Tuesday, March 5, 2024

जिल्हास्तरीय गुंतवणूक शिखर परिषद गुरुवारी; उद्योजकांनी परिषदेचा लाभ घ्यावा

 

जिल्हास्तरीय गुंतवणूक शिखर परिषद गुरुवारी;

उद्योजकांनी परिषदेचा लाभ घ्यावा

अमरावती, दि. 05 (जिमाका) :  उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी गुंतवणूकदार व व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरिता जिल्हास्तरीय गुंतवणूक शिखर परिषदेचे आयोजन गुरुवार दि. 07 मार्च 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता हॉटेल ग्रँड महफिल येथे करण्यात आले आहे.

 

जिल्हास्तरीय गुंतवणूक शिखर परिषदेत जिल्ह्यातील प्रमुख उद्योग क्षेत्राबाबत चर्चासत्र, गुंतवणुकीच्या संधी, इतर क्षमता असलेल्या क्षेत्रांमधील गुंतवणूक व व्यवसाय संधीबाबत चर्चा, सामंजस्य करार इत्यादी बाबींचा समावेश राहिल. तसेच प्रातिनिधिक स्वरूपात जिल्ह्यातील उत्पादनाचे प्रदर्शनी, निर्यातक्षम उत्पादने, एक जिल्हा एक उत्पादन, जिल्ह्यातील स्थापित औद्योगिक समूह, विविध योजनेंतर्गत लाभार्थ्यांचे उत्पादने यांचे प्रदर्शनी भरवण्यात येणार आहे.

 

जिल्हास्तरावर गुंतवणूक आकर्षित करणे, जिल्हास्तरीय गुंतवणूकदार आणि व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देणे, जिल्ह्यांना विकासाचा केंद्रबिंदू मानून जिल्ह्यांच्या व राज्याच्या विकासाला चालना देणे हा परिषदेचा उद्देश आहे. परिषद ही उद्योजकांसाठी व निमंत्रकांसाठी निशुल्क असून उद्योजकांनी या परिषदेचा पूर्ण लाभ घ्यावा, असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्राचे, निलेश निकम यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार