Monday, April 23, 2018


महाराष्ट्रदिनानिमित्त शासकीय सोहळ्याच्या
पूर्वतयारीबाबत जिल्हाधिका-यांकडून आढावा

अमरावती, दि. 23 :  महाराष्ट्रदिनानिमित्त दि. 1 मे रोजी आयोजित शासकीय ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वतयारीबाबत आढावा जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्यासह अनेक अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.  


ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभाची काटेकोर तयारी करावी. तालुका स्तरावर ध्वजारोहणासह प्रभात फे-या आयोजित केल्या जाव्यात. शासकीय कार्यालयांवर रोषणाई केली जावी. आचारसंहितेच्या अनुषंगाने सर्व तरतुदी तपासून नियोजन करावे, अशी सूचना जिल्हाधिका-यांनी यावेळी केली. महाराष्ट्रदिनी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन वनिता समाज येथे करण्यात आले आहे.
विधानपरिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक
आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे
                                                                                                                जिल्हाधिकारी अभिजित बांगर
          अमरावती,दि.24: विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूकीदरम्यान सर्व संबंधितांकडून आचारसंहितेचे काटेकोर पालन होईल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी आज येथे दिले.  
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक- 2018 अंतर्गत अमरावती जिल्ह्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, तात्काळ प्रभावाने आचारसंहिताही लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. बांगर यांनी विविध अधिका-यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, उपजिल्हा निवडणूक अधिकारी एस. पी. पाटील, पोलीस उपअधीक्षक शिरीष राठोड, पोलीस निरीक्षक निलीमा आरज, नायब तहसीलदार नीता लबडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे श्री. कोळी आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. बांगर म्हणाले की, निवडणूक आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी तालुका स्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक व अन्य अधिकारी यांनी समन्वयाने प्रयत्न करावे. कुठेही गैरप्रकार घडू नयेत आणि कायदा व सुव्यवस्थेत बाधा येऊ नये, यासाठी चोख बंदोबस्त असावा. आचारसंहितेतील नियमांचा भंग होत असल्याचे तत्काळ कार्यवाही करावी. आवश्यक व्हिडीओ चित्रीकरण आदी तरतुदींचे काटेकोर पालन करावे. सर्व संबंधितांनीही आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन केले जाईल याची दक्षता घ्यावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. बांगर यांनी दिले.

दिलखुलास’ मध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट
मुंबई, दि. 23 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलास कार्यक्रमात सार्वजनिक शिधा वितरण व्यवस्थेचे बळकटीकरण’ या विषयावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट आणि या विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे.ही मुलाखत मंगळवार दि. 24 आणि बुधवार दि. 25 एप्रिल रोजी आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका मनाली दिक्षीत यांनी ही मुलाखत घेतली आहे.
शिधा वितरण प्रणालीचे संगणकीकरणशिधापत्रिकाचे डिजिटायजेशन व आधार लिंकिंगई -पॉस मशिनके.वाय.सी सुविधामहिला बचतगटांना शिधा वितरण केंद्रांचे वाटप,दुकानदारांसाठी थेट द्वारपोच योजना तसेच बोगस शिधापत्रिकांना आळा घालण्यासाठी राबविण्यात येणारी मोहीम याबाबतची सविस्तर माहिती श्री. बापट आणि श्री. पाठक यांनी दिलखुलासकार्यक्रमातून दिली आहे.
००००
जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात
अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट  
मुंबई, दि. 23 माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात  सार्वजनिक शिधा वितरण व्यवस्थेचे बळकटीकरण’ या विषयावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट आणि या विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि.24 एप्रिल रोजी संध्याकाळी7.30 ते 8 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका मनाली दीक्षित यांनी ही मुलाखत घेतली आहे.
            शिधा वितरण प्रणालीचे संगणकीकरणशिधापत्रिकाचे डिजिटायजेशन व आधार लिंकिंगई -पॉस मशिनके. वाय. सी सुविधामहिला बचतगटांना शिधा वितरण केंद्रांचे वाटप,दुकानदारांसाठी थेट द्वारपोच योजना तसेच बोगस शिधापत्रिकांना आळा घालण्यासाठी राबविण्यात येणारी मोहीम याबाबतची सविस्तर माहिती श्री. बापट आणि श्री. पाठक यांनी  जय महाराष्ट्रकार्यक्रमातून दिली आहे.
मुंबईत इंटलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमराज्यभर राबविणार
सुलभ वाहतूक व नियोजनाला
आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबईदि. 23 : सुलभ वाहतूकीकरिता वाहतूक नियोजनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी इंटलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर मुंबईत करण्यात येणार आहे. त्यानंतर ही यंत्रणा राज्यभर राबविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.  
परिवहन विभाग व वाहतूक पोलीस विभागमुंबई यांच्यावतीने आयोजित रस्ते सुरक्षा पंधरवड्याचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते व परिवहन मंत्री दिवाकर रावतेखासदार अरविंद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, गेल्या तीन वर्षात राज्यातील रस्ते अपघाताच्या प्रमाणात घट झाली आहे. मात्रअपघात कमी करण्यासाठी सुधारणेस आणखी वाव आहे. परिवहन विभाग व वाहतूक पोलीसांनी आणखी प्रयत्न व जाणीव जागृती तसेच नवनवीन उपक्रम राबवावेत. सीसीटीव्ही नेटवर्क, ई- चलान या उपक्रमामुळे बेशिस्त वाहतुकीवर कारवाई करणे सोपे झाले. तसेच यामुळे लोकांमध्ये धाक बसून वाहतुकीच्या शिस्तीत वाढ झाली आहे. कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात बदल दिसून येत आहे.
ऑर्टिफिशियल इंटलिजन्सच्या माध्यमामातून लोकांच्या सवयीघडणारे गुन्हेवाहतुक  यांचा अभ्यास करून त्याचे विश्लेषण करून व्यवस्था उभी करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईत प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत असलेल्या इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीममुळे रस्त्यांवरील वाहतुकीचा अभ्यास करण्यात येऊन त्याप्रमाणे वाहतुकीचे नियोजन करता येणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी टाळणे, अपघात टाळणे शक्य होत आहे. ही यंत्रणा आता लवकरच संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. इंटलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीममुळे पुण्यातील वाहतूक सुधारण्यास अधिक मदत होईलअसेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेमुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक असली तरी येथील नागरिक नियमांचे पालन योग्य रितीने करत असल्यामुळे कमी त्रास होतो. वाहनचालकांवरील कार्यवाही बरोबरच त्यांचे नियमासंबंधी लोकांचे प्रबोधन, जागृती होणे आवश्यक आहे. नागरिकांबरोबरच मुलांच्या वाहतूकविषयक शिक्षणासाठी राज्य शासन पावले उचलत आहे. परिवहन विभागाने राबविलेल्या ‘नो हॉकिंग’ हा उपक्रमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. ही एक लोकचळवळ झाली आहे. बेशिस्त रस्ते तसेच अभियांत्रिकी क्षेत्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात येत आहे.
नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर शून्य अपघातासाठी स्मार्ट इंटलिजन्स असलेली यंत्रणा तयार करण्यात येणार आहे. तसेच पुणे मुंबई महामार्गावर सुद्धा अशी यंत्रणा उभारण्यात येणार आहे. रस्ता सुरक्षा पंधरवडा हा फक्त साजरा न करता यातून सुरक्षित प्रवासासाठी लोकप्रबोधन व जागृती करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पुढाकार घ्यावाअसे आवाहनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.
            परिवहन मंत्री श्री. रावते म्हणालेरस्त्यांवरील अपघात कमी करण्यासाठी परिवहन विभाग व वाहतूक विभाग काम करत आहे. वाहने रस्त्यावर येण्यापूर्वीच ते तांत्रिकदृष्ट्या सक्षम असावेतयासाठी तंत्रशुद्धरित्या वाहन तपासणी करणारी स्वयंचलित यंत्रणा परिवहन विभागाच्या वतीने उभारण्यात येत आहे. तसेच शिकाऊ वाहनचालकांसाठी संपूर्ण ऑनलाईन यंत्रणा राज्यातील परिवहन कार्यालयात उभारण्यात आली आहे. परिवहन विभाग सक्षमपणे काम करत असून नवनवीन पद्धतीचा वापर करत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात रस्ता सुरक्षा निधी जमा झाला आहे.
            राज्यात सुमारे 3 कोटी 28 लाख वाहनांची नोंदणी झाली आहे. मुंबई पुणे सारख्या शहरामध्ये 36 लाख वाहनांची नोंदणी झाली आहेही चिंतेची बाब आहे. मुंबई सारख्या शहरात त्यामुळे वाहनतळाची समस्या निर्माण झाली आहे. पुरेशा प्रमाणात वाहनतळे उभारल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही. यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे.  राज्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे झाली आहेत. रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलीस मोठ्या प्रमाणात उपाय योजना राबवित असून आणखी प्रयत्न केले जात आहेतअसेही श्री. रावते यांनी यावेळी सांगितले.
गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तवपरिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिकमुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकरपोलीस सहआयुक्त (वाहतूक) अमितेश कुमारपरिवहन आयुक्त शेखर चन्ने आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीसपरिवहन मंत्री श्री. रावते यांनी रस्ता सुरक्षा जनजागृती फलकावर स्वाक्षरी करून या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला. पोलीस सहआयुक्त अमितेश कुमार यांनी प्रास्ताविकात वाहतूक विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
००००



बाळासाहेब पवार म्हणजे सहकारशिक्षणातील
सेवाभावी वृत्तीने काम करणारे व्यक्तिमत्व
-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
औरंगाबाददि. 21 (जिमाका) - नीतिधुरंधर या चरित्रग्रंथाचे वाचन केल्यावर बाळासाहेब पवार हे सहकार आणि शिक्षण क्षेत्रातील सेवाभावी वृत्तीने काम करणारे राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व होतंत्यांच्या या काम करण्याच्या पद्धतीचा अवलंब अनेकांनी करावा असं ते व्यक्तिमत्व होतंअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
मराठवाड्यातील समाजकारण व राजकारणातील अव्दितीय व्यक्तिमत्व बाळासाहेब पवार यांच्या नीतिधुरंधर या चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते येथील जगतगुरु तुकाराम सभागृह येथे झालात्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभूविधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेविरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील,प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे,  उद्योग मंत्री सुभाष देसाईमाजी अर्थमंत्री जयंत पाटीलखासदार चंद्रकांत खैरेचरित्रग्रंथाचे लेखक ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळेप्राध्यापक रा. रं. बोराडेमहापौर नंदकुमार घोडेले हे उपस्थित होते.
सर्वप्रथम मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मराठवाड्यातील या दिग्गज व्यक्तिमत्वाच्या चरित्रग्रंथाचे प्रकाशन करण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणालेजरी या व्यक्तिमत्त्वाची आणि त्यांची प्रत्यक्ष भेट होवू शकली नाहीतरी या चरित्रग्रंथाच्या माध्यमातून मला हे व्यक्तिमत्व समजले. मराठवाड्यातील विविध आंदोलनांचे दाखले आजही बाळासाहेबांच्या नावाने दिले जातातयातच या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाची उंची लक्षात येते. बाळासाहेब पवारांनी सामाजिक आणि राजकीय वाटचालीत स्वाभिमान जपूनअपयश आले तरी खचून न जाता आपल्या भागातील माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी अविश्रांत परिश्रम घेतलेअसे सांगून श्री. फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या कोणत्याही कामाप्रती त्यांच्या व्रतस्थ स्वभावाचे सर्वांनी अनुकरण करावेअसे आवाहन त्यांनी  केले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेमुख्यमंत्री कोण असावा या भूमिकेसाठी न्यायरितीनेअभ्यासूवृत्तीने संघर्ष स्वीकारणारेप्रामाणिक तळमळ असणारे हे व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपल्या वैयक्तिक जीवनात परंपराधार्मिक प्रथा जपल्या आणि हे करताना कुठेही जातीभेदधर्मभेद अंगिकारला नाही. समाजकारणराजकारण करण्याची इच्छा बाळगणाऱ्यांनी हा चरित्रग्रंथ जरुर वाचावाअसे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना केले. आणि या चरित्रग्रंथामुळे एका महनीय व्यक्तीचा परिचय झालायाबद्दल लेखकाप्रती आणि या चरित्रग्रंथाशी संबंधित अन्य व्यक्तींविषयी कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविक या चरित्रग्रंथाचे लेखक ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे यांनी केले. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांनीही या चरित्रग्रंथाविषयी केलेल्या प्रस्तावनेबाबत मनोगत व्यक्त केले.
या प्रकाशन सोहळयास विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकरबाळासाहेब पवारांचे सुपूत्र मानसिंग पवारमंगलसिंग पवार यांच्यासह औरंगाबादमधील सामाजिक कार्यकर्तेराजकीय दिग्गज,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्याची सुरुवात  वैष्णव जन ते..  या भजनाने झाली तर समारोप पसायदानाने झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. रुपेश मोटे यांनी केले.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे
महाराष्ट्र पोलीस यंत्रणा सक्षमसुसज्ज
-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
औरंगाबाद,दि. 21(जिमाका)---महाराष्ट्र पोलीस दल देशातील सर्वात मोठा पोलीस दल असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमाद्वारे पोलिस यंत्रणा अधिक गतिमान आणि सक्षमसुसज्ज झाली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
