Thursday, January 25, 2024

भारतीय प्रजासत्ताकाचा 74 वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात; जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

 





भारतीय प्रजासत्ताकाचा 74 वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात; जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

अमरावती, दि. 26 (जिमाका) : भारतीय प्रजासत्ताकाच्या 74 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण उत्साहात संपन्न झाले.

यावेळी पोलीस वाद्यवृंद पथकाच्या तालावर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधून प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरज वाघमारे,  निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बीजवल, उपजिल्हाधिकारी रणजित भोसले, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत म्हस्के, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, जिल्हा खनिकर्म अधिकारी इम्रान शेख, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, तहसीलदार विजय लोखंडे तसेच अधिकारी  व कर्मचारी आदी उपस्थित होते.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 17-10-2025

                                                        जिल्हा महिला लोकशाही दिन येत्या सोमवारी अमरावती, दि. 17 (जिमाका) : जिल्हा महिला लोकश...