Monday, April 30, 2018

जिल्ह्यात महाराष्ट्रदिन उत्साहात साजरा
मुख्य शासकीय सोहळ्यात विभागीय आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण
             अमरावती, दि. 1 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 58 व्या वर्धापन दिनोत्सवाचा सोहळा जिल्ह्यात सर्वत्र उत्साह व मंगलमय वातावरणात पार पडला. येथील जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
सोहळ्याला विशेष पोलीस महानिरीक्षक सी. एच. वाकडे, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, महापालिका आयुक्त हेमंतकुमार पवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी आदी मान्यवरांसह विविध क्षेत्रांतील नागरिक उपस्थित होते.
सोहळ्यात प्रारंभी राष्ट्रध्वज वंदन झाले. त्यानंतर विभागीय आयुक्त श्री. सिंह यांनी जीपमधून विविध पथकांचे निरीक्षण केले. जिल्हा पोलीस दलासह वाहतूक शाखा, शहर पोलीस, अग्निशमन दल, दंगल नियंत्रण पथक, पोलीस बँड आदी विविध पथकांनी शानदार संचलन केले. संचलनाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
पोलीस दलात सतत 15 वर्षे उत्तम सेवाभिलेख ठेवल्याबद्दल पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांना मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. हवालदार अंबिकाप्रसाद यादव व पोलीस नाईक भरत मसलदी यांनाही हा सन्मान प्राप्त झाला. पोलीस उपनिरीक्षक जगदीश सावळे, सहा. उपनिरीक्षक उदय रंगारी, हवालदार धनवाल चौरपगार, प्रमोद कडू व अब्दुल सईद अब्दुल कादिर यांना उत्तम सेवेबद्दल मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रा. गजानन देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.
उपायुक्त (महसूल) गजेंद्र बावणे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, रमेश काळे, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, तहसीलदार गजेंद्र मलठाणे यांच्यासह अनेकविध अधिकारी- कर्मचारी आणि विविध क्षेत्रांतील नागरिक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
 जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. बांगर यांनी अधिकारी व कर्मचा-यांशी हस्तांदोलन करून त्यांना महाराष्ट्रदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

                                    जिल्ह्यात विविध कार्यक्रम
जिल्ह्यातील सर्व तालुका मुख्यालये, गावे आदी ठिकाणी शासकीय कार्यालये, शिक्षण संस्था, सामाजिक व स्वयंसेवी संस्था आदींकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. वॉटर कप स्पर्धेतील विविध गावांमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले.                                        
00000








जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या हस्ते ध्वजारोहण

Friday, April 27, 2018

प्राचीन संस्कृतीमुळे भारतीय संस्कृती अबाधित
देशाच्या प्रगतीसाठी सर्व समाज एकसंघ ठेवण्याची गरज



