Tuesday, March 19, 2024

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज काढले

 

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज काढले

अमरावती, दि. 19 (जिमाका):  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक जाहीर होताच शासकीय, सार्वजनिक व वैयक्तिक ठिकाणांवरील फलक, भिंतीवरील मजकूर व इतर मजकूर हटविण्यात आला.

निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्व सार्वजनिक मालमत्ता जागेवरील वॉल रायटींग 444, पोस्टर 2 हजार 345, बॅनर 1 हजार 755 व इतर ठिकाणचे 2 हजार 754 असे एकूण 7 हजार 298 मजकूर हटविण्यात आले. तसेच जिल्ह्यातील विविध वैयक्तिक ठिकाणांवरून वॉल रायटींग 68, पोस्टर 81,  बॅनर 455 व इतर ठिकाणचे 184 असे एकूण 788 मजकूर काढण्यात किंवा मिटविण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे - जिल्हाधिकारी आशिष येरेकर

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे    - जिल्हाधिकारी आशिष येरेकर *उद्दिष्ट प...