Monday, January 29, 2024

स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान; पंधरवाडा कालावधीत विविध जनजागृती कार्यक्रम

 स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान;

पंधरवाडा कालावधीत विविध जनजागृती कार्यक्रम

 

अमरावती, दि. 29 (जिमाका): केंद्रीय कुष्ठरोग विभागाच्या निर्देशानुसार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथीचे औचित्य साधून दि. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2024 या पंधरवाड्यात ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या पंधरवाडा कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.

 

अभियान कालावधीमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामपंचायत स्तरावर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेचे आयोजन करुन व्याख्यान, कुष्ठरोग निर्मुलन प्रतिज्ञा, कुष्ठरोगाबाबत प्रश्नोत्तरे, कुष्ठबाधित व्यक्तींचा सत्कार  करण्यात येईल. तसेच प्रत्येक शासकीय कार्यालयांमध्ये कुष्ठरोग निर्मुलन प्रतिज्ञाचे वाचन होईल. जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यामिक शाळांमध्ये अभियान कालावधीमध्ये निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, पथनाटय, रॅली तसेच जिल्हास्तरीय मॅरेथॉन, आरोग्य मेळावे असे जनजागृतीपर कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती आरोग्य सेवा कुष्ठरोग जिल्हा केंद्रीय पथक डॉ. पूनम मोहोकार यांनी दिली.

 

00000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार