नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना सन 2023-24 साठी अर्ज मागविण्यात आले होते. तथापि प्रवेश प्रक्रिया पुर्ण झालेली नसल्याने अर्ज करण्यास दि. 4 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुक पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज डाऊनलोड करून आवश्यक कागदपत्रासह पोस्टाने किंवा समक्ष समाज कल्याण आयुक्तालय, 3 चर्च रोड, पुणे - 411001 येथे सादर करावेत. अर्जाचा नमुना व अधिक माहितीसाठी www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन समाज कल्याणाचे सहायक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

000000

अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

 अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

 

            अमरावती, दि. 02 (जिमाका): पोलिस ठाणे सिटी कोतवाली अमरावती (शहर) अंतर्गत एका अनोळखी इसमाचा मृतदेह, इर्विन दवाखान्याच्या सायकल स्टँन्डच्या परिसरामध्ये सापडला आहे. मृतकाचे अंदाजे वय 70 ते 75  वर्षे असून मृतकाचा बांधा सडपातळ, रंग सावळा, उंची 5 फुट 4 इंच, डोक्याचे, दाढी व मिशीचे केस पांढरे वाढलेले आहे व समोर डोक्यावर टक्कल पडलेले आहे.  अंगात भुरकट पांढऱ्या रंगाचे स्वेटर, मिनि बरमुडा मरकटलेल्या घातलेला होता. 

मृतकाच्या नातेवाईकाचा शोध लागावा व अनोळखी इसमाची ओळख पटविण्यास पोलीस नियंत्रण कक्ष, अमरावती शहर दुरध्वनी क्रमांक - 0721-2672001 किंवा राजु सायगन यांच्या  भ्रमणध्वनी क्रमांक 9823372165, 9834315085 वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस स्टेशन सिटी कोतवाली, अमरावती  यांनी केले आहे.

00000

ग्रामीण भागात कलम 37(1) व (3) लागू

 ग्रामीण भागात  कलम 37(1) व (3) लागू

 

            अमरावती, दि. 02 (जिमाका) :  जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस अधीक्षक (ग्रामीण), अमरावती  यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

 सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा, याकरिता पोलिस आयुक्तालय परिक्षेत्र वगळून अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात लागू करण्यात आला असून दि. 14 जानेवारी 2024 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अपर जिल्हादंडाधिकारी  आशिष बिजवल  यांनी कळविले आहे.

00000

Monday, January 1, 2024

महाकृषी ऊर्जा अभियानाच्या लाभार्थी शेतकऱ्यांनी अवैध फसव्या संकेतस्थळापासून सावध राहण्याचे आवाहन

 

महाकृषी ऊर्जा अभियानाच्या लाभार्थी शेतकऱ्यांनी अवैध फसव्या संकेतस्थळापासून सावध राहण्याचे आवाहन

                अमरावती, दि. 1 (जिमाका) : महाकृषी उर्जा अभियान पीएम-कुसूम घटक-ब योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्यात येते. ऑॅनलाइन नोंदणी केलेल्या पात्र शेतकऱ्यांना महाऊर्जामार्फत एसएमएस पाठविला जातो. परंतु सद्य:स्थितीत वेगवेगळ्या बनावट वेबसाईट, सोशल मिडीयामार्फत शेतकऱ्यांची आर्थिक फसवणुक होत असल्याचे तसेच शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी खोटे संदेश पाठविण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. अश्या खोट्या व फसव्या संकेतस्थळांना,  भ्रमणध्वनीच्या संभाषणाला शेतकऱ्यांनी बळी पडु नये, असे आवाहन विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे यांनी केले आहे.

            महाकृषी उर्जा अभियान पीएम-कुसूम घटक-ब योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 3.5 व 7.5 अश्वशक्ती क्षमतेचे पारेषण विरहित सौर कृषी पंप देण्यात येत आहेत. यासाठी सौर कृषी पंपासाठी पात्र लाभार्थ्यांना सौर पंपचा क्षमतेनुसार खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यास 10 टक्के आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांस 5 टक्के लाभार्थी हिस्सा भरण्यासाठीचा एसएमएस पाठविला जातो. या योजना राबविण्यासाठी महाऊर्जामार्फत स्वतंत्र ऑनलाईन पोर्टल तयार करण्यात आले असून लाभार्थी शेतकऱ्यांनी संकेतस्थळांचा उपयोग नोंदणी व इतर माहिती प्राप्त करण्यासाठी करावयाचा आहे.

       https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component -Bhttps://kusum.mahaurja.com/beneficiary/ या ऑॅनलाइन लिंक व्यतिरिक्त महाऊर्जामार्फत कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारण्यात येत नाहीत.  फसव्या वेबसाईट, सोशल मिडीया प्लॅटफॉर्ममार्फत आर्थिक फसवणुक होत असल्यास शेतकऱ्यांनी महाऊर्जा, विभागीय कार्यालय, अमरावती दुरध्वनी क्रमांक 0721-2661610 व ई-मेल आयडी domedaamravati@ mahaurj.com  यावर संपर्क साधावा.

00000

 

अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शाळांनी अनुदान प्रस्ताव पाठविण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

 


अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शाळांनी अनुदान प्रस्ताव पाठविण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

अमरावती, दि. 1 (जिमाका) : धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान दिल्या जातो. त्याअनुषंगाने अल्पसंख्याक पात्र इच्छुक शाळांनी अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता सोमवार दि. 15 जानेवारीपर्यंत प्रस्ताव सादर करा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

शासनमान्य खासगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगर परिषद शाळा व अपंग शाळांमध्ये सन 2023-24 या वर्षासाठी अनुदान वितरणासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहे. शाळांकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांची समितीमार्फत तपासणी करुन पात्र शाळांचे प्रस्ताव पाठविण्यासाठी पुढील वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार इच्छुक शाळांकडून जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन येथील नियोजन शाखेत दि. 15 जानेवारीपर्यंत सादर करावा. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त प्रस्तावांची छाननी व त्रुटींची पूर्तता करुन अंतितरित्या प्राप्त प्रस्ताव शासनास सादर करण्याची मुदत दि. 25 जानेवारी  2024 पर्यंत आहे.

00000

हरविलेल्या व्यक्तीबाबत आवाहन (दिपा देवानंद तायडे)

 

हरविलेल्या व्यक्तीबाबत आवाहन (दिपा देवानंद तायडे)

             अमरावती, दि. 1 (जिमाका) :  येथील दिपा देवानंद तायडे  (वय 20 वर्षे, काडलकर प्लॉट, अमरावती) ही मुलगी हरविल्याची फिर्याद आशा देवानंद तायडे वय 40 वर्षे खोलापुरीगेट पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.  कु. दिपा तायडे  हि दि. 16 डिसेंबर, 2023 रोजी सायंकाळी 6.00 वाजता, भाजीपाला आणायला जाते म्हणून घरून गेली. शोध घेतला असता सापडल्या नाहीत. 

कु. दिपा देवानंद तायडे  यांचा वर्ण गोरा, उंची पाच फूट, गोल चेहरा, नाक सरळ कानात काळया रंगाचे रिंग डावे हातावर इंग्रजी मध्ये डी अक्षर गोंदले आहे. घरून जातेवेळी अंगात पांढऱ्या रंगाची टॉप  काळी लॅगीन सलवार परिधान केला होता. वरील वर्णनाची मुलगी  कुणाला आढळल्यास त्यांनी खोलापुरीगेट पोलीस ठाण्यात (0721)-2678133  या दूरध्वनी क्रमांकावर किंवा विनोद टेभुर्णे (मो. क्र.) 9855467307,  यावर संपर्क साधण्याचे आवाहन खोलापुरी गेट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी केले आहे..

00000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...