Tuesday, January 16, 2024

हरविलेल्या व्यक्तीबाबत आवाहन (अमोल जयकृष्ण लाहे)

 


हरविलेल्या व्यक्तीबाबत आवाहन (अमोल जयकृष्ण लाहे)

 

            अमरावती, दि. 16 (जिमाका) :  येथील  अमोल जयकृष्ण लाहे  (वय 38 वर्षे, रा. रविनगर, सिटी कोतवाली, अमरावती) ही व्यक्ती हरविल्याची फिर्याद सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

अमोल जयकृष्ण लाहे हे दि. 23 जुन, 2023 रोजी गांधी चौक येथील दुकानातुन घरी जातो म्हणुन निघुन गेले व परत आले नाही. शोध घेतला असता ते सापडले नाहीत.  त्यांचा वर्ण गोरा, बांधा सडपातळ, केस मोठे, डोळे बारिक. घरून जातेवेळी  अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट, क्रिम रंगाचा पॅन्ट घातलेला होता.

 

 उपरोक्त वर्णनाची व्यक्ती कुणालाआढळल्यास त्यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.

000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार