Wednesday, March 6, 2024

हरविलेल्या व्यक्तीबाबत आवाहन (अंकुश दिनेश भाकरे)

 


हरविलेल्या व्यक्तीबाबत आवाहन (अंकुश दिनेश भाकरे)

अमरावती, दि. 06 (जिमाका) :  येथील  अंकुश दिनेश भाकरे   (वय 27 वर्षे, रा. शिवणी, नांदगाव पेठ, अमरावती) ही व्यक्ती हरविल्याची फिर्याद नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

अंकुश दिनेश भाकरे हे दि. 21 मे, 2023 रोजी अमरावती येथे मामाकडे आला होता. बैतुल येथे जातो म्हणून घरून निघून गेला परंतु तो शिवणी येथे पोहचला नाही.  शोध घेतला असता ते सापडले नाहीत. त्यांचा वर्ण गोरा, उंची 5 फुट 6 इंच, घरुन जातेवेळी अंगात पांढरा रंगाचा शर्ट, निळसर रंगाचा पॅन्ट, पायात कथ्था रंगाचा बुट घातलेला होता.

 

          उपरोक्त वर्णनाची व्यक्ती कुणाला आढळल्यास त्यांनी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.

00000

 

हरविलेल्या व्यक्तीबाबत आवाहन (सौ.रामकली मंजू ठाकूर)

 


हरविलेल्या व्यक्तीबाबत आवाहन (सौ.रामकली मंजू ठाकूर)

             अमरावती, दि. 06 (जिमाका) :  येथील  सौ.रामकली मंजू ठाकूर   (वय 38 वर्षे, रा. पॉवर हाऊस झोपडपट्टी, नांदगाव पेठ, अमरावती) ही व्यक्ती हरविल्याची फिर्याद नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सौ. रामकली मंजू ठाकूर हे दि. 23 फेब्रुवारी, 2024 रोजी घरून कुणालाही काही न सांगता निघुन गेली. शोध घेतला असता ते सापडले नाहीत. त्यांचा वर्ण सावळा,बांधा सडपातळ, उंची 5 फुट, डोळे मोठे, केस लांब काळे, उजव्या हातावर रमेश असे नाव गोंदलेले होते.  घरुन जातेवेळी अंगात लाल रंगाची साडी,पायात निळ्या रंगाची स्लीपर घातलेली होती.

          उपरोक्त वर्णनाची व्यक्ती कुणाला आढळल्यास त्यांनी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.

00000

Tuesday, March 5, 2024

शहरात कलम 37 (1) व (3) लागू

 

शहरात कलम 37 (1)  व (3) लागू

             अमरावती, दि. 05 (जिमाका) :  शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस आयुक्त  (अमरावती शहर) यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

 

            सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला असून   दि. 7 ते 21 मार्च  2024 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त (अमरावती शहर)  नविनचंद्र रेड्डी  यांनी कळविले आहे.

000000

महाडीबीटी प्रणालीः महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज निकाली काढा - समाजकल्याण विभागाचे आवाहन

 

महाडीबीटी प्रणालीः महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज निकाली काढा

- समाजकल्याण विभागाचे आवाहन

             अमरावती, दि. 5 (जिमाका):  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती, प्रवर्गासाठी शिष्यवृत्ती व अन्य योजनांचा लाभ ऑनलाईन महाडीबीटी प्रणालीद्वारे दिला जातो. शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील महाडीबीटी प्रणालीवर 5 हजार 979 अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. अशा महाविद्यालयांनी आपल्यास्तरावर प्रलंबित अर्जातील त्रुटीची पूर्तता करुन तात्काळ निकाली काढावे, असे आवाहन समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

 

सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा फी योजना, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतीपूर्ती योजना व व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता या योजना राबविण्यात येतात.

 

महाडीबीटी प्रणालीवर सन 2023-24 वर्षातील अनुसूचित जाती प्रवर्गाचे एकूण 5 हजार 979 अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहे. तसेच काही महाविद्यालयाचे शिष्यवृत्ती अर्ज मागील वर्षीच्या तुलनेत कमी प्रमाणात नोंदणीकृत झालेले आहे. प्रलंबित व नोंदणी कमी झाल्याबाबत कार्यालयामार्फत वेळोवेळी पत्रव्यवहाराव्दारे आणि ऑनलाईन व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे संबंधित महाविद्यालयांना सूचित करण्यात आले आहे. परंतु अद्यापही संबंधित महाविद्यालयांनी अर्ज मंजूरी करीता जिल्हा कार्यालयाकडे सादर केलेले नाही. ही गंभीर बाब असून मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचीत राहू शकतो. त्यामुळे महाविद्यालयांतील प्राचार्यांनी आपल्या महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित असलेले पात्र अर्ज जिल्हा लॉगिन वर पाठविण्यात यावे. तसेच शिष्यवृत्ती अर्जाचे नोंदणीचे प्रमाण वाढवावे व विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये त्रुटि पूर्ततेसाठी परत केलेले अर्जाची संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून त्वरीत त्रुटिपूर्तता करून पात्र अर्ज जिल्हा लॉगिनवर पाठविण्यात यावे.

 

महाविद्यालय स्तरावर प्रलंबित महाविद्यालयाची नावे

 

                    तक्षशिला महाविद्यालय, शासकीय विदर्भ ज्ञान महाविद्यालय, श्री शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालय, आर्ट कॉम किरण नगर महाविद्यालय, भारतीय महाविद्यालय, श्री. रामकृष्ण महाविद्यालय, जे. डी. पाटील महाविद्यालय दर्यापूर, श्रीराम कला महाविद्यालय मोर्शी, जी. आर. काब्रा महाविद्यालय चांदुर बाजार, महात्मा फुले महाविद्यालय विहीगाव या महाविद्यालयांतील प्राचार्यांनी आपल्या स्तरावर प्रलंबित असलेले पात्र अर्ज जिल्हा लॉगिनवर पाठविण्याचे पत्राव्दारे कळविण्यात आले आहे.

00000

जिल्हास्तरीय गुंतवणूक शिखर परिषद गुरुवारी; उद्योजकांनी परिषदेचा लाभ घ्यावा

 

जिल्हास्तरीय गुंतवणूक शिखर परिषद गुरुवारी;

उद्योजकांनी परिषदेचा लाभ घ्यावा

अमरावती, दि. 05 (जिमाका) :  उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी गुंतवणूकदार व व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरिता जिल्हास्तरीय गुंतवणूक शिखर परिषदेचे आयोजन गुरुवार दि. 07 मार्च 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता हॉटेल ग्रँड महफिल येथे करण्यात आले आहे.

 

जिल्हास्तरीय गुंतवणूक शिखर परिषदेत जिल्ह्यातील प्रमुख उद्योग क्षेत्राबाबत चर्चासत्र, गुंतवणुकीच्या संधी, इतर क्षमता असलेल्या क्षेत्रांमधील गुंतवणूक व व्यवसाय संधीबाबत चर्चा, सामंजस्य करार इत्यादी बाबींचा समावेश राहिल. तसेच प्रातिनिधिक स्वरूपात जिल्ह्यातील उत्पादनाचे प्रदर्शनी, निर्यातक्षम उत्पादने, एक जिल्हा एक उत्पादन, जिल्ह्यातील स्थापित औद्योगिक समूह, विविध योजनेंतर्गत लाभार्थ्यांचे उत्पादने यांचे प्रदर्शनी भरवण्यात येणार आहे.

 

जिल्हास्तरावर गुंतवणूक आकर्षित करणे, जिल्हास्तरीय गुंतवणूकदार आणि व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देणे, जिल्ह्यांना विकासाचा केंद्रबिंदू मानून जिल्ह्यांच्या व राज्याच्या विकासाला चालना देणे हा परिषदेचा उद्देश आहे. परिषद ही उद्योजकांसाठी व निमंत्रकांसाठी निशुल्क असून उद्योजकांनी या परिषदेचा पूर्ण लाभ घ्यावा, असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्राचे, निलेश निकम यांनी केले आहे.

0000

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी मतदान केंद्रांची केली पाहणी; केंद्रांवरील सोयी-सुविधांचा घेतला आढावा

 











 जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी मतदान केंद्रांची केली पाहणी;

केंद्रांवरील सोयी-सुविधांचा घेतला आढावा

 

 अमरावती, दि. 05 (जिमाका):  आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी-सुविधांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी काही मतदान केंद्रांना भेटी दिल्या. यावेळी त्यांच्या सोबत पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, मनपा आयुक्त देवीदास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, पोलीस उपआयुक्त सागर पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, तहसिलदार विजय लोंखडे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी सर्वप्रथम शासकीय विद्या निकेतन जुने अद्यापक विद्यालय, नागपुरी गेट येथील मतदान केंद्राची पाहणी केली. त्यानंतर असोसिएशन उर्दु प्राथमिक व कनिष्ठ महाविद्यालय, मनपा उर्दु हायस्कुल जमील कॉलनी, मनपा शाळा क्रमांक 3 गवळीपुरा व वलगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा येथील मतदान केंद्रांची पाहणी केली. मतदान केंद्रावरील पिण्याच्या पाण्याची सुविधा, कनेक्टीव्हिटी, विजेचा पुरवठा, शौचालयाची सुविधा, दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर, रॅम्पची सुविधा यासह इतर बाबींचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.

 

दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर व्हीलचेअर उपलब्ध ठेवावी. तसेच रॅम्पही सुस्थितीत असावा. मतदानाच्या दिवशी मतदारांचे उन्हापासून सुरक्षितेसाठी मतदान केंद्रावर मंडप व आवश्यक सोईसुविधा उपलब्ध करावे. मतदान केंद्रावर एकाचवेळी गर्दी होणार नाही यासाठी योग्य नियोजन करण्याचेही सूचना जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी यावेळी दिल्या.

00000

 

 

 

जिल्ह्यात आगामी लोकसभा निवडणूकीच्या तयारीला सुरुवात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

 





जिल्ह्यात आगामी लोकसभा निवडणूकीच्या तयारीला सुरुवात

 

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

 

अमरावती, दि. 5 (जिमाका):  निवडणूकीसाठी नवतंत्रज्ञानाचा वापर, नोडल अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, 12 डी अर्ज, राजकीय पक्षांसोबत बैठकीचे आयोजन, मृत मतदारांची नावे वगळणे यासह निवडणूकविषयक विविध विषयांचा आढावा आज जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात आगामी लोकसभा निवडणूकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. कटियार यांनी विविध विषयांचा आढावा घेतला.

भारत निवडणूक आयोगाकडून लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. तत्पूर्वी, जिल्हा प्रशानाने नेमून दिलेल्या जाबाबदाऱ्या आणि कामाला सुरुवात करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. उपविभागीय अधिकारी रिचर्ड यान्थन, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विजय जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, स्वीपचे सहायक नोडल अधिकारी कैलास घोडके, जिल्हा शल्य चिकित्सक दिलीप सौंदळे आदी यावेळी उपस्थित होते.

आगामी निवडणूकीसंदर्भात जिल्ह्यातील विविध अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. निवडणूक काळात प्रत्येक टप्प्यावर करण्यात येणाऱ्या कामांचे नियोजन व त्याअनुषंगाने मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. इव्हीएम संदर्भात जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात यावे. यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्यात यावा. निवडणूक आयोगाचे अनेक ॲप्स असून या ॲप्सची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी, त्यांच्याशी संबंधित अधिकारी तसेच सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवा, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच विद्युत वि‍भागाने स्ट्राँगरुम तसेच मोजणी कक्षाची दुरुस्ती आणि अनुषंगिक तयारी तातडीने पूर्ण करावी. सहायक निवडणूक अधिकारी यांनी (एआरओ) राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठकीचे आयोजन करावे. सीमावर्ती जिल्ह्यांच्या बैठका घ्याव्यात, एक खिडकी योजना, सी-व्हिजिल, कायदा आणि सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्था, सायबर सुरक्षितता, नियंत्रण कक्ष आदींचा यावेळी आढावा घेण्यात आला.

निवडणूक कामांशी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांचे  आदेश काढून त्यांच्यावर विवक्षित कामांची जबाबदारी सोपवावी. मतदार यादीत अद्यायावत होण्यासाठी निवडणूक विभागाला सहकार्य करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. सर्व उपविभागीय अधिकारी, नोडल अधिकारी, तहसीलदार तसेच संबंधित विभागाचे विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.

00000

 

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...