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सोलापूर दि. 27 : भारतावर अनेक आक्रमणे होवूनही प्राचीन परंपरांमुळेच भारताची संस्कृती टिकून आहे. देशातील विविध मठ संस्कार व शिक्षण प्रसार करण्याची ठिकाणे आहेत,देशातील सर्व समाज एकसंघ ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
येथील अक्कलकोट रोडवरील श्री वीरतपस्वी मंदिरात श्री बृहन्मठ होटगी संस्थेच्या श्री संकल्पसिध्दी कार्यमहोत्सव २०१८ अंतर्गत वीरशैव लिंगायत संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेत्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुखग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेपालकमंत्री विजयकुमार देशमुखजिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे,सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी,  आमदार प्रशांत परिचारकआमदार सिध्दराम म्हेत्रेडॉ. मल्लिकार्जून शिवाचार्य महास्वामीश्री श्री श्री १००८ उज्जयनी जगदगुरूश्री श्री श्री १००८ श्रीशैल जगदगुरूश्री श्री श्री १००८ काशी जगदगुरू उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणालेकोणत्याही संकल्पाची पूर्ती ही आपली भारतीय  संस्कृती आहे. होटगी मठाचे शिवाचार्यानी श्री श्री श्री १००८ जगदगुरु भगवतपाद यांची  १०८ फुट उंच मुर्तीचे लोकार्पण व १००८ शिवलिंगांची प्राणप्रतिष्ठापना करण्याचा संकल्प सोडला होता. हा संकल्प पूर्ण होईपर्यंत केवळ पाण्यावर राहण्याची कडक उपासना त्यांनी केली. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी ते अडीच वर्ष केवळ पाण्यावर राहिले. त्यांच्या पश्चात त्यांचा संकल्प त्यांच्या शिष्यांनी आणि समाजबांधवांनी पूर्ण केला ही मोठी उपलब्धी आहे.
देशातील मठांना ऐतिहासिक वारसा आहे. या मठातून शिक्षण आणि संस्कार देण्याचे काम चालते. होटगी मठालाही शिक्षण प्रसाराची मोठी परंपरा आहे. प्राचिन परंपरांमुळेच देशाची संस्कृती टिकून आहे. मठांच्या माध्यमातून समाज एकसंध ठेवण्याचे काम चालते. देशाच्या प्रगतीसाठी समाजातील दरी कमी होवून समाज एकसंध राहण्याची आवश्यकता आहेअसे ते म्हणाले.
श्रध्दा टिकली तरच देशाची अखंडता टिकणार आहे. समाजाला एकसंध ठेवण्याची सर्वांची जबाबदारी आहे. लिंगायत समाजाला इतर मागासवर्गीयांच्या सवलती मिळूवन देण्यासाठी राज्य शासन विशेष प्रयत्न करणार आहे. त्याच बरोबर बसवेश्वर महाराजांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीने पावले उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘संकल्प सिध्दीला आपल्या संस्कृतीत मोठे महत्व आहे. गुरुंनी केलेला संकल्प यानिमित्ताने सर्व शिष्यांनी व समाजाने सिध्दीला नेला आहे. समाजाच्या उत्थानासाठी हे अत्यंत महत्वाचे आहे’.
पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणालेबृहन्मठ होटगी मठाला प्राचिन इतिहास आहे. या मठाला अध्यात्मिकसांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा आहे. समाजाच्या उन्नतीसाठी या मठाच्या माध्यमातून काम सुरू आहे. योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामींच्या संकल्पाची आज संकल्पपूर्ती होत आहे. शासनाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगिण विकास सुरु आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते श्री श्री श्री १००८ जगदगुरू पंडिताराध्य भगवतपाद यांच्या १०८ फूट उंच मुर्तीचे लोकार्पण आणि १००८ शिवलिंग प्राणप्रतिष्ठापना समारंभ पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते संकल्प सिध्दी’ विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी होटगी मठ आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्यावतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यातील वधू-वरांना मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी आशीर्वाद दिले.
यावेळी  माजी मंत्री सिध्दराम म्हेत्रेडॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांचे भाषण झाले. या संमेल्लनाला राज्यासह कर्नाटकआंध्रप्रदेश राज्यातील वीरशैव समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.   
पत्रकार आरोग्य शिबीराला मुख्यमंत्र्यांची भेट
पत्रकारांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक 

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 27 : पत्रकार हे क्षेत्रियस्तरावर अत्यंत मेहनतीचे काम करतात. त्यांना वेळे काळाचं बंधन नसते, प्रसंगी चार-पाच तास थांबावे लागले तरी ते बातमी मिळवितात. त्यांच्याबाबत शासन सकारात्मक असून त्यांच्या घराच्या प्रश्नबाबतही शासन सकारात्मक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
आझाद मैदान येथे टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित पत्रकार आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेपत्रकारांना 24 तास काम करावे लागतेयामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. ताण तणाव वाढतो. पत्रकारांना सुदृढ आरोग्य लाभण्यासाठी या आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकारांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे शिबीर फायदेशीर आहेयाचा लाभ सर्व पत्रकारांनी घ्यावाअसे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच सर्व पत्रकारांना सुदृढ आरोग्य लाभोअशा शुभेच्छाही दिल्या.
यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजनआमदार राज पुरोहितडॉ. तात्याराव लहानेटीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विमल सिंगउपाध्यक्ष अतुल कदममहासचिव विलास आठवले यांच्यासह विविध दूरचित्रवाहिन्यांचे पत्रकार उपस्थित होते.
या शिबिरात सर्व माध्यमातील पत्रकारांची संपूर्ण आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात येणार आहेत.
००००
राहूल आवारे ऑलिंपिकचे मैदानही जिंका!
महाराष्ट्र तुमच्या पाठीशी 
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि. 26 : राहुल आवारे ऑलिंपिकचे मैदानही जिंका. त्यासाठी प्रशिक्षणासह आवश्यक त्या सर्व सुविधांसाठी शासन खंबीर पाठबळ देईल, संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्ण पदक पटकाविणाऱ्या राहूल आवारे यांना आज येथे गौरविले.
यावेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजनग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे प्रमुख उपस्थित होते.
ऑस्ट्रेलियामध्ये गोल्डकोस्ट येथे नुकताच पार पडलेल्या २१ व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत राहूल आवारे यांनी ५७ किलो वजनी गटात फ्रि-स्टाईल प्रकारात सुवर्णपदक पटकाविले आहे. या यशासाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मल्ल राहूल यांचे कौतुक केले. ते म्हणालेमहाराष्ट्रासाठी हे यश अभिमानास्पद आहे. आंतरराष्ट्रीयस्तरावर क्रीडा स्पर्धांत पदक पटकाविणाऱ्या क्रीडापटूंना शासकीय सेवेत थेट नियुक्तीचा निर्णय यापुर्वीच आम्ही घेतला आहे. त्यामुळे आता राहूल यांनी २०२० मध्ये टोकियो येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेच्या तयारीला लागावे आणि ऑलिंपिकचे मैदानही जिंकावे. या स्पर्धेच्या तयारीसाठी प्रशिक्षणासह आवश्यक त्या सर्व सुविधांसाठी शासन खंबीर पाठबळ देईल.
यावेळी मल्ल राहूल यांनीही कुस्तीमधील यापुढेही चमकदार कामगिरी व्हावी यासाठी मेहनत घेईनएवढ्यावरच थांबणार नाही, असे आश्वस्त केले.
यावेळी राहूल यांचे प्रशिक्षक अर्जून पुरस्कार विजेते मल्ल काका पवारदिलीप भरणेदत्ता गायकवाडगोविंद पवार आदी उपस्थित होते.
००००
जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात
सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील
मुंबईदि. 26 :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात रस्ते विकासामुळे राज्याच्या विकासाला गती’ या विषयावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून उद्या शुक्रवार दि. 27 एप्रिल रोजी संध्याकाळी 7.30 ते 8 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका मनाली दीक्षित यांनी ही मुलाखत घेतली आहे.
        खड्डेमुक्त रस्ते अभियानदोन वर्षाचे AMC, हायब्रीड ॲन्युईटी संकल्पनामुख्यमंत्री ग्रामसडक योजनागाव आणि शहरे जोडण्यासाठी शासनाने घेतलेले निर्णयसार्वजनिक बांधकाम विभागाचे सक्षमीकरणराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व नाबार्डमार्फत सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामानंतर राज्यातील रस्त्यांची स्थिती याबाबत सविस्तर माहिती श्री. पाटील यांनी  'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून दिली आहे.

Thursday, April 26, 2018

दिलखुलास मध्ये परिवहन मंत्री दिवाकर रावते
मुंबई, दि. 25 माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलास कार्यक्रमात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत गुरुवार दि. २६ ते शनिवार दि. २८ एप्रिल रोजी आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका पल्लवी मुजुमदार यांनी ही मुलाखत घेतली आहे.
बिरसा मुंडा पुनर्वसन प्रकल्पतरुण महिलांना वाहन चालकाचे प्रशिक्षणशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना, एसटी आगारांमध्ये लघु चित्रपटगृहे, परवाने मुक्त रिक्षा, खासगी टॅक्सी कंपनींना सिटी टॅक्सी नियम,महाविद्यालयीन तरुणांना वाहन चालकाचा शिकाऊ परवानाअत्याधुनिक बसपोर्टबाळासाहेब ठाकरे अपघात सहायता निधी तसेच महिला चालक असलेली अबोली रंगाची रिक्षा याबाबत माहिती श्री. रावते यांनी दिलखुलासकार्यक्रमातून दिली आहे.

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...