Friday, March 15, 2024

येत्या सोमवारी(दि.18) महिला लोकशाही दिन

 

येत्या सोमवारी(दि.18) महिला लोकशाही दिन

अमरावती, दि. 15 (जिमाका):  महिलांना त्यांच्या तक्रारी दाखल करता याव्या म्हणून महिला लोकशाही दिनाचे आयोजन प्रत्येक महिन्यांच्या तिसऱ्या सोमवारी करण्यात येते. याअनुषंगाने तिसऱ्या  सोमवारी दि. 18 मार्च रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सभागृह क्र. 1 येथे जिल्हास्तरीय महिला दिनाचे आयोजन करण्यात आले  आहे. ज्या महिलांना तक्रारी दाखल करावयाच्या आहेत त्यांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ‘दत्तात्रय सदन’ दसरा मैदान रोड, भुतेश्वर चौक, देशपांडे वाडी येथे किंवा जिल्हाधिकारी कार्यालय, सभागृह क्र. 1 अमरावती येथे तक्रारी दाखल करावे, असे आवाहन जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

 

          न्याय प्रविष्ठ करणे, विहित नमुन्यातील अर्जासोबत आवश्यक कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज, सेवा, आस्थापना विषयक बाबी तसेच वैयक्तिक स्वरूपाची तक्रार निवेदन, अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. ज्या महिलांचे तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनात तक्रारीचे निरसन झाले नाही त्याच तक्रारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनी सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 10.06.2026

  शुक्रवारी जागतिक बाल कामगार प्रथाविरोधी दिन अमरावती, दि. 10 (जिमाका) : बालमजुरी या अनिष्ठ प्रथेविरूद्ध विस्तृत प्रमाणात जनजागृती करणे आवश्...