Tuesday, January 23, 2024

अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

 

अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

 

            अमरावती, दि. 23 (जिमाका): पोलिस ठाणे सिटी कोतवाली अमरावती (शहर) अंतर्गत एका अनोळखी इसमाचा मृतदेह, इर्विन दवाखान्याच्या परिसरात सापडला आहे. मृतकाचे अंदाजे वय 42 वर्षे असून मृतकाचा बांधा सडपातळ, रंग गोरा, उंची 5 फुट 6 इंच, चेहरा लांबट, दाढी मीशी पांढरी काळी, अंगात काळ्या रंगाचे जरकीन, निळ्या रंगाचे शर्ट, काळ्या रंगाचे लोअर, उजव्या हातात आणि कंबरेला काळ्या करदोळा बाधलेला आहे.

 

मृतकाच्या नातेवाईकाचा शोध लागावा व अनोळखी इसमाची ओळख पटविण्यास पोलीस नियंत्रण कक्ष, अमरावती शहर दुरध्वनी क्रमांक - 0721-2672001 किंवा वपोनी विजयकुमार वाकसे भ्रमणध्वनी क्रं. 9923252696 व पोहेकाँ एम जुनेद बनं.1133  भ्रमणध्वनी  क्रं. 9923081375 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस स्टेशन सिटी कोतवाली, अमरावती यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 17-10-2025

                                                        जिल्हा महिला लोकशाही दिन येत्या सोमवारी अमरावती, दि. 17 (जिमाका) : जिल्हा महिला लोकश...