Sunday, March 24, 2024

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024; मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण




लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024; मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

अमरावती दि.24 (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने  मनुष्यबळ प्रशिक्षणाच्या  कार्यक्रमात आज मतदान केंद्राध्यक्ष व इतर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात प्रथम प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी मार्गदर्शन केले. मतदान पथकांनी करावयाचे कार्य, मतदान केंद्राध्यक्षाची भूमिका, ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट आदी यंत्रणा आदींबाबत सविस्तर माहिती त्यांनी दिली. निवडणुकीची प्रत्येक जबाबदारी समजून व दक्षतापूर्वक पार पाडावी. राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या आदेश व सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

निवडणूक प्रक्रिया कशा प्रकारे पार पाडावी यासाठी प्रात्यक्षिक, सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. निवडणूकीचे प्रथम प्रशिक्षण जिल्ह्यातील सर्व आठ विधानसभा मतदार संघात दि. 23 व 24 मार्च रोजी आयोजित करण्यात आले. यावेळी प्रशिक्षणाकरीता नियुक्त 12 हजार 355 मतदान केंद्राध्यक्ष तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.

00000


No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार