Tuesday, January 16, 2024

सहकार विभागातील ‘जी.डी.सी. ॲन्ड अे’ परीक्षा वेळापत्रक जाहीर; परीक्षेचा कालावधी 24 ते 26 मे दरम्यान

 

सहकार विभागातील ‘जी.डी.सी. ॲन्ड अे’ परीक्षा वेळापत्रक जाहीर; परीक्षेचा कालावधी 24 ते 26 मे दरम्यान

अमरावती, दि. 16 (जिमाका): सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ (जी.डी.सी. ॲण्ड अे बोर्ड) मार्फत घेण्यात येणारी शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ (जी.डी.सी. ॲण्ड अे) व सहकार गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र सी.एच.एम परीक्षा दि. 24,25 आणि 26 मे 2024 रोजी ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दि. 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांनी केले आहे.

 

ऑनलाईन अर्ज करण्याबाबत सविस्तर सुचना खात्याच्या वेबसाईट https:gdca.maharashtra.gov.in व https:sahakarayukya.maharashtra.go.in या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. ऑनलाईन ॲलिकेशन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारे या परीक्षेसाठी अर्ज स्विकारले जाणार नाहीत. ऑनलाईन अर्ज करताना तयार केलेला स्वत:चा यूजर आयडी व पासवर्ड परीक्षार्थींनी जतन करून ठेवावा. तसेच सन 2023 चे परीक्षाचा निकाल संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

 

परीक्षेचे वेळापत्रक याप्रमाणे

 

शुक्रवार, दि. 24 मे रोजी सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत सहकारी गृहनिर्माण संस्थांचे व्यवस्थापन व दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत जमाखर्च.

शनिवार, 25 मे रोजी सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत लेखापरिक्षण व दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत सहकाराचा इतिहास, तत्वे, व्यवस्थापन.

रविवार, दि. 26 मे रोजी सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत सहकार कायदा, इतर कायदे व दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत सहकारी बॅक, संस्था व इतर वित्तीय संस्था.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 17-10-2025

                                                        जिल्हा महिला लोकशाही दिन येत्या सोमवारी अमरावती, दि. 17 (जिमाका) : जिल्हा महिला लोकश...