Tuesday, February 6, 2024

जिल्हास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवास आजपासून प्रांरभ

 जिल्हास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवास आजपासून प्रांरभ

 

अमरावती, दि. 6 (जिमाका): जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिकव्दारे जिल्हास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सव 2023-24 चे आयोजन दि. 7 ते 9 फेब्रुवारी 2024 या कालावधीत विभागीय क्रीडा संकूल, अमरावती येथे करण्यात आले आहे. या क्रीडा स्पर्धा महोत्सवात जिल्ह्यातील पंचायत समिती अधिनस्त असलेल्या जिल्हा परिषद शाळांतील तीन हजार विद्यार्थी व शिक्षक सहभागी होणार आहेत.

 

या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन सोहळा बुधवार दि. 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांचे हस्ते होणार आहे. यावेळी दिव्यांगाच्या दारी अभियानाचे मुख्य मार्गदर्शक तथा अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार रामदास तडस, खासदार नवनीत रवी राणा, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा आदी उपस्थित राहणार आहेत.

00000

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार 2022-23; क्रीडा पुरस्कारासाठी सुधारीत नियमावलीनुसार 8 फेब्रुवारीपर्यंत अर्ज आमंत्रित

 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार 2022-23; क्रीडा पुरस्कारासाठी सुधारीत नियमावलीनुसार 8 फेब्रुवारीपर्यंत अर्ज आमंत्रित

 

अमरावती, दि. 06 (जिमाका): शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, जिजामाता, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार दिव्यांग खेळाडू, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार साहसी उपक्रम या पुरस्कारांच्या नियमावलीत सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार इक्वेस्ट्रियन, गोल्फ, यॉटींग, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलियर्डस् अॅण्ड स्नूकर, सॉफ्टबॉल पुरुष व बेसबॉल महिला आणि जिम्नॅस्टिक्स एरोबिक्स, अॅक्रोबॅटिक्स या खेळांचा समावेश करण्यात आले आहे. या खेळासाठी सुधारीत नियमावलीनुसार दि.8 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

 

            सुधारीत नियमावलीनुसार पुरस्काराकरीता पात्र क्रीडा प्रकारांच्या यादीनुसार पुरस्काराकरीता अर्ज मागविण्यात आले आहेत. यातील पात्र क्रीडा प्रकारांच्या यादीमध्ये शासनाने दि. २५ जानेवारी, २०२४च्या शासन निर्णयानुसार सुधारणा केली आहे. शासनाच्या दि. २९ डिसेंबर २०२३ रोजीचा शासन निर्णयानुसार  इक्वेस्टरियन, गोल्फ, यॉटींग, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस अॅन्ड स्नूकर, सॉफ्टबॉल पुरुष व बेसबॉल महिला या खेळांचा समावेश करण्यासय व मॉडर्न पेंटॅथलॉन या खेळामध्ये गुणांकन करताना टेट्राथलॉन या उपप्रकाराचा विचार शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार 2022-23 मध्ये करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

 

 पुरस्काराकरीता विहित केलेला अर्ज क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे दि. 8 फेब्रुवारी, 2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. अर्ज स्वीकारण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे कार्यालय कार्यालयीन वेळेत सुट्टीच्या दिवशी देखील सुरु ठेवण्यात येणार आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.

00000

सीसीआयतर्फे कापूस खरेदीस सुरुवात

 सीसीआयतर्फे कापूस खरेदीस सुरुवात

 

अमरावती, दि. 6 (जिमाका): भारतीय कापूस महामंडळामार्फत जिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्रावर कापूस खरेदीस सुरुवात करण्यात आली आहे.

 

        अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे व येवदा दर्यापूर येथील कापूस खरेदी केंद्रावर भारतीय कापूस महामंडळमार्फत एफ.ए.क्यु. प्रतिच्या कापसाची किमान हमी दराने खरेदी सुरू आहे. तसेच याव्यतिरिक्त सीसीआयमार्फत जिल्ह्यातील चांदुर बाजार, दर्यापूर, वरूड व भातकुली या चार प्रास्तावित केंद्रांवर किंमान हमी दराने कापूस खरेदी केंद्र उघडण्याची कार्यवाही सुरु आहे. सर्व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी आपला कापूस आवश्यक कागदपत्रांसह सीसीआयच्या नजिकच्या खरेंदी केंद्रावर विक्री करावा, असे आवाहन प्र. विभागीय व्यवस्थापक यांनी केले आहे.

0000

अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

 



अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

             अमरावती, दि. 06 (जिमाका): पोलिस ठाणे शेंदुरजनाघाट अमरावती (शहर) अंतर्गत एका अनोळखी इसमाचा मृतदेह हा अमरावती-नरखेड रेल्वे रूटमार्गावरील धनोडी ते पूसला रेल्वे ट्रॅक जवळ सापळला. या इसमाला रेल्वेच्या धडक दिल्याने जखमी झाल्याची माहिती मिळाली. अज्ञात ईसमास प्राथमिक उपचार ग्रामीण रुग्णालय वरूड येथे तर पुढील उपचाराकरीता वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान अज्ञात इसमाचा मृत्यू झाला.

