Monday, January 1, 2024

अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शाळांनी अनुदान प्रस्ताव पाठविण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

 


अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शाळांनी अनुदान प्रस्ताव पाठविण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

अमरावती, दि. 1 (जिमाका) : धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान दिल्या जातो. त्याअनुषंगाने अल्पसंख्याक पात्र इच्छुक शाळांनी अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता सोमवार दि. 15 जानेवारीपर्यंत प्रस्ताव सादर करा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

शासनमान्य खासगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगर परिषद शाळा व अपंग शाळांमध्ये सन 2023-24 या वर्षासाठी अनुदान वितरणासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहे. शाळांकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांची समितीमार्फत तपासणी करुन पात्र शाळांचे प्रस्ताव पाठविण्यासाठी पुढील वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार इच्छुक शाळांकडून जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन येथील नियोजन शाखेत दि. 15 जानेवारीपर्यंत सादर करावा. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त प्रस्तावांची छाननी व त्रुटींची पूर्तता करुन अंतितरित्या प्राप्त प्रस्ताव शासनास सादर करण्याची मुदत दि. 25 जानेवारी  2024 पर्यंत आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-02-2026

                                                         हरीसाल आरोग्य केंद्राच्या पथकाकडून मातेला जीवनदान *प्रसूतीनंतरचा गंभीर रक्तस्त्राव ...