Sunday, March 24, 2024

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024; मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण




लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024; मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

अमरावती दि.24 (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने  मनुष्यबळ प्रशिक्षणाच्या  कार्यक्रमात आज मतदान केंद्राध्यक्ष व इतर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात प्रथम प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी मार्गदर्शन केले. मतदान पथकांनी करावयाचे कार्य, मतदान केंद्राध्यक्षाची भूमिका, ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट आदी यंत्रणा आदींबाबत सविस्तर माहिती त्यांनी दिली. निवडणुकीची प्रत्येक जबाबदारी समजून व दक्षतापूर्वक पार पाडावी. राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या आदेश व सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

निवडणूक प्रक्रिया कशा प्रकारे पार पाडावी यासाठी प्रात्यक्षिक, सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. निवडणूकीचे प्रथम प्रशिक्षण जिल्ह्यातील सर्व आठ विधानसभा मतदार संघात दि. 23 व 24 मार्च रोजी आयोजित करण्यात आले. यावेळी प्रशिक्षणाकरीता नियुक्त 12 हजार 355 मतदान केंद्राध्यक्ष तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.

00000


लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024; मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

 

 



लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024;

मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

 

अमरावती दि.24 (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने  मनुष्यबळ प्रशिक्षणाच्या  कार्यक्रमात आज मतदान केंद्राध्यक्ष व इतर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

 

येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात प्रथम प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी मार्गदर्शन केले. मतदान पथकांनी करावयाचे कार्य, मतदान केंद्राध्यक्षाची भूमिका, ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट आदी यंत्रणा आदींबाबत सविस्तर माहिती त्यांनी दिली. निवडणुकीची प्रत्येक जबाबदारी समजून व दक्षतापूर्वक पार पाडावी. राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या आदेश व सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

 

निवडणूक प्रक्रिया कशा प्रकारे पार पाडावी यासाठी प्रात्यक्षिक, सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. निवडणूकीचे प्रथम प्रशिक्षण जिल्ह्यातील सर्व आठ विधानसभा मतदार संघात दि. 23 व 24 मार्च रोजी आयोजित करण्यात आले. यावेळी प्रशिक्षणाकरीता नियुक्त 12 हजार 355 मतदान केंद्राध्यक्ष तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.

000000

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024; मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024; मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर

 

अमरावती दि.24 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. कार्यक्रमानुसार अमरावती लोकसभा मतदार संघासाठी दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे दिनांक 26 एप्रिल 2024 या मतदानाच्या दिवशी सर्व विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. राज्य आणि केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे, सार्वजनिक उपक्रम, कंपन्या व संस्थाना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील. तथापि अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास अशा व्यवस्थापनाने कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना कमीत कमी दोन तासाची सवलत देता येईल. मात्र त्यासाठी आस्थापना किंवा कारखाना मालकाने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहिल.

00000

संपूर्ण जिल्ह्यात ‘चुनाव की पाठशाला’; मतदारांमध्ये जनजागृती करणारा एक अभिनव उपक्रम: सौरभ कटीयार

 




संपूर्ण जिल्ह्यात ‘चुनाव की पाठशाला’;

मतदारांमध्ये जनजागृती करणारा एक अभिनव उपक्रम: सौरभ कटीयार

 

अमरावती दि.24 (जिमाका) : जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवार दि. 26 मार्चला अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण मतदान केंद्रावर "चुनाव की पाठशाला" हा उपक्रम आयोजित करण्यात येणार असून यामध्ये  जास्तीत जास्त मतदारांमध्ये मतदान करण्याविषयी जनजागृती करण्यात येईल. मतदार जनजागृती करण्याचा हा एक अभिनव उपक्रम असून यामध्ये सर्व शासकीय यंत्रणांनी सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार केले आहेत.

 

मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि अमरावती जिल्ह्यातील मतदारांची टक्केवारी वाढविण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली 'स्वीप कक्ष' अर्थात पद्धतशीरपणे मतदारांचे शिक्षण आणि निवडणूक प्रक्रियेतील सहभाग या कक्षांची स्थापना करण्यात आली असून प्रत्येक तालुक्याला एक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्ह्यातील गावागावात मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या अवलंबण्यात येत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावा यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी मंगळवारी संपूर्ण जिल्ह्यातील 2 हजार 699 मतदान केंद्रावर 'चुनाव की पाठशाला' हा उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये मतदारांमध्ये जनजागृती करणे, यांच्या समस्यांची निराकरण करणे, त्यांचे मतदार यादीतील नाव, त्यांचे मतदान केंद्र, त्याचबरोबर मतदान करण्याची पद्धत आणि त्यांच्या मतांचे मूल्ये याविषयी सविस्तर माहिती देण्यात येणार असून हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व केंद्रावर एकाच दिवशी राबवणारा अमरावती हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आहे.

 

               हा उपक्रम राबविण्यासाठी जिल्ह्यातील मतदान केंद्र जागृती कक्षा मधील प्रतिनिधी, कॉलेज कॅम्पस अँबेसिडर, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी त्याचबरोबर 'द पिंक फोर्स' मधील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, एएनएम, महिला बचत गटांच्या महिला इत्यादी या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या उपक्रमांची संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे जिल्हास्तरावरून आणि तालुकास्तरावरील वरिष्ठ अधिकारी काही मतदान केंद्रांना भेटी देणार असून ते सुद्धा या उपक्रमामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मतदार जनजागृती कक्षाचे नोडल अधिकारी डॉ. कैलास घोडके यांनी दिली आहे.