एमजीएम कॅम्पसच्या द्योतन सभागृहात महाराष्ट्र पोलिस दलाच्या  डिजिटल आणि स्मार्ट पोलिसिंग अंतर्गत तयार करण्यात आलेल्या एम पोलीसई-समन्स आणि यथार्थ या तीन ॲपचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.  व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेउच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती रवींद्र बोर्डेपोलिस महासंचालक सतीश माथूरविशेष पोलिस महानिरीक्षक मिलींद भारंबे  उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीगेल्या दोन-तीन वर्षात पोलीस दलाच्या कार्यद्धतीत अमुलाग्र बदल करण्यात येत असून शास्त्रीयतांत्रिक पद्धतींचा वापर करुन गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण वाढण्यास मदत झालेली आहे. पोलीस स्टेशन मध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात महाराष्ट्र राज्य पहिले असून 2015 ते  2016 या एका वर्षात पोलिस स्टेशनमध्ये  सीसीटिव्ही बसवण्याचे काम  100 टक्के पूर्ण करण्यात आले आहेअसे सांगून श्री. फडणवीस पुढे म्हणाले कीडिजिटलायझेशनचा मोठया प्रमाणात वापर करण्यात येत असून त्याद्वारे लोकांना त्रास न देता कायदा आणि सुव्यवस्था राखणेसीसीटिव्हीमुळे ई-चलानद्वारे नियम तोडणाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करत नियमांचे पालन करण्यास नागरिकांना प्रोत्साहीत करणेई-तक्रारद्वारे मोबाईलवरुन आपली तक्रार पोलिसांकडे करणे.  या गोष्टी मोठया प्रामणात शक्य होत आहेअसे श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.
सेवा देण्याचे काम पोलिस दल करतेही सेवा अधिक दर्जेदार देणे तंत्रज्ञानामुळे शक्य होत असून या पार्श्वभूमीवर यथार्थ’ ॲप सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करत पोलीस तपास अधिक पारदर्शकरित्या करणे शक्य होणार आहे. प्रामुख्याने साक्षीदारांच्या फितूर होण्यावर नियंत्रण येऊन घडलेल्या गुन्ह्यात संबंधित आरोपीला योग्य ती शिक्षा देता येईल. त्याचप्रमाणे ई-समन्स’ या ॲपमुळे अधिकृतपणा व्यापक प्रमाणात येण्यास, ‘एम पोलीस या ॲपद्वारे प्राप्त होणाऱ्या माहितीच्या विश्लेषणातून व्यक्तीची क्षमतागुणवत्ता लक्षात घेता पोलीस दलाची कार्यक्षमताउत्तरदायित्व अधिक प्रमाणात  वाढवण्यास या सर्व ॲपचा निश्चितच लाभ होईलअसे श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.
अनुभवी न्यायमुर्तीअधिकारी यांचे अनुभव कार्यशाळेद्वारे काम करणाऱ्यांपर्यंत पोहचविल्यास त्याचा फायदा होईल. यादृष्टीने अशापद्धतीच्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात यावे. पोलिसांच्या घरासाठी मोठ्या प्रमाणात काम सुरु असून पोलिसांना स्वत:च्या मालकीचे घर घेण्यासाठी कर्जवाटप करण्यात येत असून त्याचे व्याज राज्यशासन भरणार आहे. त्यादृष्टीने संबंधित वरिष्ठांनी या कामाकडे प्राधान्याने लक्ष द्यावेअसेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
विशेष पोलीस महानिरीक्षक मिलींद भारंबे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात एम पोलिस,  ई-समन्स आणि यथार्थ या तीन ॲपचे विस्तुत सादरकीकरण केले. एम पोलीस या ॲपद्वारे कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामाचे नियोजन करण्यासह सुट्ट्या व इतर प्रशासकीय बाबी पाहता येणार आहे. ई-समन्य ॲपच्या माध्यमातून व्हाट्सॲपई-मेल आणि एसएमएसद्वारे समन्स पाठवता येणार आहे. यथार्थ ॲपद्वारे गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळाचे फोटो आणि व्हीडीओ शूटींग करण्यात येणार आहे. महिलांशी संबंधित गुन्ह्यांत फिर्यादीचे व्हीडीओ रेकॉर्डींगही या ॲपमध्ये करण्यात येणार आहे. यातील पुरावे हे पोलिसांना थेट न्यायालयात सादर करता येतील.
कार्यक्रमास महापौर नंदकुमार घोडेलेखासदार चंद्रकांत खैरेआ. अतुल सावेआ. इम्तियाज जजीलआ. संजय शिरसाटआ. नारायण कुचेविभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर,जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त उदय चौधरीपोलिस अधीक्षक आरती सिंह यांच्यासह इतर संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*****


भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येणार

  भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येणार आह...