 

मृतकाचे अंदाजे वय 60 वर्षे असून मृतकाचा बांधा सडपातळ, रंग गोरा, उंची 5 फुट 6 इंच, डोक्याचे केस काळे पांढरे समोरून टक्कल पडलेले, दाढी मीशी पांढरी, अंगात काळी हिरवी रंगाची टि शर्ट व खाकी रंगाचा फुलपॅन्ट घातलेला होता.

 

            मृतकाच्या नातेवाईकाचा शोध लागावा व अनोळखी इसमाची ओळख पटविण्यास पोलीस नियंत्रण कक्ष, स. पो. नी. सतिष इंगळे भ्रमणध्वनी क्रं. 9823196824 किंवा पो. हवा. मोहन महाजन  भ्रमणध्वनी क्रं. 9850698214  या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस स्टेशन शेंदुरजनाघाट, अमरावती यांनी केले आहे.

00000

Friday, February 2, 2024

लोकशाही दिन 5 फेब्रुवारीला

 लोकशाही  दिन  5 फेब्रुवारीला

 अमरावती, दि. 2(जिमाका): जिल्हा लोकशाही दिन महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार फ्रेबुरवारी महिन्यातील जिल्हा लोकशाही दिन, सोमवार, दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. संबंधितांनी याची नोंद घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

00000

चित्ररथातून शासनाच्या विविध योजनांचा जागर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रारंभ: जिल्ह्यातील 96 गावात फिरणार चित्ररथ

 





चित्ररथातून शासनाच्या विविध योजनांचा जागर

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रारंभ: जिल्ह्यातील 96 गावात फिरणार चित्ररथ

 

अमरावती, दि. 2 (जिमाका): जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा प्रचार, प्रसार करणाऱ्या एलइडी चित्ररथास जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 96 गावामध्ये शासनाच्या विविध योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी हा चित्ररथ फिरणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातून आज सकाळी या चित्ररथाला जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले. उपसंचालक (माहिती) अनिल आलुरकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत म्हस्के, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस, प्र. जिल्हा माहिती अधिकारी अपर्णा यावलकर, माविमचे जिल्हा समन्वयक सुनील सोसे, तहसीलदार प्रशांत पडघम, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, सहायक माहिती अधिकारी सतीश बगमारे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे लेखाधिकारी श्री. बोडखे आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत शासनाच्या विभागांमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजना समाजातील तळागळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे नियोजन चित्ररथाव्दारे करण्यात आले आहे. अत्यंत सोप्या भाषेमध्ये विविध योजनांची माहिती व लाभार्थ्यांच्या मुलाखती या चित्ररथाच्या माध्यमातून गावा-गावात दाखविण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 96 गावांमध्ये हा चित्ररथ फिरून माहिती देणार असून लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी यावेळी केले. चित्ररथामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, नैसर्गिक उत्पादनांचे माहेरघर मेळघाट हाट, महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोती अभियान (उमेद), पशु संवर्धन विभाग, कृषी विभाग, उद्योग विभाग, सहकार विभागातील महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी प्रोत्साहनपर लाभ योजना, आयुष्मान योजना, शेतकरी सन्मान योजना यासह इतर योजनांची माहिती व लाभार्थ्यांच्या मुलाखती या एलइडी चित्ररथाच्या माध्यमातून दाखविण्यात येणार आहे.

000000

Thursday, February 1, 2024

भरडधान्य खरेदी नोंदणीसाठी 15 फ्रेबुवारीपर्यंत मुदतवाढ

 

भरडधान्य खरेदी नोंदणीसाठी 15 फ्रेबुवारीपर्यंत मुदतवाढ

 

            अमरावती, दि. 1 (जिमाका) :  आधारभूत किंमत खरेदी योजनेत भरडधान्य ज्वारी व मका खरेदीसाठी शेतकरी बांधवांची ऑनलाईन नोंदणीसाठी अर्ज मागविले होते. परंतु नोंदणी पुरेशी झालेली नसल्याने भरडधान्य खरेदीच्या ऑनलाईन नोंदणीकरीता मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी पात्र व इच्छूक शेतकऱ्यांनी दि. 15 फ्रेबुवारी पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी, अमरावती यांनी केले आहे.

 

            आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत राज्य शासनामार्फत भरडधान्य ज्वारी व मका खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यात अचलपूर, मोर्शी, वरुड, धामणगाव रेल्वे या चार तालुक्यात खरेदी केंद्रे उघडण्यात आली आहेत.

 

            शेतकरी नोंदणी करतांना या हंगामापासून ज्या शेतकऱ्यांचा 7/12 त्यामध्ये पिकपेऱ्याची नोंद असावी,आधार कार्ड, ॲक्टीव बँक खातेची अचूक माहिती या सर्व तपसिल दयावा, त्याशिवाय नोंदणी पूर्ण होत नाही.  त्या शेतकऱ्याने लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी स्वत: खरेदी केंद्रावर उपस्थित राहण्याबाबत जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

00000

टास्क फोर्स् सदस्य जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे विद्यार्थी,उमेदवार व संबंधित घटकांशी थेट संवाद साधणार

  भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येणार आह...