00000

Saturday, March 23, 2024

जिल्हाधिकारी कार्यालयात शहीदांना अभिवादन

 


जिल्हाधिकारी कार्यालयात शहीदांना अभिवादन

 

     अमरावती, दि. 23 : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान देणारे शहीद भगत सिंग, राजगुरु,सुखदेव यांना आज शहीद दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले.

 

     जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन सभागृहात आयोजित कार्यक्रमात तहसिलदार निलेश खटके यांनी शहीदांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

00000

कॉलेज कॅम्पस अँबेसेडर वाढविणार मतदानाचा टक्का !

 

कॉलेज कॅम्पस अँबेसेडर वाढविणार मतदानाचा टक्का !

अमरावती, दि. 23 (जिमाका) : अमरावती जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे मतदारांमध्ये जनजागृती केली जात आहे. यासाठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्याही वापरण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कैलास घोडके  यांच्या उपस्थितीत विमलाताई देशमुख महाविद्यालयात जिल्ह्यातील प्रत्येक कॉलेजमधील दोन अशा शंभर विद्यार्थ्यांची  कार्यशाळा घेण्यात आली. या सर्व विद्यार्थ्यांची कॉलेज कॅम्पस अँबेसेडर म्हणून नेमणूक करण्यात आली असून ते महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांच्या मदतीने मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी तसेच मतदारांमध्ये जनजागृती करणार आहेत.

         शहरी तसेच ग्रामीण भागातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जास्तीत -जास्त लोकांनी मतदान करावे आणि आपल्या मतदानांचा हक्क बजावावा म्हणून प्रशासन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. यासाठी मतदारांचे शिक्षण आणि मतदान प्रक्रियेतील सहभाग (स्वीप) या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ग्रामीण आणि शहरी भागात प्रचार प्रसिद्धीचे काम हाती घेण्यात आले आहे. असून  जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या अध्यक्षतेखाली  अकरा लोकांची टीम तयार केली असून ते मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी गावोगाव रॅली, महाविद्यालयात विविध स्पर्धा, सावली सभा, पिंक फोर्स, बस स्थानकावर जिंगल्स, चुनाव की पाठशाला इत्यादी माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसिद्धी करीत आहेत. यासाठी कॉलेजमधील तरुण वर्गाने पुढे यावे. त्यांनी मतदारांमध्ये जनजागृती करावी. वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून लोकांना मतदान करण्यासाठी तयार करावे. मतदारांमधील नैराश्य घालवून अमरावती जिल्ह्यात जास्तीत -जास्त मतदान कसे होईल , यासाठी कॉलेजमधील तरुण वर्गांना पुढे आणत कॉलेज कॅम्पस अँबेसिडरची नेमणूक करण्यात आली आहे . कॉलेज कॅम्पस अँबेसिडर गावात जाऊन प्रचार प्रसिद्धीचे काम करणार आहेत.  अचलपूर तहसीलदार संजय गरकल,  ज्ञानेश्वर घाटे, संजय राठी, नितीन माहुरे, पंकज मेश्राम आदींनी मार्गदर्शन केले.

0000

 

 

गावागावात 'पिंक फोर्स' पुढे येणार , मतदानाची टक्केवारी वाढणार मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी महिलांनी पुढे यावे - जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 




गावागावात 'पिंक फोर्स' पुढे येणार , मतदानाची टक्केवारी
  वाढणार

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी महिलांनी पुढे यावे

- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

              अमरावती, दि. 23 (जिमाका) : महिला शक्ती ही कोणत्याही गोष्टीत परिवर्तन घडवून आणू शकते. महिलांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवल्यास जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढेल त्यासाठी सर्व महिलांनी पुढे यावे असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.

अमरावती जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनामार्फत वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत . जिल्हा आणि तालुका पातळीवर मतदान जनजागृती करण्यासाठी मतदार जागृती कक्ष स्थापन करण्यात आले असून गावागावात मतदार जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी  यांच्या अध्यक्षतेखाली मोर्शी येथे महिला मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, एएनएम, शिक्षिका आणि बचत गटांची महिला यांचा "द पिंक फोर्स" जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते स्थापन करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.

              मागच्या वेळीच्या लोकसभेच्या तुलनेत यावर्षी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हा स्तरावरून मतदारांना वेगवेगळ्या प्रकारे आकर्षित करण्यात येत आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कैलास घोडके यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करून मतदार जनजागृती कक्षांची स्थापना करण्यात आली असून प्रत्येक तालुका स्तरावर तालुका नोडल अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. जिल्हा कक्ष आणि चौदा तालुक्याचे टीम मोठ्या प्रमाणावर जनजागृतीचा काम करत असून सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत आहे. त्याचबरोबर सायकल रॅली, विद्यार्थ्यांची रॅली, विविध स्पर्धा,  कॉलेज कॅम्पस ॲम्बेसिडरची नियुक्ती, सावली सभा, बस स्थानकावर जिंगल, जाऊ तिथे शपथ घेऊ, मतदानावर बोलू काही  यासारख्या अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रमात आयोजन केले करण्यात आले असून यावर्षी मतदानाची टक्केवारी निश्चित वाढेल असा विश्वास श्री. कटियार यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे आयोजनासाठी मोर्शीचे उपविभागीय अधिकारी प्रदीप पवार, मोर्शीचे तहसीलदार उज्वला ढोले, मोर्शीचे गटविकास अधिकारी देवयानी पोकळे, मोर्शीचे बालविकास प्रकल्प अधिकारी डॉ.नितीन उंडे, मोर्शीचे गटशिक्षणाधिकारी यांनी पुढाकार घेतला.

00000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...