Friday, March 20, 2020

परमिटरूम, बार व रेस्टॉरंट आजपासून बंद


अमरावती, दि. 20 : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना अंमलात येत आहेत. जिल्ह्यातील परमिट रुम, बार व रेस्टॉरंट उद्या (21 मार्च) रात्री 8 वाजतापासून 25 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज जारी केला.
            कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी व्यक्तींमध्ये भौतिकदृष्ट्या अंतर (सोशल डिस्टन्स) राखणे गरजेचे आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व देशी दारू दुकाने, बिअर शॉपी, वाईन शॉप, परमिट रुम बार अँड रेस्टॉरंट,  सर्व क्लब, सर्व रेस्टॉरंट व तत्सम ठोक व घाऊक अनुज्ञप्त्या या कालावधीत संपूर्ण दिवस बंद  ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
            या आदेशाचे पालन न केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
                                    000 

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार